झटपट काजू-खोबरे बर्फी (मायक्रोव्हेव स्पेशल)

इशा१२३'s picture
इशा१२३ in पाककृती
27 Oct 2016 - 5:06 pm

बर्फि
साहित्य :तिन वाटि : ओले खोबरे उचलेले
दोन वाटि : साखर
एक छोटी वाटि :दुध पावडर
एक छोटी वाटी : काजू पावडर
दुध : दोन तिन चमचे
वेलदोडा पुड,केशर,पिस्ता काप

सा

कृती :खवलेले खोबरे आणि साखर व काजू पावडर मिक्सर भांड्यात तिन चमचे दुध घालुन फिरवून एकजीव करुन घेणे.हे मिश्रण मायक्रोव्हेव भांड्यात घालून दोन मिनिट हाय पोवरवर ठेवावे.दोन मिनिटानंतर मिश्रण एकदा हलवावे.परत दोन मिनिट हाय पोवरवर ठेवावे. आता या मिश्रणास बुडबुडे यायला लागतील.
दोन मिनिटानंतर भांड बाहेर काढून त्यात दुधपावडर व वेलदोडा पुड घालावी.मिश्रण निट एकत्र करुन परत अर्धा मिनिटासाठि आत ठेवावे.आता जरासे घट्ट होईल.

बर्फि

आता हे मिश्रण दहा मिनिट तसेच कोमट होउ द्यावे. एक ताटलीला तूप लाउन हे मिश्रण त्यात थापून घ्यावे.वरुन पिस्ता काप, केशर लावावे आणि सुरीने लगेच बर्फी कापावी.

ब

पूर्ण गार झाल्यावर छान बर्फि तयार होते. आता अलगद उचलून चव पहावी लगेच तोंडात विरघळते.

ब२
*या बर्फित काजू ऐवजी बदाम, पिस्ता पुडहि घालता येते. नक्की करुन पहा.
दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा !!

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

27 Oct 2016 - 5:18 pm | कविता१९७८

मस्तच

इशा१२३'s picture

27 Oct 2016 - 5:29 pm | इशा१२३

फोटो असे भव्यदिव्य का दिसताहेत?नेहेमीचा साईज दिला होता. सा सं.मदत करु शकाल का?

कविता१९७८'s picture

27 Oct 2016 - 5:34 pm | कविता१९७८

भव्य दिव्य (हा हा हा हा )

तुषार काळभोर's picture

27 Oct 2016 - 5:42 pm | तुषार काळभोर

त्यात कन्वेन्शन ओवन नाही. फक्त मायक्रोवेव्ह आहे.
मागची चार वर्षे फक्त रात्रीची उरलेली भाजी गरम करण्यापुरता उपयोग होतोय.

मावेच्या अजून छान छान पाकृ टाकत राहा. :)

अवांतरः बर्फी झक्कास आहे ;)

इशा१२३'s picture

27 Oct 2016 - 5:46 pm | इशा१२३

धन्यवाद!
कनव्हेक्शनची गरज नाहि.साधा मावेत होईल.

सूड's picture

27 Oct 2016 - 6:31 pm | सूड

फोटो दिसत नाहीयेत.

नूतन सावंत's picture

27 Oct 2016 - 6:41 pm | नूतन सावंत

Zakas,kharach zatpat pan kruti.

पिलीयन रायडर's picture

27 Oct 2016 - 6:51 pm | पिलीयन रायडर

काय सुंदर ग!!!! लगेच उचलुन खावी वाटतेय!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 7:44 pm | अत्रुप्त आत्मा

+१
जब्बरदस्त!

सही रे सई's picture

27 Oct 2016 - 7:31 pm | सही रे सई

मस्तच ग. आणि मावे मुळे थोडी सोप्पीच झाल्ये ही पाकृ. दिवाळीच्या नेवेद्यासाठी करून बघण्यात येईल.

लहानपणी अशी बर्फी केली कि आई ती डब्यात भरून डबा लपवून ठेवत असे कारण नाहीतर मी आणि माझा धाकटा भाऊ ती त्याच दिवशी संपवू कि काय अशी तिला भीती असे. मग तो डबा शोधून काढण्याची आमची मोहीम सुरु होई. त्या आठवणी जाग्या झाल्या.

