हे महाराजा

अभिजीत मोटे's picture
अभिजीत मोटे in काथ्याकूट
1 Oct 2008 - 7:09 pm
गाभा: 

स्थळः स्वर्गलोक

वेळ: सकाळची

सावरकर (वि. दा. सावरकर) कसलातरी गुढ विचार करत बसले होते. तेवढ्यात कूठून तरी तुतार्‍याचे आवाज त्यांच्या कानी आले. समोरून महाराज (छ्त्रपति शिवराय) येत होते. दोघांनी एकमेकांना नमस्कार केले. एकमेकांची विचारपूस केली. चर्चा चालू होती पन राहून राहून सावरकर स्वतात हरवून जात होते. महाराजांना या गोष्टिची जानीव झाली. त्यांनी याबद्दल सावरकरांना विचारलं,

"काय तात्या कसला विचार करताय मघासपासून".

"काही नाही महाराज, विचार करत होतो मी आणि तुम्ही, दोघांनिही आपली पूरी हयात घालवली हिंदूस्थानला स्वतंत्र्य करायला. जनता मला तर विसरली पण तूम्हाला नाही विसरली. हे कसं काय? "

"काय मतलब"

"मतलब साफ आहे महाराज. तुम्हाला माहितच आहे माझ्या स्मारकाचे काय केले ते. खाली (भूलोकी) कांही लोक सतत माझ्याबद्दल अपप्रचार करतात. चुकीचे संदर्भ लावतात."

"हो पण हे माझ्याबाबत पण घडतय कधी कधी."

"मान्य आहे पण तुमच्याबाबत घडलं तर जनता लगेच आंदोलनं सुरु करते. तूमची बूवा हवा आहे."

तेवढ्यात मोरारजी (देसाई) नरकाच्या दारातून बाहेर पडून स्वर्गाकडे धावत येताना सावरकरांना दिसले. सावरकर ऊठून मोरारजिला आडवे गेले आणि विचारंल,

"काय मोरारजि एवढ्या घाईत कुठे?"

"कूठे काय?, स्वर्गात चाललोय. आज माझी नरकातून सुटका झाली. माझ्यावरचे आरोप चित्रगुप्ताने मागे घेतले."

"काय म्हणताय, कसले आरोप.... मला तर काही समजत नाहीय तुम्ही काय म्हनताय ते.."

मोरारजीने हातातले कागद पूढे करत:

"आहो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सूरू असताना मी शिवाजिला विश्वासघाती असं म्हटलं होते ना... "

"हूं..."

"एका भल्यामाणसाची बदनामी केली म्हनून येथे आल्यावर मला आजन्म नरकवासाची शीक्षा दीली होती या चित्रगुप्ताने"

"मग......."

"आहो ते हातातले कागद पहा, महाराष्ट्र सरकारने शिवाजि विश्वासघाती असल्याचा रिपोर्ट दिलाय. तो रिपोर्ट पाहून तर माझी शिक्षा माफ झाली. "

सावरकर आचंबीत होऊन महाराजांकडे पाहू लागले. महाराज स्थीरपने सावरकरांकडेच पहात होते. मोरारजी कागद घेवून ऊड्या मारतच निघून गेला.....

महाराजांनी स्मितहास्य केले आणि दोघेपण तीथून निघून गेले.

स्थळः भूलोक

ईकडे साबू आजमींनी मुंबई ऊच्चन्यायालयात शीवाजि विरूध्द खूनाचा खट्ला भरला. अल्पसंख्यांक आयोग आनी मानवाधीकार समीतीने पन अफजल खानाला न्याय मिळावा म्हनून जनहीत याचीका दाखल केली. न्यायालयाने दोन्ही बाजू एकून घेतल्या. महाराजांच्या वकीलाने आत्मसंरक्षणाचा मुद्दा पूढे करून खट्ला आपल्याबाजूने वळवायचा प्रयत्न केला पन घटना शीवाजिच्या राज्यात घडली व अफझल शीवाजीचा पाहूणा होता त्यामूळे न्यायालयाने ति घटना म्हणजे विश्वासघातच होता असा नीर्वाळा दीला. शिवाजीविरूध्द गुन्हा सीध्द झाला होता आता अवकाश होता तो सजा काय मिळते ते ऐकण्याचा.

आणि सजेचा दीवस ऊजाड्ला. न्यायालयासमोर ही गर्दी झालेली आणी.....................

"अभ्या..... ए अभ्या........... ऊठ, ऑफीसला जायचं नाही का? " ईती माझी बायको....

