हा भेदभाव-दुजाभाव का बरं?

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
3 Oct 2008 - 11:21 am
गाभा: 

कालच "गांधीजयंती" झाली....स्वर्गीय महात्मा गांधी यांच्या विचारमुल्यांबाबत आणि ते महात्मा होते याविषयी माझ्या मनात कोणत्याही शंका नाहीत. पण गांधीजयंती ज्या उत्साहात सर्व देशभर साजरी केली जाते तशाच प्रकारे...विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, किंवा अशा अन्य वीरांना ते Glamour का मिळत नाही? त्यांची देशभक्ति किंवा त्यांचे प्रयत्न हे गांधींपेक्षा कमी होते का? ते गांधीइतके ग्रेट नव्हते का?...

मुळात अशा जयंत्या-आणि स्मृतीदिनाच्या सुट्ट्या देणे हेच माझ्या तत्वात बसत नाही...अनेक सणवार्(अनेक धर्माचे) इथे साजरे होत असल्याने आधीच कामाचे असंख्य तास फुकट जातात पण मग जर सुट्ट्या द्ययच्या असतील तर केवळ एकाच व्यक्तिच्या जयंती आणि स्मृतीदिनाच्या का बरे? तुम्हाला हा दुजाभाव आहे असं वाटत नाही का?

पर्याय दोन आहेत

१) सगळ्याच स्वातंत्रवीरांच्या जयंती आणि स्मृतीदिनाच्या सुट्ट्या कायम्च्या रद्द करणे ( उलट त्यांच्या दिव्य स्मृतीला स्मरुन त्या दिवशी अधिक तास प्रामाणिकपणे काम करणे)

२) एकूणएक स्वातंत्रवीरांच्या जयंत्या आणि स्मृतीदिनी सुट्ट्या जाहीर करुन सेक्युलर राष्ट्र असल्याचा दावा सिध्द करुन कोणाच्याही बाबतीत दुजाभाव न करणे.

........कदाचित माझे मत हे अतिशयोक्तीचे असुही शकेल पण तुम्हाला काय वाटतय?

प्रतिक्रिया

अभिजीत मोटे's picture

3 Oct 2008 - 12:12 pm | अभिजीत मोटे

काल लाल बहाद्दुर शास्त्री यांची पन जयंती होती, पन या आदर्श पंतप्रधानांबद्दल बोलताना कोणीही (राजकीय पुढारी, न्युज चेनल) दिसले नाही.
थोडक्यात काय, घराणेशाही आणी फायद्याचे राजकारण. गांधी घराण्या सारखी बाकिच्यांची घराणी मोठी नाहीत ना.......
आणी बाकीच्यांच्या नावाने राजकारण करायचे म्हणजे तोटाच जास्त.........

............अभिजीत मोटे.

धमाल मुलगा's picture

3 Oct 2008 - 12:24 pm | धमाल मुलगा

अभिजीतराव,
लाख बोललात.
केवळ 'माजी पंतप्रधान' म्हणुन उपकार केल्यासारखं बातम्यांमध्ये 'आज भुतपुर्व प्रधानमंत्री, स्व.लाल बहादुर शास्त्री इनकी भी जयंती है| ' फि नी श! ना आदरांजली, ना ह्याउप्पर दोन भलेबुरे शब्द ना काही.
तिकडे राजघाटावर मात्र लंगडत, फाफलत, कोलमडत पुष्पचक्र वाहणार्‍यांचे टेलिकास्ट्स.

येडा खवीसराव,
तुम्ही वर उल्लेख केलेल्यातल्या एकानं तरी (किंवा त्यांच्या अनुयायांनी) आपल्या विचारांचं, आचाराचं, योग-अयोग्य प्रत्येक गोष्टीचं 'सक्सेसफुल मार्केटींग' केलं आहे का?
सोप्पं आहे राव, 'बोलणार्‍याची मातीदेखील खपते..' अशा अर्थाची एक म्हण आहे.

इनोबा म्हणे's picture

3 Oct 2008 - 1:46 pm | इनोबा म्हणे

तुम्ही वर उल्लेख केलेल्यातल्या एकानं तरी (किंवा त्यांच्या अनुयायांनी) आपल्या विचारांचं, आचाराचं, योग-अयोग्य प्रत्येक गोष्टीचं 'सक्सेसफुल मार्केटींग' केलं आहे का?
सोप्पं आहे राव, 'बोलणार्‍याची मातीदेखील खपते..' अशा अर्थाची एक म्हण आहे.

सहमत आहे.

(सावरकरभक्त) - इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विजुभाऊ's picture

3 Oct 2008 - 2:46 pm | विजुभाऊ

गांधी घराण्या सारखी बाकिच्यांची घराणी मोठी नाहीत
गान्धी आणि गान्धी घराणे हे वेगवेगळे आहेत मोटेसाहेब.राजकारण आणि इतिहास माहीत करुन घ्या.
म.गान्धीना कधीच घराण्याची पार्श्वभूमी नव्हती. केवळ गोपाळ कृष्ण गोखलेंमुळे ते भारतीय राजकारणात आले. म गान्धीनी अफ्रिकेत केलेल्या कार्याची इथल्या जनसामान्याना मिहितीही नव्हती.
म.गान्धीनी स्वातन्त्र्यानन्तर कोणते पद ही घेतले नाही.
टिळकांच्या निधनानन्तर भारतीय राजकारणात एक पोकळी निर्माण झाली. टिळकानीही ब्राम्हणवादाला थोडे जास्त महत्व दिले होते.
सावरकर हे सर्वसामान्य भारतीयांपर्यन्त पोहोचु शकले नाहीत. सर्वाना समावुन घेण्यासारख्या तत्वामुळे गान्धी जनसामान्याना बापु म्हणजे स्वतःच्या वडीलांप्रमाणे वाटत असत.
राजकारण करतानासुद्धा त्यानी व्यक्ती विद्वेष मनात रुजु दिला नाही. हा खरेच मोठेपणाच आहे.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

