ऑपरेशन ब्लाइंड हॉक

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in लेखमाला
29 Oct 2016 - 12:17 am

'स्टोक'.. अवघ्या काही हजारांची लोकसंख्या असलेलं एक छोटंसं गाव. लडाखची राजधानी लेहपासून साधारण वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर वसलेलं एक छोटंसं खेडेगाव. तसं पाहायला गेलं तर 'स्टोक' (किंवा काही जण याचा उच्चार 'स्टाक' असाही करतात) अगदीच काही अज्ञात किंवा दुर्लक्षित नाहीये. माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी येणारे बहुतांश गिर्यारोहक आधी सरावासाठी म्हणून 'स्टोक कांगडी' या शिखरावर चढाई करतात. हिमालयाच्या रौद्र निसर्गाने भरलेल्या आणि भारलेल्या स्टोक पर्वतराजीमधलं हे एक उत्तुंग शिखर. त्यामुळेच असेल कदाचित, पण ....

स्टोकच्या सौंदर्याला ख्यातीला कारणीभूत अशी आणखी एक गोष्ट म्हणजे लद्दाखच्या गतकालीन राजघराण्याचा वारसा सांगणारा, आता वस्तुसंग्रहालयामध्ये रूपांतरित झालेला त्यांचा वैभवशाली राजवाडा.

हिमालयाच्या पर्वतराजीतलं एक लहानसं, फारसा लोकसंपर्क नसलेलं गाव म्हणजे त्याला दैवी निसर्गसौंदर्याचं वरदान असणं हे ओघाने आलंच. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली पांढर्‍याशुभ्र बर्फाची चादर. चारी बाजूला दिसणारी उत्तुंग पर्वतशिखरं आणि एका बाजूला खोलच खोल स्टोक व्हॅली. अशा या निसर्गरम्य, परंतु अतिशय दुर्गम भौगोलिक परिस्थितीत वसलेलं स्टोक. गाव तसं छोटंसंच, कधीमधी येणारे पर्यटक आणि स्टोक कांगडीच्या चढाईसाठी येणारे गिर्यारोहक सोडले, तर तसं शांत, थोडंसं आळशी, सुस्त भासणारं गाव आहे स्टोक!

एका बाजूला उंचच उंच अजस्र कातळकडा उभा, तर आजूबाजूला स्टोक व्हॅलीची भीषण दरी. त्या कातळकड्यात वसलेली जगप्रसिद्ध स्टोक मॉनेस्ट्री, सेकंडरी स्कूलपर्यंत शिकण्याची व्यवस्था असलेलं एक हायस्कूल, एक-दोन बर्‍यापैकी हॉटेलं आणि स्टोक व्हॅलीतून वाहणार्‍या झन्स्कार नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेली लहान-मोठी घरं, काही बंगलीवजा वास्तू, तिथेच एका कोपर्‍यात एका जुनाट बंगलीत थाटलेली पोलीस चौकी आणि स्टोकच्या अगदी एका कोपर्‍यात, लेहच्या विरुद्ध दिशेला जिथे झन्स्कारचा प्रवाह अगदीच लहान होत जातो, तिथे कायम भारतीय सैन्याच्या पहार्‍याखाली असलेली एक छोटीशी हवेली. खरं तर ती बहुधा कुणा भारतीय सेनाधिकार्‍याची खाजगी प्रॉपर्टी होती. पण बाहेर बोर्ड मात्र 'ऑफिसर्स क्लब'चा. कधी अधूनमधून लडाखला हिमवर्षावामुळे अडकलेले सैन्याधिकारी अध्येमध्ये तिथे उतरायचे. नाहीतर हा तथाकथित आर्मी क्लब तसा ओसाडच होता. पण तरीही तिथे आर्मीचे सैनिक कायम पहारा देत असत. आंगचुक मोथूपने दोनतीन वेळा त्या प्रॉपर्टीत घुसण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पण त्यालासुद्धा बंगलीच्या गेटवरूनच परत पाठवण्यात आलं होतं. आंगचुक मोथूपलासुद्धा! गंमत म्हणजे चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत अगदी आतपर्यंत जरी नाही, तरी त्या बंगलीच्या दिवाणखान्यापर्यंत प्रवेश होता आंगचुकला. म्हणजे तिथले निवासी असणारे रिटायर्ड कर्नल फुन्सूक थापा यांच्याशी त्याची ओळख होती. त्या वेळी खरं तर सैनिकांचा पहाराही नसायचा. पण चारएक वर्षांपूर्वी अचानक सगळंच दृश्य बदललं. ती वास्तू सिव्हिलियन्ससाठी पूर्णपणे बंद करण्यात आली. बंगलीच्या चारी बाजूला अगदी सख्त पहारा सुरू झाला. एकदोन वेळा आंगचुकने प्रयत्न केला आपल्या उच्चाधिकार्‍यांशी बोलण्याचा, पण अगदी कडक शब्दात समज देऊन त्याचं तोंड बंद करण्यात आलं.

आंगचुक मोथूप. ३५ वर्षांचा उंचापुरा, गव्हाळ वर्ण, पण देखणा चेहरा लाभलेला आंगचुक मोथूप. स्टोकच्या इवल्याशा वस्तीतल्या ईनमीन सात-आठ कर्मचारी असलेल्या पोलीस चौकीचा रुबाबदार, धाडसी एस.एच.ओ. सतत काहीतरी साहस हवं असलेल्या आंगचुकला गेली चार वर्षं ती वास्तू खटकत होती. तिथे काहीतरी विचित्र, सामान्याच्या पलीकडचं काहीतरी घडतंय ही शंका त्याच्या मनाला शांत बसू देत नव्हती. आपल्या धाडसी स्वभावाला जागून दोन-तीन वेळा त्याने गुपचुप त्या वास्तूत शिरण्याचा प्रयत्नही केला. पण तिथे पहार्‍यास असलेल्या सैनिकांनी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. एकदा तर त्याला तुरुंगवासच घडायचा. तो सापडलाच होता सैनिकांच्या तावडीत. पण त्या वेळी कर्नल थापांनी हस्तक्षेप केल्यामुळे निव्वळ गंभीर इशारा देऊन त्याला सोडून देण्यात आलं होतं. त्याच्या वरिष्ठांनी कानपिचक्या दिल्या त्या वेगळ्याच. तिथून बदलीच व्हायची, त्याची पण सुदैवानेच तो वाचला होता. तरीही त्या बंगलीबद्दल वाटणारं औत्सुक्य काही कमी होत नव्हतं. गेल्या काही दिवसात ते जास्तच वाढलं होतं.

आठवड्याभरापूर्वी नासीर सांगत आला...

"हुजूर, त्या बंगलीभोवतीची चहलपहल वाढलीये आजकाल."

"चहलपहल? पण मी तर गेल्या कित्येक दिवसात आर्मीची माणसं नाही पाहिली गावात, मार्केटमध्ये. म्हणजे बघ ना, स्टोकपासून त्या बंगलीपर्यंत जाणारा गावातला एकमेव रस्ता आपल्या चौकीवरूनच जातो. आणि आपली चौकी गावाच्या एका टोकाला आहे. इथून पुढचा रस्ता तसा थेट दरीत उतरणारा असल्याने डेड एंडच आहे. त्यामुळे इथून पुढे जाणार्‍याला आपली परवानगी घेतल्याशिवाय जाता येत नाही. अगदी आर्मीवाले आले, तरी हेडऑफिसहून आपल्याला आगाऊ सूचना मिळालेली असते. तसं काहीही या वेळी झालेलं नाहीये." आंगचुक आपल्या समोरची गेल्या आठवड्याभराची रजिस्टर्स चाळत म्हणाला.

हा भाग तसा शांतच असल्यामुळे चौकीत असणारे ७-८ पोलीस कर्मचारीसुद्धा तसे बर्‍यापैकी सुस्त आणि निष्क्रिय बनत चाललेले होते. त्यामुळे आंगचुक आणखीनच वैतागायचा. त्यातल्या त्यात हवालदार नासीरुद्दीन बनातवाला हे एक अजब कॅरेक्टर त्याच्या दिमतीला होतं. नासीरमियाँ ऐन पंचविशीत होते. रक्तातली सळसळ, धाडसी स्वभाव आणि त्याबरोबर असलेलं देशावरचं, त्याहीपेक्षा त्याची लाडकी मातृभूमी लद्दाखवरचं प्रेम यामुळे हा पोरगा पोलिसात भरती झाला होता. पण इथे स्टोकमधल्या थंड (केवळ 'गार' या अर्थाने नव्हे, तर एकूणच थंड) वातावरणात कंटाळला होता. पण त्याच्या या स्वभावामुळेच त्याचं आंगचुकशी चांगलं जमायचं. त्यामुळे आंगचुकने कायम संशयाच्या घेर्‍यात असलेल्या 'त्या' हवेली कम ऑफिसर्स क्लबवर लांबूनच नजर ठेवायची कामगिरी नासीरवर सोपवली होती.

"दीड महिन्यांपूर्वी मेजर लांबा आणि त्यांच्या फॅमिलीची विश्रांतीसाठी म्हणून झालेली पर्सनल व्हिजिट सोडली, तर आर्मीकडून कसलीही नोंद नाहीये आपल्याकडे. त्या व्यतिरिक्त गेल्या महिन्यात स्टोक कांगडीवर चढाई करण्यासाठी आलेली ती कोरियन गिर्यारोहकांची टीम, तिची एक नोंद आहे. पण ती टीम परत गेल्याचीसुद्धा नोंद आहे. त्या दिवशी आपण दोघेच होतो ना मार्केटमध्ये, जेव्हा ती टीम परत गेली... त्यांचा तो टीमलीडर वूजीन आणि तो कॅसानोव्हा टाईप होता तो.. काय त्याचं नाव बरं?

"तो 'मिनजून' हुजूर..."

"करेक्ट, मिनजून, काय पण एकेक नावं त्यांची." आंगचुक स्वतःशीच पुटपुटला. पुटपुटताना त्याची नजर नासीरकडे गेली. नासीर त्याच्याकडे बघत मिश्कीलपणे हसत होता. त्याच्या हसण्याचं कारण लक्षात आलं आणि आंगचुक स्वतःसुद्धा हसायला लागला.

"आमच्याकडे असलीच नावं असतात रे."

"असो, तर मुद्दा हा की हे दोन ग्रूप्स सोडले, तर इतर कुठल्याही ग्रूपची नोंद नाहीये यात."
नासीर थोडा घुटमळला बोलताना....

"सर, मलाही त्यामुळेच आश्चर्य वाटतंय. त्या वूजीनच्या टीममेट्सपैकी दोघे जण त्या हवेलीच्या आसपास घुटमळताना पाहिले आहेत मी."

