सचिननामा-३: पुन्हा फॉर्मात

फारएन्ड's picture
फारएन्ड in क्रिडा जगत
31 Dec 2016 - 7:40 am

६. जुलै १९९९ ते मार्च २०००

सचिनचा दुसर्‍यांदा कप्तानपदाचा काळ. १९९९च्या वर्ल्ड कपच्या शेवटी अझरचे कप्तानपद पुन्हा जाणार हे दिसू लागले होते. सचिन कप्तान नको असे अनेकांना वाटत होते. पण दुसरा कोणीही तयार दिसत नव्हता. त्यात अझर संघातूनही बाहेर जाईल अशीच चिन्हे होती. शेवटी नाइलाजाने परत दीड वर्षांनंतर सचिनकडे ती जबाबदारी दिली गेली असावी. आणि पुन्हा फॅन्स या दृष्टीने एक बोअर कालावधी सुरू झाला.

तसे सचिनने या काळात भरपूर रन्स केल्या. पहिल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये एक शतक व एक द्विशतकही मारले. पण खरे सांगायचे तर ते लाइव्ह बघताना भयंकर बोअर झाले. टीपिकल सचिनची इनिंग नव्हती ती. कप्तानपदाच्या पहिल्या काळाप्रमाणेच येथेही एरव्ही सहज जिंकू शकू अशा परिस्थितीतील मॅच भारताला जिंकता आली नाही न्यूझीलंड विरूद्ध घरच्या मैदानावर स्पिनर्स असूनही. मोहाली ला पहिल्या डावात केवळ ८३ वर ऑल आउट झाल्यावर दुसर्‍या डावात सचिन व द्रविड च्या शतकांमुळे व भागीदारी मुळे भारताने ५००+ रन्स मारले. पण किवीज ना ३७४ चे टार्गेट, त्यांना उडवायला जवळजवळ दीडशे ओव्हर्स व घरचे मैदान असतानाही आपण मॅच संपवू शकलो नाही. पण पुढची कानपूरची मॅच जिंकल्यामुळे आपण सिरीज जिंकली.

त्यात घरच्या मैदानावरील न्यूझीलंड विरूद्धच्या एकूण बर्‍यापैकी कामगिरीवरून भारतातील अनेक महाभाग आता हा संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍याकरता तयार झालाय असे भाकीत करू लागले. पण संघनिवडीपासूनच अनेक गडबडी सुरू झाल्या. कोच म्हणून कपिल होता. आधी तो संघात असताना सचिन बरोबर त्याचे चांगले जमायचे पण या कोच-कप्तान जोडीचे फारसे जमले नाही. सचिन ला मनासारखा संघ मिळाला नाही अशी जाहीर चर्चा होत होती. त्यात बीसीसीआय च्या जयवंत लेले यांनी हा संघ ०-३ हरून परतेल असे वक्तव्य केले.

आणि जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऑसी टीम विरुद्ध भारताची कामगिरी तशीच झाली. सचिन ची बॅटिंग चांगली झाली. मेलबोर्न ला इतर सगळे पडत असताना नवा वेगवान बोलर ब्रेट ली विरुद्ध उभे राहून त्याने मारलेले शतक जबरदस्त होते. तसेच वन डे सिरीज मधे एकदा पाक विरुद्ध मारलेले ९३ ही. पण एकूण सुमार सांघिक कामगिरी मुळे संघावर व कप्तान म्हणून सचिन वर बरीच टीका झाली.

ही सिरीज संपल्यावर लगेच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होम सिरीज होती. त्या सिरीज मधल्या कसोटी सामन्यांत त्याने नेतृत्व केले पण ते सुरू होण्याआधीच त्याने घोषित केले की त्यानंतर तो कप्तानपद सोडणार. त्याप्रमाणे ते त्याने सोडले व गांगुली कप्तान झाला. सचिन च्या कप्तानपदाची कारकीर्द येथे संपली. पुढे २००५ च्या आसपास चर्चा सुरू होती पण सुदैवाने तो झाला नाही.

