चित्रकथी

विशेषांक's picture
विशेषांक in लेखमाला
17 Jan 2017 - 8:07 am

*/

अ‍‍ॅरि फिल्म्सचे हे एक ड्रीम प्रोजेक्ट होते. आपल्या 'गोष्ट तशी छोटी'साठी ही फिल्म त्यांनी आपल्या डेडलाइनमध्ये बनवली, जेणेकरून ती पहिल्यांदा ह्या व्यासपीठावर प्रदर्शित व्हावी. तेवढ्याकरिता खास धर्मावरमला दोन दिवस मुक्काम ठोकून ही फिल्म चित्रित केली गेली. तेलगू मित्रमैत्रिणींची मदत घेऊन .. रात्री उशिरापर्यंत जागून युद्धपातळीवर भाषांतर झाले. फिल्मच्या एडिटिंगसारखा किचकट भागही वेगाने पूर्ण केला गेला.

खास ह्या उपक्रमाकरिता एवढे कष्ट घेऊन तयार केलेली ही फिल्म, मिपावर पहिल्यांदा प्रदर्शित करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

ही फिल्म एकहाती बनवणार्‍या अ‍‍ॅरि फिल्म्सच्या संचालिका शिल्पा धेंडे ह्यांचे मिपाच्या वतीने हार्दिक आभार!

राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कलाकारांनी सादर केलेली चित्रकथी हा मिपाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण फिल्म असेल, हे नक्की!

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

17 Jan 2017 - 10:36 am | जयंत कुलकर्णी

मस्तच...
कॅमेरा कुठला अहे ? हे एवढ्यासाठी विचारतोय की या प्रतीची फिल्म बनवायला काय काय लागते हे जाणून घ्यायची इच्छा आहे..
पण हे मस्तच...

Arifilm's picture

21 Jan 2017 - 12:02 am | Arifilm

ही फिल्म बनवताना आम्ही canon 5D कॅमेरे वापरला असून Final Cut Pro या software वर एडिट केलं आहे.

अतिशय सुंदर! फेसबुक वॉलवरही दुवा दिला आहे.

यशोधरा's picture

17 Jan 2017 - 10:46 am | यशोधरा

दुव्यावर उपक्रमाचे मुपृ दिसण्याऐवजी चित्रकथीचा व्हिडिओ दिसायला हवा, त्यासाठी काय करावे?

यशोधरा's picture

17 Jan 2017 - 10:52 am | यशोधरा

जमले!

विशाखा पाटील's picture

17 Jan 2017 - 11:44 am | विशाखा पाटील

फारच सुरेख! दूरदर्शनवरच्या 'सुरभी' कार्यक्रमाची आठवण करून देणारी फिल्म आहे. अ‍‍ॅरि फिल्म्सचे आभार!

सही रे सई's picture

17 Jan 2017 - 8:42 pm | सही रे सई

+१

पद्मावति's picture

17 Jan 2017 - 12:00 pm | पद्मावति

अतिशय सुरेख. खुप धन्यवाद.

व्हिडिओचे रेझलुशन आणि फाइल साइझ देत चला. उघडायचा/डाउनलोड करायचा ते ठरवता येईल॥ अथवा या गोष्टींना आपला पास.

वेल्लाभट's picture

19 Jan 2017 - 4:35 pm | वेल्लाभट

मी काय म्हणतो कंजूसभाऊ, घरचं ब्रॉडबँड अनलिमिटेड असल्यास घरून प्ले करा विडियो. म्हणजे टेन्शन नको डेटाचं. किंवा मग लो-रेस मधे बघा, म्हणजे कमी टेन्शन. नाहीतर यूट्यूब चे व्हिडियो डाउनलोड करून देणार्‍या ऑनलाईन साईट आहेत, त्यांचा वापर करा.

पण बघा नक्की.

व्हिडिओ।फाइलची लिंक watch?v= .....पाहिजे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2017 - 7:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्रावर राईट क्लिक केल्यास लिंक आणि एंबेड कोड दोन्ही मिळतील.

देशपांडेमामा's picture

17 Jan 2017 - 1:44 pm | देशपांडेमामा

सुंदर..मुलांनापण दाखवणार आहे ही फिल्म (आणि पर्यायाने कलेची माहिती पण होइल)

देश

नीलमोहर's picture

17 Jan 2017 - 2:54 pm | नीलमोहर

खूपच सुंदर, आभार सर्वांचे.