रामपुरी's picture

4 Oct 2008 - 3:00 am | रामपुरी

म.गान्धीनी स्वातन्त्र्यानन्तर कोणते पद ही घेतले नाही.
थोडेसे बाळ ठाकरेंप्रमाणे. त्याना रीमोट हातातून जाऊ द्यायचा नव्हता त्यामुळे सरदार पटेल जास्त लायक उमेदवार असुनही नेहरू पंतप्रधान होऊ शकले. त्याआगोदर आपले महत्व कमी होऊ नये म्हणुन भगतसिंगची फाशी रोखण्यासाठी या महापुरूषाने काहीच प्रयत्न केले नाहीत. अश्या बर्‍याच गोष्टी आहेत. (अर्थात ही माझी वैयक्तीक मते आहेत)

टिळकानीही ब्राम्हणवादाला थोडे जास्त महत्व दिले होते.
फक्त ताई महाराज प्रकरणावरून हा निष्कर्ष काढला नसावा अशी आशा आहे.

मैत्र's picture

5 Oct 2008 - 4:05 pm | मैत्र

मिपावर वाचलेला गणेश विसर्जनाचा केसरीमधला टिळकांचा लेख वाचला तर ब्राम्हण्यवादापेक्षा बहुजन समाजाला एकत्र कसं आणता येइल आणि पेशवाइनंतर आलेली ब्राम्हण मराठा दुफळि कमी कशी होइल यावर त्यांचा भर होता असं वाटतं..
शाळेत टिळकांना 'तेल्या तांबोळ्यांचे' प्रतिनिधी म्हणत असं इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं आठवतं...

ध्रुवतारा's picture

3 Oct 2008 - 12:19 pm | ध्रुवतारा

ध्रुवतारा

माझ्या देखिल मनात अशिच भावना आली होती कि आपण सगळे जण सुट्ट्या घेउन एका महपुरुषाची जय॑ती का साजरी करावि ?

उलट ह्या दिवशी त्या॑चे गुण अ॑गी कारुन अपल्याल जास्त काम करायला हवे. जसे १४ एप्रिल रोजि नागपुर मध्ये १८ तास अभ्यास करुन विद्यर्थ्या॑नी Dr. बाबासाहेब आ॑बेड्कर या॑ना जय॑ती निमीत्त अभिवादन केले होते. ह्याच प्रेरणेने प्रेरीत होउन आम्ही सगळे जण काल आमच्या कर्यालयात रात्रि १०.०० वाजे पर्य॑त काम करीत होतो. म्हणजे सर्व कमाचा अढावा घेत होतो.

चक्शु's picture

3 Oct 2008 - 12:22 pm | चक्शु

सहमत !

छोटु's picture

3 Oct 2008 - 1:18 pm | छोटु

माझ्या देखिल मनात अशिच भावना आली होती कि आपण सगळे जण सुट्ट्या घेउन एका महपुरुषाची जय॑ती का साजरी करावि ?

सहमत !!!!!!

आरे येद्या खविसा तुझ्या हतात आसेल तर इन्क्म सेल्स एकसाइस ईत्यादि सर्कारि खात्यानि दुस्रा पर्याय घेत्ला तर बघ नाहितरि ते काम कर्तात त्याचा त्रासच असतो

घासू's picture

4 Oct 2008 - 1:23 pm | घासू

बरोबर आहे तुमच॑. हा भेदभाव का? गा॑धीजी मोठे आणि बाकि सर्व ....अस॑च आजकालच्या राजकारण्याच मत आहे. गा॑धीजी महान आहेतच पण याचा अर्थ असा नाही कि बाकिच्याची देशभक्ती कमी होती. गा॑धीजी॑ना इ॑ग्रजानी मारल॑ नाही तर आपल्याच देशातील एकाने त्या॑ची॑ हत्या केली हे सुद्धा विचार करण्यासारख॑ आहे.

घासू

विजुभाऊ गांधीबद्दल मला पन आदर वाटतो हो. मी ज्या गांधी घराण्याबद्दल बोललो ते इंदीरा गांधी पासून सुरू होते. मूळ गांधी घराण्यातिल कीती लोकं आता प्रसिध्दी झोतात आहेत. तूषार गांधी थोडेफार माहीत आहेत.........
बाकी राजकारण आणि इतिहास माहीत करुन घ्यायचा नक्कीच प्रयत्न करेन.

............अभिजीत मोटे.

कवटी's picture

5 Oct 2008 - 4:25 pm | कवटी

सुट्टी देउ नये अश्या मताचा आहे मी.
काय आहे हे लोक सुट्ट्या देतात आणि ड्राय डे पण ठेवतात. एक तर सुट्टी द्या नाहितर ड्राय डे करा. दोन्ही एकत्र आल्याने फार गोची होते राव.

इनोबा म्हणे's picture

5 Oct 2008 - 4:35 pm | इनोबा म्हणे

मग स्टॉक करुन ठेव ना भौ!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

धमाल मुलगा's picture

8 Oct 2008 - 9:43 am | धमाल मुलगा

=))

लै जोरात सहमत आहे!

-(जबरदस्तीमुळे ड्राय) ध मा ल.

विसोबा खेचर's picture

8 Oct 2008 - 1:05 am | विसोबा खेचर

खवीसराब,

आपले म्हणणे रास्त आहे!

आपला,
(सावरकरभक्त) तात्या.