इतर फलंदाज - अझर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, देवांग गांधी, रमेश
ओपनर्स - रमेश-देवांग गांधी, (एम एस के) प्रसाद-लक्ष्मण

७. ऑक्टोबर २००० ते एप्रिल २००४
इथे मधली गॅप सोडून थेट ऑक्टोबर पासून धरले आहे. कारण मधे क्रिकेट फारसे नव्हते.

मग ऑक्टोबर मधे नैरोबीला आयसीसी ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाली. सचिन डोक्यावरचे ओझे मोकळे झाल्यासारखा पुन्हा एकदा खेळू लागला. इथे त्याला आधी ऑस्ट्रेलियात सतावल्यावर मॅग्राथ परत पहिल्यांदाच भेटत होता. पण आता सचिन त्याच्यावर फोकस करायला मोकळा होता. आणि इथे जरी त्याने फक्त ३८ मारले, तरी मॅग्राथ वर चढवलेला हल्ला जबरदस्त होता. त्याची बोलिंग पूर्ण बिघडवली त्याने इथे - ९ ओव्हर्स मधे ६१ रन्स आणि नो विकेट. हेच तंत्र तो नंतर २००१ मधे त्याने वापरले, त्याची ही सुरूवात होती. या मॅच नंतर आफ्रिकेविरूद्ध ३९ मारले, आणि फायनल मधे न्यूझीलंड विरूद्ध आक्रमक ६९ मारून तो शतकाच्या वाटेवर होता, पण गांगुली व त्याच्यात गोंधळ झाल्याने तो रन आउट झाला. ही फायनल मधली त्याची बॅटिंग जबरदस्त आहे. इथे दोन वर्षांपूर्वीचा आक्रमकपणा व शॉट्स मधला 'पंच' परत आला.

इथून त्याचा आक्रमक खेळ पुन्हा सुरू झाला.
ही एक २००१ ची द आफ्रिकेतील - 'बॅकफुट सेंचुरी' किंवा 'थर्ड मॅन सेंचुरी' असेही म्हणता येइल. या सिरीज मधे डोनाल्ड नव्हता (वो भी एक लंबी कहानी है. दादा व पोलॉक च्या खुन्नसची. पण ती वन डेज मधे). पण तरीही पोलॉक, क्लुजनर, कालिस, एन्टिनी व हेवर्ड हे सगळे होते. चांगला बाउन्स व कॅरी असलेल्या ब्लोएमफाँतेन च्या पिचवर पहिल्या टेस्ट च्या रिच्युअल प्रमाणे आपली नेहमीची त्या काळची रडकथा सुरू झाली होती. पहिली बॅटिंग व ४३ ला २. तेव्हा सचिन आला, नंतर ६८/४. इथे त्याच्याबरोबर कसोटी पदार्पण करत असलेला वीरू आला.

पुढच्या सुमारे ३५-४० ओव्हर्स आफ्रिकेने सतत फास्ट बोलर्स वापरले व सर्वांनी ऑफ साईड ची लाईन व शॉर्ट पिच बोलिंग हे पूर्ण वेळ सतत वापरले. त्याला प्रत्युत्तर म्हणून सचिन ने स्लिप्स किंवा शॉर्ट थर्ड मॅन च्या डोक्यावरून किंवा मधल्या जागेतून तेथे कट्स मारले. मध्यंतरी त्याने ते बाउन्स होत वर जाणार्‍या बॉल ला बॅट ने दिशा देउन थर्ड मॅन च्या वरून सिक्स कधी मारायला सुरूवात केली याबद्दल चर्चा झाली होती. इथेही ते प्रयत्न दिसतात. एक मारलीही आहे.
तोपर्यंत असे शॉट्स फारसे बघायला मिळत नसत. त्यामुळे इथे प्रत्येक बोलर ला असे वाटलेले दिसते तेव्हा की ते शॉट म्ह्णजे सचिन 'बीट' झाला आहे किंवा मटक्याने गेले आहेत. पण क्लिप मधे बघून व सचिन ने नंतर सतत मारलेले असे शॉट्स बघून हे लक्षात येते की यातील एकही 'मिस' झालेला फटका नाही. सगळे मुद्दाम मारलेले आहेत. काही वेळा पोलॉक वगैरेंना लेट कट किंवा चॉप्स जे मारले आहेत ते तर एकदम खतरनाक आहेत.

