गट्टे के चावल : खास मारवाडी पेशकश

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in पाककृती
14 Nov 2016 - 3:23 pm

अस्मादिकांचे सासर मारवाड प्रांत राजस्थान येथे असून जातिवंत खवय्ये लोकांचा हा भाग आम्हाला साहजिकच एकदम आवडतो, त्यात जावईबुआ (स्थानिक भाषेत पावणेसा) म्हणजे आम्ही जरा जास्त स्पेशल असतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर नाश्त्याला प्याज कचौरी अन काजूकतली असले मजबूत आयटम ते डिनरला खास मारवाडी गट्टे के चावल अन कढी हे प्रकार व्हाया लंच मध्ये तुपात पोहणारी दलाबाटी-चुरमा, बिकानेरी भुजिया सब्जी, पापड सब्जी असे सगळे असते. मारवाडी + जैन संस्कृती त्यातही १२ महिने कांदा लसूण न खाणारे बहुसंख्य लोक आजूबाजूला असणे ह्यामुळे मारवाडी जेवणात कांदा लसूण अजिबातच नसतो किंवा फार कमी असतो. त्याचा अनुशेष भरून काढायला दुधदुभते भरपूर वापरणे होते. दिवसभरातले हेवी खाणे जिभेला आवडत असले तरी जिभेला आवडणारे अन पोटाला सुद्धा मस्त वाटणारे एक प्रकरण आज आपणासमोर मांडतो आहे. अर्थात लेखक फक्त मी आहे बल्लवकर्म कार्यसिद्धी पूर्णत्वास नेणारी सौ.बापूसाहेब उर्फ आमची मारवाडीण होय (आहे मराठीच ती, पण मारवाड मे पली हुई. इतके सगळे लिहावे लागते, मागं कमरेवर हात ठेऊन उभी आहे मुकादमासारखी ती)

तर साहित्य खालील प्रमाणे.
१. बासमती तांदूळ – १ वाटी
२. बेसन – १ वाटी
३. तेल – ४ टेबलस्पुन
४. दही – २ टेबलस्पुन
५. हळद – १/२ टी-स्पुन
६. तिखट – २ टी-स्पुन
७. जिरे – १ टी-स्पुन फोडणी करता
८. लवंग – ३-४
९. काळीमिरी- ३-४
१०. दालचिनी- अर्ध्या बोटा इतका एक तुकडा (आमच्याकडे नव्हता)
११. तमालपत्र- १
१२. मसाल्याची वेलची – १ (काळी वेलची)
१३. मीठ – चवीनुसार.

2016-11-14_01-52-26

प्रथम एका ताटलीत बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून , त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा तेलाचे मोहन घालावे. हे सगळे एकत्र मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते बेसन घट्ट मळून घ्यावे. मळून घेतल्यावर त्याच्या लांब लांब वळ्या करून (साधारण अंगठ्या इतक्या जाड) ठेवाव्यात.

IMG_20161114_132248947

IMG_20161114_132541525

IMG_20161114_132703415

आता एका पातेल्यात पाणी गरम करून (अंदाजे लोटाभर) त्याला उकळी फुटल्यावर त्यात तयार गट्टा सुरळी अलगद सोडाव्यात. गट्टा सुरळी आधी पाण्यात बुडतात. त्या पाण्यावर तरंगायला लागल्या की त्या शिजल्या असे समजावे. मग त्या पाण्यातून काढून थोड्या थंड करून त्यांचे बोटाच्या पेरा इतके तुकडे करावेत. हे झाले आपले गट्टे तयार.

IMG_20161114_133138512

IMG_20161114_133605377

IMG_20161114_133637472

2016-11-14_03-10-28

आता एका कुकर मध्ये २ चमचे (टेबल स्पुन) तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, मसाल्याची वेलची, दालचिनी घालून थोडे परतावे. आता त्यात कापून ठेवलेले गट्टे घालून ते अंदाजे दीड दोन मिनिटे परतावेत. परतणे झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावेत. त्यावर हळद, तिखट अन चवीनुसार मीठ घालून नीट परतावे तांदूळ (अंदाजे २ मिनिटे). ते परतून झाल्यावर त्यात गट्टे उकळलेले गरम पाणी दोन वाट्या घालावे. हे महत्वाचे आहे कारण ह्याने एकतर ते पाणी वाया जात नाही अन गट्टे अंगच्या चवीत शिजतात. आपण पाणी गरम घालणार आहोत त्यामुळे कुकरचे झाकण लावून फक्त २ शिट्या घ्याव्यात. जास्त घेतल्यास भात मऊ होऊन पुलाव खराब होऊ शकतो. एक शिटी घेतल्यावर एलपीजी थोडा कमी करावा. अन दुसरी शिटी थोड्या वेळाने घ्यावी.