"कसं शक्य आहे नासीर? ते तर... , एक मिनिट, आर यू शुअर अबाउट धिस?"

"तुम्हाला माहितीय हुजूर, मी एकदा पाहिलेला चेहरा परत जन्मात विसरत नाही. खरं तर मी त्यांना हटकायचा विचार केला होता. पण त्यामुळे ते सावध झाले असते. मी दोन कॉन्स्टेबल्स त्यांच्या - रादर बंगलीच्या पाळतीवर ठेवले आहेत. सध्यातरी त्यांना फक्त लांबूनच त्या दोघांवर नजर ठेवायला सांगितली आहे."

आणि आज परत नासीर सांगत आला होता...

"हुजूर... रायान गायब आहे गेल्या सकाळपासून. त्याला आणि तेन्जीनला मी बंगलीवर नजर ठेवायला सांगितली होती. रायान गायब झालाय आणि...

"आणि ......?"

"आणि तेन्जीनला अपघात झालाय. बंगलीमागच्या एका खोल कपारीत तेन्जीन बेशुद्धावस्थेत सापडला आर्मीच्या जवानांना. सध्यातरी तो बेशुद्धावस्थेत आहे. त्यामुळे अपघात आहे की घातपात, हे तो शुद्धीवर आल्यावरच कळेल."

"मी तुला म्हणलो नव्हतो नासीर? त्या बंगलीत काहीतरी शिजतंय नक्कीच. आधी अचानक सैनिकी पहारे बसवले जातात. आपल्यालासुद्धा प्रवेश निषिद्ध ठरवला जातो आणि आता हे नवीन त्रांगडं. तू एक काम कर, आणखी काही जण बरोबर घेऊन रायानचा शोध घ्या. मी दवाखान्यात जाऊन तेन्जीनची खबर घेतो."

"आणि नासीर...."

दारापर्यंत गेलेला नासीर मागे वळला, "जी हुजूर...!"

"काळजी घ्या. उगीच जास्तीचं धाडस दाखवायला जाऊ नकोस. मला माझी माणसं गमावणं परवडणारं नाहीये."

"जी हुजूर"

नासीर आणखी काही कॉन्स्टेबल्स घेऊन रायानच्या शोधात निघाला, तर आंगचूक दवाखान्याकडे.
***

स्टोकपासून हजारो कि.मी. अंतरावर.... उत्तर कोरियातील एका छोट्याशा शहरात...

फोन खणखणला, तशी त्याने लॅपटॉपमधली नजर बाहेर काढली. खुर्ची सोडून निवांतपणे सिगरेट शिलगावली आणि मग आपला सेलफोन उचलून कॉल पिकअप केला. बहुधा हा कॉल त्याला अपेक्षितच असावा आणि आपण उचलल्याशिवाय कट होणार नाही, हेसुद्धा त्याला पक्कं ठाऊक असावं.

"annyeonghaseyo, mal (Hello, tell me)

"boseu, jihoo ga jug-eoss" (Boss, Jihoo is dead)

त्याने एक थंड नि:श्वास सोडला. कपाळावर क्षणभर एक आठी उमटली आणि..

"Choa, naui da-eum myeonglyeong eul gidalineun dasi jeonhwahaji anhseubnida. naega god dangsin-eul hochul (OK, wait for my next instructions. and don't call me again. I will call you soon.)

त्याने फोन टेबलवर आदळला.

परत तिरिमिरीत त्याने फोन उचलला आणि कुठलातरी नंबर लावला....

थोडा वेळ रिंग गेल्यानंतर पलीकडच्या व्यक्तीने फोन उचलला.

"मेजर शौकत हिअर...., व्हाय डिड यू कॉल मी? आय हॅड वॉर्न्ड यू नॉट टु कॉल, बेवकूफ?"

"आय हॅव लॉस्ट अ मॅन मेजर. कॉस्ट इन्क्रीज्ड नाऊ."

"डू व्हॉटएव्हर यू वॉन्ट. यू विल गेट व्हॉटएव्हर यू नीड. आय वॉन्ट रिझल्ट्स, मिस्टर जोंग यू."

"डोंट वरी, यू विल गेट व्हॉट यू आर पेईंग फॉर."

त्याने फोन ठेवला, ठेवता ठेवता पलीकडच्या मेजरने हिंदीतून हासडलेली शिवी त्याच्या कानावर आली आणि तो हसला. बराच काळ नेपाळच्या भागात काढल्यामुळे त्याला हिंदी तशी नवीन नव्हती. त्यामुळे मेजर शौकतने उच्चारलेला तो शब्द म्हणजे एक अतिशय गलिच्छ शिवी आहे, हे त्याच्या बरोबर लक्षात आलं. पण जोपर्यंत मेजर त्याला वेळच्या वेळी पैसे देत होता, तोपर्यंत असल्या शिव्यांनी त्याच्या अंगाला भोकं पडणार नव्हती.
***

"सर, ते दोघे जण होते. त्यातला एक जण गेल्या महिन्यात आलेल्या त्या कोरियन गिर्यारोहकांपैकी एक होता."
नुकताच शुद्धीवर आलेला तेन्जीन समोर बसलेल्या आंगचुकला सांगत होता.

"एकच....?"

"कदाचित दोघेही असतील. मी मात्र एकालाच ओळखलं. हवालदार साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही त्या ऑफिसर्स क्लबवर पाळत ठेवून होतो."

"रायान, तू उत्तरेकडील बाजूने पहारा ठेव, मी दरीकडची बाजू सांभाळतो. पोलिसात भरती होण्यापूर्वी काही काळ शेर्पागिरी केलेली असल्याने मला त्या दरीची आणि पर्वतरांगांची रेघ न रेघ माहीत आहे. तेव्हा तो भाग मी सांभाळतो. तू हा उत्तरेकडचा गेटच्या बाजूचा भाग सांभाळ." तेन्जीनने रायानला सूचना दिली आणि तो बंगलीच्या मागच्या बाजूला जाण्यास निघाला.

"तेन्जीन, तुला असं नाही वाटत का, की हवालदारसाब उगीचच बाऊ करताहेत... अरे, गिर्यारोहक आहेत ती पोरं. कड्याकपारीत गिर्यारोहणाचा सराव नाय करणार तर काय बंगल्यात करणार?" कायम गस्त, पहारा देणं असल्या कामाचा कंटाळा असलेल्या रायानने वैतागलेल्या आवाजात तेन्जीनला विचारलं. "त्यांच्या मागे फिरत बसण्यापेक्षा सरळ दोघांना उचलू या आणि चौकीत घेऊन जाऊ या. आपली स्पेशल ट्रीटमेंट दिली की पोपटासारखे बोलायला लागतील दोघंही."

"हे बघ रायान, हवालदारसाबनी सांगितलंय की ते दोघेही कोरियन नागरिक आहेत, परवानगी घेऊन इथे गिर्यारोहणाच्या सरावासाठी आलेत. त्यांच्यावर थेट हात टाकायला आपल्याकडे काहीही पुरावा नाहीये. अशाने देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संबंध धोक्यात येऊ शकतात. तेव्हा जेवढं साबनी सांगितलंय, तेवढं कर. स्वतःचं डोकं चालवू नकोस." तेन्जीनने रायानला दटावलं आणि तो आपल्या ठरलेल्या दिशेने निघाला.

रायानच्या चेहर्‍यावरून त्याला काही ते पटलेलं दिसत नव्हतं. आळशी जरी असला, तरी रायान भितरा नव्हता. पण साहेबांचा हुकूम न पाळण्याचे परिणाम नोकरीवर होऊ शकतात, हे माहीत असल्याने तो सांगितलेलं काम गुपचुप करत राहिला.

तेन्जिनच्या वॉकीटॉकीने मंद स्वरात बीप-बीप करायला सुरुवात केली...

"हॅलो, हॅलो ..."
"तेन्जिन, रायान बोलतोय. ते दोघे जण बंगल्याच्या उत्तरेला आहेत. त्यांच्यापैकी एक जण आत शिरण्याचा प्रयत्न करतोय. लवकर पोहोच, मी आता थांबू शकत नाही फार काळ."
"मी, आलोच रायान. तू घाई करू नकोस. काहीतरी काळंबेरं आहे नक्कीच. त्यांच्याकडे शस्त्रं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी येतोच आहे, तोपर्यंत फक्त नजर ठेव..."
..
..
..
..
"आणि त्यानंतर मला रायानही दिसला नाही आणि ते दोघेसुद्धा. बंगलाही शांत होता. ते दोघे आत शिरले असते, तर कदाचित आतल्या सैनिकांनी काहीतरी विरोध केला असता. काहीतरी गडबड, गोंधळ झाला असता. पण....! तरीही मी बंगल्याच्या कंपाउंडवरून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. पण नेमकं त्याच वेळी माझ्या डोक्यावर मागून काहीतरी प्रचंड आघात झाला आणि माझी शुद्ध हरपली. त्यानंतर शुद्धीवर आलो, तेव्हा इथे तुमच्यासमोर होतो. साबजी, रायान...?"

"तेन्जीन, रायान अजूनही गायब आहे. वी हॅव नो ट्रेस ऑफ हिम येट." आंगचुकने एक दीर्घ निश्वास सोडला.
"सर, आणखी एक... गेल्या काही दिवसात आणखी एक माणूस त्या परिसरात वावरताना दिसला होता मला."
"कोरियन?"

"नाही सर, तो कोणीतरी भारतीय होता. मला नक्की नाही सांगता येणार, पण त्याचा चेहरा....?, तो माणूस एकदाच ओझरता दिसला मला. चेहरा नाही आठवत आता, पण त्याचे अतिशय कठोर पण चकाकणारे डोळे मात्र मी कधीच विसरू शकणार नाही."

"तू ठीक आहेस तेन्जीन? बाहेर येऊ शकशील?"

"एकदम फिट साबजी...." तेन्जीन पटकन अटेन्शन मोडमध्ये आला, तसा हसत आंगचुक उठला. आता सगळे प्रोटोकॉल्स बाजूला ठेवायची वेळ आली होती. त्याचा एक माणूस गायब होता आणि एक जखमी झाला होता. काहीतरी शिजत होतं नक्कीच.

