(जवळ जवळ) पेसरेट्टु (च)..

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in पाककृती
3 Nov 2016 - 7:43 pm

यंदा काही तरी बर्‍यापैकी जमलंय म्हणुन आवर्जुन पाकृ टाकत आहे. मला जवळपास जमलंच आहे, तुमची थोडीशी मदत लागेल शेवटी शेवटी..

माझ्या एका कानडी मैत्रिणीने मला शिकवलेले हे पेसरेट्टु! म्हणजेच मुगाचे डोसे.

काही म्हणजे काहीच अवघड नाही.

साहित्य :- (माझा कारभार अंदाजपंचे दाहोदरसे असतो. घ्या आपापल्या हिशोबाने..)

चटणीसाठी:-
फोडणीचे साहित्य, कांदा, टोमॅटो, चिंच, गुळ, शेंगदाणे/काजु

पेसरेट्टुसाठी:-
दोन वाट्या हिरवे मुग
एक वाटी तांदुळ
आलं, मिरची, लसुण, कोथिंबीर
मीठ

कृती:-

चटणी:- जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्ता ह्यांची फोडणी करुन त्यात चिरलेला कांदा घालुन थोडा परतुन घ्या. मग त्यावर चिरलेला टोमॅटो घाला. वरुन चिंच-गुळ टाकुन एक वाफ काढा. ह्या मिश्रणाला थंड करुन मिक्सर मधुन वाटुन घ्या. घट्टपणासाठी थोडे शेंगदाणे किंवा काजु घाला.

डोसे:- रात्री स्वच्छ धुतलेले एक वाटी तांदुळ आणि दोन वाटी मुग भिजत घाला. सकाळी आलं, मिरची, लसुण, कोथिंबीर, मीठ घालुन मिक्सर मधुन सरबरीत वाटुन घ्या.

आता ह्या पीठाचे आपापल्या वकुबा प्रमाणे डोसे काढा. मला कुरकुरीत डोसे अ जि बा त येत नाहीत. मी लहान भांड्यात पीठ घेऊन, पाणी टाकुन थोडं पातळ करते. आणि मग ते सरळ तव्यावर ओतते. तसं ते आपोआप पसरतं किंवा आपण टाकतानाच गोल टाकायच. पण तरीही आकारात गडबड वाटलीच तर तवा हॅण्डलला धरुन गोल गोल फिरवायचा. होतंच मग ते गोल! कानडी लोक वरुन कांदा टाकतात चिरलेला. मी नाही टाकला.

आता इथवर मला जमलंय. तुम्हाला फक्त खालच्या फोटोत धिरड्या ऐवजी पातळ कुरकुरित डोसा इमॅजिन करायचा आहे. झालं पेसरेट्टु! हाकानाका!

1

तळटिपा:-

मी कमला सोहोनींच्या पुस्तकात असं वाचल्याचं आठवतंय की कडधान्यांना नेहमी मोड येऊ द्यावेत आणि मगच ते खावेत. मोड न आलेल्या कडधान्यात काही हानिकारक घटक असतात म्हणे. हेच डॉसे जर मोड आलेल्या मुगाचे केले तर कसे होतील कल्पना नाही. पण हे न मोड आलेले मुग वापरावेत का?

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

3 Nov 2016 - 7:56 pm | राघवेंद्र

छान जमलाय.
पेसरेटू च्या वर पांढरा उपमा देतात हैद्राबाद मध्ये. १०-१२ वर्षांपूर्वी नाश्ता-लंच म्हणून पेसरेटू -उपमा खात असायचो .
मोड आलेले मुग यात नाही वापरतात.
(डिश चे नाव बरोबर खाली यायला हवे होते. )

रमेश आठवले's picture

3 Nov 2016 - 8:57 pm | रमेश आठवले

याच पदार्थाला हैदराबाद मध्ये एमेलए डोसा म्हणतात.या नावाचं कारण माहीत नाही.

राघवेंद्र's picture

3 Nov 2016 - 9:28 pm | राघवेंद्र

MLA कॅन्टीन म्हणजे आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये असे कॉम्बिनेशन पहिल्यांदा वापरात आले म्हणून.

कपिलमुनी's picture

3 Nov 2016 - 9:44 pm | कपिलमुनी

एमएलए पेसरट्ट फार सुंदर मिळतो

बोका-ए-आझम's picture

4 Nov 2016 - 1:29 pm | बोका-ए-आझम

असं फक्त नाव सांगून सोडून नका देऊ.