अपवाद म्हणजे चार पाच वेळा बॉल पिच अप केल्यावर मारलेले खणखणीत स्ट्रेट ड्राइव्ज. ते सुरूवातीला सचिन ने व नंतर सेहवागनेही मारले आहेत. आणि हे सगळे अगदी आक्रमक खेळाने. ६८/४ असताना तेथून ४५ ओव्हर्स मधे २२० ची भागीदारी केली या दोघांनी. सेहवाग सुरूवातीला स्थिर होत होता तेव्हा सचिन ने धुलाई केली व नंतर सेहवागही पेटला. त्याचेही ड्राइव्ज व कट्स जबरी आहेत. अनेक शॉट्स मधे तुम्हाला दिसेल की जबरदस्त टायमिंग असलेले फटके मारताना त्याचे पाय होते तेथेच आहेत व बॅट व पाय यामधे फुटाफुटाच्या गॅप्स आहेत. पण शॉट चे टायमिंग तरीही इतके जबरी आहे की विश्वास बसत नाही.

सचिन ने हे शतक ११४ बॉल्स मधे मारले, व एकूण स्कोअर १७८ बॉल्स मधे १५५. शतक मारल्यावर बॉयकॉट ची प्रतिक्रिया:
"If you don't clap for this innings, you are just a big mean spirited". मात्र हे दोघे गेल्यावर रडकथा मागील पानावरून पुढे सुरू झाली. ३५१/५ वरून ऑल आउट ३७९. मॅच हरली. या मॅच चा स्कोअर बघायला क्रिकइन्फो वर त्या दिवशी गेल्यावर 'Dazzling Tendulkar turns the tables on South Africa' हे शीर्षक बघितल्याचे इतक्या वर्षांंतरही लक्षात आहे.

क्लिप येथे आहे.

२००१ ची ऑस्ट्रेलिया सिरीज लक्ष्मण-द्रविड साठी प्रसिद्ध आहे. पण ती मॅच वगळता त्या सिरीज मधल्या बाकी दोन्ही मॅचेस मधे सचिन अतिशय जोरात होता. पहिल्या मुंबईच्या मॅचेस मधे बाकी सगळे चाचपडत असताना त्याचा फॉर्म बघून टोनी ग्रेग म्हंटला होता "There is Sachin. Then there is daylight. Then there are others." पहिल्या डावातील ७६, व दुसर्‍या डावातील ६५ हा भारताकडून झालेला एकमेव प्रतिहल्ला, आणि तो ही दोन्ही वेळेस अत्यंत कमी स्कोअर वर दोन विकेट्स गेल्यावर केलेला. नंतर पुन्हा तिसर्‍या कसोटीत चेन्नईला मारलेले अत्यंत सुंदर शतक. हे शतक आम्ही त्या दिवशी रात्रभर जागून पाहिले होते. टेस्ट क्रिकेट मधे ज्या पेशन्स ने खेळावे लागते, बोलर्स च्या स्लेजिंग ला तोंड देउन लक्ष विचलित होउ न देता मोठी धावसंख्या उभारणे हा गोल जराही न विसरता खेळणारा सचिन इथे जबरदस्त दिसला. त्यात चेन्नई हे त्याचे आवडते ग्राउण्ड. इथे मॅग्राथ ने भरपूर स्लेजिंग केले, तरीही सचिन शांतपणे खेळत राहिला (आणि स्लेजिंग चा बदला नंतर वन डेज मधे घेतला).