"नासीर, गाडी काढ, आपल्याला हवेलीत जायचंय. मी सांगितलेलं काम केलंयस ना?"
"यस्सर!"
*************************************************
कर्च्चक्क! पोलीस व्हॅन ऑफिसर्स क्लबच्या दारात थांबली, तसे पहार्‍यावरचे जवान सावध झाले. पण गाडीतून उतरताना आंगचुकही चमकला. कारण क्लबच्या दारात आणखीही एक लांबलचक गाडी उभी होती..... स्टेशन वॅगनटाइप.
जवानांनी त्याला गेटवरच अडवलं. आंगचुकला याची कल्पना होतीच, त्यामुळेच त्याने रायानच्या बेपत्ता होण्याची खबर वापरून आधीच हेडक्वार्टरकडून परवानगी मिळाली होती. पण ते वॉरंट वापरण्याची त्यावर वेळच आली नाही. क्लबच्या दारात एक अनोळखी चेहरा डोकावला आणि त्याने जवानांना काहीतरी खूण केली, तशी जवान आपोआप बाजूला झाले.
"वेलकम इन्स्पेक्टर मोथूप! मायसेल्फ मेजर चैतन्य निंबाळकर. मला माहीत होतं तू येणार ते."
तेन्जीन हळूच आंगचुकच्या कानात कुजबुजला,
"साबजी, हाच तो चकाकणार्‍या डोळ्याचा......"
"राइट यू आर, तेन्जीन. तोच मी."
आंगचुक जाम गोंधळात पडला होता.
"आय अ‍ॅम सॉरी सर, पण माझा एक माणूस गायब झालाय या प्रकरणात. हे नक्की काय चाललंय ते मला कळायलाच हवंय." आंगचुक थोडा रागातच बोलला.
"आय कॅन अंडरस्टँड माय फ्रेंड. आय एम सॉरी, पण तो जिवंत असण्याची शक्यता कमीच आहे. हा तेन्जीनही त्याच्याच वाटेने गेला असता, पण ऐन वेळी मी त्याच्या मागे पोहोचलो आणि त्याच्या डोक्यावर आघात करून त्याला बेशुद्ध केलं, म्हणून वाचला. मी काहीही हालचाल करायच्या आधीच रायान आत पोहोचला होता, नेमका तेन्जीनच्या नादात वेळ गेल्याने मला उशीर झाला आणि मी आत उशिरा पोहोचलो, तोवर चौघेही गायब झालेले होते."
बोलता बोलता चैतन्यची नजर पहार्‍याच्या जवानांकडे वळली. पण पुढच्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं की त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यांना तर बिचार्‍यांना आपण कशावर पहारा करतोय तेही माहीत नव्हतं. आणि इथे तर त्याची गाठ जगातल्या एका अतिशय घातकी गुन्हेगारी टोळीशी होती.
"चौघे?" इती आंगचुक.
चैतन्यने आर्मीच्या त्या दोन जवानांना बाहेर जाण्याची खूण केली. त्यांच्याबरोबरच त्याने नासीर आणि तेन्जीन दोघांकडेही पाहिलं, तसे ते दोघेही बाहेर पडले.
"आंगचुक, खरं तर हा पूर्णपणे आर्मीच्या अखत्यारीतला मामला आहे, सो आय एम नॉट अॅट ऑल अलाउड टू टेल यू एनीथिंग. पण तू यात एक माणूस गमावलायस. म्हणजे कदाचित तो अजूनही जिवंतही असू शकतो, कदाचित मृतही. पण तुझी पूर्ण माहिती माझ्या रेकॉर्डला आहे. त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवून ही गोष्ट तुला सांगतोय. आय होप, इट विल रिमेन बिटविन यू अँड मी. आणि तुला हे सांगतोय, कारण कदाचित आम्हाला तुझी मदत होऊ शकेल या केसमध्ये, म्हणून. एक लक्षात घे, बाहेर पहारा देणार्‍या त्या जवानांनासुद्धा हे माहीत नाहीये की ते इतके दिवस कशासाठी आणि कुणावर पहारा देत होते."
आंगचुकचे खांदे साहसाच्या कल्पनेने उत्तेजित झाले.
"यू प्लीज बी रेस्ट अॅश्युअर्ड सर. माझ्या या कानाने ऐकलेली गोष्ट त्या कानापर्यंतसुद्धा पोहोचणार नाही."
"थँक्स आंगचुक, मग ऐक... भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा एक कैदी गेली तीन वर्षं इथे अतिशय गुप्तपणे कैदेत ठेवलेला होता. त्याच्या इथे असण्याबद्दल खूप कमी जणांना माहिती होती. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, चार वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा तुला इथे यायला बंदी करण्यात आली, तेव्हा या बंगलीचं एका तुरुंगात रूपांतर करणं चालू होतं. त्यांनंतर त्याला इथे हलवण्यात आलं. गेली तीन वर्षं तो इथेच होता आमच्या संरक्षणात, कैदेत. पण समहाऊ....
समहाऊ, इंडियन आर्मी हॅड फेल्ड धिस टाईम. एका अतिशय कुख्यात अशा कोरियन मर्सिनरीजच्या गँगने त्याला सोडवून नेण्याची सुपारी घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. गेल्या काही दिवसात त्यांच्या गुप्त हालचाली वाढल्याचं आमच्या लक्षातही आलं होतं. पण ते लोक आपल्यापेक्षा खूपच फास्ट ठरले. कधी नव्हे ते मी फसलो आणि त्या लोकांनी माझ्यावर मात केली. दोन दिवसांपूर्वी, ज्या दिवशी रायान आणि तेन्जीन इथे आले होते, त्याच दिवशी त्या टोळीने त्याची सुटका केलीय. कशी? ते अजूनही कळलेलं नाहीये. पण मी लवकरच शोधून काढेन. त्या कामात कदाचित मला तुझी मदत लागेल." चैतन्यने आपले बोलणे संपवलं, तसा आंगचुकने पुढचा प्रश्न विचारला.
"पण मग इतक्या खतरनाक कैद्याला, केवळ बाहेरच्या काही पहारेकर्‍यांच्या भरवशावर कसं ठेवलं होतं?"
"नाही आंगचुक, बाहेरचा चार जवानांचा पहारा हा केवळ दिशाभूल करण्यासाठी होता. आत, प्रत्य़क्ष सेलवर बारा अतिशय घातकी अशा कमांडोजचा पहारा होता, ज्याबद्दल बाहेरच्या जवानांनाही माहीत नव्हतं. आणि तुला तर माहीतच आहे, आर्मीत प्रश्न विचारले जात नाहीत, फक्त आज्ञा पाळल्या जातात. पण इथे शत्रू आपल्यापेक्षाही घातकी आणि हुशार ठरलाय."
"म्हणजे?"
"आत माझ्या बारा कमांडोजची प्रेतं पडली आहेत आंगचुक. तू एक माणूस गमावलाहेस, मी बारा बहाद्दर गमावून बसलोय. सामना अतिशय भयंकर आणि घातकी लोकांशी आहे."
"इफ यू डोंट माइंड......"
"मला माहीत आहे तू काय विचारणार ते. खरं तर मी तुला काही सांगायला नकोय. पण मी दुर्दैवाने तितका कट्टर आर्मीमॅन नाहीये, त्यामुळे काही निवडक अपवादांच्या बाबतीत मी प्रोटोकॉल मोडतो बिनधास्त. सुदैवाने या आधीच्या दोन्ही वेळी माझे निर्णय योग्य ठरलेत आणि का कोण जाणे, मला तुझ्याबद्दल तितकीच खातरी वाटतेय, जितकी शिर्‍याबद्दल वाटली होती."
"शिर्‍या...?"
"कळेल लवकरच. हा जो कैदी आपल्या कैदेतून पळालाय ना, त्याला पकडून देण्यात शिर्‍याचा सिंहाचा वाटा होता, त्यामुळे आता तो पळालाय म्हटल्यावर मी कितीही नाही म्हटलं तरी शिर्‍या या प्रकरणात उतरणार आणि मग त्याची-तुझी भेट होईलच. इफ यू आर इंटरेस्टेड, आय वुड आस्क माय सुपीरियर्स टु इन्व्हॉल्व्ह यू इन धिस केस?"
"ऑफकोर्स सर, आय वुड लव्ह टू. पण सर, तुम्ही अजूनही....."
"हिज नेम इज 'पख्तुनी', पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा, जगातील अतिशय घातकी हेरांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा मेजर दिलबागखान पख्तुनी!"
*********************************************************************************
नजर जाईल तिथवर पांढरा आणि काही प्रमाणात हिरवा रंग पसरलेली ती सुविख्यात, निसर्गरम्य स्टोक, खरं तर हिमालयाचा परिसर. स्टोक तसं आता बरंच मागे पडलेलं होतं. सगळीकडे अभेद्य पर्वतशिखरं आणि दर्‍या. पण त्याचं हे प्रेमात पाडणारं सौंदर्यही तितकंच दुर्गम होतं. एका बाजूला उंचच उंच कडा आणि दुसरीकडे दरी. एखादं पाऊल चुकून इकडे तिकडे पडलं की लगेच खाली पडायच्याऐवजी थेट वर जाण्याची शक्यताच जास्त. आणि अशात जर तुमच्या पाठलागावर भारतीय सैन्याचं एखादं पथक असेल तर विचारूच नका....
ते दोघे जण होते. दोघेही साधारण सहा-साडेसहा फुटी, धिप्पाड शरीरं. दोघेही कसलेले वाटत होते. सराइतासारखे न चुकता त्या भीषण दरीतून मार्गक्रमण करत होते.
"व्हॉट्स युवर नेम, बडी?" पख्तुनीने गेल्या दीड दिवसात तिसर्‍यांदा हा प्रश्न विचारला होता. पण त्याचा जोडीदार एखाद्या मुक्या माणसाप्रमाणे शांत होता. तो पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पख्तुनीकडे बघून हलकेच हसला आणि...
"इज दॅट रिअली इम्पॉर्टन्ट मिस्टर पख्तुनी?"
आवाजात एक प्रकारचा कठोर, खरखरीतपणा होता. पण असहकार नक्कीच नव्हता. त्याला आपले डिटेल्स शेअर करायचे नाहीयेत, हे एव्हाना पख्तुनीच्या लक्षात आलेलं होतं. पण त्याला जास्तीत जास्त बोलतं करून पख्तुनी त्याचा बेस जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. कारण या माणसाचा चेहरा थोडासा नॉर्थ-ईस्ट एशियन वाटत होता, पण त्याची साडेसहा फुटापेक्षा जास्त असलेली धिप्पाड देहयष्टी त्याच्या चेहर्‍याशी मेळ खात नव्हती. पण भाषेचा अ‍ॅक्सेंट मात्र किंचित कोरियन वाटत होता. या माणसाने आपल्या सुटकेसाठी भारतीय कमांडोजची एक पूर्ण टीम उद्ध्वस्त केलेली पख्तुनीने पाहिली होती. त्याच्या पराक्रमाबद्दल एक अनामिक आदर निर्माण झालेला असला, तरी मनात कुठेतरी शंकेचं पिल्लूही वळवळायला लागलेलं होतं.