मोदक's picture

4 Nov 2016 - 1:35 pm | मोदक

पत्ता सांगा...

या पाकृचे आपले व्हर्जन आवडीचा प्रकार आहे.

कपिलमुनी's picture

4 Nov 2016 - 3:42 pm | कपिलमुनी

बेगमपेठसे सीधा जाके जुबीली हिलके इधर किसीकोबी पूछ ,चटनीज् किदर है!

चटनीजबद्दल फार्फार चविष्ट आठवणी आहेत हैद्राबादेच्या. त्यांच्याकडे सगळंच छान मिळतं. रजनीकांत दोसाही.

एस's picture

3 Nov 2016 - 7:58 pm | एस

इतका छान पेसरेट्टू मोडवणार नाही. पण तुमचे मनही मोडवणार नाही. त्यामुळे वाढल्यास खाल्ला जाईल. =))

बादवे, आख्ख्या मुगाची उसळ फार म्हणजे फार प्रिय असल्याने मोड-बीड न आणता न खाण्याची कल्पना फेटाळण्यात येत आहे.

बोका-ए-आझम's picture

3 Nov 2016 - 8:18 pm | बोका-ए-आझम

कॅफे मद्रास मध्ये जाऊन खाणं जास्त tempting आहे.

पण कॅफे मद्रास ज्यांच्या जवळ नाही, त्यांना बनवूनच खायला लागणार ना आता ! :(

बोका-ए-आझम's picture

4 Nov 2016 - 9:22 am | बोका-ए-आझम

:)

सरळ मूगाचा चिल्ला कर ना. काहीच कटकट नाही..

पिलीयन रायडर's picture

3 Nov 2016 - 8:51 pm | पिलीयन रायडर

आता चिल्ला म्हणजेही साधारण हेच ना? की ते काही वेगळे असते?

पिंगू's picture

4 Nov 2016 - 7:12 pm | पिंगू
डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Nov 2016 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर पाककृती ! अजून खाल्लेली नाही, पण मुगांची चव आवडत असल्याने चवही नक्की आवडेल.

कडधान्यांना नेहमी मोड येऊ द्यावेत आणि मगच ते खावेत. मोड न आलेल्या कडधान्यात काही हानिकारक घटक असतात म्हणे.

मोड न आलेल्या कडधान्यांमध्ये काही हानीकारक घटक असतात हे शास्त्रियरित्या खरे नाही. तसे असते तर, भिजत न ठेवता रोजच्या भारतिय जेवणात मुख्य पदार्थाच्या रुपाने शेकडो वर्षे वापरल्या जाण्यार्‍या डाळींमुळे (ज्या मूळात कडधान्येच असतात) आतापर्यंत फार मोठा धोका झालेला दिसायला हवा होता, नाही का ?! (नेहमीच्या वापरात नसलेल्या एखाद्या विशिष्ट कडधान्याबद्दल तसे मत असल्यास माहीत नाही.)

कडधान्यांना मोड येताना तेव्हा नवीन झाडाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अनेक उपयोगी घटक त्यांच्यात निर्माण होतात. शिवाय मोड आलेल्या कडधान्यांची चव जास्त चांगली लागते. मोड आलेली कच्ची कडधान्ये खाल्ली तर ते घटक आपल्याला मिळू शकतात. जास्त शिजवल्यावर त्यातले असे बरेचसे घटक नष्ट होतात. त्यामुळे, कच्च्या व अर्धकच्च्या कडधान्यांत (उदा. चीनी पदार्थांतली कुरकुरीत कडधान्ये) अधिक पोषणमुल्ये असतात असे म्हणणे योग्य होईल.

मात्र, कोणत्याही प्रकारचे (शाकाहारी / मांसाहारी) अर्धकच्चे अन्न स्वच्छतेची पुरेशी काळजी न घेता बनवले तर त्यांत नैसर्गिक अथवा अनैसर्गिकरित्या असणार्‍या जंतूचा प्रादुर्भाव कायम राहून धोका होऊ शकतो. त्यामुळे, कच्चे अन्न खाताना याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पिलीयन रायडर's picture

3 Nov 2016 - 8:50 pm | पिलीयन रायडर

अहो मी कमला सोहोनींच्या पुस्तकात वाचलं होतं. विकीवर हे वाक्य सापडलं:-
Sprouting, like cooking, reduces anti-nutritional compounds in raw legumes. Raw lentils, for example, contain lectins, antinutrional proteins which can be reduced by sprouting or cooking.

साधारण असंच काहीसं म्हणणं होतं त्या पुस्तकात.

