विरामचिन्हाबाबत.

Dilipkumar's picture
Dilipkumar in काथ्याकूट
29 Sep 2008 - 1:09 pm
गाभा: 

मराठी आणि इन्ग्रजी या दोन्ही भाषामध्ये विरामचिन्हे (Punctuations) ही सारखीच कशी आहेत?

प्रतिक्रिया

सुनील's picture

29 Sep 2008 - 1:19 pm | सुनील

मराठीत वापरली जाणारी सर्व विरामचिन्हे ही मराठीला कॅन्डीसाहेबाने (चुभुद्याघ्या) दिलेली देणगी आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भास्कर केन्डे's picture

29 Sep 2008 - 11:55 pm | भास्कर केन्डे

सुनील साहेब,

जरा तपशीलवार सांगा ना राव. मला सुद्धा ही ऐकीव माहिती आहे. अधिक खोलात जाणून घ्यायची इच्छा आहे...

आपला,
(आशाळभूत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

टारझन's picture

30 Sep 2008 - 2:24 am | टारझन

मराठी आणि इन्ग्रजी या दोन्ही भाषामध्ये विरामचिन्हे (Punctuations) ही सारखीच कशी आहेत?
असेच म्हणतो , सहमत आहे.

:) आजकाल एक लाइनचे धागे फार निघायला लागलेत नै ? :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

सुनील's picture

30 Sep 2008 - 11:30 am | सुनील

पूर्वी मराठी ही मोडी लिपीत लिहिली जायची. जवळपास छापखाने सुरू होईपर्यंत हीच परिस्थिती होती. मोडी लिपीत विरामचिन्हे तर सोडाच पण र्‍हस्व्-दीर्घ हे भेददेखिल नाहीत! इतकेच काय पण दोन शब्दांमध्ये सोडली जाणारी मोकळी जागाही सोडली जात नाही.

आजच्या पूर्णविरामासारखे वापरले जाणारे दंड हेच काय ते एकमेव विरामचिन्ह संस्कृतमध्येदेखिल वापरले जात होते.

मराठेचे हे खर्‍या अर्थाने "रांगडे" रूप पालटले ते मोल्सवर्थ आणि कँडी ह्या ब्रिटीशांनी. त्यांनीच मराठी-इंग्रजी हा पहिला शब्दकोष निर्माण केला तसेच इंग्रजीत वापरली जाणारी सगळी विरामचिन्हे मराठीसाठी वापरायला सुरूवात केली.

मराठीचे आजचे हे सुटसुटीत स्वरूप हे त्याचेच फळ आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गणपा's picture

30 Sep 2008 - 1:59 pm | गणपा

छान माहिती दिलीस सुनील..
इतकी वर्ष मराठी लिहितोय / वाचतोय, पण हा विरामचिन्हांचा विचार कधीच डोक्यात आला नाही . :?
ह्या प्रश्ना बद्दल दिलीपकुमार आणि त्याच उत्तर दिल्या बद्दल सुनील या दोधांचे आभार..
-गणपा

Dilipkumar's picture

1 Oct 2008 - 11:55 am | Dilipkumar

धन्यवाद!!!

दिलीपकुमार.