(इथून पुढे वाचकांच्या (आणि माझ्याही) सोयीसाठी आपण सरसकट मराठी भाषा वापरणार आहोत, सर्व संभाषणांसाठी.)
"मला माहीत आहे पख्तुनी, तुझ्या मनात सध्या अनेक प्रश्न आहेत. का? कशासाठी? कोण? कुणासाठी? पण लेट मी टेल यू, मला काहीही बोलायची परवानगी नाहीये. सध्या इतकंच सांगू शकेन की मला, एका प्रोफेशनल संघटनेकडून तुला सोडवण्याची सुपारी मिळालेली आहे. त्यासाठी एक अवाढव्य रक्कम माझ्या अकाउंटला जमा झालेली आहे. आणि अर्थातच जोपर्यंत माझ्या अकाउंटला नंबर्स दिसताहेत, तोपर्यंत बाकीचे प्रश्न विचारायची किंवा त्यांची उत्तरं शोधायची मला गरज भासत नाहीये."
"पण ज्या लोकांना तू संपवलंस, ते कोण होते माहीत आहे का?"
"भारतीय सैन्यदलाचे किंवा कदाचित रॉचे, एम.आय.चे कमांडोज असावेत. इट डझन्ट मेक एनी डिफरन्स टू मी. आय अ‍ॅम अ प्रोफेशनल अ‍ॅसेसिन. मला पैशाशी मतलब आहे. तुला सोडवून आणण्याचं काम माझ्यावर सोपवण्यात आलं होतं. ते मी केलं. एकदा तुला 'त्या' लोकांच्या ताब्यात दिलं की माझं काम संपलं. त्यानंतर जर दुसर्‍या कोणी मला तुला मारायची सुपारी दिली, किंवा परत त्या संघटनेच्या तावडीतून सोडवून भारतीय सैन्याच्या ताब्यात देण्याची सुपारी दिली, तर मी तेही काम तेवढ्याच आनंदाने करीन."
"गुड, मग जर मीच आत्ता तुला एक आगाऊ सुपारी दिली, तर स्वीकारशील?" पख्तुनीने जाळं टाकायला सुरुवात केली, तसा तो धूर्तपणे हसला.
"मिस्टर पख्तुनी, तुझ्याबद्दल माझ्याकडे असलेली माहिती अगदीच चुकीची नाहीये तर. मी तुला त्या संघटनेच्या ताब्यात देण्यापूर्वी माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुला मिळतील. त्यानंतर जर तुला शक्य झालंच, आणि तू माझी किंमत देऊ शकलास, तर ..... आय विल बी अ‍ॅट युवर सर्व्हिस."
इतक्यात त्याच्या सॅटलाइट फोनने बीप द्यायला सुरुवात केली आणि त्याने कॉल पिकप केला. आपल्या भाषेत फोनवर काहीतरी बोलून झाल्यावर पख्तुनीकडे वळून एक स्माइल केलं.
"गेट रेडी मिस्टर पख्तुनी, तुझी माणसं तुझी वाट पाहताहेत. तासाभरात मी तुझी डिलिव्हरी पूर्ण करीन. अर्थात ती तुझी माणसं आहेत का शत्रू आहेत, हे मला माहीत नाही. पण त्यांना तू हवा आहेस हे नक्की. माझी गरज पडलीच तर नॉमपेन्हमध्ये प्याँगयाँग रेस्ट्रॉच्या मागे एक कोरियन नाइट कॅफे आहे, 'किम्स डेन' या नावाचा. तिथल्या काउंटरला एक मेसेज ठेव लिओपॉर्डसाठी, तुझे कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊन ठेव. मी कॉन्टॅक्ट करेन. विश यू अ नाइस फ्री लाइफ माय फ्रेंड."
पख्तुनी नावाचं वादळ मुक्त झालं होतं. मेजर चैतन्य आणि ब्रिगेडियर चक्रवर्ती यांच्यासाठी ही बातमी अतिशय चिंताजनक होती.
***************************************************************
"चैतन्य, पाहायला गेलं तर बातमी तशी निरुपद्रवी आहे आणि म्हणायला गेलं तर चिंताजनकही आहे. "
"मी समजलो नाही कर्नल????"
"चैतन्य, आतापर्यंतच्या, विशेषतः मागच्या केसमधील एकंदरीत वर्तन लक्षात घेता शिर्‍यावर नजर ठेवायची तुझी मागणी चक्रवर्तींनी मान्य केली होती."
"यस सर, पैशांच्या बाबतीत शिर्‍या थोडा ढिलाच आहे, म्हणून अगदी जवळचा मित्र असूनही मी त्याच्यावर लक्ष ठेवण्याची मागणी केली होती."
"आय माइट बी राँग माय सन, पण या कर्नल देशमुखांचा अनुभव धोका देत नसेल तर काहीतरी गडबड नक्की आहे चैतन्य. कारण गेला आठवडाभर शिर्‍या गायब आहे. त्याच्या पाळतीवर असलेल्या आपल्या एजंटला अगदी सहज गुंगारा दिलाय शिर्‍याने. कालपर्यंत आपल्या एजंटकडून व्यवस्थित अहवाल येत होता शिर्‍याच्या हालचालींचा. पण काल एक शॉकिंग बातमी कळली. शिर्‍याच्या पाठलागावर असलेला आपला एजंट एलिफंटा केव्ह्जच्या जंगलात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या मते गेले चार-पाच दिवस तो कुणाच्या तरी कैदेत होता. "
"मग...., म्हणजे असं असेल तर?"
"यू आर राइट मेजर, असं असेल तर शिर्‍याबद्दलची प्रत्येक बातमी, माहिती आपल्याकडे कशी काय पोहोचत होती?"
"कर्नल, डू यू मीन टू से, शिर्‍या....?"
"आय डोंट वाँट टू से एनीथिंग मेजर, पण काहीतरी गोंधळ आहे. रॉच्या माहितीनुसार शिर्‍याच्या हाताचे ठसे नॉमपेन्हमधल्या एका नाइट कॅफेमध्ये सापडलेत. तिथे गँबलिंग टेबलवर झालेल्या हाणामारीत एका अज्ञात माणसाचा मृत्यू झालाय. तेव्हा स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करताना घेतलेल्या माहितीत जे ठसे सापडलेत, त्यात शिर्‍याचे ठसे आहेत असं रॉ खातरीशीररित्या सांगतंय."
"पण सर, नोमपेन्हसारख्या एका शांत शहरात घडलेल्या एका क्षुल्लक मारामारीत रॉला स्वारस्य असण्याचं कारण काय?"
"'किम्स डेन' या नावावरून काही लिंक लागतेय चैतन्य?"
"किम्स डेन...! म्हणजे.... एथिकल ड्रॅगन्स?"
"येस्स चैतन्य. एथिकल ड्रॅगन्स या कुप्रसिद्ध भाडोत्री मर्सीनरीज पुरवणार्‍या संघटनेचं संपर्क केंद्र असणार्‍या या नाइट कॅफेमध्ये झालेल्या या हाणामारीत जे काही फिंगरप्रिंट्स सापडलेत, त्यातले काही शिर्‍याच्या फिंगरप्रिंट्सबरोबर मॅच होताहेत. जे आपल्यासाठी खूप शॉकिंग आहे. कारण पख्तुनीला आपल्या तावडीतून सोडवून नेणारासुद्धा एक एकांडा शिलेदारच होता."
शिर्‍या... शिर्‍या... नक्की काय करतोयस तू? तू जर शत्रुपक्षात असशील, तर माझ्यासाठी हे प्रकरण शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक अशा तिन्ही पातळ्यांवर फार कठीण जाणार आहे.....
मेजर चैतन्य आयुष्यात प्रथमच एका विलक्षण प्रसंगात अडकला होता. अर्थात कुठल्याही परिस्थितीत पहिलं प्राधान्य कायम देशालाच असणार होतं.
*************************************************************************
मलेशियामधल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या एका राजेशाही सुइटमध्ये ती भेट झाली.
"शौकतमिया आप? मुझे तो लगा था की ....."
"आपकी आर्मीसे ज्यादा हमे आपकी जरुरत है, मेजरसाहब. और सच मानिये तो फिक्र भी!" शौकत हुसैन मिर्झा, आय.एस.आय.चा एक अतिशय वरच्या स्थानावरचा असा अधिकारी. असं मानलं जात असे की तो थेट आणि फक्त चीफलाच आन्सरेबल आहे. एवढ्या वरच्या स्थानावरचा माणूस इन्व्हॉल्व्ह असलेला पाहून पख्तुनी आपोआपच गंभीर झाला.
"तो ये देढ-दो सालका इंतजार क्यूं किया आपने?"
"आप तो खफा हो गये मेजरसाब, खैर छोडिये, कमिंग टू द पॉइंट. एक बहोतही अहम काम के लिए आपकी जरूरत है! और मुझे, सॉरी... हमे यकीन है के ये काम सिर्फ आपही कर सकते है! "
"ऐसा क्यूं?"
"क्यूंकी इस बार हमे दुश्मन के साथ साथ अपनेही लोगोंसे लडना है!"
"मै....."
"समझाता हूं, वख्त बहोत कम है और काम बहोत ज्यादा. लेकिन एक बात जान लीजिये, इस कामके लिए आपको इसलिये चुना गया है क्योंकी ये काम आपको अकेलेही करना है! इव्हन हम भी इसमें कही नही आयेंगे, ना आपकी कोई मदत कर पायेंगे. कल को आप अगर पकडे जाते है तो ना तो पाकिस्तान ना ही आय.एस.आय. आपकी कोई जिम्मेदारी लेगा! "
"इसमे नई बात क्या है, सरहदपे लडे मेरे नब्बे हजार भाइयोकी जिम्मेदारी भी कहा ली थी सरकारने?" पख्तुनीचा स्वर कडवट झाला होता.
"कुछ चिजे ना चाहते हुये भी करनी पडती है मेजरसाहब. खैर ये फाइल संभालिये, इसमें सारी डिटेल्स है| बस इतना बता देता हूं की दो साल पहले एक सिक्रेट लॅबोरेटरी खोली गयी थी, जहांपर किसी बहोतही खतरनाक बायॉलॉजिकल वेपनपर काम चल रहा है! आपको उस लॅब को तहसनहस करना है! अगर उस वेपनका फॉर्म्युला मिल जाता है, तो सुभानअल्लाह, वर्ना उनके हाथ भी कुछ नही लगना चाहिये."
"इस छोटेसे कामके लिए इतना खर्चा करके, एक मर्सीनरी अपॉइंट करके मुझे छुडवाने की जरूरत क्या थी शौकतसाब? ये काम तो आपके अपने लोगभी आसानी से कर सकते थे|"
"नही कर सकते, क्योंकी इस लॅब के बाहर पाकिस्तानी फौज का सख्त पहरा है! एक पूरी रेजिमेंट तैनात है वहांपर|"
"इसका मतलब आप इतनी हद तक उतर आए? आपने ये सोच भी कैसे लिया की पख्तुनी अपने ही मुल्क के खिलाफ लडनेमें आपकी मदत करेगा?" पख्तुनी भडकला होता.
"कूल डाऊन, मेजरसाहब. हमने अभी पूरी बात नही बतायी है आपको. आपने मिया झुल्फिकार हसन जहांगीर के बारे मे तो सुना होगा?"