पण कुकिंग पण मोड काढण्यासातल्हेच काम करत असेल ह्या बाबतीत, तर मग तुम्ही म्हणतात तसं काहीच हरकत नाही :)

जंतुंच्या प्रादुर्भावाबद्दल सहमत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Nov 2016 - 11:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

ते इतर कोणाच्या तरी पुस्तकातलं मत आहे, हे वाचलंय मी. :)

तो प्रतिसाद टीका नव्हती. छापून आलेल्या गोष्टींवर लोक सहज विश्वास ठेवतात म्हणुन मी केवळ लोकांचा गैरसमज टळण्यासाठी आणि जरा जास्त माहिती देण्यासाठी विस्तारने लिहिले आहे.

Sprouting, like cooking, reduces anti-nutritional compounds in raw legumes. Raw lentils, for example, contain lectins, antinutrional proteins which can be reduced by sprouting or cooking.

antinutrional म्हणजे अन्नाचे अन्नमार्गात शोषण होण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक अथवा कृत्रिम पदार्थ. (या वाक्यात दिल्याप्रमाणेच) नैसर्गिकरित्या कडधान्यांत असलेले हे पदार्थ मोड येताना आणि शिजविताना कमी/नष्ट होतात. इथे raw legumes हा शब्द मोड न आलेली किंवा न शिजवलेली सुकी कडधान्ये या अर्थाने वापरला आहे असे दिसते.

अप्पा जोगळेकर's picture

4 Nov 2016 - 8:38 am | अप्पा जोगळेकर

मोड आणण्याबद्दल विविध प्रवाद आहेत.
काही जण मोड आणून खाणे म्हणजे कुजवलेले अन्न खाणे असे सांगतात.
काही जण मोड आणलेले अन्न खाऊन गॅस होतो असे सांगतात.
आज हे मोड न आणता खाऊ नये हे ऐकले.
वर्तुळ पूर्ण झाले.

कडधान्यांना मोड आले तर त्यांच्यातील क जीवनसत्व वाढतं. शिवाय ते पचायला हलके बनतात.

पैसा's picture

4 Nov 2016 - 11:26 am | पैसा

कुजवलेले तर नसतेच. गॅसबद्दल माहीत नाही. मात्र मोड आलेले कडधान्य कच्चे खाल्ले तरी सहज पचते. आता काही लोक अळंबी खात नाहीत कारण ती बुरशी गटातली ना? पण त्यातूनही उत्तम प्रकारे पोषक घटक मिळतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2016 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

काही जण मोड आणून खाणे म्हणजे कुजवलेले अन्न खाणे असे सांगतात.
काही जण मोड आणलेले अन्न खाऊन गॅस होतो असे सांगतात.
आज हे मोड न आणता खाऊ नये हे ऐकले.

या सगळ्या अशास्त्रिय अंधश्रद्धा आहेत :)

त्रिवेणी's picture

3 Nov 2016 - 9:06 pm | त्रिवेणी

मी जेव्हाही करते तेव्हा मोड आलेल्या मुगाचेच करते. मस्त लागतात.

पिलीयन रायडर's picture

3 Nov 2016 - 9:08 pm | पिलीयन रायडर

म्हणजे होतात तर मोड आलेल्या मुगाचे नीट! मग मी पण पुढच्या वेळेस तसेच करेन.

पूर्वाविवेक's picture

5 Nov 2016 - 3:07 pm | पूर्वाविवेक

खरतर हे नुसत्या डाळीचेच करतात, तांदूळ वापरत नाहीत. त्या ऐवजी थोडा रवा घातला तर अगदी मस्त कुरकुरीत होतात.
मुगाला मोड आणून एकदा केले होते, नंतर कितीवेळ भूकच लागेना. पोट डब्ब .... अर्थात हा माझा अनुभव.
http://purvasfoodfunda.blogspot.in/2012/12/pesarattu-dosa-mung-dal-ghava...

प्रियान's picture

3 Nov 2016 - 9:08 pm | प्रियान

मी नुसते मूग किव्वा साल असलेली मूगडाळ भिजवून त्याचे दोषे बनवते.
आता या पद्धतीने तांदूळ वापरून बनवून बघेन. छान जमलेत तुझे डोसे!

बाकी खाणारे आपणच , त्यामुळे कुरकुरीत डोसा होवो वा धिरडी, कि फरक पेंदा ;)

पिलीयन रायडर's picture

3 Nov 2016 - 9:09 pm | पिलीयन रायडर

मुगाची डाळ वापरुन?