संजय क्षीरसागर's picture

17 Jan 2017 - 3:14 pm | संजय क्षीरसागर

नवीन गोष्ट कळली. धन्यवाद !

किसन शिंदे's picture

17 Jan 2017 - 5:28 pm | किसन शिंदे

आपल्या कोकणातल्या दशावताराशी साम्य असणारा हा एक भारी प्रकार दिसतोय. चित्रे खूप सुंदर दिसतायंत सगळी.

ज्योति अळवणी's picture

17 Jan 2017 - 5:30 pm | ज्योति अळवणी

खूपच सुंदर. वेगळी माहिती कळली या निमित्ताने

पुष्करिणी's picture

17 Jan 2017 - 7:04 pm | पुष्करिणी

सुंदर, खूप आवडली चित्रकथी

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2017 - 7:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

केवळ अप्रतिम !

राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या कलाकारांनी सादर केलेली चित्रकथी हा मिपाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण फिल्म असेल, हे नक्की!

+१०००

अश्या कलाकारांचे या विशेषांकासाठी सहकार्य मिळविणार्‍या मिपाकराचे/रांचे हार्दीक अभिनंदन व धन्यवाद !!!

सामान्य वाचक's picture

17 Jan 2017 - 8:45 pm | सामान्य वाचक

यासाठी वेळ आणि कष्ट देणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन

शिल्पा धेंडे यांचे खूपच कौतुक ! नुसती एक सुंदर फिल्म बनवल्या बद्दल च नाही तर त्यावर शारीरिक व आर्थिक खर्च करून ती मिपा साठी मोफत उपलब्ध केल्या बद्दल धन्यवाद !!

प्रचेतस's picture

18 Jan 2017 - 9:27 am | प्रचेतस

अतिशय उत्कृष्ट फिल्म

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Jan 2017 - 10:37 am | कैलासवासी सोन्याबापु

सुरुवातीच्या प्रस्तावनेत फिल्म कशाबद्दल आहे, विषय, त्याच्याबद्दल केलेल्या शोधाची अनालॉजी वगैरे जर संक्षिप्त स्वरूपात मांडले असते तर माझ्या सारख्या डेटा रेशनिंग वर असलेल्या सभासदाला काही साधक बाधक कॉमेंट करता आली असती, तरीही फिल्मचे थोडे डिटेल्स जर प्रस्तावनेत संलग्न करता आले तर (अजूनही) करावेत ही नम्र विनंती.

सविता००१'s picture

18 Jan 2017 - 12:02 pm | सविता००१

मस्तच आहे ही चित्रकथी. खूप आवडली. शिल्पा धेंडे यांचे अनेकानेक आभार

सस्नेह's picture

18 Jan 2017 - 12:56 pm | सस्नेह

अतिशय सुंदर वृत्तांत चित्रकथीच्या प्रवासाचा. आणि आश्चर्यकारकरित्या गतिमान व मुग्ध करणारे तंत्र.

प्रीत-मोहर's picture

18 Jan 2017 - 3:33 pm | प्रीत-मोहर

अतिशय सुरेख!!!!

सुरेख, एक आजोबा शेवटी ते आणि त्यांचं कुटुंब महाराष्ट्रातून आंध्रात गेल्याचं नमूद करतात. मग आंध्रालगतच्या महाराष्ट्राच्या भागात देखील ही कला अजून आहे का याबद्दल माहिती मिळायला हवी.

पैसा's picture

19 Jan 2017 - 12:42 pm | पैसा

कोकणात, वेंगुर्ल्याजवळ पिंगुळी गावात या कलेचा उगम आहे असे वाचलेले आठवते. तिथे अजून काही कुटुंबात ही कला जिवंत आहे.

महाराष्ट्रात पुण्याजवळ मामुर्डी नावाच्या गावात तसेच विदर्भातही चित्रकथी कुटुंबे आहेत. परंतु दुर्देवाने यातले कोणीही हि कला पुढे नेऊ शकले नाही.
कोकणात पिंगुळी या गावात ठाकर आदिवासी ही कला सादर करतात.

चैत्रबन's picture

19 Jan 2017 - 5:33 pm | चैत्रबन

धन्यवाद...