IMG_20161114_134023859

IMG_20161114_134051448

IMG_20161114_134258749

IMG_20161114_134401516

दुसऱ्या शिटी नंतर कुकर गार होऊन झाकण पडेस्तोवर ठेवावा मग गट्टे के चावल गरमागरम सर्व करावेत.
गट्टे के चावल पारंपारिकरित्या आंबूस अन घट्ट कसुरी मेथी घातलेल्या मारवाडी कढी सोबत खातात. पण वेळ नसल्यास आपण कुठलेही एक रायते, किंवा ताजे फेटलेले घट्ट दही थोडे तिखट मीठ अन जिरेपूड घालून सोबत खायला घेऊ शकता. आम्ही बुंदी चे रायते ठेवले होते.

2016-11-14_03-10-44

प्रतिक्रिया

फोटो कुणी अपलोड केले आहेत..?

"सोनू बापू" नाव आवडले..!! :))

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 3:45 pm | कैलासवासी सोन्याबापु

फ्लिकर खाते काढताना याहू वर मेल आयडी बनवत होतो. त्यात नाव सोनू टाकले अन टायटल बापू! तेच रिफ्लेक्ट होतंय. :)

महासंग्राम's picture

14 Nov 2016 - 3:43 pm | महासंग्राम

बाप्पू तोंडाले पानी सुटलं ना हे वाचून !!! कवा बलाविता खायले ...

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 3:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

कवा बी या न देवा. तुमचेच आहे घर :)

महासंग्राम's picture

14 Nov 2016 - 3:52 pm | महासंग्राम

उत्तेरची मोहीम हाती घेतली कि तुम्हाला रितसर खलिता पाठवून गुप्त ठिकाणी भेटण्यात येईल. उगाच सिक्रसीचा भंग नको.

नारायणपेठेचा जेम्स बॉण्ड ०३०
(तुम्ही उत्तरेत कुठे तरी कामावर हायेत हा अंदाज आहे )

अप्पा जोगळेकर's picture

14 Nov 2016 - 3:50 pm | अप्पा जोगळेकर

एकदा उदयपूरला गट्टेची चवदार भाजी खाल्ली होती.
गट्टे चावल प्रकार पथमच पाहात आहे. छान.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 3:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

गट्टे भाजीला तरी सायास पडतात अप्पा हा भात तुलनेने सोपा. बघा करून, आवडला तर आम्हाला आठवत चेपा! :)

सूड's picture

14 Nov 2016 - 3:54 pm | सूड

भारीच!!

आदूबाळ's picture

14 Nov 2016 - 3:56 pm | आदूबाळ

अगं आय गं!

माझा एक मारवाडी मित्र फार उत्तम बनवायचा हा प्रकार. याच्याबरोबर मी बनवलेली मराठी कढी आणि तिसर्‍या आसामी मित्राने बनवलेलं 'पिटिका' (उकडलेले बटाटे मॅश करून बनवलेला प्रकार) असा आमचा झकास आंतरभारतीय मेनू असे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 4:00 pm | कैलासवासी सोन्याबापु

वाह!!!! :)

एस's picture

14 Nov 2016 - 5:20 pm | एस

वाह वाह!

नाखु's picture

14 Nov 2016 - 3:58 pm | नाखु

इतके दिवस मी गट्टे म्हणजे एखादी भाजी आहे काय आणि तिचे तिकडे हे नाव असावे असे सम्जत होतो.

जसे घोसाळ्याला खानदेशात काही वेगळेच नाव आहे तसे.

फार तिखट नसतो ना हा प्रकार ? लेकीला तिखट वाटणार नाहीना म्हणून विचारणा.

दस्तुरखुद्द नाखु

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 4:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

किती तिखट करायचा ते आपल्यावर आहे काका, मिरी घालू नका, तिखट कमी करा फक्त हळद घालून मीठ घालून बनवा खिचडी प्रमाणे. आपापली इच्छा. पोटभरीचा आयटम आहे वाटेल तसे बनवा.

