झटपट पुरण पोळी

किर्ति's picture
किर्ति in पाककृती
30 Sep 2008 - 10:12 pm

ही पा.क्रु माझ्या सासुबाई चि आहे
साहित्य:- दाळव १ वाटी ,साखर १ वाटी , विलायची ,जायफळ आपल्या आवडी प्रमाणे
पुरण पोळी साठी कणिक मळुन घेतलेली
दाळव मिक्सर मधुन काढुन घेणे साखर पण मिक्सर मधुन वाटुन घेणे
एकत्र करुन त्यात विलायची जायफल पुड घालुन दुधात मळुन घेणे
हे सारण कणिके च्या पारी त भरुन पोळी लाटावी
साजुक तुप टाकुन खायला घ्यावी :)

प्रतिक्रिया

सागर's picture

30 Sep 2008 - 10:37 pm | सागर

दाळव म्हणजे पुरण का?

अनामिक's picture

1 Oct 2008 - 3:00 am | अनामिक

नाही..... दाळवं = डाळे/डाळं (साल नसलेले फुटाणे) - विदर्भात दाळवं म्हणतात... (तसेच वेलचीला विदर्भात विलायची म्हणतात... मी विलायची म्हणायचो तेव्हा माझे मित्र मला भरपूर हसायचे)

झटपट पुरण पोळीची आयडीया मस्तच!

चकली's picture

30 Sep 2008 - 11:17 pm | चकली

करून बघते. डाळे (साल नसलेले फुटाणे) म्हणजे चणा डाळ च ना? आणि डाळ भिजवायची नाही का आधी?

चकली
http://chakali.blogspot.com

प्राजु's picture

30 Sep 2008 - 11:48 pm | प्राजु

चकली ताई,
अगं डाळं गं.. ते चिवड्यात घालतात ते. त्याला हिंदीत फूटा चना म्हणतात बहुतेक.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

1 Oct 2008 - 12:09 am | चकली

ओके...दाळवं काय ते कळले.. thanks प्राजु

चकली
http://chakali.blogspot.com

शितल's picture

1 Oct 2008 - 7:05 am | शितल

किर्ति,
सोपी आणि पटकन होणार्‍या पोळ्यांची कृती सांगितल्या बद्दल धन्यवाद !

विसोबा खेचर's picture

1 Oct 2008 - 7:52 am | विसोबा खेचर

पाकृ नामंजूर...!

क्षमस्व...

उत्तम गाणं आणि उत्तम खाणं ह्यात कधीही काहीही झटपट, इन्स्टंट नसतं असा आमचा ठाम विश्वास आहे!`

हां, चार चुरमुर्‍यात शेव-चणे-दाणे घालून कुणी झटपट सुकी भेळ केली तर एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु झटपट पुरणपोळी??

केवळ अशक्य आहे!

हे म्हणजे 'झटपट भीमपलास' असं म्हणण्यासारखं आहे. उत्तम पुरणपोळी अन् उत्तम भीमपलास प्रसन्न होण्याकरता जन्मभराची तपस्या लागते असा आमचा ठाम विश्वास आहे! ती झटपट येणारी कामं नव्हेत!

आपला,
(पारंपारिक पद्धतीने केलेली पुरणपोळी आवडणारा!) तात्या.

पिवळा डांबिस's picture

1 Oct 2008 - 8:32 am | पिवळा डांबिस

मला वाटलं, तू सुद्धा "वा, काय झकास रेसेपी !",म्हणतोस की काय! असं म्हटलं असतंस तर तुझी "खवय्या" ही पदवी अस्वीकार (मराठीत "क्यान्सल!!") करायचं ठरवलं होतं.......:)
पुरणपोळी ही इन्स्टंट करायची गोष्टच नाही.......
ती मुलींनी आपल्या आईकडून (अगदी खरं सांगायचं तर आजीकडून) शिकायची पाककॄती आहे......
माफ करा, पण फुटाण्याच्या डाळीची पुरणपोळी?
बाकी पुरणपोळी ही कधीच नुसती पुरणपोळी नसते....
तेलपोळी की पीठपोळी हे जास्त महत्वाचं.....
पीठ्पोळी बहुतेक कोणालाही माहीती आहे, पण जर तुम्ही तेलपोळी खाल्ली नसेल तर तुम्ही खरी पुरणपोळी खाल्लेलीच नाही असे मी म्हणेन......
खर्‍या पुरणपोळीसाठी चपातीचं किंवा पोळ्यांच्या पिठाचं प्रमाण वापरत नाहीत, त्या पिठाला एक विशिष्ठ चिकणाई लागते! त्याशिवाय पुरण भरल्यावर पातळ आणि नितळ पोळी लाटली जात नाही!!! त्या पिठाची योग्य चिकणाई जमवण्यासाठी स्पेशल कुशलता लागते.....

आणि अशी तेलपोळी जेंव्हा काकू करते (कटाच्या आमटीसकट!!) तेंव्हा हा काका मरून स्वर्गलोकी जाण्यास आनंदाने तयार असतो.....

होळीची वाट पहाणारा,
डांबिसकाका

भाग्यश्री's picture

1 Oct 2008 - 8:39 am | भाग्यश्री

अरेवा, काका.. तुम्हाला माहीती आहे की!! तुम्ही करून पाहीली की काय पुपो?
मला पुरणपोळी करताना आईने हेच सांगितलं, की कणिक सैल मळून अर्धा तास ठेव.. आणि नंतर भरपूर तेल घालून मळून, कणीक पूर्ण बुडेल इतक्या तेलात ठेव.. मी अवाक झाले होते! पण तसं करून पाहीलं, आणि अमेझिंग होते पोळी! :)

ह्म्म, बाकी, पाककृती आहे छान.. पण पुरणपोळीमधे तडजोड नको वाटते.. इतकं खपून पुपो केली की काय मजा येते खायला!?

पिवळा डांबिस's picture

1 Oct 2008 - 8:46 am | पिवळा डांबिस

अरेवा, काका.. तुम्हाला माहीती आहे की!! तुम्ही करून पाहीली की काय पुपो?
मी स्वतः कशाला करायला पाहिजे? मी तर अशी झक्कास पुरणपोळी करणारी पोरगी पटवली आहे की!!! :)
(पेढा करण्याचे कसब असण्यापेक्षा हलवायाची मैत्री जास्त महत्वाची!!!!)

शुभान्गी's picture

11 Oct 2008 - 2:56 am | शुभान्गी

करुन बघायला पाहिजे........ रेसेपि सोपि आहे.... चव कशी असेल .... उत्सुकता आहे....