"उस कमजर्फ को कौन नही जानता शौकतमिया? सदर-ए-रियासतका साला है इसिलिये आजतक बचा हुआ है, वर्ना कबका मै ही मार चुका होता उसे."
"आपके पास जो फाइल है, उसमें कुछ सबूत ऐसे है जो ये साबित करते है की अब आप अपनी मन्शा कभी पूरी नही कर पायेंगे, क्योंकी झुल्फिकार देढ साल पहले कराचीके एक हॉटेलमे मारा जा चुका है, सारे सबूत उस फाइल में मौजूद है!"
"तो फीर आप उससे इतना डर क्यूं रहे है, अब तो रास्ता बिल्कुल साफ है."
"नही मेजरसाब, ये मामला इतना साफ नही है, आपकी जानकारी के लिए बता दूं, झुल्फिकारमिया कल शाम लाहोरमे हुयी एक रॅलीमे मौजूद थे, रादर पिछले देढ सालसे वो बिल्कुल सक्रिय है यहां की पॉलिटिक्स में, और अब उनका रुतबा और भी बडा हो गया है."
"मै कुछ समझ नही पा रहा हूं जनाब... आप अभी कुछ कहते है, अभी कुछ...." पख्तुनी गोंधळला
"ये कोइ और है मेजरसाब, जो पिछले कही महिनोसे झुल्फिकार बने छाया हुआ है| बदकिस्मती से जो सबूत उस फाइलमे है उन्हे आप तो समझ सकते है, लेकिन सदर को समझाया नही जा सकता. अहम मुद्दा ये है की जिस सिक्रेट लॅब की बात हम कर रहे है, वो इन्ही झुल्फिकारमियां की अगवानीमें चल रहा है! और हमे पक्का यकीन है लॅबमे जो कुछ भी पक रहा है उसके पिछे हिंदुस्थान का हाथ है! ये बंदा कोई हिंदोस्थानी जासूस है जो इतने अंदरतक घुसा हुवा है, हमारीही फौज की निगरानी में हमारेही मुल्क के खिलाफ एक जहरीला हथियार तैयार करवा रहा है और चुंके वो सदर का साला है, हम उसपर हाथ नही डाल सकते| उसे टॉपमोस्ट सिक्युरिटी हासिल है, कमसे कम सौ कमांडोजसे घिरा रहता है हमेशा. ऐसेमें अगर कोई हमारे मुल्क की मदत कर सकता है तो वो नाम है मेजर दिलबागखान पख्तुनी."
"मै अपने सोर्सेस से पता लगाऊंगा शौकतमियां. ऐसा नहीं है की आपपे यकीन नही है, लेकिन.. आप समझ सकते है, पख्तुनी के काम करने का यही तरीका है"
"बिल्कुल मेजरसाहब, आप अपने सारे सोर्सेस यूज कर सकते है, इन्शाल्लाह हमे यकीन है की आप कामयाब होकर ही लौंटेंगे!"
...
..
फाईल आणि आपल्या वैयक्तीक सोर्सेसकडून खातरी करून घेतल्यावर पख्तुनीच्या डोक्यात आलेला पहिला विचार होता, तो म्हणजे या वेळी लढा आपल्याच, म्हणजे त्याने स्वतःच ट्रेन केलेल्या कडव्या कमांडोजशी असणार आहे. कारण अशा कामासाठी पाकिस्तानी आर्मी इतर कुठल्याही रेजिमेंटचा विचार करणार नाही, हे त्याला पक्कं माहीत होतं. एक एक माणूस त्याने स्वतः पारखून घेतलेला होता, एकेक जवान म्हणजे साक्षात सैतान होता. अशा जवळजवळ तीनशे जणांच्या पहार्‍यातून त्याला त्या लॅबमध्ये घुसायचं होतं. हे करताना आपल्याच माणसांची कमीत कमी हानी होईल याचीही काळजी घ्यायची होती, कारण ती माणसं तशी निर्दोषच होती, आपण कुणाचं काम करतोय हेच मुळी त्यांना माहीत नव्हतं. त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या पाक वतनसाठीच लढत होते. त्याच क्षणी पख्तुनीने मनातल्या मनात दोन निर्णय घेऊन टाकले...
पहिला ... लॅब उद्ध्वस्त झाली की पहिलं काम म्हणजे झुल्फिकारला उडवायचं, त्या आधी त्याच्याकडून सगळे डिटेल्स काढून घ्यायचे. खरं तर आत्ताच त्याच्यावर हात टाकायचा मोह होत होता, पण अशाने दुश्मन होशियार झाला असता.
दुसरा निर्णय त्याने घेतला, तो म्हणजे 'किम्स डेन'वर मेसेज सोडायचा...
***********************************************************
"आंगचुक, तुझ्यावर एक अतिशय महत्त्वाची कामगिरी सोपवणार आहे मी. पण त्या आधी मला तुझ्याकडून पूर्ण माहिती हवीये त्या कोरियन गिर्यारोहकांच्या टीमबद्दल. ते लोक कधी आले? कधी परत गेले? त्यांच्यातला कोणी मागे राहिला होता का?"
"पण सर तुम्हाला त्या लोकांबद्दल...., श्या, मी पण काय मूर्ख माणुस आहे. कुणाला काय विचारतोय... सर, ते लोक एकूण १८ जण होते...."
आणि आंगचुक बोलायला लागला, ते शेवटी तेन्जीनकडून मिळालेली ताजी माहिती सांगूनच थांबला.
"म्हणजे दोघे जण कोणीतरी मागे राहिले होते. म्हणजे ज्या कुणी पख्तुनीची सुटका केली, तो एकटा नव्हता. त्याच्याबरोबर मदत होती.. कदाचित बाहेरून असेल, पण होती. मूळ मुद्दा असा आहे की ते जे कोणी होते, ते तुझ्या माहितीनुसार कोरियन्स होते, पाकिस्तानी नव्हे. मग त्यांनी पख्तुनीची सुटका का करावी? आणि त्यांना पख्तुनीचा ठावठिकाणा कसा काय लागला? पॉसिबिलिटी ऑफ इनफिल्ट्रेशन! ह्म्म्म....."
"आंगचुक तुला आता महत्त्वाचे काम करायचं आहे, ते म्हणजे शक्य ते सोर्सेस वापरून त्या टीमची माहिती काढायची. आलेल्या-गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डिटेल्स आउट पोस्टवर मिळतील. आणि या बंगलीवर नजर ठेवायची. इथे कोण येतं, कोण जातं. आजपर्यंत रेग्युलर येणारयांपैकी - मग त्यात हरकामे नोकरसुद्धा येतात - कोण कोण यायचं बंद झालंय ही सर्व माहिती काढायची."
"श्या... मला वाटलं सर, तुम्ही मला या केसमध्ये बरोबर घ्याल." आंगचुकने नाराजी व्यक्त केली.
"तू आमच्या बरोबरच आहेस आंगचुक. हेही काम तितकंच महत्त्वाचं आहे. आणि लवकरच मी तुला बोलावून घेईन. तुला इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं म्हणजे काही सरकारी सोपस्कार पूर्ण करून घ्यावे लागतील, त्यात काही दिवस जातील. तोपर्यंत तू हे काम कर. मग मी तुला बोलावून घेतोच."
************************************************
नॉमपेन्हच्या प्याँगयाँग रेस्टोरंटच्या त्या लॉबीत तो म्हातारा बराच वेळ कुणाची तरी वाट पाहत बसला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो तिथेच, त्याच हॉटेलात मुक्काम करून होता. कुठल्यातरी आफ्रिकन देशातून आलेला टूरिस्ट म्हातारा, त्याच्याबरोबर साधारण त्याच्याच वयाची त्याची बायको. दोघांचाही वर्ण त्यांच्या नागरिकत्वाची ग्वाही देत होता. वय झालेलं असलं, तरी म्हातारा अंगकाठीने धिप्पाड होता. वेटरला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की आल्यापासून म्हातार्‍याने एकदाही बिअर किंवा कुठल्याही मद्याला हात लावलेला नव्हता. निव्वळ कॉफी , कॉफी..... आजही त्याचं चार वेळा कॉफी मागवून झालेलं होतं. वेटरने विचारलंसुद्धा त्याला की "सर, तुम्हाला गाइड वगैरे हवा आहे का? कुणाची वाट पाहताय? हवम असेल तर हॉटेलतर्फे सोय करून देऊ का?" पण यावर म्हातारा नुसताच हसून गप्प राहिला होता.
एवढ्यात एक तरुण त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. कुठल्यातरी भडक अत्तराचा उग्र वास भक्ककन नाकावर आला, तसं म्हातार्‍याने वर पाहिलं, आपले पिवळेजर्द दात दाखवत तो तसाच समोर उभा राहिला होता.
"सर, त्या वेटरने सांगितलं की तुम्हाला गाइड हवा आहे म्हणून..."
म्हातारा भडकला, "मी त्याला आधीच नकार दिलाय. नाऊ यू प्लीज टेक युवर फिल्दी माउथ अँड डिसॅपियर, अदरवाईज आय विल हॅव टु कॉल हॉटेल गार्ड्स टु थ्रो यू आउट."
चिडून म्हातार्‍याने हातातल्या मॅगझिनमध्ये डोकं खुपसलं.
"अॅक्टिंग अच्छी कर लेते हो मेजरसाहब, भेस भी अच्छा बदला है! कोई भी पहचान नही पायेगा आपको. लेकिन लिओ की नजरोंको धोका नही दे सकते."
म्हातार्‍याने चमकून वर पाहिलं. समोर तोच गाईड दात दाखवत हसत होता.
"लिओ....? तुम....?"
"तुम्हाला काय वाटलं, चेहरा फक्त तुम्हालाच बदलता येतो? दॅट्स द मेन वेपन ऑफ माय बिझनेस सर."
तेवढ्यात वेटर जवळ येताना दिसला आणि तो परत भूमिकेत शिरला.
चेहर्‍यावर शक्य तेवढी लाचारी आणत म्हणाला,
"साबजी मै हैदर, थॉमससाबने भेजा है, आपका गाइड हूं मै."
वेटरचं समाधान झालं, पण आपलं कमिशन हुकल्यामुळे तो वैतागलासुद्धा.
"चले साबजी?"
हैदरने पुढे झुकून आदराने विचारलं, तसा पख्तुनी उठला. त्याच्या चेहर्‍यावर समाधान होतं. त्याची निवड सार्थ ठरली होती. आता फक्त त्या भाडोत्री अभिनेत्रीचं पेमेंट करून तिला रफादफा करणं बाकी होतं.
*****************************************************
"हॅलो डेडशॉट, एव्हरीथिंग इज ओके?"
"आतापर्यंत तरी सगळं प्लॅनिंगप्रमाणेच होतंय सर. झुल्फिकारने काही घोळ घालू नये म्हणजे मिळवली."
"पाखरू उडालंय, आतापर्यंत शिकारी त्याच्या मागे लागले असतील."
"डोंट वरी सर, पाखरू लवकरच आपल्या ताब्यात येईल. आपले शिकारी सराईत आहेत."