या काळात प्रत्येक सिरीज मधे, प्रत्येक दोन तीन मॅचेस नंतर सचिन शतक मारणारच हे गृहीत धरलेले असायचे. पहिल्या दोन कसोटींमधे त्याने न मारल्याने तो चेन्नईला मारणार हे ऑस्ट्रेलिया संघाच्या प्लॅनिंग मधे धरलेले होते, हे जॉन बुखॅनन च्या मुलाखतीत वाचलेले आहे.

मग झालेल्या वन डे सिरीज मधे सचिन ने मॅग्राथ वर हल्ला करायचा हे टीम चे धोरण होते. त्याप्रमाणे जवळजवळ प्रत्येक मॅच मधे सचिनने त्याला धुतला. यातली सर्वात भारी इनिंग म्हणजे वायझॅग ला मॅग्राथ ची केलेली अभूतपूर्व धुलाई! त्यांच्या ३३८ स्कोअर ला चेस करताना सचिन ने ३८ बॉल्स मधे ६१ मारले. यातील अनेक क्लिप्स पुन्हा पुन्हा पाहण्यासारख्या आहेत. मॅग्राथ मुळात जबरदस्त अॅक्युरेट. त्यात शॉर्ट कव्हर च्या आसपास तीन फिल्डर्स लावलेले. ते ही ऑसी फिल्डर्स. मॅग्राथ म्हंटल्यावर लाईन ऑफ स्टंपची असणार यात काही आश्चर्य नव्हते. आधीच्या बॉलला सचिनने जरा रिस्क घेत थोडा वरून मारला. तो हवेतून गेला. तेथे फोर मिळाले पण शॉट रिस्की होता. पण मग लगेचच पुढच्या बॉल ला त्याने त्याच एरियातून इतका क्लीन मारला की बॉल बाउण्डरीचे अर्धे अंतर पोहोचेपर्यंत स्क्रीन वर फिल्डरच दिसत नाही. आणि प्रत्यक्षात तेथे तीन फिल्डर्स उभे होते. अशा वेळेस वाटते की पॉण्टिंग ला भारताविरूद्ध शतक करायला जितके प्रयत्न करायला लागत असतील त्याच्या दुप्पट प्रयत्न सचिनला त्यांच्याविरूद्ध शतक करायला लागत असतील. इथे फील्ड पोझिशन्स पाहिल्या तर सुईतून दोरा कोठेही धक्का न लावता ओवल्यासारखे गॅप काढलेले शॉट्स आहेत.

सर्वात मोठी कॉम्प्लिमेण्ट त्याला इयान चॅपेल कडून थोडी नंतर मिळाली. पुन्हा एकदा मॅग्राथला टार्गेट केल्यावर चॅपेल म्हंटला "..Australians have got into the mind of Ganguly, well, Tendulkar has got into the mind of Glen McGrath. He (McGrath) is talking to himself at the moment."

याच वन डे सिरीज मधे इंदूर ला त्याने एक सुंदर शतक मारले.

२००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधे भारताची नवीन टीम वेगळी आहे, आक्रमक बॅटिंग, आक्रमक बोलिंग आणि इतरांइतकीच चांगली फिल्डिंग करणारी, खुन्नस वाली आहे याचे चित्र दिसले होते. २००१ च्या या सिरीज मधे अतिबलाढ्य ऑस्ट्रेलियन्स ना हरवल्यावर या टीम मधे प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. पुढच्या १०-१२ वर्षांत मिळालेल्या अनेक यशांची सुरूवात इथून झाली.