तांदुळ घालतेस का त्यात? प्रमाण काय असतं?

अख्खे मूग किव्वा साल असलेली डाळ रात्री भिजवून, सकाळी मिरची, कोथिंबीर, आले, जिरे आणि मीठ घालून वाटायची.
कुरकुरीत डोसे होण्या करता ह्या batter मध्ये चमचा भर तांदळीची पिठी घालायची.
1 कप मुगाचे 5-6 डोसे होतात.

रमेश आठवले's picture

5 Nov 2016 - 9:41 pm | रमेश आठवले

हॉटेल मध्ये खाल्लेले पेसरटू थोडेसे हिरव्या रंगाचे असतात . तेंव्हा तेथे बहुधा अक्खे मूग वापरले जात असावेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2016 - 9:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान ! आवडले. थोडं धीरडया सारखं दिस्तंय हे पेसरटट्टू !

-दिलीप बिरुटे

सामान्य वाचक's picture

3 Nov 2016 - 9:56 pm | सामान्य वाचक

शीवधनुष्य उचललस बै
(संदर्भ होसुमियाघ)

पद्मावति's picture

3 Nov 2016 - 10:26 pm | पद्मावति

मस्तं दिसताहेत पेसरटट्टू.

पैसा's picture

3 Nov 2016 - 10:31 pm | पैसा

छान जमलंय ग! पण फसले असते तर जास्त मजा आली असती! :P

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 2:38 pm | सस्नेह

आणखी एक ब्लेमगेम वाचायला मिळाला असता =))

सूड's picture

3 Nov 2016 - 10:41 pm | सूड

चांगलं दिसतंय की!!

चांगलं दिसतय. मला आवडतं व बरोबर उपमा असतो तोही.

स्वाती दिनेश's picture

4 Nov 2016 - 12:56 am | स्वाती दिनेश

पेसरट्टु छान दिसत आहेत, माझा आवडीचा पदार्थ.
स्वाती

अप्पा जोगळेकर's picture

4 Nov 2016 - 8:41 am | अप्पा जोगळेकर

छान पदार्थ. यात थोडा रवा घातला तरी चालते. कुरकुरीत पणा साठी थोडे कच्चे पोहे घालावेत.

श्रीरंग_जोशी's picture

4 Nov 2016 - 9:12 am | श्रीरंग_जोशी

पौष्टिक पाककृती आवडली. दोसे करणे अवघड वाटत असल्याने मी उतप्पेच करतो. कधी तरी हे बनवण्याचा प्रयत्न करीन.

प्रीत-मोहर's picture

4 Nov 2016 - 9:36 am | प्रीत-मोहर

सा वा आणि पैसाक्का ना +१०००००००००००००००००

बाकी छान दिसताहेत ग पेसरट्टु

स्मिता चौगुले's picture

4 Nov 2016 - 11:42 am | स्मिता चौगुले

अरे वा सुगरणबई.. छानच की

बाकी ते उकडिच्या मोदकाचे कुठवरं आले. .. (पळा ... )

सिरुसेरि's picture

4 Nov 2016 - 2:29 pm | सिरुसेरि

70 MM पेसरट्टु / 70 MM डोसा असाहि एक प्रकार हैदराबादला कामतमध्ये मिळतो .

प्राची१२३'s picture

4 Nov 2016 - 4:07 pm | प्राची१२३

वा छान !!! मी ही असाच करते.

जमलेत कि! कुरकुरीत व्हायला तांदुळपिठ वापर.पण मलाही असेच आवडतात.
आता एखादा अवघड पदार्थ करना!

विजय पिंपळापुरे's picture

4 Nov 2016 - 7:07 pm | विजय पिंपळापुरे

डोसच्या पिठा मध्य मोड़ आलेले मुग मिक्सर मध्ये फिरवुन टाकावेत
त्याचे पण छान दोशे होतात

विजय पिंपळापुरे's picture

4 Nov 2016 - 7:09 pm | विजय पिंपळापुरे

चटनी मध्ये मिठ मिर्ची टाकली नाही का

पाटीलभाऊ's picture

4 Nov 2016 - 7:12 pm | पाटीलभाऊ

मस्त दिसतायत

मनिमौ's picture

4 Nov 2016 - 7:33 pm | मनिमौ

एकंदरीत परदेश वारी पिराला सुगरण बनवणार

विशाखा राऊत's picture

6 Nov 2016 - 4:26 am | विशाखा राऊत

एकदम जोश मे हैं पिरा ;)

चांगला दिसतोय की पेसरट्टू! पेसरट्टूचं पीठ फक्त मुगाचं किंवा सालाच्या मुगडाळीचं असेल तर पेसरट्टू जाडसर आणि मऊच होतात आणि छान हिरवट रंग येतो. कांदा, आलं आणि मिरची पीठात न टाकता उत्तप्प्यासारखी वरून घालल्यास मस्त चव येते. बरोबर चटणीपेक्षा आंब्याचं किंवा आल्याचं लोणचं!