"काही गोंधळ होता कामा नये. एक लक्षात घे, इथे जर काही झालं तर आपलं सरकारदेखील आपल्याला वार्‍यावर सोडेल. वी ऑल मे लूज अवर क्रेडिबिलिटी."
"तसं होणार नाही सर. मी त्याला लवकरच परत आणेन. काहीही झालं, तरी आपल्या प्रोजेक्टला धक्का लागू देणार नाही मी. इट्स अ वर्ड!"
"वेल डन चॅप अँड ऑल दी बेस्ट."
"थँक्स चीफ, नाऊ वी विल मीट टु सेलिब्रेट द सक्सेस ऑफ 'ऑपरेशन ब्लाइंड हॉक."
***************************************************************************
"सो, आतातरी तू तुझ्या मूळ रुपात येणार आहेस का लिओ? बाय द वे, लिओ हे तरी तुझं खरं नाव आहे की...."
आपला उद्देश स्पष्ट केल्यावर पख्तुनीने हैदरला म्हणजे लिओला विचारलं. अर्थात लिओला त्याने पूर्ण माहिती दिलेली नव्हतीच. लिओला फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की पाकिस्तानी सैनिकांच्या एका पहार्‍यात बंदिस्त ठिकाणी एका माणसाला कैद करून ठेवलम आहे. तिथून त्याला उचलायचंय आणि त्यासाठी लिओने पख्तुनीला त्या अभेद्य गढीत प्रवेश मिळवून द्यायचा होता. लिओच्या माहितीप्रमाणे ते सर्व पाकिस्तानी गणवेशातले भारतीय जवान होते.
"माझा अकाऊंट नंबर तुझ्याकडे आहे मेजर. माझी फी जमा झाली की मी तुझ्याबरोबर आहे."
"संध्याकाळपर्यंत होऊन जाईल ते काम. पण एक लक्षात ठेव, तिथे स्टोकमध्ये तू बारा कमांडोज कापले होतेस. इथे मला फार रक्तपात नकोय. कमीतकमी जीवितहानी व्हायला हवी. "
"ओ के डूड, माझी फी जमा झाली की मी कामाला लागतो. एका आठवड्याने इथेच भेटू या. तुझ्या फाइलमधला तो नकाशा तेवढा मला देऊन ठेव. आय नीड टु फाइंड आउट अॅटलीस्ट टू-थ्री पॉसिबल वे आउट्स! अँड येस, वी मे नीड सम अॅमो."
"त्याची व्यवस्था मी करेन. आठवड्याभराने तू भेटशील तेव्हा मी तयार असेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव लिओ. मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय, कारण आजपर्यंत मी कधीही तुझं नाव ऐकलेलम नव्हतं. पण गेल्या काही दिवसात मी बरीच माहिती मिळवलीय. अगदी 'झाई झँग'पासून ते जोंग यूपर्यंत. तेव्हा माझ्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न करशील तर यापुढे लिओ हे नाव कधीच, कुणालाच ऐकू येणार नाही याची काळजी हा मेजर दिलबागखान पख्तुनी जातीने घेईल."
लिओच्या चेहर्‍यावर आधी आश्चर्य आणि मग कौतुकाचे भाव उमटले.
"इट्स रिअली प्लेझर टू वर्क विथ अ डिझर्व्हिंग सोल्जर, मेजर. तू थेट जोंगपर्यंत पोहोचलास म्हणजे यू आर समथिंग. उगाच नाही आय.एस.आय.ने तुझ्यावर विश्वास टाकून तुला सोडवण्यासाठी एवढा खर्च केला."
"आय.एस.आय?"
"कमॉन मेजर, मीपण कोणी बच्चा नाहीये. गेली कित्येक वर्षं या खेळात टिकून आहे ते याचमुळे. आय हॅव माय ओन सोर्सेस माय डिअर. एकच सांगतो, मला फक्त आणि फक्त पैशाशी मतलब आहे. जोपर्यंत तू आर्थिक बाबतीत माझ्याशी दगाबाजी करत नाहीस, तोपर्यंत आय अ‍ॅम विथ यू. अदरवाइज, लिओच्या असंख्य शत्रूंमध्ये आणखी एकाची वाढ होईल."
"जाण्यापूर्वी एकच प्रश्न लिओ........'
"माहितीये, पण त्याला माझं आजही तेच उत्तर आहे. नावात काय आहे? चल, तरीही तू मला आवडलास. लिओच्या मुळापर्यंत पोहोचणारा तू पहिलाच माणूस आहेस, त्यामुळे धोकादायक असलास तरी मला आवडलास. ज्या कामासाठी तू मला हायर केलं आहेस, ते सक्सेसफुली पूर्ण झालं की मी तुला माझम खरं नाव नक्की सांगेन. दॅट्स अ जंट्लमॅन्स वर्ड."
***********************************************************************
"हॅलो डेडशॉट धिस एन्ड..."
"डेडशॉट, पाखरू लोकेट झालंय. ते कंबोडियामध्ये आहेत. प्योंगयाँग हॉटेल, नॉमपेन्ह सिटी. गेल्या दोन दिवसात तो हैदर नावाच्या एका मुसलमान गाईडबरोबर पाहिला गेलाय.""
"गुड, लक्ष ठेव. तो नजरेच्या टप्प्याबाहेर जाता कामा नये.
योग्य वेळ आली की त्याला उचलूच आपण."
"यस बॉस."
**********************************************************************
"चीफ, पाखरू टप्प्यात आहे. शिकारी नजर ठेवून आहेत. त्याच्या हालचालीची खबर आपल्यापर्यंत पोहोचत राहील."
"गुड, तो जास्त काळ तिथे नाही थांबणार. लवकरच गंतव्याकडे निघेल. कीप अॅन आय. मला कसलाही गोंधळ नकोय या केसमध्ये."
"डोंट वरी चीफ, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल."
"ते दुसरं कबुतर, त्याचं काय?"
"ते स्वतःला गरुड समजतायत चीफ, पण डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ हिम."
****************************************************************
एक आठवड्यानंतर...
"मेजर, पैसे मिळाले. फक्त एकच चेंज आहे प्रोग्राममध्ये. तो म्हणजे आपण आठवड्याने भेटणार होतो, त्याला आता पंधरा दिवस लागतील."
"लिओ, मला गंडवायचा..."
"विचारही नाहीये माझा. बट यू वाँट मी टू एंटर अक्साई चीन. "
"नॉट जस्ट यू लिओ, वुई, वुई आर गोइंग देअर... "
"यस्स, पण त्याच तयारीसाठी हा वेळ लागणार आहे. बर्‍याच अरेंजमेंट्स कराव्या लागतील. बनावट कागदपत्रं तयार करावी लागतील. अ‍ॅम्युनिशन्स आपल्याला तिथेच ताब्यात मिळायला हवेत."
"अर्थात, नाहीतरी मी ते इथून वागवत नेणार नाहीच आहे."
"आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. मला माझी फी वाढवून हवी आहे."
"लिओ, तू शब्द फिरवतोयस... "
"तू मला फिरवतोयस मेजर, तू खोटं बोललाहेस माझ्याशी. तिथे तुला नक्की काय काम आहे याच्याशी मला देणं-घेणं नाही. पण दे आर नॉट इंडियन सोल्जर इन पाकिस्तानी डिस्गाइस. दे आर पाकिस्तानी सोल्जर्स! आपल्याच देशाच्या कुठल्यातरी प्रोजेक्टशी तुझं काय वैर आहे मला माहीत नाही. पण तू खोटं बोललास. मी अजूनही काम करायला तयार आहे, पण अर्थात माझी किंमत वाढलीये."
"ओके, लिओ. आय अपोलोजाइज. तुझे पैसे तुला संध्याकाळपर्यंत मिळतील."
"गुड बॉय अँड बाय..."
तिकडून फोन ठेवला गेला, त्याच क्षणी पख्तुनीने निर्णय घेतला - मिशन संपलं की लिओसुद्धा संपायला हवा.
***********************************
"अहा, आता कसं मस्त वाटतंय सर. गेली चार-पाच वर्षं तिथे सडत होतो लिटरली." आंगचुक नुसता सळसळत होता उत्साहाने. चैतन्यने त्याला श्रीनगरला बोलावून घेतलं होतं. वरून सगळ्या परवानग्या वगैरे त्यानेच काढल्या होत्या. आता आंगचुक आपल्या पहिल्यावहिल्या साहसाला सिद्ध झाला होता.
"हा नकाशा बघ आंगचुक. काही लिंक लागतेय का?"
आंगचुक नकाशा पाहू लागला. थोड्याच वेळात त्याचा चेहरा गंभीर झाला, पण डोळे एका वेगळ्याच उत्साहाने तेजाळले होते.
"आपण अक्साई चीनमध्ये घुसणार आहोत सर?
चैतन्याच्या चेहर्‍यावर हसू उमटलं.
"येस आंगचुक. तुला त्या भागाची माहिती आहे?"
"लेह, लद्दाखच्या परिसरात मोठा झालोय सर. आमच्या भागात दर दहामध्ये दोघांना तरी या भागाची इत्थंभूत माहिती असतेच आणि मी त्या दर दोघांपैकी एक आहे सुदैवाने. माझं मूळ गाव त्या बॉर्डरवरच आहे. तिथेच लहानाचा मोठा....
आंगचुकने एकदम मान वर करून चैतन्यकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आनंदमिश्रित कुतूहल होतं.
"शिट, हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं. हे सगळं प्री-प्लॅन्ड आहे ना? म्हणजे माझ्यावर तुमची नजर आधीपासून होती तर."
चैतन्य फक्त हसला, काही गोष्टी गुप्तच राहिलेल्या बर्‍या असतात.
"अगदीच प्री-प्लॅन्ड नाही म्हणता येणार, पण पख्तुनी गायब झाल्यावर त्याला कशासाठी सोडवण्यात आलं असावं, याचे काही अंदाज आम्ही बांधले होते. आता हे स्पष्ट झालंय की वुई वेअर राईट. अशा वेळी तुझ्यासारखा लोकल आणि या भारत देशावर जिवापाड प्रेम करणारा माणूस बरोबर असणं जास्त फायदेशीर ना?"
"डोंट वरी सर, इट्स माय मिशन नाऊ. घरभी मेरा है, आंगन भी मेरा. अब आयेंगा मजा. करायचंय काय तेवढं सांगा. एखादी चिनी चौकी उद्ध्वस्त करायचीय?"
"चिनी चौकी नाही आंगचुक, एक भारतीय लॅबॉरेटरी उद्ध्वस्त होणार आहे. पण ते काम दुसरेच कुणी करणार आहेत. आपल्याला फक्त त्यांचं काम झालं की त्यांना उचलायचं आहे."
"सर, आपलीच लॅब..."
"फक्त विश्वास ठेव आंगचुक, माझंही माझ्या भारतावर तुझ्याइतकंच प्रेम, श्रद्धा आहे."
"आय ट्रस्ट यू सर. आय अ‍ॅम इन! त्या भागात चालू शकतील अशा वाहनांची व्यवस्था करावी लागेल. कारण तिथे चॉपर्स नेणं धोकादायक आहे. यू लीव्ह इट टू मी!"