अप्रतिम चित्रकथी!कष्ट करुन बनवलेल्या सुंदर फिल्मबद्दल धन्यवाद!

अप्रतिम चित्रकथी!कष्ट करुन बनवलेल्या सुंदर फिल्मबद्दल धन्यवाद!

नमस्कार,
चित्रकथी या माहीतीपटाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार. मिसळपावच्या माध्यमातून अगदी योग्य प्रेक्षकांपर्यंत आम्हाला पोहोचता आले यामुळे खुप समाधान वाटत आहे.

रातराणी's picture

20 Jan 2017 - 11:56 pm | रातराणी

खूप सुंदर फिल्म!

यशोधरा's picture

21 Jan 2017 - 9:51 am | यशोधरा

आज पुन्हा एकदा पाहिली ही चित्रफीत! ज्यांनी पाहिली नाही किंवा बघणं "avoid" केलं आहे, त्यांनी एक फार सुरेख अनुभव चुकवलाय हे नक्की.

अस्वस्थामा's picture

21 Jan 2017 - 5:42 pm | अस्वस्थामा

खरोखर सुंदर फिल्म.! निर्मात्यांचे आणि भाषांतरीत करुन इथे पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सर्वांचेच आभार. :)

रेवती's picture

31 Jan 2017 - 6:30 pm | रेवती

फिल्म आवडली. चित्रे व त्यावरील रंगकाम सुरेख केलेय.

अभिजीत अवलिया's picture

5 Feb 2017 - 6:56 pm | अभिजीत अवलिया

अतिशय सुंदर. संपूर्ण आयुष्य कोकणात (कणकवलीत) घालवून देखील कणकवलीपासून जेमतेम ४५ मिनिटाच्या अंतरावर असलेल्या पिंगुळी मध्ये अशी काही कला आहे हे माहीत न्हवते. आता लवकरच पिंगुळीला जाऊन शोध घेईन. कोकणातील दशावतार ह्या कलेवर एक उत्तम भाग झाला असता. ह्या उपक्रमात भाग घेऊन दशावतार ही कला लोकांसमोर आणायला हवी होती असे आता वाटतेय.

पिलीयन रायडर's picture

5 Feb 2017 - 9:24 pm | पिलीयन रायडर

मग आता करा. उपक्रम संपला तरी ह्या विषयांवर आपण काम करत राहुया. :)

Arifilm's picture

7 Feb 2017 - 1:17 pm | Arifilm

धन्यवाद. महाराष्ट्रात दुर्मिळ होत चाललेल्या अशा खुप लोककला आहेत, ज्या प्रकाशात आणणे गरजेचे आहे. दशावतरीवर काम करण्यासाठी आम्हीही उत्सुक आहोत. काही मदत लागली तर arifilms.in@gmail.com या पत्त्यावर नक्की कळवा.

चित्रफीत अतिशय नेटकी आणि देखणी झालेली आहे. अशा लुप्त होत चाललेल्या लोककलांचा दस्तावेज म्हणून या चित्रफितीचे महत्त्व मोठे आहे. अरी फिल्म्स चे आभार व कौतुक.

प्रदीप's picture

19 Feb 2017 - 6:01 pm | प्रदीप

अतिशय बोलके चित्रीकरण, नेमके संकलन व नॅरेशन. अतिशय चांगला अनुभव.

ही कला शतकांपासून चालू आहे, म्हणजे अगदी पार पूर्वीपासून हे कलाकार प्रेक्षकांना दूरचित्रवाणीचा अनुभव देत होते !

हे कौतुकास्पद आहेच, पण त्या कलाकारांची पाठ थोपटतांना बरेच वाईटही वाटत आहे. ते अशासाठी की सुमारे १९३०- ४० पासून चित्रपटांच्या जमान्यानंतर सदर लोककलाकारांना हा व्यवसाय तगवण्यासाठी केव्हढी धडपड करावी लागत असेल? आम्हा त्रयस्थ जनांना कौतुक करून पुढे जाणे सहज शक्य आहे, पण ह्यांनी त्यासाठी इतकी तोशिश का सोसावी? प्रेक्षकांच्या आश्रयाने आता ही कला जगण्याची शक्यता शून्य आहे. तेव्हा सरकारने ह्या (व अशाच इतर अनेक) पारंपारीक लोककलांना जगवण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.