एक फसलेली वूफी (woofi)

अनुप देशमुख's picture
अनुप देशमुख in पाककृती
23 Nov 2016 - 10:49 pm

लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
साधारण सामग्री अशी -

उत्तम प्रकारची व्हिस्की - प्रमाण मापात

क्रमवार पाककृती:
एका शनिवारच्या निवांत दुपारी अस्मादिकांना Beer Country हा कार्यक्रम बघून एका नवीन मद्यकृती चा शोध लागला. लागलीच शनिवार असल्याने आणि संध्याकाळ चढत असल्याने हि नवीन पाककृती बघण्याची करून खुमखुमी सुरु झाली. त्यात सौ ने दुजोरा भरला आणि एका थंडीच्या संध्याकाळी सामग्री गोळा करण्याची लगबग सुरु झाली. वुफी विषयी थोडक्यात सांगायच म्हणजे व्हिस्की घातलेली कॉफी.

सर्वात प्रथम व्हिस्की च्या शोधात निघालो. या बाबतीत आम्ही ढ गोळा असल्याने गुगल बाबाची मदत घेत (आणि बायको समोर अडाणीपणा) दाखवत शेवटी RC या ब्रॅण्ड वर स्थिरावलो. सुट्टे पैसे आणि कार्ड याचा मेळ घालत शेवटी एकदाची ती क्वार्टर आमच्या पदरात सॉरी खिशात पडली आणि वरात घरी येऊन स्थिरावली.एक अक्खी क्वार्टर खिशात म्हणजे काय याचा अभिमान अनुभवला आणि तयारीला लागलो.

कृती -

सर्वप्रथम एका खोल भांड्यात व्हिस्की ३०ml काढून घ्या. त्यात ते दोन चमचे क्रीम टाकून एका बलदंड आणि रिकाम्या माणसाकडे व्हिस्कर घालून द्या. त्याने बघणार्याला कंटाळा येईपर्यंत आणि त्याचा ट्रायसेप फुगून बेंडकुळी येईपर्यंत हलवावे. तरीही ते तयार होणार नाहीच याची खात्री बाळगावी. व्हिस्की फेसाळून त्यावर एक तवंग येईपर्यंत हलवून ठेवावे.

दुसऱ्या बाजूला आपली कॉफी उकळण्यास ठेवावी. चवीनुसार साखर घालून एक उकळी काढावी.

हे झाल्यावर वुफी सर्व करायला तय्यार !

एका छानशा ग्लासात सर्वप्रथम कॉफी ओतून घ्या. एक चमचा घेऊन त्यावर हळू हळू फेटलेली क्रिमी लेयर सोडा.

कॉफी ची कडक चव आणि व्हिस्की चा मधुर गिळगिळीतपणा एका वेगळीच अनुभूती देतो. थोड्या वेळानंतर जे झिंगालाला होत ते वेगळंच. सगळं करून झाल्यावर ह्याची जातकुळी आयरिश कॉफी असल्याचं समजलं आणि कपाळावर हात मारून घेतला.

पुढच्या खेपेस अजून काही कॉकटेल मध्ये आहुती देण्यास उरलेली व्हिस्की अजूनही फ्रिजवर वाट बघत आहे. तज्ञांच्या प्रतीक्षेत!

प्रतिक्रिया

फोटू नाय तर पाकृ नाय.

वरुण मोहिते's picture

24 Nov 2016 - 11:45 am | वरुण मोहिते

rc ह्या प्रकाराला आयरिश व्हिस्की लागते.. बेल्जीयम ला ह्याचे उत्तम प्रकार मिळतात . एकदा आयरिश आणून ट्राय करा .

वेल्लाभट's picture

24 Nov 2016 - 2:49 pm | वेल्लाभट

अरेरे. पण शेवटी झिंगालाला झालं ना! बास मग!

बा.द.वे. मी सीसीडीत गेलो की आयरिश कॉफीच घेतो. त्यात अल्कोहोल नसतं हे वेगळं.

खादाड's picture

26 Nov 2016 - 5:02 pm | खादाड

बाकि रेसिपी worth trying aahe