त्या दृष्टीने मुंबईला १०-२० रन्स मधेच दोन विकेट उडाल्यावर खेळायला येणार्‍या सचिनला कलकत्त्याच्या विजयानंतर चेन्नई ला चांगली सुरूवात मिळाली ही त्या बदलाचीच चुणूक असेल. कारण यापुढे केवळ सगळे सचिन वर अवलंबून आहे असे राहिले नाही. सेहवाग, द्रविड, लक्ष्मण आणि गांगुली यांनी पुढची काही वर्षे आपली बॅटिंग मजबूत केली. बॅटिंग कागदावर आपली कायमच जोरदार दिसे पण प्रत्यक्षातही सगळे सणसणीत खेळत आहेत असे चित्र नंतर दिसू लागले. सचिन वरचे प्रेशर यानंतर खूप कमी झाले.

एकूण २००० पासून ते २००३ च्या वर्ल्ड कप पर्यंत सचिन जबरदस्त फॉर्म मधे होता. त्याचा खूप चांगला आक्रमक खेळ या काळात दिसला. त्याची या काळातील शतके, अर्धशतके सगळी अत्यंत सुंदर व त्याचे बॅटिंग मधले जबरदस्त स्किल दाखवणारी आहेत. बहुधा त्याची पाठदुखी या काळात त्याला सतावत नसावी.

२००१ मधेच घरच्या इंग्लंड विरूद्धच्या सिरीज मधेही त्याचे एक कसोटी शतक आणि वन डे मधे काही अर्धशतके सुरेख होती. एकाच इनिंग मधे कधी ऑफ साइडला क्लासिकल ड्राइव्ह्ज आणि कट्स मारत असतानाच मधे भारतीय कंडिशन्स चा पुरेपूर फायदा उठवत जेव्हा मनात येइल तेव्हा ऑल्मोस्ट कोणताही बॉल लेग साइडला मारत केलेली इंग्लिश बोलर्स ची धुलाई इथे जाणवेल.

नंतर मे २००२ मधे पोर्ट ऑफ स्पेन मधे विंडीज विरूद्ध मारलेले शतक. नंतर नॉटिंगहॅम ला इंग्लंड विरूद्ध मारलेले ९२ ही काही उदाहरणे. यातील सर्वात भारी मॅच म्हणजे २००२ च्याच सिरीज मधली लीडस ची. आपल्या नवीन टीम चा सर्वात जबरी परफॉर्मन्स. त्या काळात द्रविड, सचिन आणि गांगुली हे आपल्या बॅटिंग मधे तीन प्रमुख लोक. त्या तिघांची शतके या मॅच मधे आहेत. बर्‍याच संघांच्या घरच्या ग्राउण्ड्स पैकी एखादे हे अभेद्य किल्ला समजले गेलेले मैदान असते. त्या देशातील 'कंडिशन्स' त्या मैदानावर सर्वात प्रभावी असतात. ऑस्ट्रेलिया चे पर्थ, विंडीज चे बार्बाडोस, तसे इंग्लंड मधे लीड्स्/हेडिंग्ले. जेव्हा तेथे ढगाळ वातावरण असेल, तेव्हा स्विंग ची सवय नसलेल्या संघांना खेळायला सर्वात अवघड मैदान. इथेच प्राचीन काळी आपली अवस्था "४ आउट ०" अशी झालेली होती

