माझ्या मित्राचा मेसेज आला की मे महिन्यात ते व्याघ्रगणती साठी नागझिरा अभयारण्यात जात आहेत आणि मी थोडा अस्वस्थ झालो. ओमान मध्ये आल्यापासून मी एक गोष्ट फार मिस करतोय ती म्हणजे भ्रमंती. भारतात असताना दर २-३ महिन्यातून कुठे न कुठे जाणे व्हायचेच,मित्रांबरोबर म्हणा, कुटुंबासमवेत म्हणा. पण इथे त्या गोष्टीना आळा बसलाय.एक तर फिरण्यासारखं फार नाही आणि दुसरं म्हणजे स्वतःच वाहन नाही अजूनपर्यंत तरी. असो.तर तो मेसेज वाचून फक्त पुढच्या वर्षी आपण परत जाऊ रे असं म्हणून समाधान करून घेण्याविषयी पर्याय नव्हता. पुढचे दोन तीन दिवस मी माझ्या मागच्या जंगल सफरींच्या आठवणीत हरवून गेलो.
लहानपणी मोगली पाहून साधारण प्रत्येकाच्याच मनात जंगलाविषयी एक उत्सुकता निर्माण होते आणि गोष्टी ही साधारण पक्षी - प्राण्यांच्या ऐकवल्या जायच्या.आणि जसे मोठे व्हायला लागतो तसे Discovery आणि NGC ने wild life विषयी उत्कंठा पार शिगेला पोहोचते.माझ्याही बाबतीत असे घडले पण हे सध्या कसे करता येईल ह्या विषयी फार माहिती नसल्याने म्हणा किंवा awareness नसल्याने म्हणा ह्या सर्व गोष्टी फक्त मनातच राहिल्या.आणि मग ती सगळी तहान फक्त पुस्तकं/लेख आणि tv ह्या वरच भागवू लागलो.मग जस जसा स्वावलंबी झालो आणि जस जसे विश्व विस्तारत गेले तसे सम आवड असणाऱ्या लोकांशी मैत्री वाढत गेली आणि अशाच काही मित्रांबरोबर एकदा कान्हाला जायची संधी मिळाली. पहिलाच अनुभव खूप झकास होता. आम्ही जेमतेम एक दिवस जंगलात होतो आणि दोन सफारी (सफारी म्हणजे जंगलभ्रमंतीसाठी साठी सरकारतर्फे प्रश्क्षित आणि परवानाधारक चालक आणि guide अशा २ व्यक्तींनी सज्ज असे वाहन) बुक केल्या होत्या.सकाळची आणि संध्याकाळची.सकाळी तर हरणं, गवे आणि मोर ह्यांच्याशिवाय फार काही नजरेस नाही पडलं आणि संध्याकाळी ही जंगलच्या राजाने आम्हास हुलकावणीच द्यायचं ठरवलं होतं आणि जसजशी आमची जीप जंगलाच्या बाहेर पडायची वेळ जवळ आली आणि मनात नैराश्य दाटू लागत असताना चमत्कार घडावा त्याप्रमाणे बिबट्या, साक्षात वाघोबा आणि जंगली कुत्रे ह्यांनी दर्शन दिले आणि नैराश्याची जागा शब्दातीत आनंदाने घेतली.खूपच अविस्मरणीय अनुभव होता
पुनश्चः हा अनुभव घेता यावा व कुटुंबास ह्या आनंदात सहभागी करून घ्यावे ह्या उद्दिष्टाने परत एकदा कान्हास जायचे ठरवले.तसे ही सौ. नी नवीन कॅमेरा भेट दिला होता व तो कॅमेरा मुक्तछंदात वापरण्यासाठी जंगलापेक्षा दुसरी उत्कृष्ट जागा नसावी आणि पक्षी प्रेमाचे ('पक्षी,' फोटोग्राफी) चे भरते आले होते आणि काही पक्षी ओळखावयास ही शिकलो होतो. एकंदरीत कान्हास जाण्यासाठी बरीच कारण पाठीशी होती.