त्रिवेणी's picture

15 Nov 2016 - 11:08 am | त्रिवेणी

घोसाळ्याला गिलक म्हणतो आम्ही खान्देशी लोक.
पुलाव मस्त दिसतोय पण मला भाजीच जास्त आवडते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Dec 2016 - 1:01 pm | कैलासवासी सोन्याबापु

काका गट्टे नाव असलेली एक सुकवलेली भाजी (राजस्थानी कुझीन मध्ये भरपूर वापरली जाणारी) म्हणजे 'कमल गट्टा' ह्या वाळवलेल्या कमळाच्या मुळ्या का देठ असतो, हिंदीत त्याला 'कमल ककडी' असं म्हणतात, मराठीत काय म्हणतात माहिती नाही, आधी त्याचे तुकडे भिजत घालून मऊ करून मग फोडणीत घालतात.

तोंपासु पाकृ.. फोटो लाजवाब

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 4:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं पाकृ !

पद्मावति's picture

14 Nov 2016 - 4:08 pm | पद्मावति

मस्तं!

नरेश माने's picture

14 Nov 2016 - 4:21 pm | नरेश माने

छान पाककृती!!! गट्टेकी सब्जी माझा एक मारवाडी मित्र होता पुर्वी कंपनीत तो आणायचा भारी लागते. गट्टे के चावल पण मस्त दिसताहेत.

बापुसाहेबांकडे यायला हवं आता.

नूतन सावंत's picture

14 Nov 2016 - 7:13 pm | नूतन सावंत

बापू,ठरवा बरं कट्टा!

अजया's picture

14 Nov 2016 - 7:23 pm | अजया

आम्हीही करतो हा गट्टे का पुलाव.कुकरमध्ये कधी केला नव्हता. सौ सोन्याबापूंच्या टिपप्रमाणे करून बघेन आता.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Nov 2016 - 7:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

क्या बात क्या बात बापुसाब!!!!!

चाणक्य's picture

14 Nov 2016 - 7:53 pm | चाणक्य

तोंपासु.

अमर विश्वास's picture

14 Nov 2016 - 8:16 pm | अमर विश्वास

बापुसाहेब .. तोंडाला पाणि सुटले ....

गट्ट्याची भाजी बरेचदा खाल्ली आहे पण गट्टे का चावल पहिल्यांदाच पाहतोय ....

आमच्या मारवाडी मित्राला जाब विचारायला पाहिजे .. हे अजूनपर्यंत हे का बनवले नाहीस ?(आणि मला का बोलावले नाही )

काँपी पेस्ट वाटते हे लिखाण मला, अगोदर वाचले आहे कोठे तरी

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 8:53 pm | कैलासवासी सोन्याबापु

हाहाहा आलात(च) परत?? शोधा कुठे लेखन सापडते ते! ओपन चॅलेंज तुम्हाला असेल हिंमत तर स्वीकारा अन लेखन कॉपी पेस्ट असल्याचे सिद्ध करा, मुदत किती हवी ते ही तुम्ही ठरवा, नाही सापडले तुम्ही ठरवलेल्या मुदतीत तर इथेच उघड माफी मागायची.

आहे दम?

ते कोनतरी बापूनी सेम असंच लिवलं होतं. Btw मला तुमची खुन्नस काढायची खुमखुमी आलेली. So so sorry ;-)

ते कोनतरी बापूनी सेम असंच लिवलं होतं. Btw मला तुमची खुन्नस काढायची खुमखुमी आलेली. So so sorry ;-)

Ram ram's picture

14 Nov 2016 - 9:43 pm | Ram ram

Hamka mafi dev thakur (bapu)

पैसा's picture

14 Nov 2016 - 10:00 pm | पैसा

लै भारी प्रकार आहे आणि सोपा पण!

