...संभवामी युगे युगे...पण आता कधी रे बाबा?

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
30 Sep 2008 - 12:44 pm
गाभा: 

श्रीमद्व्भगवगीतेत श्रीकृष्णाने "जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म आणि अत्याचार वाढतील तेव्हा तेव्हा मी पुन्हा जन्म घेऊन त्यांचा संहार करेन" अशा अर्थाचे वचन दिले आहे. श्रीमद्भगवतगीता हा हिंदुंचा एक पवित्र धर्मग्रंथ असल्याने त्यातील प्रत्येक शब्द हा मंत्रस्वरुप आणि सत्य मानला जातो. असं असताना आज जगात सर्वत्र प्रचंड अत्याचार, दहशतवाद बोकाळलेला असताना अजुनहि श्रीकृष्णाला ( विष्णु) अवतार घ्यावा असं वाटत नाहीये का?

शक्यता----

१) "हे तर काहीच नाही अजुन खुप काही घडुन जेव्हा सगळं संपायच्या मार्गावर असेल तेव्हाच मी जन्म घेईन" असं तर त्याने ठरविलेलं नसेल ना????

२) त्याने आता " उगाच बोललो आता काय करावे बरं?" असा विचार केला असेल का?

३) की "संभवामी युगे युगे" म्हणजे आपल्यातीलच कोणाला स्वत:मधले परमेश्वरी अस्तित्व कळुन तोच पेटुन उठेल आणि या सगळ्या अधर्माचा-अत्याचाराचा संहार करेल...हे अपेक्षित आहे का?

४) तुमचा गीतेवर विश्वास असला तरी या विधानावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

30 Sep 2008 - 1:08 pm | अरुण मनोहर

हाच प्रश्न कविला पडला होता तेव्हा मिळालेले उत्तर.
http://www.misalpav.com/node/2687

स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही...

तेव्हा आपण सर्वसामान्य माणसांनीच काही केले नाही...तर भविष्याकाळात दुसरेच कोणीतरी 'मानवजमातीला' संभवामि युगे युगे असे म्हणेन

बाकी या विधानाशी पूर्ण सहमत.
३) की "संभवामी युगे युगे" म्हणजे आपल्यातीलच कोणाला स्वत:मधले परमेश्वरी अस्तित्व कळुन तोच पेटुन उठेल आणि या सगळ्या अधर्माचा-अत्याचाराचा संहार करेल...हे अपेक्षित आहे का?

सागर

मनीषा's picture

30 Sep 2008 - 3:12 pm | मनीषा

३) की "संभवामी युगे युगे" म्हणजे आपल्यातीलच कोणाला स्वत:मधले परमेश्वरी अस्तित्व कळुन तोच पेटुन उठेल आणि या सगळ्या अधर्माचा-अत्याचाराचा संहार करेल...हे अपेक्षित आहे का?

कदाचित हे अपेक्षित नसावे ... (आपले काम दूसर्‍यावर सोपवणे हा खास मानवी गुण आहे , देव तसे करणार नाही असे वाटते .)
पण एक युग म्हणजे काही हजार वर्षे होतात. त्यामुळे प्रत्येक युगात ईश्वराने अवतार घ्यायचा म्हणले तरी काही हजार वर्षांचा कालावधी जायला हवा (आधीच्या अवतारा नंतर) .
पु ल. नी पण लिहिलं आहे ना ... "------ब्रम्हदेवाच्या घड्याळातला काटा सेकंदानेही हलत नाही , हजार वर्ष उलटल्याशिवाय "(अंतु बर्वा)

ऍडीजोशी's picture

30 Sep 2008 - 4:43 pm | ऍडीजोशी (not verified)

@ खवीस

ह्याचा अर्थ अजून परिस्थीती तितकीशी बिघडलेली नाहिये. इतक्यात हरून कसं चालेल? आणि जरा काही झालं की देवाकडे धावायची माणसाला घाई असतेच. त्यामुळे आपण आपल्या परीने प्रयत्न करत रहायचे. तसंस, देव जरी आला तरी प्रत्येकाला कर्माचं फळ भेगावं लागतंच. त्यामुळे प्रदुषण केलं की ग्लोबल वॉर्मींग होणारच.

