तं(टं)ग्ग्ग्गडी कबाब .. .

स्मिता चौगुले's picture
स्मिता चौगुले in पाककृती
16 Nov 2016 - 3:15 pm

7
साहित्यः
४ चिकन लेग्ज

पहिले मॅरीनेशन
१ लिंबाचा रस
१ चमचा लाल मिरची पावडर
मीठ चवीनुसार

दुसरे मॅरीनेशन
१/२ लहान वाटी दही
१ चमचा आले-लसूण पेस्ट
२ चमचा तंदुरी मसाला/चिकन मसाला

पा़कृ -
1
चिकन लेग्ज धूवून, स्किन असेल तर साफ करून त्यावर सुरीने प्रचीमध्ये दाखवल्याप्रमाणे कट द्या
2

चिकनला पहिले मॅरीनेशन लिंबूरस+लाल मिरची पावडर+मीठ लावून मॅरीनेट करावे, अर्धातास फ्रिजमध्ये ठेवावे. यामुळे या मॅरीनेशनची चव व्यवस्थित मुरते.
3

अर्धातासानंतर यात दुसरे मॅरीनेशन दही+तंदुरी मसाला+आले-लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मॅरीनेट करावे आणि रात्रभर/४-५ तास कमीतकमी फ्रिजमध्ये ठेवावे.
4

5

कन्वेक्शन ओव्हन २०० डिग्रीवर प्री-हीट करावा, त्यात मॅरीनेट केलेले चिकन लेग्ज ठेवून ५मि. भाजावेत.
आता तापमान थोडे कमी ठेवून (१७०-१८० डिग्री) २०-२५ मिनिटे भाजावे. दरम्यान एकदा उलटून सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातेय याची खात्री करावी.

कांदा+चाट मसाला+लाल मिरची पावडर+मीठ सलाड बनवून कबाबसोबत सर्व्ह करावे
6

अधीक टीपा -
१) लाल मिरची पावडर - मी एवरेस्टचा तिखालाल वापरला आहे, तिखट + लाल रंगसाठी उत्तम
नसेल तर तुम्ही साधी लाल मिरची पावडर + चिमुट्भर लाल रंग घेवू शकता

२) दुसर्‍या मॅरीनेशनमध्ये चमचाभर बेसन/ पंढरपुरी डाळीचे पिठ घालतात, यामूळे मॅरीनेशन थोडे घट्ट होते आणि त्याचा एक थर चिकन लेग्जवर चि़कटतो.मला तसे आवडत नाही त्यांमूळे साहित्यात बेसन/ पंढरपुरी डाळीचे पिठ नाहीए.

३)दही शक्यतो घट्ट, पाणी नसलेले घ्यावे . नसेल तर तलम कापडात बांधून पाणी निथळून घ्यावे

४) कबाबसोबत पुदिन्याची चटणीपण सर्व्ह करु शकता. कबाबच्या मॅरीनेशनमध्ये पुदिन्याची चटणी घातली तर अजुन वेगळी चव येते. तुमच्या आवडीप्रमाणे याच्या मॅरीनेशनमध्ये तुम्ही फेरफार करु शकता

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

16 Nov 2016 - 3:18 pm | संजय पाटिल

तोंपासु...
बायदवे.. एअर फ्रायर मधे करता येइल का हे?

स्मिता चौगुले's picture

16 Nov 2016 - 4:06 pm | स्मिता चौगुले

एअर फ्रायरबद्दल कल्पणा नाही, पण साध्या पॅनमध्ये/ग्रिलपॅनमध्ये करु शकता.

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2016 - 7:42 pm | स्वाती दिनेश

ए फ्रा मध्ये करता येते. खूप छान होते. फक्त नंतर चिकन फॅटने खालचे पॅन खराब होते ते साफ करायला साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावे लागते.
स्मिता, कबाब मस्त दिसत आहेत.
स्वाती

स्मिता चौगुले's picture

21 Nov 2016 - 8:48 am | स्मिता चौगुले

धन्यवाद स्वातीताई

टवाळ कार्टा's picture

16 Nov 2016 - 3:31 pm | टवाळ कार्टा

काय त्रास आहे चायला...आता तंदूर कॉर्नर शोधणे आले

एस's picture

16 Nov 2016 - 3:41 pm | एस

सोपी पाकृ.

अजया's picture

16 Nov 2016 - 4:05 pm | अजया

छान सादरीकरण.

अप्पा जोगळेकर's picture

16 Nov 2016 - 4:37 pm | अप्पा जोगळेकर

कन्व्हेक्शन ऐवजी सिंपल मायक्रोवेव्ह मधे करता येईल का ? स्किन लेस तंगड्या मिळतात का बाजारात ?

संजय पाटिल's picture

16 Nov 2016 - 4:57 pm | संजय पाटिल

मायक्रोवेव्ह मधे चिकन फक्त शिजेल. त्याला तंदूर चा कूरकूरीतपणा नाहि येणार.
स्किन लेस तंगड्या मिळतात..

संजय पाटिल's picture

16 Nov 2016 - 5:45 pm | संजय पाटिल

हां मावे विथ ग्रील असेल तर बनवता येइल.

खादाड's picture

16 Nov 2016 - 4:44 pm | खादाड
खादाड's picture

16 Nov 2016 - 4:45 pm | खादाड

Chhan !!!

नूतन सावंत's picture

16 Nov 2016 - 7:43 pm | नूतन सावंत

चविष्ट.

खटपट्या's picture

16 Nov 2016 - 9:41 pm | खटपट्या

धाग्याच्या शिर्षकाला १०० मार्क्स

ये संडे को कर्के चोडेग्गा जी.

स्मिता चौगुले's picture

17 Nov 2016 - 9:54 am | स्मिता चौगुले

धन्यवाद सर्व प्रतिसादकर्त्यांचे.. :)

पियुशा's picture

17 Nov 2016 - 10:01 am | पियुशा

वा , मी वेजी असौन मला खावस वाट्तय !

स्मिता चौगुले's picture

17 Nov 2016 - 10:13 am | स्मिता चौगुले

:) मशरूम वापरून बघ अन मलापण सांग कसे लागते..चांगले लागेल असे वाटते