रमेश आठवले's picture

14 Nov 2016 - 10:11 pm | रमेश आठवले

स्थानिक गरज
मरुभूमीत भाज्या पिकवता येत नाहीत. आत्तासारखे दूर देशातून भाज्या आणणे एके काळी शक्य नव्हते. त्यामुळे तेथे त्यांच्या जागेवर गट्टेकी सब्जी, बिकानेरी भुजिया सब्जी, पापड सब्जी असे पर्याय निर्माण झाले आहेत. हे सर्व चविष्ट असतात. त्या शिवाय तेथे उगवणाऱ्या केंगरी या झाडाच्या शेंगांची ही भाजी करतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Nov 2016 - 11:16 pm | कैलासवासी सोन्याबापु

केंगरी नव्हे आठवले सर ती 'सांगरी' असते, सांगरी म्हणजे सोप्या भाषेत शमीच्या झाडाला येणाऱ्या शेंगा, वाळवलेल्या शमीच्या शेंगा म्हणजे सांगरी, दुसरा प्रकार म्हणजे 'केर' हे एक बारीक फळ असते, आपल्याकडे त्याला केरं म्हणतात अन रामनवमीच्या आसपास ती बाजारात ताजी सापडतात, राजस्थानात ती वाळवून ठेवतात सांगरी महाग असते, जवळपास १००० ₹/ किलो वगैरे केर पण असेच आसपास असतात दोन्हीची मिक्स भाजी म्हणजे केर सांगरी, त्यात काजू व किसमिस हा सुकामेवा सुद्धा घातला जातो

रेवती's picture

16 Nov 2016 - 7:24 am | रेवती

केरच्या बिया या पौष्टिक म्हणून बाळंतिणीच्या लाडवातही घालतात.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2016 - 7:28 am | कैलासवासी सोन्याबापु

कल्पना नाही ताय!

रमेश आठवले's picture

15 Nov 2016 - 4:02 am | रमेश आठवले

धन्यवाद बापूसाहेब
२२ वर्षांपूर्वी चुरु जिल्ह्यात तेथील पाण्याच्या समस्येवर काम करण्यासाठी काही काळ राहिलो. तेथे असताना या दोन्ही भाज्या खाल्ल्या होत्या. नावे नीट लक्षात राहिली नव्हती.

वाह बापू खुप छान रेसिपी आहे.

वा.. मस्त. फोटो छान आलेत.

मी एकदा केला होता, छान लागतो.

रेवतीताईंनी पण इकडे दिली आहे पाकृ

रेवती's picture

16 Nov 2016 - 7:24 am | रेवती

:)

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2016 - 7:31 am | कैलासवासी सोन्याबापु

ताईची रेसिपी वाचली, जिभेला चटकदार वाटते आज, हे व्हेरिएशन करून पाहण्यात येईल. बाकी गट्टे पुलावात कांदे लसूण म्हणले की आमची अट्टल मारवाडीण एकदम पॅनिक मोड मध्ये जाणार. अनुभवांती सांगतोय ;)

जुइ's picture

16 Nov 2016 - 8:40 am | जुइ

सोपी आणि छान पाकृ. नक्कीच करुन बघनार. फोटो छान आलेत.

चांदणे संदीप's picture

16 Nov 2016 - 8:52 am | चांदणे संदीप

आमच्याकडं फुगलेल्या पोराला 'गट्ट्या' म्हणायची पद्धत आहे! ;)

पाककृती करून खाणेत येईल!

Sandy

वा वा, कधी खाउन पाहीले नाही रेसेपीच आज वाचलिय एक ट्राय तो बनता है :)

सुरेख प्रेझेन्टेशन ! भाताचे प्रकार फारसे प्रिय नसल्याने पास !
या गट्ट्याची भाजी कशी करतात ?

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Nov 2016 - 11:28 am | कैलासवासी सोन्याबापु

पुढे मागे टाकू ती रेसिपी गृहलक्षमीची कृपा झाल्यावर :)

नि३सोलपुरकर's picture

18 Nov 2016 - 3:04 pm | नि३सोलपुरकर

पावणेसा...राम राम _/\_.

छान रेसिपी आहे.

स्वाती दिनेश's picture

18 Nov 2016 - 7:34 pm | स्वाती दिनेश

मस्तच दिसत आहेत गट्टे के चावल.
स्वाती

कविता१९७८'s picture

18 Nov 2016 - 11:31 pm | कविता१९७८

मस्तच , कढी गट्टे भरपुर खाल्लेत आता हा प्रकार करुन पाहायला हवा

पिंगू's picture

19 Nov 2016 - 12:11 am | पिंगू

बाप्पू कधी बोलवतोय मग पार्टीला...

कैलासवासी सोन्याबापु's picture

19 Nov 2016 - 8:25 am | कैलासवासी सोन्याबापु

तू म्हणशील तेव्हा रे भावा!