कान्हास आमचा मुक्काम ३ दिवसांसाठी होता.आम्ही सकाळची जंगल सफारी घेतली होती आणि संध्याकाळी nature walk , आदिवासी वस्तीस भेट, लोकनृत्य वगैरे साठी राखीव होती.साधारण सूर्योदयाच्या वेळेस आम्ही जंगलात भ्रमंतीसाठी निघायचो.आमच्या बरोबर आमच्या जिप्सीत डच जोडपे होते. आम्ही राहिलेलो त्याच resort मध्ये उतरले होते. साधारण नोव्हेंबर महिना असेल एवढी कडाक्याची थंडी होती की विचारता सोय नाही, मुंबईत एवढ्या वर्षात कधीच अनुभवली नव्हती.आम्ही घोंगडी घेऊन आणि गरम पाण्याच्या पिशव्या सोबत घेऊनच जायचो.तरी ही फोटो काढण्यास हात घोंगडीच्या बाहेर काढावयास धजावायचो नाही.आणि दाट जंगल असल्याने सुर्य दर्शन व्हावयास किमान ८ तरी वाजायचे आणि थंडी कमी होण्यास १० तरी.आणि ११ पर्यंत तुम्ही जंगलातून बाहेर पडायचे असते.आमची अशी अवस्था व्हयाची तर प्राण्याची काय सांगा.थोडक्यात व्याघ्रदर्शन होणे कठीणच होते. कारण जंगलात प्राणी पक्षी साधारण पाणवठ्यावरच दिसतात. थंडीच्या दिवसात ते तरी कशाला लवकर बाहेर पडतील.अगदीच एखादा भक्ष्याचा शोधात निघाला तर.
सफारीला निघण्याच्या आधी naturalist म्हणून रेसोर्त मध्ये असलेल्या देशपांडेनी प्राथमिक माहिती दिली आणि आमची उत्सुकता खूपच वाढवली . मुन्ना नावाच्या वाघाविषयी त्यांनी फार उत्सुकता निर्माण केली.त्यच्या कपाळावर म्हणे cat नाव तयार झालाय रेघानी.एवढंच नव्हे तर कान्हातला लांबी ने सगळ्यात मोठा. आम्हाला आता तर तो पाह्याचाच होता .जंगलात जायचं ते वाघासाठीच हा समज पक्का आहे आणि तिथले गाईड आणि चालक पण वाघाच्याच माघावर निघतात . येणाऱ्या जाणाऱ्या गाईड्स आणि चालकांना विचारतात.त्यांच्या कडून माहिती काढायचा प्रयत्न करतात कि कुठे दिसला का..मग त्या अंदाजाने निघतात.एखाद्या ठिकाणी १०-१५ मिनिटे वाट बघत थांबतातएखाद्या जिप्सीला वाघ दिसला असले तर विचारायची गरज च नसते.त्यांचे चेहरेच सांगत असतात.
ह्या चालक किंवा वाटाद्यांनी त्या भागात दिसणाऱ्या वाघांना नावं दिली आहेत त्या वाघांच्या दिसण्यावरून/सवयीवरून किंवा तत्सम प्रकारे आणि ते त्याच भाषेत बोलतात उदाहरणार्थ एका वाघाचा आपापसातील लढाईत कानाचा तुकडा निघालाय तो कनकटा, एक वाघीण सारखी पाण्यात असते तर ती मछली वगैरे आणि सदहार्ण २ जिप्सी एकमेकांसमोर आल्या की संभाषण साधारण असे , 'दिखा क्या कोई?... नही रे ...बहादूर अभी अंदर गया है किंवा मुन्ना कि दहाड सुनाई दी शायद यही से आयेगा" वगैरे, ऐकून खूप मज वाटते आपल्या आशा पल्लवित होतात आणि वाटते की जणू हे सर्व ह्यांचे पाळीव पशूच आहेत कि काय
एकंदरीत २ दिवसाच्या सफारीत वाघ काही दिसला नाही पण नीलगाय, barking दीर वगैरे प्राण्यांनी दर्शन दिले
ह्या काळात पक्षी निरीक्षण मात्र समाधान कारक झाले,फोटोही बऱ्यापैकी काढता आले पण वाघोबांनी काही दर्शन दिले नाही,पण वाघ दिसला नाही ह्याचे आमच्यापेक्षा जास्त वाईट त्या रिसोर्ट मधल्या कर्मचारीवर्गालाच झाले असावे. एकंदरीतच गावातली माणसं फार साधी असतात आणि पाहुणोपचार त्याच्ज्या कडून शिकवा असे माझे मत आहे .माझ्या पहिल्या सफरीच्या वेळी मी अनुभवले होते आणि आता हि मी अनुभवले. पहिल्या वेळी सकाळी आम्हास वाघ नाही दिसला तर आमच्या जिप्सीच्या चालकाने दुपारच्या सफरीस स्वतःच्या मुलीस आणले होते कारण ती असली कि वाघ दिसतोच हा त्याचा विश्वास आणि तो त्या वेळीही सार्थ ठरला. माझ्या ह्या भ्रमंतीच्या वेळी आमचा कर्मचारी वर्ग हळहळलाच पण तिसऱ्या दिवशी आमच्याकडे मोकळा वेळ होता सकाळी कारण आम्ही दुपारी निघणार होतो तर त्यांनी आम्हास संगितले की सकाळच्या वेळेस तरी करून बघा परत एक सफारी करून. बारा एवढाच बोलून ते थांबले नाहीत तरत त्यांनी आम्हास सफारी मिळावी ह्या साठी प्रयत्न पण केले. म्हणजे साधारणतः सफरीच्या बुकिंग महिने - २ महिने आधीच झालेल्या असतात आणि आयत्या वेळी राखीव ५ (ज्या आमदार/खासदार किंवा तत्सम VIP लोकांसाठी राखीव असतात ते जर त्या दिवशी नाही आले तर मग जनसामान्यांसाठी खुले करतात) मध्ये जागा मिळावी म्हणून रात्रभर रांगेत उभे राहून आमच्यासाठी सफारी मिळवली. पण आमचे नशीब मात्र साथ देण्यास राजी नव्हते.