**********†***********************
लिओ आणि पख्तुनी दोघांची नॉमपेन्हमध्ये भेट झाली, त्यानंतर बाविसावा दिवस.
दोघेही आठवड्यापूर्वीच अक्साई भागात दाखल झाले होते. एका छोट्या खेड्यातील सराईत उतरले होते. इथून गंतव्य स्थान अवघ्या साठ कि.मी. अंतरावर होतं. गेल्या काही दिवसात दोन वेळा दोघांनी त्या भागाची रेकी केली होती. आता उद्या अ‍ॅम्युनिशन्स हातात आली की प्रत्यक्ष ऑपरेशन...
लिओने एका स्थानिक राहिवाशाला पटवून एक पिकअप ट्रक आणि दोन खेचरं मिळवली होती. शेवटच्या सहा-सात कि.मी.च्या टप्प्यात ती खेचरंच उपयोगी पडणार होती.
दुसर्‍या दिवशी दुपारच्या वेळी खेचरांसह पिकअपने सराई सोडली आणि कूच केलं...
गावाबाहेर पडताना ऐन रस्त्यावर बंद पडलेला, बर्फाळ प्रदेशातील सामानाची ने-आण करणारा ट्रक सोडला, तर बाकी काहीच अडचण आली नव्हती.
ऑपरेशन ब्लाइंड हॉक वॉज इन लास्ट स्टेज...