@ मनीषा

पण एक युग म्हणजे काही हजार वर्षे होतात. त्यामुळे प्रत्येक युगात ईश्वराने अवतार घ्यायचा म्हणले तरी काही हजार वर्षांचा कालावधी जायला हवा

संभवामी युगे युगे चा अर्थ मी एका युगात एकदाच येइन असा नाहिये. खरा अर्थ आहे की मी युगा नु युगे परित्राणाय साधूनाम, विनाशायच दुश्क्रुताम् अवतार घेत राहीन.

अर्जूनासाठी अर्थ- तुला जर असं वाटत असेल की मी तुला जन्म-पुनर्जन्माच्या / संचीत - पूर्वसंचीताच्या गप्पा ऐकवतोय, तर तसं ते नाहीये. आणि जन्म कुणालाही चुकलेला नाहिये. तू अन्यायाविरुद्ध प्रत्येक जन्मात लढ. तुला झेपेनासं झालं की मी येइनच. आज भेटलो पुन्हा भेटणार नाही असं होणार नाही. धर्मसम्स्थापनार्थाय मी युगा नु युगे अवतार घेत राहीन. त्यामुळे मनातला किंतू काढून टाक.

मुशाफिर's picture

1 Oct 2008 - 3:04 am | मुशाफिर

३) की "संभवामी युगे युगे" म्हणजे आपल्यातीलच कोणाला स्वत:मधले परमेश्वरी अस्तित्व कळुन तोच पेटुन उठेल आणि या सगळ्या अधर्माचा-अत्याचाराचा संहार करेल...हे अपेक्षित आहे का?

आणि

४) तुमचा गीतेवर विश्वास असला तरी या विधानावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

हे मला जास्त सयुक्तिक वाटतं. श्रीमद्व्भगवतगीता खरोखरं श्रीकृष्णाने सांगितली की नाही? याविषयी मतमतांतरं दिसून येतात. आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली त्यावेळीच गीता प्रकाशात आली, असेही म्हटले जाते. त्यापुर्वी गीतेविषयी उल्लेख सापडत नाहीत.

त्यामुळे, श्रीमद्व्भगवतगीता म्हणजे आद्य शंकराचार्यांनी वेदांविषयी केलेली टिकाटिप्प्णी /निरूपण आहे आणि ती महाभारताच्या कथेत नंतर प्रक्षिप्त केली गेली, असा एक प्रवाद आहे. तसेच अनेक श्रीकृष्णांचे उल्लेख सापडत असल्याने गीता नक्की कोणी सांगितली हे ही ठामपणे सांगता येत नाही. याविषयी 'थॉट्स ऑन गीता' हे विवेकानंदांचे पुस्तक जरूर वाचण्यासारखे आहे (अधिक विषयांतर होऊ नये, म्हणून याविषयी जास्त लिहीत नाही)

सनातन (ओर्थोडॉक्स) हिंदू धर्म मानणारा (किंवा 'मिमांसक) देवांवर विश्वास ठेवत नाही. मिमांसक हा केवळ वेदांवर विश्वास ठेवतो. वेद, म्हणजे शब्द आणि त्या वेदमत्रांमुळे हे जग नियंत्रित होते, असं मिमांसक मानतं. त्यातुनच मगं पुढे वेद जाणणार्‍या पुरोहित वर्गाचे महत्व अवास्तव वाढले आणि हिंदू धर्माचा र्‍हास झाला.

तेव्हा, कर्मकांडापासून हिंदू धर्माला मुक्त करण्यासाठीच आद्य शंकराचार्यांनी जीवनाशी निगडीत असे गीतेचे तत्वज्ञान सांगितले आणि हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली . जेव्हा गीतेविषयी बोलले जाते तेव्हा, बहुतांश लोक 'मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन' याकडेच लक्ष वेधतात. परंतु दुर्जनांचा नि:पात करण्यासाठी गीतेतच सांगितलेला 'निष्काम कर्मयोग' सोयिस्कररित्या विसरतात.

जोपर्यंत, आपण स्वतः काही न करता केवळ देवाची वाट पहात बसू तोपर्यंत श्रीकृष्ण काही पुन्हा अवतार घेणार नाही. त्यामुळे, ज्याचा गीतेवर विश्वास असेल त्याच्यासाठी तुम्ही दिलेली ३) आणि ४) ही विधाने एकाच वेळी खरी आहेत.

मुशाफिर.