पण वाघाचे दर्शन वगळता अनुभव फार छान होता.अप्रतिम फोटो निघाले काही पक्ष्यांची ओळख झाली. माणुसकीचे दर्शन झाले आणि एक मात्र कळले की जंगल वर वर कितीही शांत दिसत असले तरी तिथे प्रत्येक क्षणाला काही न काही घडत असते आणि ते टिपण्यासाठी तुम्ही फारच सावध असले पाहिजे.आणि मुख्य म्हणजे एकाच गोष्टीवर लक्ष न केंद्रित करता आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचा आस्वाद घेण्यास शिकले पाहिजे.
मगाशी वर उल्लेख केलेल्या देशपांडे विषयी,रिसोर्ट वर रात्री जेवणानंतर कॅम्प फायर लावत आणि तिथे सर्व गोरी मंडळी (प्रामुख्याने गोरी मंडळीच रिसोर्ट मध्ये होती) मदिरेचे घुटके घेत चर्चा करत बसलेली असत. आम्हीपण उब घेण्यासाठी बसायचो तेव्हा ते देशपांडे आले आणि चर्चा करता करता सहज विचारले की पुण्याहून थेट मध्य प्रदेशात तेही अशा छोट्या गावी?? .तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तराने थोडे अन्तर्मुख व्हायला झाले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, बरोबरीचे मित्र खूप च पुढे गेले, मला कुटुंबाच्या बाबतीत तडजोड करावी लागते पण कामाच्या बाबतीत मात्र मी खूप समाधानी आहे .ज्याची आवड आहे त्याच गोष्टीत काम करायला मिळतेय हि खूपच समाधानकारक बाब आहे.हे वाक्य अजूनही जसेच्या तसे माझ्या लक्षात आहे. आणि त्या देशपांडेचा हेवा वाटत राहतो
प्रतिक्रिया
27 Nov 2016 - 1:11 am | जॉनी
आठवणी जाग्या केल्यात तुम्ही.
2 वर्षांपूर्वी गेलो होतो कान्हाला, मुन्नासाहित 4 वाघ दिसले दिसले होते. त्यातली एक वाघीण आमच्या जिप्सी च्या अगदी मागून आरामात चालत गेली. रणथंबोर, कान्हा, ताडोबा तिन्ही मध्ये कान्हा चे गाईड प्रेमळ आहेत खूप. न कंटाळता माहिती अगदी नम्रपणे देत राहतात.जमल्यास रणथंबोर ला जाऊन या. अत्त्युत्तम व्यवस्थापन आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट चं.
27 Nov 2016 - 11:40 pm | रुस्तुम
धन्यवाद ,
रणथंभोर ही बुकेत लिस्ट मध्ये आहे.
तुमचा प्रवास खूप चॅन चालू आहे. पु.भा.प्र.
27 Nov 2016 - 5:22 pm | कंजूस
वाघ नको, पक्षी दाखवा.
27 Nov 2016 - 11:51 pm | रुस्तुम
कंजूसराव,
मतितार्थ नाही कळला, पण फोटोस ची लिंक देत आहे...सगळेच फोटो आहेत पक्ष्यांचे जास्ती आहेत.
https://goo.gl/photos/KDeuDVHFey1GUXom7
29 Nov 2016 - 4:47 am | कंजूस
वाघाचे फोटो पाहण्याचा{ पुढे मागे जीप उभ्या } कंटाळा आलाय
28 Nov 2016 - 12:28 pm | आर्या१२३
मस्त अनुभव आहेत.अशी जंगलभ्रमंती एकदा तरी करायची आहे,.
28 Nov 2016 - 12:54 pm | पैसा
छान लिहिलंय. फोटो मात्र हवे होते.
28 Nov 2016 - 10:46 pm | रुस्तुम
बरेच फोटो असल्याने आणि त्यातले सिलेक्टिव्ह कोणते टाकावे हे ठरवता न आल्याने फोटो टाकले नाहीत.
लिंक खालील प्रमाणे.