भरले बांगडे

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in पाककृती
11 Jan 2017 - 5:03 pm

भरले बांगडे
.
बांगडा या माशाला स्वत;ची अशी वेगळी चव आहे.ताजे बांगडे तर नुसते तेल,कोकम मिर्चीपुड,मीठावर टाकले तरी झकास लागतत.नवरात्र सुरु झाले कि बांगड्यांचा मोसम चालू होतो तो मेपर्यंत टिकत असला तरी पावसात थंडीच्या दिवसात,सकाळी तांदूळाची गरम पेज आणि तोंडक खरपूस भाजलेला सुका बांगडा हा अजूनही मालवणी पट्ट्यातल्या लोकांचा नष्ट असतो. सुक्या बांगड्याची किस्मोर म्हणजे कोशिंबीर अगदी kiss moreच असते.ओल्या बांगड्यांचे कालवण भंडारी,मालवणी पद्धतीने झकास तर होतेच पण तिखले,हळदीच्या पानातले मोठाले हेही ढिन्च्याक असतात.साधे तुकडे तळण्यापेक्षा आमच्याकडे भरले बांगडे प्रिय.हे भरले बांगडेपण दोन तीन प्रकाराने करतात येतात.नेहमीचा लोकप्रिय प्रकार इथे देत आहे.

साहित्य:-

१.कोळीण मावशीकडून साफ करून पोटाच्या बाजूला चीर देऊन आणलेले दोन बांगडे.
.

२,अर्धी वाटी ओले खोबरे

३.अर्धी वाती चिरलेली कोथिंबीर

४. ५/६ लसूण पाकळ्या

५.अर्धा पेर आले,

६.सात /आठ मिरच्या

७ अर्ध्या लिंबाचा रस

८. मीठ चवीनुसार.

९ .दोन चमचे तेल.

१० अर्धी वाटी तान्दूळाचे पीठ

११.अर्धा चहाचमचा मिरचीपूड

१२,अर्धा चहाचा चमचा हळदपूड

कृती:-

१.बांगड्यांना थोडा लिम्बुरस आणि मीठ चोळून ठेवावे.

२,अनुक्रमांक दोन ते आठचे जिन्नस पाणी न घालता वाटावेत,

३. हे मिश्रण बांगड्याच्या पोटात दाबून भरावे. १५ मिनिटे तसेच राहू द्यावेत,

.

४.तांदळाच्या पिठात मिरचीपूड आणि हळदपूड मिसळून एकत्र करावे.त्यात बांगडे घोळवून घ्यावेत.

५.तवा चांगला तापवून त्यवर तेल पसरून घालावे.आणि बांगडे दोन्ही बाजूनी खरपूस तळून काढावेत.

भाकरी,पोळी कशासोबतही खायला तयार आहेत.

.

प्रतिक्रिया

कैवल्यसिंह's picture

11 Jan 2017 - 7:02 pm | कैवल्यसिंह

मस्त पाकृ... फोटू पन मस्त... सगळ्या माश्यांमधे बांगडा हा माझा सर्वात जास्त प्रिय मासा... तळून किंवा रस्सा करुन खाणे तो पन झणझणीत... आहाहा एकदम तों-पा-सु..

यशोधरा's picture

11 Jan 2017 - 7:10 pm | यशोधरा

सुंदर!

तेजस आठवले's picture

11 Jan 2017 - 8:30 pm | तेजस आठवले

शाकाहारी असल्याने हा प्रश्न बावळट वाटू शकेल... पण तो डोळा पण खातात का ?

Nitin Palkar's picture

11 Jan 2017 - 9:14 pm | Nitin Palkar

नाही! भारतात माशाचा डोळा खाल्ला जात नाही. पण जपान सारख्या पौर्वात्य देशांमध्ये डोळाही खाल्ला जातो.

कैवल्यसिंह's picture

11 Jan 2017 - 10:35 pm | कैवल्यसिंह

भारतामधे सुद्धा माश्याचा डोळा खातात...

वाहवा.. माशाल्ला.. सॉरी.. मासाल्ला...

पण.

भाकरी,पोळी कशासोबतही खायला तयार आहेत.

हे जरा कोरडं कॉन्बिनेशन वाटलं. बांगडा करी आणि भातासोबत हा प्रकार जास्त भारी लागेल.

पैसा's picture

12 Jan 2017 - 6:02 pm | पैसा

माहीत नाही पण माझा नवरा नेहमी असे तळलेले किंवा भरलेले मासे असतील तर त्यासोबत तूरडाळीची चिंच गूळ न घातलेली आमटी आणि भात पसंत करतो. खरे तर गोव्यातले लोक मी बघते ते बहुतेकसे माशाच्या कोणत्याही पाकृ भाताबरोबरच खातात. म्हणजे पोळी/रोटी/भाकरी वगैरे माशाच्या आमटीबरोबर लोकांना सहसा आवडत नाही. खूपशा ठिकाणी माशाच्या थाळीत पोळ्या नसतातच. नुसता उकड्या भाताचा डोंगर!

पाकृ आवडली. आजकाल मी माश्याला हात लावायला शिकलिये त्यामुळे लवकरच फिशकरी करण्यापर्यंत मजल मारावी असे वाटतेय.

पैसा's picture

12 Jan 2017 - 6:04 pm | पैसा

त्याचा तळताना वास सुटतो तेव्हा सांभाळ. मला २५ वर्षानंतरही त्या वासाची सवय झालेली नाही. शिंका सुरू होतात! =)) त्यामुले मी फक्त माशाची आमटी/हुमण करू शकते. फ्राय करायचे काम नौर्‍याचे.

यशोधरा's picture

12 Jan 2017 - 9:18 pm | यशोधरा

जरुर मारशील. तिथे तर व्यवस्थित स्वच्छ केलेले मासे मिळतात फिले वगैरे तेव्हा तुला "वासाचा" प्रॉब्लेम फारसा येऊ नये. हां, एशियन मार्केटमधून आणलंस न कापता तर मग कापणे वगैरे प्रकार करावे लागतील.

तरीही "वासाचा" खूपच अति त्रास होत असेल तर मासे आणल्यावर आणि साफ करावे लागले तर ते केल्यावर, माशांना थोडा वेळ मीठ लावून ठेवून द्यावे आणि १०- १५ मिनिटांनी स्वच्छ धुवून घ्यावे, वास वगैरे प्रकार निघून जातात, अगदी पेडवे, तार्ले आणले तरी. त्यामुळे मुळीच भीती नसावी.

पेडवे, तार्ले तोंडलावणीलाही तिथे मिळणार नाहीत हा भाग अलाहिदा.

जरुर मारशील हे जरुर करु शकशील, असे वाचावे प्लीज.

पैसा's picture

12 Jan 2017 - 6:05 pm | पैसा

अगदी निगुतीने लिहिले आणि फोटो काढले आहेस!

Ranapratap's picture

12 Jan 2017 - 6:54 pm | Ranapratap

पा कृ वाचताच करून पहिली. फारच सुंदर, भाकरी, चपाती बरोबर थोडी कोरडी वाटते पण एका बंगड्याचा रस्सा केला. मजा आली.

शाकाहारी असल्याने पाकृला पास पण सुरवातिचे वर्णन आणि माहिती नविन समजली.

शाकाहारी असल्याने पाकृला पास पण सुरवातिचे वर्णन आणि माहिती नविन समजली.

मनिमौ's picture

7 Feb 2017 - 7:59 pm | मनिमौ

सारखेच म्हणते

मुक्त विहारि's picture

8 Feb 2017 - 7:09 pm | मुक्त विहारि

वाखूसा....