अग बाई किती उरक तुला पोहे काय, शन्कर पाळे काय न आता हे --^--
तुला मिपा फराळ सम्रादणी पुरस्कार द्यावा अशी मिपा ला विंनती ;) ;)

सुरेख! अनाहितामध्ये विचारणारच होते ते आता इथे विचारते की ही वडी खुटखुटीत होते की मऊ? माझी आई मस्त खुटखुटीत नारळाच्या वड्या करते व माझ्या मात्र चिक्कीवर जातात. असे का होत असावे?

वडि छान होते अगदी!मउ खुटखुटित पण ओलसर नाही.
तुझ्या साखरेचा पाक होतोय का त्यामुळे चिक्किटाइप होत असतील.
अशा करुन बघ,मि नेहेमी करते. मिक्सरमधून फिरवल्याने मिश्रण चांगल एकजीव होत आणि शिजतहि.

रेवती's picture

27 Oct 2016 - 11:12 pm | रेवती

ओक्के.

अनन्न्या's picture

27 Oct 2016 - 9:33 pm | अनन्न्या

आता सानिकासारखे तुझ्यासाठी पण शब्द सापडत नाहीत!

पद्मावति's picture

27 Oct 2016 - 9:35 pm | पद्मावति

आहा,मस्तं!

जोरात सुरु आहे फराळ.तुच दिलेल्या नारळाची ही बर्फी करतेय परवा!

पैसा's picture

27 Oct 2016 - 11:00 pm | पैसा

आम्ही आमचा अजून एकही पदार्थ बिघडला नाही एवढ्यातच खूश!

मस्त! पहिला फोटो भारीच :)

मनीषा's picture

28 Oct 2016 - 7:39 am | मनीषा

मस्तं
करून बघेन

पूर्वाविवेक's picture

28 Oct 2016 - 9:42 am | पूर्वाविवेक

खुप मस्त! ईशाताई आता जोरात बर का !

स्नेहल महेश's picture

28 Oct 2016 - 11:31 am | स्नेहल महेश

बर्फी झक्कास आहे

इशा१२३'s picture

28 Oct 2016 - 8:58 pm | इशा१२३

धन्यवाद सगळ्यांना!

स्वाती दिनेश's picture

28 Oct 2016 - 9:13 pm | स्वाती दिनेश

दिसत आहे, अगदी टेप्टिंग..
स्वाती

उल्का's picture

28 Oct 2016 - 11:38 pm | उल्का

सोपी व छान पाकृ.

मदनबाण's picture

30 Oct 2016 - 8:31 am | मदनबाण

आहाहा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

शर्मिला किशोर वाघ's picture

2 Nov 2016 - 8:22 am | शर्मिला किशोर वाघ

खुप छान

खादाड's picture

3 Nov 2016 - 6:30 pm | खादाड

आत्ताच ही बर्फी केली. जशी मी स्वप्नात पाहिली होती तशीच झाली. मला आज पहिल्यांदा नारळाची वडी जमली. चिक्कीवर गेली नाही. एक आगाऊपणा अंगाशी आला तोही सांगते. आमच्यायेथील साखर गोडीला जरा कमी असते त्यामुळे तीन वाट्या नारळाला दोन वाट्या कमी पडली म्हणून अर्धी वाटी वाढवल्यावरच थांबणे जरुरी होते पण आणखी दोन चमचे वर घातली त्याने जास्त गोड झाल्यात. पुढीलवेळी ही चूक सुधारणार आहे. मायक्रो बर्फी असल्याने कमी एफर्टसमध्ये झाल्या. तू सांगितल्यानुसार मिश्रण तयार झाल्यावर कोमट होईस्तोवर थांबावे म्हणून थांबले पण थंडी जास्त असल्याने सात आठ मिनिटात थापल्या पाहिजेत हे विसरले. नंतर जरासे गरम करून काम भागले.
पिस्ते कापण्याऐवजी जाडसर कुटले पण कापण्याने शोभा वाढते. असो. एक वेळखाऊ पाकृ सोप्यारितीने शिकवल्याबद्दल आभार. यू आर ग्रेट!

करुन सांगितल्यास इथे म्हणून धन्यवाद!
बाकी ग्रेटबिट काहि नाहि.मलाही या पद्धतीनेच छान जमतात म्हणून झटपट उरका.