साहित्य
३ १/२ ते ४ कप मैदा
१/४ कप दूध
३/४ कप पाणी
३ मोठे चमचे लोणी/बटर
३ मोठे चमचे मध
१ अंडे, फेटून
३ चमचे ऍक्टिव्ह ड्राय यीस्ट
सारणासाठी
२ चमचे लोणी/बटर
१ चमचा लसूण, बारीक चिरलेला
१ मोठा कांदा, उभा चिरून
१ मोठा टोमॅटो, बिया/गर काढून, बारीक चिरून
२ चमचे मिक्सइड हर्ब्स
२ चमचे मिरी पावडर (असल्यास सफेद)
मीठ, चवीनुसार
८ ते १० मोठे चमचे किसलेले चीज
कृती
गॅसवर किंवा मायक्रोव्हेव मध्ये, लोणी, दूध आणि पाणी एकत्र करून, लोणी वितळेस्तोवर गरम करून घ्या. एका मोठ्या भांड्यात काढून, गार करायला ठेवा. गार झाले, कि ह्यात मध, आणि १ १/२ कप मैदा घालून मिश्रण नीट ढवळून घ्या. ह्या मिश्रणात आता यीस्ट, आणि फेटलेले अंड घालून मिश्रण नीट मिसळून, १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा.
आत ह्या मिश्रणात, २ १/२ कप मैदा आणि मीठ घालून, मिश्रण कट्ट्यावर/ओट्यावर मळून घ्या. साधारण १० ते १५ मिनिटे मऊसर मळून, पिठाचा गोळा, एका तेल लावलेल्या भांड्यात ठेवून द्या. वरून ओले फडक्याने झाकून साधारण एक ते दिड तास बाजूला ठेऊन द्या. तो पर्येंत सारण करून घ्या.
पिठाचा गोळा फुगून वर आला कि कट्ट्यावर/ओट्यावर थोडा मैदा भुरभुरून हा गोळा हाताने दाबून घ्या. हा गोळा आता आयताकृती (साधारण १२ इंच x २४ इंच) असा पातळ लाटून घ्या.
सर्व बाजूने २ इंच सोडून, ह्यावर थंड झालेले सारण पसरवून घ्या. निम्मे किसलेले चीज पसरून, मग कडा आत मध्ये फोल्ड करून घ्या. आता ह्याचा अलगद हाताने रोल करून, त्या रोल चे सम असे १२ किंवा १६ भाग सुरीने कापून घ्या.
कप केक च्या साच्यांना तेलाचे बोट किंवा स्प्रे मारून, हे रोल त्यात टाका. परत एकदा ओल्या फडक्याने झाकून साधारण १ तास ठेवा.
ओव्हन १८० डिग्री ला प्री-हिट करून घ्या. रोल वर उरलेले चीज टाकून, हे रोल ओव्हन मध्ये २० ते २५ मिनिटे भाजून घ्या. बाहेर काढून १० ते १५ मिनिटे गार करायला ठेवा, आणि नंतर साच्यांमधून बाहेर काढून खायला घ्या!
सारणची कृती
एका पॅन मध्ये बटर घेऊन बटर गरम झाले कि त्यात लसूण टाकून परतून घ्या. ह्यात उभा चिरलेला कांदा टाकून अजून काही मिनिटे परतून घ्या. आता पॅन मध्ये चिरलेला टोमॅटो टाकून परतून घ्या. शेवटी मिरी पावडर, हर्ब्स आणि चवीनुसार मीठ टाकून, हे सारण थंड करायला बाजूला ठेवा.
टीप.
सारणासाठी तुम्ही खालील पर्याय वापरू शकता:
- सामोश्याचे सारण करून असेच सामोसा पिन-व्हील बनवता येतील.(कप केक च्या साच्यात नं टाकता तसेच ट्रे वर बेक करून घायचे)
- पिझ्झा टॉपिंग्स म्हणजे ढोबळी मिरची, मशरूम, पिझ्झा सौस.
- ब्रेकफास्ट बन्स, ह्यासाठी अंडा भुर्जी किंवा स्क्रॅम्बल्ड एग्ग्स, सोबत सौसेज आणि बेकन चे तुकडे घालून [हे अप्रतिम लागतात.]
- मुलांसाठी गोड करायचे असतील, तर ह्यात जॅम आणि फळांचे काप (स्ट्राबेरी जॅम आणि त्याचे काप)
- सामिष बनवायचे असतील तर ह्यात चिकन/मटण खिमा घालून सारण बनवू शकता
प्रतिक्रिया
7 Jan 2017 - 10:10 am | फेदरवेट साहेब
ओ माय, धीस इज क्वाइट इंग्लिश, फकस्त आपुन त्यात , स्ट्रॉंग इंग्लिश चेडार चीज घालनार, प्रोसेस्ड व्हाईट इज नॉट अवर स्टाईल यु नो.
7 Jan 2017 - 11:44 am | कैवल्यसिंह
वा मस्त तों-पा-सु पाकृ.. मस्त.. एकदम झक्कास..
7 Jan 2017 - 7:57 pm | सविता००१
छानच दिसतय.
7 Jan 2017 - 8:50 pm | तुषार काळभोर
अमा केडी मियाँ, हमारा कत्ल करोगे क्या!
7 Jan 2017 - 11:02 pm | अत्रुप्त आत्मा
अरे दुष्ट माणसा... आता मला ह्यो पदार्थ माझ्या घरी येऊन करून खायला घाल. नैतर ... ल्लुल्लुल्लुल्लु! =))
7 Jan 2017 - 11:46 pm | रेवती
पदार्थ छान दिसतोय.
10 Jan 2017 - 1:04 am | सही रे सई
लय भारी