मात्र या मॅच मधे द्रविड व संजय बांगर ने पहिल्या दिवशी अभेद्य सुरूवात करून दिल्यावर मग द्रविड १४८, सचिन १९३ आणि गांगुली १२८ यांच्या जोरावर आपण ६२८ मारल्या आणि इंग्लंडला दोन्ही वेळेस ला लौकर उडवून मॅच जिंकली. या मॅच मधल्या दुसर्‍या दिवशीच्या खेळात गांगुलीची कप्तान म्हणून आक्रमकता व त्याची आणि सचिन ची आक्रमक बॅटिंग हे दोन्ही एकत्र आले व इंग्लंडच्या हातातून मॅच गेली. त्या दिवशी टी टाईम नंतर साधारण एक तास खेळ झाल्यावर बॅड लाईट मुळे अंपायर्सनी या दोघांना विचारले की खेळ थांबवायचा का. तेव्हा भारताची अवस्था अत्यंत सेफ होती. इथे आधीच्या मॅचची बॅकग्राउंड आहे - नॉटिंगहॅम ला इंग्लंड साधारण अशाच स्थितीत असताना त्यांनी लाईट ऑफर स्वीकारून खेळ थांबवला व एका अर्थाने ओव्हर्स वाया घालवल्या. मग शेवटी भारताने मॅच ड्रॉ केली तेव्हा साधारण तेवढ्याच ओव्हर्स त्यांना कमी पडल्या असे म्हंटले गेले. त्या पार्श्वभूमी वर येथे सचिन व गांगुली यांनी ती ऑफर नुसती नाकारलीच नाही, तर पुढच्या ११ ओव्हर्स मधे प्रचंड धुलाई करून जवळजवळ ९५-९६ रन्स मारले. ऑसीज करत तसे इंग्लंडचे mental disintegration करून टाकले या दोघांनी. या दिवसाचे वर्णन येथे मिळेल.

यानंतर भारताकडे वन डे मधे तीन ओपनर आले. मग मधे टीम मॅनेजमेण्ट ने असे ठरवले की सचिन ने मधल्या फळीत खेळावे. २००२ च्या उत्तरार्धात तो तसा खेळला, पण खूप मॅचेस झाल्याच नाहीत तेव्हा. नंतर आला तो २००३ चा वर्ल्ड कप. तेव्हा मात्र सचिनने आग्रहाने ओपनिंग स्लॉट परत मागितला. जॉन राईट व गांगुलीने ते मान्य केले. तेथे सुरूवातीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध दणदणीत हरल्यावर भारतात जोरदार प्रतिक्रिया झाली होती. तेव्हा सचिननेच लोकांना तिकडून आवाहन केले होते पेशन्स चे. त्याचा खेळ तोपर्यंतही वाईट नव्हता. पण पुढच्या मॅचेस मधे त्याने तो उंचावला. पण इंग्लंड विरूद्धच्या ५० व श्रीलंकेविरूद्धच्या ९७ सुद्धा जबरदस्त आहेत. विशेषतः इंग्लंड विरूद्धचे फटके. त्यात एक तर कायमच लक्षात राहणारा आहे. आधीच्या फुल पिच बॉल वर फोर मारल्यामुळे पुढचा तो शॉर्ट टाकणार हे सचिनला माहीत होते. तो तयारच होता. त्यावर मारलेली कचकचीत सिक्स त्याच्या करीयर मधे कायम लक्षात राहिलेल्या शॉट्स पैकी आहे.

त्यातली पाक विरूद्धची इनिंग तर सर्वांनाच माहीत आहे. या मॅचच्या सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट वर मी आधी या लेखांत लिहीलेले आहे त्यामुळे पुन्हा वर्णन देत नाही. फक्त वकार ने लागोपाठ दोन विकेट्स उडवून ब्रेक लावायचा प्रयत्न केल्यावर भारताचा चेस आधीच्याच वेगात पुढे नेताना इथे अक्रमला व नंतर इथे वकारला इतके हाय क्वालिटी शॉट्स त्याने मारले आहेत की नंतर वकारची प्रतिक्रिया व सहानुभूतीकारक थाप मारणारा तो दुसरा पाक प्लेयर बघावे.

मात्र नंतर फायनल मधे तो लौकर आउट झाला, व सेहवाग च्या रन्स सोडल्या तर भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या ३५९ ला फारसा प्रतिकार झाला नाही.

