मुसळधार पावसात किवा बाहेर स्नो फॉल होत असताना गरम गरम भजी म्हणजे क्या कहने? तर पेश आहेत ही मिश्र डाळींची भजी..
मूग डाळ, हरबरा डाळ आणि उडीद डाळ एकेक वाटी असे समप्रमाणात घ्या.
त्या एकत्रच भिजत घाला. ७ ते ८ तास भिजवा.
म्हणजेच संध्याकाळी भजी हवी असतील तर सकाळी डाळी भिजवा. दुपारच्या जेवणात किवा ब्रंचला हवी असली तर रात्री डाळी भिजत घाला.
वाटताना त्यात दोन तीन मिरच्या, लसणीच्या २-३ पाकळ्या आणि आल्याचा लहानसा तुकडा घाला.
मिरच्यांचे प्रमाण आपापल्या तिखट पणाच्या आणि मिरच्यांच्या आवडीनुसार ठरवा. मी दोन मिरच्या घेतल्या.
कमीत कमी पाणी घालून वाटा.
ह्या वाटणात एक लहान कांदा बारीक चिरून घाला. कोथिंबिर चिरून घाला आणि चवीनुसार मीठ घाला.
तेल तापत ठेवा. तापलेल्या तेलाचे चमचाभर मोहन त्यात घाला.
मध्यम आचेवर भजी तळा.
आल्याच्या गरम चहाचे घुटके घेत, बाहेरचा पाऊस किवा स्नो बघत ही भजी खा, :)
किवा १८० अंशावर ए फ्रा ५ मिनिटे प्रि हिट करा. बेकिंगपेपरचे छोटे तुकडे करा व त्यावर सांडगे घालतो तशी भजी घाला व ए फ्रा मध्ये ठेवा. ४ मिनिटानंतर बाजू पालटून बेकिंग पेपर काढून टाका, तेलाचा हात लावा व परत ५ मिनिटे ए फ्रा करा.
कचोर्यांप्रमाणेच मुद्दाम दोन्ही पध्दतीने भजी करून पाहिली. नेहमी तळतो तशी भजी तर मस्त लागतातच पण ए फ्रा मधली भजीही तितकीच टेस्टी झाली होती.
दोन्ही फोटो देते आहे.
तेलात तळलेली भजी
ए फ्रा मधील भजी
प्रतिक्रिया
22 Nov 2016 - 6:51 pm | रेवती
वाह! दोन्ही प्रकारे पदार्थ करून दाखवण्याची कल्पना छान आहे.
22 Nov 2016 - 8:23 pm | पियुशा
वा ! सहीच , एअर फ्रायर मधले जास्त क्रिस्पी वाटत आहेत :)
22 Nov 2016 - 8:26 pm | पिलीयन रायडर
हे एअर फ्रायर प्रकरण घ्यावं लागणार असं वाटतंय. विश्वास बसत नाही इतकी क्लास दिसत आहेत ती भजी!!
22 Nov 2016 - 8:50 pm | प्रचेतस
मस्त
22 Nov 2016 - 9:33 pm | यशोधरा
मस्त!
22 Nov 2016 - 10:16 pm | आनंदयात्री
आजच करून बघणार.
23 Nov 2016 - 1:45 am | रुपी
वा.. सारखीच दिसत आहेत दोन्ही फोटोंतली भजी. ए.फ्रा.मध्ये बाजू पलटल्यावर बेकिंग पेपर काढून का टाकायचा?
23 Nov 2016 - 2:07 am | स्वाती दिनेश
बाजू पलटल्यावर भजी अर्धवट तयार झालेली असतात, त्यामुळे जाळीला चिकटत नाहीत.त्यामुळे बेकिंग पेपरची गरज उरत नाही आणि बेकिंग पेपरचे छोटे तुकडे जास्त वेळ ए फ्रा मध्ये ठेवल्यावर एकदोनदा जळले त्यामुळे मी आता ते काढून टाकते. अर्थात तेच तुकडे पुढच्या भज्यांच्या घाण्याला वापरता येतात.
स्वाती
23 Nov 2016 - 10:00 am | स्मिता चौगुले
दोन्ही प्रकारे पदार्थ करून दाखवण्याची कल्पना खरच खूप छान आहे
23 Nov 2016 - 12:42 pm | तुषार काळभोर
अशा डाळींची भजी रश्श्यात टाकून आमच्या घरी मस्स्त भाजी/रस्सा/आमटी करतात.
23 Nov 2016 - 2:22 pm | विजय पिंपळापुरे
इतर डाळी बरोबर मटकी किंवा मटकीची डाळ पण घालू शकता
मटकीची डाळ भिजवून, न वाटता घालावी.
जोडीला कढीपत्ता जरूर घालावा, फार छान स्वाद येतो.
23 Nov 2016 - 3:09 pm | प्राची१२३
वा !! मस्तच ....
24 Nov 2016 - 8:11 pm | मनिमौ
ईकडे.मस्त कुरकुरीत दिसतायत
24 Nov 2016 - 9:22 pm | अजया
मस्त मस्त!
25 Nov 2016 - 6:39 am | मदनबाण
कुरकुरीत... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मनमा इमोशन जागे रे... ;) :- Dilwale
25 Nov 2016 - 7:14 am | कविता१९७८
मस्तच
25 Nov 2016 - 7:24 pm | पद्मावति
मस्त.