घाटलं!!

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
17 Nov 2016 - 12:42 pm

गौरी गणपतीला, शेतकापणी झाल्यावर मूगवणीला तसेच कोकणात बय्राच सणांना घाटलं करायची पध्द्त आहे. नेहमीचेच पदार्थ वापरून केलेला अजून एक चविष्ट पारंपारीक प्रकार!
साहित्यः
अर्धी वाटी तांदळाचा रवा, एक वाटी गूळ, एका नारळाचे ओले खोबरे (यातले अर्धी वाटी तसेच वापरायचे आहे आणि बाकीच्याचे दूध काढायचे आहे.), चार वाट्या पाणी, वेलची पावडर, सुंठ पावडर एक चमचा, हळद पाव चमचा, मीठ आणि केशर, एक चमचा तूप.
ghatla
कृती:
ओल्या खोबय्रापैकी अर्धी वाटी बाजूला ठेवा. बाकी खोबय्राचे दूध काढून घ्या, साधारण चार वाट्या दूध निघेल. कढईत एक चमचा तूप घ्या. त्यात अर्धी वाटी रवा घालून मंद आचेवर तांबूस भाजून घ्या. एक वाटी गूळ, अर्धी वाटी ओले खोबरे, मीठ चवीपुरते, हळद, चार वाट्या पाणी हे सर्व एकत्र करा. उकळी काढा. गूळ विरघळला की भाजलेल्या रव्यात ओतून मंद आचेवर ठेवा. रवा शिजत आला की नारळाचे दूध, वेलची पावडर, सुंठ पावडर घालून ढवळा. वरून केशराच्या काड्या घाला.
तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे सैल घट्ट करा. पण घाटलं चमच्याने खाण्या इतपत असते. तांदळाच्या पिठाच्या घावनांबरोबर घाटलं करतात.
माझी आजी प्राजक्ताच्या फुलांची देठं काढून ती सावलीत वाळवत असे. आणि त्या काड्याच केशर म्हणून वापरत असे.
ghatla

प्रतिक्रिया

विजय पिंपळापुरे's picture

17 Nov 2016 - 1:40 pm | विजय पिंपळापुरे

सुन्दर पारंपारीक प्रकार

प्राजक्ताच्या फुलांची देठं केशर म्हणून वापरणे छान कल्पना

सिरुसेरि's picture

17 Nov 2016 - 2:42 pm | सिरुसेरि

+१

पद्मावति's picture

17 Nov 2016 - 2:46 pm | पद्मावति

मस्तं!

आदूबाळ's picture

17 Nov 2016 - 3:17 pm | आदूबाळ

माझी आजी प्राजक्ताच्या फुलांची देठं काढून ती सावलीत वाळवत असे. आणि त्या काड्याच केशर म्हणून वापरत असे.

हायला! चव वेगळी लागते का?

अनन्न्या's picture

17 Nov 2016 - 6:00 pm | अनन्न्या

केशर विकत आणण्याएवढे पैसे नसायचे म्हणून घरगूती केशर करायची ती. सण साजरा करणं आणि तोही घरात उपलब्ध असलेल्या गोष्टीतून....कर्ज काढून नव्हे.

पिलीयन रायडर's picture

17 Nov 2016 - 7:29 pm | पिलीयन रायडर

किती मस्त ग!!

पाकृ नेहमीप्रमाणेच सुरेख!

शशिधर केळकर's picture

17 Nov 2016 - 7:02 pm | शशिधर केळकर

घाटल्याची कृती छानच; प्राजक्ताच्या फुलांचा वापर केशराच्या ऐवजी विलक्षण!
आता तांदळाच्या पिठाच्या घावनाची कृतीही लागेल - नाहीतर घाटले नुसतेच खायला लागेल!

अनन्न्या's picture

18 Nov 2016 - 5:55 pm | अनन्न्या

घावनासाठी तांदूळ धुवावेत. सावलीत वाळवावेत. पीठ करून घ्यावे. आयत्यावेळी पिठात मीठ घालून पाण्यात किंवा दुधात भिजवावे. हे पीठ सैलसर असते. आंबवायचे नाही. तव्यावर धिरड्यासारखे घालावे. दोन्ही बाजू भाजाव्या. छान जाळी पडते.

तोंपासु.. नारळाचे दूध कसे करायचे?

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2016 - 8:01 pm | स्वाती दिनेश

आमच्याकडे गौरीजेवणाला घावन घाटलं हवेच. पण आमच्याकडे घाटलं जरा वेगळ्या पध्दतीने करतात. त्यात तांदळाचा रवा नसतो, कणिक असते. ही बघ पाकृ
स्वाती

निशाचर's picture

18 Nov 2016 - 3:52 am | निशाचर

+१. कणकेचं घाटलं माहित आहे.
तांदळाचा रवा आणि नारळाचं दूध घालून घाटलं माझ्यासाठी नवीन आहे. अर्थात चवीला छान सुरमट लागणार यात शंका नाही.

अनन्न्या's picture

18 Nov 2016 - 5:56 pm | अनन्न्या

माझ्या वाढदिवसाला दरवर्षी मी घाटलं करतेच.

रुपी's picture

20 Nov 2016 - 9:16 am | रुपी

अरे वा! मस्तच!

पाकृ नेहमीप्रमाणेच छान :)

नूतन सावंत's picture

17 Nov 2016 - 10:22 pm | नूतन सावंत

सुरेख, अनन्या! तू कोकणातल्या पारंपारिक पदार्थांचे छान डॉक्युमेंटेशन करते आहेस.

पदार्थ मस्तच दिसतोय. घाटले अश्याही पद्धतीचे असते हे माहित नव्हते. आमच्याकडे कणकेची गुळवणी करतात.

विशाखा राऊत's picture

18 Nov 2016 - 3:18 am | विशाखा राऊत

वाह मस्त रेसेपी.. केशर साठी प्राजक्ताची आयडिया एकदम मस्त

एस's picture

18 Nov 2016 - 4:45 am | एस

छान रेसिपी.

मंजूताई's picture

18 Nov 2016 - 7:40 am | मंजूताई

पाकृ! प्राजक्ताच्या फुलाचा वापर ... आयडीया आवडली. आसाममध्ये फूल वाळवून भजी करतात.

इशा१२३'s picture

18 Nov 2016 - 10:14 am | इशा१२३

मस्तच!

नविनच प्रकार आहे माझ्यासाठी करुन बघेल :)

Ram ram's picture

18 Nov 2016 - 11:18 am | Ram ram

तोंपासु हं

अनन्न्या's picture

18 Nov 2016 - 5:50 pm | अनन्न्या

कोकणातला पदार्थ म्हटला की नारळ आणि तांदूळ हे दोन हवेतच. पूर्वी जात्यावर रवा काढून घाटलं व्हायचं, आता सोपा पर्याय आहे...इडली रवा!

अशा पारंपारिक पाकृ बघितल्या की बरं वाटतं. फोटोतून तो बाऊल उचलून न्यावासा वाटतोय. =))

अनन्न्या's picture

18 Nov 2016 - 5:58 pm | अनन्न्या

आमच्याकडे बाळंतिणीला महिन्याच्या पहिल्या वाढदिवसाला घाटलं करतात. आणि मग त्यावर एक म्हण आहे... घावन घाटलं आणि सोडा खाटलं!!

अजया's picture

18 Nov 2016 - 6:56 pm | अजया

नेहमीप्रमाणे मस्त.

पैसा's picture

20 Nov 2016 - 4:03 pm | पैसा

छान पाकृ