पुढच्या २००३-२००४ च्या सीझन मधे मात्र सचिन थोडा स्लो झाला तो नैसर्गिक आक्रमक खेळ कमी झाला न्यूझीलंड विरूद्ध घरच्या सिरीज मधे फारसे खेळला नाही तो (एक फिफ्टी). मग झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सुरूवातीला त्याचे स्वतःचे अपयश व अंपायर्स नी दिलेले अचाट निर्णय यामुळे पहिल्या तीन मॅचेस मधे फारसे खेळला नाही तो. तेव्हा आपण ड्राइव्ह्ज मारायला जाताना सतत आउट होतो हे लक्षात घेउन सिडनेच्या चौथ्या टेस्ट मधे मात्र तो अत्यंत कंट्रोल ठेवून बहुतांश लेग साईडला खेळला. या इनिंग मधे त्याचे अगदी क्वचित एखादे शॉट्स ऑफ साईडला आहेत, ते ही बरेचसे नंतर मारलेले. त्याचे पहिल्या इनिंग मधले २४१ व दुसर्‍या इनिंग मधे ६० हे दोन्ही नाबाद होते व मॅच सेटप करून देणारे होते. मात्र आपल्याला मॅच क्लोज करता आली नाही. नाहीतर स्टीव वॉ ची फेअरवेल मॅच व सिरीज आपणच जिंकली असती.

त्यापाठोपाठ भारताने केलेल्या पाक दौर्‍यात पहिल्याच टेस्ट मधे सेहवाग (३०९) बरोबर सचिन ने (१९४) मारले, ते ही नाबाद. तेव्हा त्याने सलग दोन मॅचेस मधे आउट न होता ५९५ रन्स मारलेले होते. याच सिरीज मधे रावळपिंडीला वन डे मधे एक जबरी शतक त्याने मारले. या दोन्ही सिरीज मधे याआधीच्या ३-३.५ वर्षांइतका त्याचा फॉर्म नव्हता, पण 'हाथी बैठ भी जाये तो...' नुसार त्याने तरीही भरपूर रन्स केले. त्याच्या करीयर मधले हे दुसरे शिखर म्हणता येइल इतका तो ही चार वर्षे चांगला खेळला.

या काळातील इतर प्रमुख फलंदाजः सेहवाग, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, युवराज, कैफ
कप्तानः गांगुली
ओपनर्सः कसोटी: दास-रमेश, दास-दासगुप्ता, सेहवाग-बांगर, सेहवाग-जाफर, वन डे: सचिन-सेहवाग, सचिन-गांगुली, सेहवाग-गांगुली

प्रतिक्रिया

फारएन्ड's picture

31 Dec 2016 - 7:46 am | फारएन्ड

मिपा अ‍ॅडमिन, वरती लेखाच्या सुरूवातीला हा खालचा मजकूर अ‍ॅड करता येइल का? मला मूळ लेख कसा संपादित करायचा ते दिसत नाही येथे. हा भाग सुरूवातीला हवा आणि नंतर मग आत्ताचा लेखात असलेला मजकूर.

६. जुलै १९९९ ते मार्च २०००

सचिनचा दुसर्‍यांदा कप्तानपदाचा काळ. १९९९ च्या वर्ल्ड कप च्या शेवटी अझर चे कप्तानपद पुन्हा जाणार हे दिसू लागले होते. सचिन कप्तान नको असे अनेकांना वाटत होते. पण दुसरा कोणीही तयार दिसत नव्हता. त्यात अझर संघातूनही बाहेर जाईल अशीच चिन्हे होती. शेवटी नाईलाजाने परत दीड वर्षांनंतर सचिनकडे ती जबाबदारी दिली गेली असावी. आणि पुन्हा फॅन्स च्या दृष्टीने एक बोअर कालावधी सुरू झाला.

