भरली भेंडी(मायक्रोवेव्ह स्पेशल)-प्रकार तिसरा
झटपट होणाऱ्या पदार्थात यांचा नंबर खूपच वरचा आहे.अक्षरश: काहीं मिनिटात भेंडी शिजवून वाढता येतात.कोवळी करंगळीइतकी भेंडी या दिवसात खूप येतात. शिवाय हल्ली ओला नारळही खवलेला तयार मिळतो.बाकीचे जिन्नस घरात असतातच.हा पदार्थ माय्क्रोवेव्ह्सोबत आलेल्या श्रीमती तरला दलाल यांच्या पुस्तकातून घेतला आहे.गुजू पद्धतीच्या या पदार्थात मी थोडासा बदल करून हि कृती सिद्ध केली आहे.लिहायलाच जास्त वेळ न घालवता इथे कृतीच देते.
साहित्य;-
१.कोवळी भेडी पाव किलो
२.अर्धा ते पाउण वाटी ओले खोबरे
३.पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
४.एक मोठा चमचा धणेपूड.
५अर्ध मोठा चमचा जिरेपूड.,
६.एक मोठा चमचा मिरची पूड
७.एक चहाचा चमचा साखर
८.अर्धा चहाचा चमचा आमचूर पूड
९.चिमुटभर हिंगपूड.
१० एक मोठा चमचा तेल
११ चवीनुसार मीठ
कृती:-
१, भेंडी धुवून पुअसून डेख न काढता एक चीर द्या.
२.सर्व साहित्य एकत्र करून भेंड्यात भरा.
३.एका उथळ डिशमध्ये ही भें ठेवा व पाण्याचा एक हबका द्या.( पाण्याचा शिडकावा करा.)
४. हाय पॉवरवर मायक्रोवेव्हमध्ये चार मिनिटे शिजवा,
५.गरमागरम वाढा.
प्रतिक्रिया
11 Jan 2017 - 6:56 pm | कैवल्यसिंह
पाकृ चा फोटूच दिसत नाय... मंग कशी कळनार कशी दिसतेय ते?
14 Jan 2017 - 10:51 am | पैसा
पाकृ छान! फटु दिसत नाय!
14 Jan 2017 - 10:20 pm | रेवती
भरली भेंडी कॄती आवडली. फोटू दिसेना.
भेंडीची भाजी रोज खाल्ली तरी आवडेल .
भेंडीचे सगळे प्रकार आवडतात.
आता प्रश्न हा आहे की मला भेंडी आज भारतीय दुकानात बघावी लागेल. मिळाल्यास ही पाकृ नक्की करणार.
15 Jan 2017 - 1:35 pm | मदनबाण
भेंडी मायक्रोवेव्हमुळे गायब झाली काय ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey
16 Jan 2017 - 8:11 am | रेवती
आज केली होती ही भाजी. एकदम आवडली. आमच्याकडे दोन प्रकारात भेंडी मिळते. एक म्हणजे सडपातळ व कोवळी, ती नेहमी आपण पोहोचेपर्यंत संपलेली असते. प्रकार दुसरा जाड, गोल, बुटकी (भेंडीबद्दल सांगतिये). ती कधीतरी शिल्लक असते. प्रकार दुसरा शिल्लक होता. तो आणून ही पाकृ केली. भेंडीची भाजी मुलगा खातो पण आज त्याने आपण होऊन जास्तीची वाढून घेतली, जे कधी होत नाही. मायक्रो पाकृ असल्याने परतत बसण्याचा प्रकार नव्हता. त्यानेच बरे वाटले. पुन्हा भेंडी आणीन तेंव्हा याच प्रकाराने करीन.