(काल रात्री झोपायला जाण्यापूर्वी स्टार माझा वर बातमी एकली होती. सातार्‍यात वन विभागाच्या अधीकार्‍यांनी अफझल खान ट्र्स्टचे बेकायदेशीर बांधकाम (जे प्रताप गडाच्या पायथ्याशी आहे) कायदेशीर करण्यासाठी जो रीपोर्ट दीला त्यात शिवाजीने अफझल खानाचा फसवून खून केल्याचे नमूद केले आहे.)

हे महाराजा काही चूकले माकले असेल तर गोड मानून घे.

क्षत्रीय कुलावतंस राजाधिराज श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय|

..............अभिजीत मोटे.

प्रतिक्रिया

भास्कर केन्डे's picture

1 Oct 2008 - 11:25 pm | भास्कर केन्डे

अभिजितराव,

आपण महाराजांबद्दल तसेच स्वा. सावरकरांबद्दल मनातून आदर बाळगता व तसेच महाराष्ट्र प्रेम आपल्या मनात खोलवर रुजलेले आहे असे दिसते. म्हणूनच तर तुम्हाला अशी स्वप्ने पडताहेत. ते आपल्या चांगल्या स्वभावाचे प्रतिक आहे. नाही तर लोकांना काय काय स्वप्ने पडतात असे ऐकून आहे ... ;)

बाकी जे खरोखर घडते आहे ते तर निंदनीय, घाणेरडेच आहे... तेही महाराजांच्याच राज्यात. या नीच, पाजी, हालकट, देशद्रोही महाराष्ट्रदोही/देशद्रोही राजकारण्यांची तसेच तथाकथित मानवाधिकार वाल्यांची लक्तरे पुरायला हवी त्या खानाच्या कबरीपाशी.

आपला,
(देशभक्त) भास्कर

योगी९००'s picture

2 Oct 2008 - 12:07 pm | योगी९००

मला आठवते, की मी एकदा प्रतापगडला गेलो असता, तेथे अफझल खानाच्या थडग्याबाहेर उभा होतो.

बाहेर एक मुस्लिम बाई आपल्या मुलाला सांगत होती, " महान संत(?) अफझलखानाचा त्या शिवाजीने फसवून खुन केला".

मी मध्येच तोंड घालून त्यांना खरे सांगायचा प्रयत्न केला आणि त्या बाईच्या चेहर्यावर "इस्लाम खतरे में " चे भाव उमटले आणि ती लगबगीने तेथून निघून गेली.

आत्ता तुम्हीच सांगा की बाळकडू जर असे मिळत असेल तर मोठेपणी तो मुलगा आपल्या महाराजांविषयी काय विचार करत असेल ?

आपला,
(देशभक्त आ़णि शिवभक्त) खादाडमाऊ

शैलेन्द्र's picture

2 Oct 2008 - 12:23 pm | शैलेन्द्र

ह्म्म्म........

गांधी टोपीच्या भोंगळ तत्वज्ञानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका कबरिचे एका दर्ग्यात रुपांतर केले. उद्या जर सरकारने त्या जागेस धार्मीक स्थळाचा दर्जा दिल्यास आश्चर्य वाटणार नाहि..

प्रतापगड ही ज्यांची खाजगी मालमत्ता आहे त्या छ्त्रपतिंच्या गादिलाही या बाबत काहि करता येवू नये? कि एका आवाजावर महाराष्ट्र उभा करायचा नैतिक आधिकार त्यांनी गमावलाय?

अनिल हटेला's picture

2 Oct 2008 - 12:29 pm | अनिल हटेला

अगदी !!

हे राजकारणाच गजकर्ण आपल्याला घेउन डूबणार ........

आणी असच चालू राह्यल तर भविष्य अंधकार मय आहे .....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Oct 2008 - 12:31 pm | घाशीराम कोतवाल १.२

प्रतापगड ही ज्यांची खाजगी मालमत्ता आहे त्या छ्त्रपतिंच्या गादिलाही या बाबत काहि करता येवू नये? कि एका आवाजावर महाराष्ट्र उभा करायचा नैतिक आधिकार त्यांनी गमावलाय? होय भाऊ छ्त्रपतिंच्या गादी ने तो अधीकार गमावला आहे कारण आता ते कोन्ग्रेस वासी झालेले आहेत त्यामुळे ते काय समनार लोकांच्या भावना हे सरकार नालायक आहे

सम्या's picture

4 Oct 2008 - 5:21 pm | सम्या

शिवजि माहाराजान्चा विजय असो