गणामास्तर's picture

24 Nov 2016 - 8:19 am | गणामास्तर

काल रात्री गट्टे के चावल करून बघितले, भारी झालेले. फक्त बिना कांद्याचे कसे करावे हा प्रश्न बराचं वेळ छळत होता, शेवटी दिलाचं टाकून एक कांदा बारीक चिरून. कुणीही फोटो मागू नयेत कारण फोटो काढणे वगैरे सोपस्कार करण्यापेक्षा खाणे महत्वाचे वाटले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Nov 2016 - 11:35 am | कैलासवासी सोन्याबापु

कांदा घालायची हिंमत आमची झाली नाही, म्हणजे आमच्या मारवाडणीनं घातलाच नाही. राजस्थानात पुष्करणा ब्राह्मण तसेच जैन समाजाचा प्रचंड प्रभाव आहे खानपान संस्कृतीवर त्यामुळे सगळ्या जेवणात जवळजवळ कांदालसूण नसतोच, त्याची भरपाई, मिरी,सुंठ,हिंग अन आल्याने केला जातो, एरवी टिपिकल मराठी कांदालसूण घातलेला स्वयंपाक आवडणारा मी पण त्या जेवणात कांदा लसूण नसूनही आवडले होते, हा कांदा प्रयोग एकदा करून पाहायला हवा खरा :)

वटवट's picture

24 Nov 2016 - 12:04 pm | वटवट

तोंड को पाणी सुट्या

करुन बघितलाच पाहिजे. भात आणि गट्टे दोन्ही फार प्रिय !

सामान्य वाचक's picture

24 Nov 2016 - 1:35 pm | सामान्य वाचक

तर काय बहार येईल

अनिंद्य's picture

25 Nov 2016 - 4:54 pm | अनिंद्य
अनिंद्य's picture

25 Nov 2016 - 5:11 pm | अनिंद्य
पिशी अबोली's picture

25 Nov 2016 - 5:17 pm | पिशी अबोली

कधी ऐकलाच नाही गट्टे प्रकार. कधीतरी ट्राय करणेत येईल.

फोटो छान आलेत करून पहायला हवाच!

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Nov 2016 - 7:17 pm | कैलासवासी सोन्याबापु

बायकोला सरप्राईज म्हणून, एकदम रापचिक जमली होती, हॉटेल स्टाईल स्मोकी फ्लेवर वगैरे, मातीच्या हंडीत. फक्त घटक पदार्थ फोटो काढून लिहायचा टंकाळा आला होता म्हणून हे फक्त काही फोटो देतोय पेशेखिदमत

.

.

केले हो सोन्याबापू गट्टे के चावल ! सोबत कढी पण केली. खूप भारी बेत झाला. ताईंना धन्यवाद सांगा :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Nov 2016 - 11:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

ताई नई हो ती अजून ! बारकी आहे वयाने :) तरी सांगतो कौतुक तिला नक्की :)

महासंग्राम's picture

29 Nov 2016 - 5:14 pm | महासंग्राम

बघा बघा

ताई नई हो ती अजून

आडून बापूनी मी म्हातारा झालो नाही हे सुचवले आहे. ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

29 Nov 2016 - 5:28 pm | कैलासवासी सोन्याबापु

अकोल्याचे पोट्टेपाट्टे कुटी न्याच्या लायकीचे नोय

हे वाक्य सिद्ध केल्याबद्दल मंदारभाऊ ह्यांचे अभिनंदन अन त्यांचा जंगी सत्कार धिंग्रा चौकात आयोजित करायचा मानस ह्या प्रसंगी व्यक्त करतो =)) =))

बाकी,

तुम्ही पोलीस खात्यात आहात का हो ? =))

अनिंद्य's picture

29 Nov 2016 - 2:31 pm | अनिंद्य

पहिले गट्टे का पुलाव, मग आता बिर्यानी. ग्लूटेन फ्री डाएटच्या दिवसांसाठी एक्दम परफेक्ट बेत आहेत !

गट्टे का पुलाव, बडी का पुलाव अगदी आवडीचे. गट्टा सब्जी विथ दही का छोक सुद्धा खास पसंतीची. आणि त्यात त्या जयपूरवाल्यांचे राजेशाही व्हेरिएशन गोविंदगट्टा ! स्लर्प !

सोप्या-क्रमवार-सचित्र कृतीसाठी धन्यवाद.
स्मोकी फ्लेवर बिर्यानीची कृती टाका प्लीज.