नूतन सावंत's picture

7 Nov 2016 - 5:53 pm | नूतन सावंत

मस्त जमलेत की पेसारट्टू.फक्त चटणीत तिखटा साठी लाल सुक्या मिरच्या व चवीनुसार मीठ घालते मी.

मैत्र's picture

7 Nov 2016 - 6:36 pm | मैत्र

हा आंध्र पदार्थ आहे. कानडी नाही.

तेलुगू घरात तुम्हाला जसा जमला आहे तसाच करतात. पेपर डोशासारखा कुरकुरीत नाही. त्यामुळे मस्त आनंद असावा की झकास जमला आहे.

उत्तप्पा करतात तसं यावर वरून कांदा आणि शिवाय हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि आल्याचे तुकडे. जिरे सुद्धा वरून घालतात.

कर्नाटकात अककी रोटी म्हणजे तांदळाची आणि रागी रोटी म्हणजे नाचणी ची केली जाते.

पेसरटटू शब्द पेसर पप्पू या तेलुगू शब्दावरून आला आहे. पप्पू म्हणजे डाळ. पेसर म्हणजे मूग.

पिलीयन रायडर's picture

7 Nov 2016 - 7:40 pm | पिलीयन रायडर

हो, हे सांगायचं राहुनच गेलें की शेकलेय कानडी मैत्रिणीकडुन पण पदार्थ तेलगु आहे!

कुरकुरीत करतच नसतील मुळ पदार्थ तर शाब्बाद पिरा!! पण मैत्रिणीने कुरकुरित डोसा करुन वाढला होता तो अप्रतिमच लागत होता. (अर्थात त्यावर तुम्ही म्हणताय तसं कांदा,मिरची घातली होती. आणि सर्वात महत्वाचं, आयता गरम गरम वाढला होता!)

विशाखापटणमची आठवण झाली.(१९९९) तेथे अत्यंत स्वस्त अशी "टिफिन्स' नामक रेस्टोरंट होती जेथे रुपये ६ ला दोन इडल्या किंवा रुपये ८ ला दोन मेंदू वडे सांबार चार चटण्यांसकट( नारळाची जाड वाटलेली पांढरी, नारळाची हिरवी मिरची घालून हिरवी चटणी,लाल मिरची घालून लाल चटणी आणि चौथी चिंचेची) इडली किंवा वडा खोल कप्पे असलेल्या प्लेट मध्ये घालून आणि चैतन्य बाहेर ठेवलेल्या पाहिजे तेवढ्या घ्या. तेथे ९ रुपयाला पेसराटू मिळत असे
२५-३० रुपयात मी पत्नी आणि दोन लहान मुले( ५ आणि २ वर्षे) असे चौघांचे व्यवस्थित आणि चविष्ट जेवण होत असे. तीन प्लेट टिफिन आणि दोन "कापी"
तेंव्हा मुंबईत २५-३० रुपयात १ प्लेट इडली मिळत असे.

पियुशा's picture

17 Nov 2016 - 10:05 am | पियुशा

भारी जमलाय बर का पिरा - ( द भीत भीत भावी सुगरण ) :प

मस्त झालेत. मला आधी डोसे पातळ, कुरकुरीत करण्याची फार हौस होती. मग नवर्‍याने सांगितले त्याच्या एका तमीळ मित्राच्या घरी डोसे जाडच असतात, मग तसेच करायला लागले, जरा वेळही वाचतो. शिवाय, जाड डोश्यांमध्ये जी जाळीची मजा आहे ती कुरकुरीत डोश्यांमध्ये नाही.

सविता००१'s picture

23 Feb 2017 - 9:29 am | सविता००१

.

जमलंय का?

पिलीयन रायडर's picture

2 Mar 2017 - 8:09 pm | पिलीयन रायडर

अरे वा! अगदी क्लास जमलाय की! तू कसा केलास? मुगाला ओड आणुन की नुसते भिजवुन ८-१० तासानी वापरलेस?

सविता००१'s picture

3 Mar 2017 - 4:59 pm | सविता००१

नुसते भिजवून वापरलेत.