तसे सचिन ने या काळात भरपूर रन्स केले. पहिल्या न्यूझीलंड विरूद्धच्या सिरीज मधे एक शतक व एक द्विशतकही मारले. पण खरे सांगायचे तर ते लाइव्ह बघताना भयंकर बोअर झाले. टीपिकल सचिन ची इनिंग नव्हती ती. कप्तानपदाच्या पहिल्या काळाप्रमाणेच येथेही एरव्ही सहज जिंकू शकू अशा परिस्थितीतील मॅच भारताला जिंकता आली नाही न्यूझीलंड विरूद्ध घरच्या मैदानावर स्पिनर्स असूनही. मोहाली ला पहिल्या डावात केवळ ८३ वर ऑल आउट झाल्यावर दुसर्‍या डावात सचिन व द्रविड च्या शतकांमुळे व भागीदारी मुळे भारताने ५००+ रन्स मारले. पण किवीज ना ३७४ चे टार्गेट, त्यांना उडवायला जवळजवळ दीडशे ओव्हर्स व घरचे मैदान असतानाही आपण मॅच संपवू शकलो नाही. पण पुढची कानपूरची मॅच जिंकल्यामुळे आपण सिरीज जिंकली.

त्यात घरच्या मैदानावरील न्यूझीलंड विरूद्धच्या एकूण बर्‍यापैकी कामगिरीवरून भारतातील अनेक महाभाग आता हा संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍याकरता तयार झालाय असे भाकीत करू लागले. पण संघनिवडीपासूनच अनेक गडबडी सुरू झाल्या. कोच म्हणून कपिल होता. आधी तो संघात असताना सचिन बरोबर त्याचे चांगले जमायचे पण या कोच-कप्तान जोडीचे फारसे जमले नाही. सचिन ला मनासारखा संघ मिळाला नाही अशी जाहीर चर्चा होत होती. त्यात बीसीसीआय च्या जयवंत लेले यांनी हा संघ ०-३ हरून परतेल असे वक्तव्य केले.

आणि जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऑसी टीम विरूद्ध भारताची कामगिरी तशीच झाली. सचिन ची बॅटिंग चांगली झाली. मेलबोर्न ला इतर सगळे पडत असताना नवा वेगवान बोलर ब्रेट ली विरूद्ध उभे राहून त्याने मारलेले शतक जबरदस्त होते. तसेच वन डे सिरीज मधे एकदा पाक विरूद्ध मारलेले ९३ ही. पण एकूण सुमार सांघिक कामगिरी मुळे संघावर व कप्तान म्हणून सचिन वर बरीच टीका झाली.

ही सिरीज संपल्यावर लगेच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होम सिरीज होती. त्या सिरीज मधल्या कसोटी सामन्यांत त्याने नेतृत्व केले पण ते सुरू होण्याआधीच त्याने घोषित केले की त्यानंतर तो कप्तानपद सोडणार. त्याप्रमाणे ते त्याने सोडले व गांगुली कप्तान झाला. सचिन च्या कप्तानपदाची कारकीर्द येथे संपली. पुढे २००५ च्या आसपास चर्चा सुरू होती पण सुदैवाने तो झाला नाही.

इतर फलंदाज - अझर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, देवांग गांधी, रमेश
ओपनर्स - रमेश-देवांग गांधी, (एम एस के) प्रसाद-लक्ष्मण

स्पार्टाकस's picture

31 Dec 2016 - 8:47 am | स्पार्टाकस

याच टेस्ट मध्ये माझ्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे अंपायर स्टीव्ह बकनरने जस्टीन लँगरला दोनदा आणि डॅमियन मार्टीनला एकदा एलबीडब्ल्यू असूनही नॉटआऊट देऊन ऑस्ट्रेलियाला वाचवले होते.

नेहमीप्रमाणेच उत्तम ! क्लासच.

विशाल कुलकर्णी's picture

6 Jan 2017 - 4:07 pm | विशाल कुलकर्णी

जबरी रे

तेजस आठवले's picture

15 Jan 2017 - 9:49 pm | तेजस आठवले

कॅडीक ला मारलेली सिक्स पण जब्राट होती.