साहित्य
१० ब्रेड स्लाईस
२ मध्यम आकाराचे बटाटे, उकडून, किसून
२ बारीक चिरलेल्या शिमला मिरच्या
४ ते ५ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ इंच आलं, बारीक चिरून
८ ते १० लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१ बारीक चिरलेला कांदा
२ मोठे चमचे सोया सौंस
१ चमचा मिरपूड (असल्यास सफेद)
मीठ चवीनुसार
१/२ कप कॉर्नफ्लॉर
३ ते ४ चमचे पांढरे तीळ
तळणीसाठी तेल
कृती
ब्रेडच्या कडा काढून वाटीने गोलाकार कापून घ्या. बटाट्यांपासून ते मीठा पर्येंत सर्व जिन्नस एका बाऊल मध्ये मिक्स करून घ्या. हे मिश्रण आता ब्रेडच्या कॉइन वर दाबून बसवा. एका ताटलीत तीळ पसरवून, ब्रेड चे मिश्रण लावलेले कॉइन तिळाच्या ताटलीत दाबून घ्या. सगळ्या ब्रेड च्या कॉईन्स ना मिश्रण आणि तीळ लावून झाले कि ते फ्रिज मध्ये साधारण २० ते २५ मिनिटे ठेऊन द्या.
कॉर्नफ्लॉर मध्ये पाणी घालून त्याची पातळीशी पेस्ट बनवून घ्या. कढईत तेल गरम करून, कॉईन्स कॉर्नफ्लॉर च्या पेस्ट मध्ये घोळवून, मंद आचेवर हे कॉईन्स तळून घ्या.
गरम गरम व्हेज गोल्ड कॉईन्स शेजवान सौंस बरोबर खायला घ्या!
ह्यात चिकन चे शिजवलेले तुकडे घालून, चिकन गोल्ड कॉईन्स बनवू शकता. बऱ्याच हॉटेल मध्ये एक चायनीज स्टार्टर म्हणून हा पदार्थ सेंसमी टोस्ट नावाखाली मिळतो. भाज्यांमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे पण वापरून बघू शकता, कांद्या ऐवजी, कांदेपात वापरून बघा.
प्रतिक्रिया
3 Jan 2017 - 6:40 pm | कैवल्यसिंह
वा वा काय दिसतेय पाककृती... एकदम झक्कास.... जाम भारी... मोबाईलच्या स्क्रिनमधे हात घालता आला आसता.. तर सगळे मीच संपवले आसते सगळे गोल्ड कॉईन...
:-) :-)
3 Jan 2017 - 7:00 pm | पिलीयन रायडर
अहाहा!! ह्याचं एयर फ्रायर व्हर्जन होऊ शकेल ना?
3 Jan 2017 - 10:30 pm | केडी
एयर फ्रायर मध्ये सुद्धा होतील हे, प्रयत्न करून बघायला हरकत नाही.
3 Jan 2017 - 7:21 pm | के.पी.
पाकृचं नाव वाचल्यावर वाटलं की किचकट पाकृ असणार बहुतेक,पण ही तर फारच सोप्पी आहे! मस्त..
3 Jan 2017 - 8:28 pm | इशा१२३
मस्त पाकृ!
3 Jan 2017 - 8:28 pm | इशा१२३
मस्त पाकृ!
3 Jan 2017 - 8:41 pm | तुषार काळभोर
एकदम सोप्पी!!!
3 Jan 2017 - 8:44 pm | सही रे सई
मस्तच.. तोंपासू
3 Jan 2017 - 10:02 pm | पद्मावति
मस्तच.
3 Jan 2017 - 11:21 pm | नूतन सावंत
मस्त पाककृती
4 Jan 2017 - 7:52 am | अजया
मस्त.
4 Jan 2017 - 12:24 pm | सविता००१
यात मी मका, गाजर आणि खूप बारीक चिरून फ्रेन्च बीन्स पण घातल्या. भन्नाट मस्त झाली कॉईन्स.
धन्यवाद
4 Jan 2017 - 1:21 pm | केडी
फोटो काढले असतील तर इथे जरूर टाका!
7 Jan 2017 - 5:11 pm | केडी
सविता००१ हिने केलेल्या ह्या पाककृती चा फोटो इथे देत आहे. तिला सध्या मिपा वर फोटो टाकणे जमत नाहीये म्हणून... मस्त आलाय फोटो, आणि मांडणी झकास केली आहे!
7 Jan 2017 - 7:19 pm | सविता००१
7 Jan 2017 - 7:20 pm | सविता००१
7 Jan 2017 - 7:20 pm | सविता००१
7 Jan 2017 - 7:54 pm | सविता००१
चुकून तीनदा झाला प्रतिसाद. कसा काय ते नाही कळालं.
केडी: मोठ्ठ काम केलस माझ तू. धन्स रे
4 Jan 2017 - 6:56 pm | दिपक.कुवेत
फोटो फारच कातील आलेत....
5 Jan 2017 - 1:08 am | रुपी
मस्त.. तोंपासु :)
5 Jan 2017 - 4:12 pm | अत्रुप्त आत्मा
दुत्त दुत्त!
5 Jan 2017 - 6:35 pm | सूड
सुंदर, विकांती करुन बघणेत येईल.
6 Jan 2017 - 8:35 am | फेदरवेट साहेब
ब्रेड फ्राय केला तर किती ऑइल पिणार सन? एअर फ्रायर व्हर्जन दे नी दिकरा.