मी काही महिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्ती (गुलटेकडी, पुणे ) मध्ये अभ्यासिकेत शिकवायला जायचो. त्यावेळी ओमला भेटलो. त्यावेळी तो ९ वी मध्ये होता. तो मुळचा बीडचा आहे. वस्तीतून मेहनत करून १० वी ला ७०% आणि १२ वी ला ७१% मिळवून तो पास झाला. आत्ता सध्या तो हॉटेल व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमाला (AISSMS College of Hotel Management & Catering Technology, पुणे) मध्ये चौथ्या वर्षाला आहे. पहिली तिन्ही वर्ष फर्स्ट क्लास आहे त्याला. तसेच शिकत असतानाच त्याने बिबेवेवाडीच्या (पुणे) हॉटेल Regent चे (रासकर palace) किचन २ वर्ष सांभाळले आहे. आत्ता सध्या तो city pride सातारा रोड च्या mcdonalds चा manager आहे.
त्याला पुढे नोकरी करत करत शिकायचे आहे. त्याची आवड Food Production(Culinary) मध्ये आहे.
जगात कुठे पण जायची आणि कितीपण कष्ट करायाची त्याची तयारी आहे.
मी अभियांत्रिकी केले असल्याने मला त्याच्या क्षेत्रातले काहीच माहिती नाही. या बाबतीत आपले अनुभवी मिपाकर नक्की मदत करतील याची मला खात्री आहे. धन्यवाद !
जेडी.
प्रतिक्रिया
4 Jan 2017 - 10:04 am | पिंगू
निनादला विचारा. त्याला या क्षेत्रातील खाचखळगे चांगलेच माहिती आहेत.
4 Jan 2017 - 10:15 am | सुधांशुनूलकर
पेठकरकाकाही या क्षेत्रातले अनुभवी आणि जाणकार आहेत. तेही मार्गदर्शन करू शकतील.
4 Jan 2017 - 1:35 pm | पुंबा
ओमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपले अभिनंदन.
4 Jan 2017 - 2:08 pm | खेडूत
चौकशी करून कळवतो.
माझ्या परिचयाचा एक जण या अभ्यासक्रमातून पदव्युत्तर झाला आहे. त्याने बेकरीमधे प्राविण्य मिळवले आहे आणि स्वत:ची उत्पादने सुरू केलीयत. त्याच्या मते या क्षेत्रात उत्तम इंग्रजी संभाषण यायला हवे. त्यामुळे कांही मराठी मुले मागे रहातात. त्याने पदवीनंतर अनुभवासाठी ताज मधे काम केले होते. तो कॉन्व्हेंट शाळेतून आला होता, म्हणून सोपे गेले.
4 Jan 2017 - 6:27 pm | रेवती
या क्षेत्रातील फारशी माहिती नाही पण असं ऐकलय की क्रूझ शिपवरही पोझिशन्स असतात व पैसे चांगले मिळतात, अनुभव मिळतो.