************************************
बर्फ, खुरटी झाडं, अधूनमधून दिसणार्‍या बोडक्या, बसक्या टेकड्या आणि दूरवर निर्मनुष्य पसरलेला ओसाड प्रदेश. आणि अशा या दुर्गम भागात ऐन चिनी सैनिकांच्या नजरेच्या टप्प्याखाली असलेली ती तथाकथित सिक्रेट लॅब. खरं तर लॅब म्हणावं असं बाहेरून काहीच वाटत नव्हतं. एक जुनाट पण भक्कम गढीवजा बंगला. खरं तर ती एक प्रायव्हेट इस्टेटच होती. दीड ते दोन कि.मी.च्या परिसरात पसरलेली कुणा अज्ञात व्यक्तीची ती इस्टेट. बाहेरून ओसाड वाटणारी ती हवेली तीनेक वर्षांपूर्वी अचानक गजबजून गेली. एका आठवड्याच्या अंतरात साधारण दीडशे ते अडीचशे सैनिकांचा पहारा बसला. कसले कसले बॉक्सेस हवेलीत येऊन दाखल झाले आणि हवेली गजबजून गेली....
तसंही आधीच वैराण असलेल्या त्या भागात त्यानंतर हळूहळू आसपासच्या दहा किलोमीटरच्या परिसरात पूर्ण सन्नाटा निर्माण झालेला होता. पाकिस्तानी सैनिकांचा पहारा आणि का कोण जाणे, पण चिनी सैनिकांनी केलेलं दुर्लक्ष यामुळे ती हवेली आणि त्यातले लोक बिनधास्तपणे कसलाही अडथळा न येता आपलं काम करत होते. झुल्फिकारची मध्यस्थी आणि पाकिस्तानी सैनिकांच्या उपस्थितीमुळे बहुधा चीननेही याकडे दुर्लक्ष केलं असावं. पण एकंदरीत काय, तर लॅबचं काम अगदी बिनबोभाट चालू होतं.
आणि आज पख्तुनी लिओला घेऊन... सॉरी, लिओ पख्तुनीला घेऊन तिथे हजर झाला होता. नखशिखांत काळ्या कपड्यातले ते दोघे रात्रीच्या अंधारात बेमालूमपणे मिसळून गेलेले होते. लिओच्या डोक्यात नक्की काय शिजत होतं, हे कळायला मार्ग नव्हता. पण त्याने काहीतरी प्लॅनिंग नक्की केलं होतं.
हवेलीच्या दक्षिणेकडील बाजूला पहारा जरा कमजोर आहे, हे लिओने शोधून काढलेलं होतं. त्यामुळे तेथूनच आत शिरायचा त्या दोघांचा इरादा होता. भिंत ओलांडून दोघे आत शिरले. दक्षिण बाजूला कंपाउंड वॉलपासून आतली हवेली साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर होती. ठिकठिकाणी उभ्या असलेल्या सैनिकी चौक्या, पहारे हे सगळं ओलांडून त्यांना आत लॅबपर्यंत पोहोचायचं होतं. पण आतली एकंदरीत परिस्थिती पाहिली, तर ते एकंदरीत कठीणच वाटत होतं. पख्तुनीला अजूनही लक्षात येत नव्हतं की लिओचा प्लॅन काय आहे? कारण लिओने त्याला प्रॉमिस केलं होतं की जीवितहानी न होता तो त्याला आत, लॅबमध्ये घेऊन जाईल. पण नक्की कसं?
अरे, हा गेला कुठे? लिओ परत गायब झाला होता.
*********************************************************************
"सर, ते दोघे दक्षिणेकडच्या बाजूने आत शिरलेत. भिंतीवर चढण्यासाठी बांधलेला दोर तसाच सोडलाय त्यांनी. इतके सराईत लोक, अशी मूर्ख चूक कशी काय करताहेत? दोर कुणाच्या नजरेला पडला तर...? "
"नाही आंगचुक, हवेलीच्या बाहेरच्या बाजूला, त्या बाजूला कुणीही येणार नाही याची खातरी करूनच ते आत शिरलेले असणार. पण मला एक कळत नाही, आतला एवढा खतरनाक पहारा कसा काय पार करणार आहेत ते?"
"स्टोकच्या हवेलीतही घुसलाच होता की तो..."
"आंगचुक, तिथे बाहेर फक्त चार लोक होते आणि आत बारा.... , इथे शेकडो कमांडोज आहेत."
"वाट पाहण्यापलीकडे आपल्या हातात काहीही नाही."
**********************************************************************
पख्तुनीने थोडा वेळ वाट पाहून शेवटी एकटंच पुढे सरकायचा निर्णय घेतला. तो हवेलीच्या दिशेने पुढे सरकला, तशी डाव्या बाजूच्या झाडीत कसलीतरी हालचाल झाली आणि क्षणार्धात त्याच्यावर अनेक फ्लॅशलाइट्स पडले. एका क्षणात त्याच्याभोवती सैनिकांचा वेढा पडला. पूर्ण काळ्या कपड्यात असलेला, बुरख्यातला पख्तुनी एका क्षणात जेरबंद झाला. काय झालं हे कळायच्या आत सगळा प्लॅन उधळला गेला होता.
"चुपचाप हमारे साथ कॅप्टनसाबके पास चलो, तुम्हाला फैसला अब वोही करेंगे."
आयुष्यात प्रथमच पख्तुनीचा प्लॅन फसला होता. स्वतःच्या सामर्थ्यापेक्षा परक्या लिओवर भरवसा ठेवल्याचा पश्चात्ताप त्याला आता होत होता.
सैनिक त्याला घेऊन आपल्या चीफ ऑफिसरकडे पोहोचले, तेव्हा पख्तुनीच्या डोक्यात एकच विचार सुरू होता. आता नक्की काय आणि कसा स्टँड घ्यायचा. मुळात तशी संधी तरी मिळेल का? कारण त्यानेच तयार केलेले कमांडोज होते ते. कर्तव्याच्या पुढे इतर कसलेही आणि कुठलीही नाती, संबंध पाहायचे नाहीत हेच ठसवलं होतं त्याने त्यांच्यावर.
त्याच्या चेहर्‍यावरचा कपड्याचा बुरखा हटवण्यात आला आणि कॅप्टन बक्ष ताडकन उभा राहिला. सवयीने त्याने आपल्या मेजरला एक कडक सॅल्यूट ठोकला.
"मेजरसाहब आप, यहां कैसे? इसका मतलब वो लडका सच बोल रहा था?"
"कौन लडका?"
"जवान, उसे सामने ले आओ."
चार सैनिकांच्या गराड्यात, गनपॉइंटवर असलेला लिओ पुढे आला. गंमत म्हणजे त्याच्या चेहर्‍यावर अजिबात भीती नव्हती, तो निर्धास्त होता.
"कॅप्टनसाहेब, मुझे यहां गनपॉइंटपे लिया गया है और मेजरसाबको ऐसे ट्रीट किया जा रहा है जैसे वो आपके दोस्त हो?" लिओने प्रश्न केला.
"मेजरसाहब, हुजूर आप इस लडके को जानते है? ये आपके साथ है? लेकिन आप तो हिंदुस्थानियोंकी कैद में थे, फिर...."
"मै बताता हूं कॅप्टन साहब. आप मेरे जर्किनके पिछले जेबमे चेक कीजिये, एक कागज मिलेगा आपको. उसपे कोई मोहर नही है, लेकिन एक ऐसा निशान है जो सिर्फ एक पाकिस्तानी आर्मी का अफसरही पहचान सकता है! ये कागज मेरा लाइफ सेव्हिंग कार्ड बनने जा रहा है अब."
त्याच्या खिशातून तो तथाकथित कागद शोधून काढण्यात आला. कॅप्टन बक्षने त्या कागदावर असलेला एका कोपर्‍यातला चांदतारा बरोबर ओळखला. ती त्या कागदाची वैधता स्पष्ट करणारी खूण होती. आणि त्या कागदाप्रमाणे त्या व्यक्तीवर, म्हणजे लिओवर पख्तुनीला भारताच्या कैदेतून सोडवून आणण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती. त्यासाठी ऑफर करण्यात आलेली रक्कम बघून कॅप्टनचे डोळेच फिरले.
"येस कॅप्टन, तो माझ्या बरोबरच आहे. रादर मी त्याच्या बरोबर आहे. त्याने माझी त्या कैदेतून सुटका केली आणि आम्ही भारतीय सैन्याला शंका येऊ नये, म्हणून या उलट्या दिशेने प्रवास सुरू केला. इथून असेच पुढे जाऊन एल.ओ.सी. क्रॉस करायची आणि पाकिस्तानात प्रवेश करायचा असा आमचा विचार होता. मध्येच ही हवेली दिसली, म्हणून रात्रीच्या निवासासाठी आत शिरलो. तर इथे भलतंच नाटक सुरू दिसतंय. आणि बक्ष, तुझी तुकडी इथे काय करतेय?"
आपण काय बोलतोय ते पख्तुनीला कळत नव्हतं, पण परिस्थिती परत आपल्या ताब्यात घेण्याचा मार्ग त्याला सापडला होता.
"दॅट्स अ लाँग स्टोरी मेजरसाहब. लेकिन आप थके हुए हो. तुम्ही आपलेच आहात. आणि हा माणूस आपल्याला सोडवायला आलाय म्हणजे तो तर आमच्यासाठी अल्लाह का फरिश्ताच आहे. आप दोनो आज की रात आराम कर लो. आपण उद्या सकाळी बोलू या. जवान, मेजरसाबको और इनके दोस्तको हवेलीके अंदर ले जाओ. बाकी बाते कल सोचेंगे."
पख्तुनी लिओकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहर्‍यावरचं मिस्कील हास्य पाहताच पख्तुनीच्या डोक्यात प्रकाश पडायला सुरुवात झाली होती. लिओची योजना हीच होती तर....
कसलाही रक्तपात न घडवता लिओ त्याला घेऊन हवेलीत अगदी बिनबोभाट शिरला होता.
************************************************************************
एकच समस्या होती, ती म्हणजे त्यांच्याकडचे सगळे अॅम्युनिशन्स मागे, जिथे त्याला पकडण्यात आलं, तिथेच राहून गेले होते. आता लॅब उद्ध्वस्त करायची म्हणजे....
"धिस इज फॉर यू मेजर...!"
लिओने त्याच्यापुढे कागदाचा एक तुकडा टाकला होता. पख्तुनीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
"या हवेलीतल्या अॅम्युनेशनच्या स्टोअरचा मॅप. आय एम सॉरी मेजर, पण तुमचे पाकिस्तानी लोक पैशाच्या बाबतीत फार हपापलेले असतात. मी त्यांच्याकडून हवेलीचा अंतर्गत नकाशा मिळवला काही हजार डॉलर्सच्या बदल्यात. एकंदरीत नकाशावरून आणि हवेलीच्या अंतर्गत रचनेवरून मी तीन जागा अशा ठरवल्या होत्या की जिथे हत्यारं किंवा दारूगोळ्याचं कोठार असू शकेल. आत शिरल्यावर मघाशी आणखी काही डॉलर्सच्या बदल्यात एक्झॅक्ट लोकेशनही कळलं. मेजर, तुला आत आणून सोडायचं काम मी केलंय. आता इथून पुढे काय करायचं ते तू ठरवायचं आहेस. मी आता इथून बाहेर पडणार आहे. माझं काम झालंय. इथे कोणीही महत्त्वाचा माणूस कैद नाहीये हे नक्की. आय डोंट नो तुझा इथे येण्याचा हेतू काय आहे ते. पण ज्यासाठी तू मला हायर केलं होतंस, ते काम मी पूर्ण केलंय. पुढचं तुझं तुला ठरवायचंय. माझ्यातर्फे तुला ही शेवटची भेट..."
लिओने एक गोष्ट पुढे केली, ती बघून पख्तुनी हरखलाच.
सायलेन्सर बसवलेलं एक ऑटोमॅटिक पिस्तूल होतं ते.
"... आणि ही एक्स्ट्राची दोन मॅगझीन्स. हवेलीच्या मागच्या बाजूला एक आउट हाउस आहे. त्याच्या मागे ड्रेनेजची एक लाइन आहे. ती थेट हवेलीच्या बाहेर निघते. ऑल दी बेस्ट मेजरसाहेब. जरूरत पडे तो बंदे को फिर याद जरूर कीजियेगा. "
"थँक्स लिओ अँड सॉरी बडी, पण मी ही रिस्क नाही घेऊ शकत.."
लिओच्या चेहर्‍यावरचं आश्चर्य त्याच्याच वेदनेत जिरलं होतं. पख्तुनीच्या, त्यानेच दिलेल्या पिस्तूलमधून सुटलेली गोळी त्याच्याच छातीचा वेध घेऊन गेली होती. पुढच्याच क्षणी लिओ, कसातरी धडपडत त्या खोलीच्या बाहेर पडला आणि अंधारात शिरला.
पख्तुनीने त्याच्यामागे जाण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. कारण गोळी बरोबर हॄदयाच्या जागी बसलेली होती. लिओ फार दूर जाऊ शकणार नाही, याची खातरी होती त्याला. त्याला लवकरात लवकर महत्त्वाचं काम उरकायचं होतं. स्टोअर हुडकून बाँब्ज शोधायचे होते, ते योग्य जागी फिट करायचे होते. त्या तथाकथित फॉर्म्युल्यात त्याला रस नव्हता आणि तो घातक फॉर्म्युला आय.एस.आय.च्या हातात पडावा असं त्याला चुकूनही वाटत नव्हतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती हवेली उडवून लावण्यापूर्वी आतल्या शक्य तितक्या सैनिकांना हवेलीच्या बाहेर काढायचं होतं. तसंही आत फार फार पन्नासच्या घरात जवान होते पहार्‍यावर. त्यातले काहीतरी नक्कीच वाचवता आले असते.
बाहेरच्या अंधाराकडे पाहत त्याने एक सुस्कारा सोडला. लिओला मारायची खरं तर त्याची इच्छा नव्हती, पण त्याला पर्याय नव्हता. हा पोरगा फारच डेंजरस होता. पण लिओ जखमी अवस्थेत बाहेर पडण्यापूर्वी पख्तुनीला काहीतरी खटकलं होतं. नक्की काय ते त्यालाही सांगता आलं नसतं.
पख्तुनीने आपली गन सावरली आणि तो अॅमो शोधायला निघाला...
*************************************************************************
"गेट रेडी, आंगचुक. कुठल्याही क्षणी आपल्याला निघावं लागेल. त्या समोरच्या नाल्याकडे लक्ष असू दे."
आंगचुक आणि चैतन्य त्या हवेलीच्या मागच्या बाजूच्या जंगलात एका गर्द ठिकाणी लपून बसले होते. काही वेळाने हवेलीच्या उत्तर दिशेला एक छोटासा स्फोट झाला आणि अचानक गोंधळ उडाला. सैनिकांच्या तुकड्या बहुतेक स्फोटाच्या दिशेने जात होत्या.
आणि त्यानंतर काही मिनिटातच हवेलीत एक मोठा स्फोट झाला आणि मग अचानक एकामागोमाग एक स्फोटांची मालिका सुरूच झाली.
"आंगचुक, रेडी, सावज येईलच आपलं इतक्यात."
काही मिनिटातच समोरच्या त्या नाल्यातून कोणीतरी गडबडीत बाहेर पडलं. आजूबाजूचा अंदाज घेत त्याने एका दिशेने पळायला सुरुवात केली. पण काहीही कळायच्या आता त्याला परत सैनिकांचा गराडा पडला.
"बेवकूफो, ये मै हूं, मेजर दिलबागखान पख्तुनी. दुश्मन उस तरफ भाग गया है, मै उसीका पीछा कर रहा हूं|" पख्तुनीने शेवटची चाल खेळली, पण आता उशीर झाला होता.
"हा मेजर, मै जानता हूं तुम पख्तुनी हो, तभी तो तुम्हारे इंतजारमे यहा खडा हूं कबसे, तुम्हारे लिये सवारी लेके."
"डेडशॉट तुम, यहां?"
एका क्षणात पख्तुनीच्या मस्तकात तारे चमकले. कारण त्याच्या लक्षात आलं होतं. मघाशी लिओ जखमी अवस्थेत बाहेर पडताना त्याला काय खटकलं होतं ते.
लिओने छातीतून उसळणारा रक्ताचा ओघळ थांबवण्यापूर्वी अतिशय वेदनायुक्त, आश्चर्यचकित मुद्रेने केलेली ती शेवटची खूण. आपल्या उजव्या हाताची दोन बोटं लिओने आपल्या कपाळावर एका बाजूला अलगद टेकवत पख्तुनीला सॅल्यूट मारला होता. पख्तुनीच्या डोळ्यासमोर तो दीड-दोन वर्षांपूर्वी भेटलेला देखणा, जिगरबाज पोरगा उभा राहिला होता.
पख्तुनी हातातलं पिस्तूल खाली टाकून मटकन जमिनीवर गुडघ्यावर बसला.
"या अल्लाह, ये क्या कर दिया मैने?"
**************************************************************************************
"सगळं काही प्लॅन्ड होतं पख्तुनी. तुझी सुटका, बारा भारतीय जवानांना मारून तुझी सुटका करणारा लिओ... सगळे आमचेच होते रे."
"लेकिन मेजर शौकत हुसेन?"
"अरे, तू शिर्‍याला ओळखू शकला नाहीस, इतका काळ तुझ्या सोबत असून. शौकतला कसा काय ओळखणार होतास? कर्नल देशमुखांसारखा मुरलेला माणूस इतक्या सहजासहजी तुला ओळखता येणं शक्य तरी होतं का? बाय द वे पख्तुनी, झुल्फिकार बनावट नव्हता, नाही. तो मेलेलाही नाही. जिवंतच आहे. पण शौकत मात्र बनावट होता. कर्नल देशमुखांनी उभा केला होता. गेल्या दोन वर्षांतल्या तुझ्या अनुपस्थितीत घडलेल्या गोष्टी तुला माहीत असणं शक्यच नव्हतं, रादर आम्ही ती संधीच दिली नाही तुला. तू पहिल्यापासून शेवटपर्यंत आमच्या माणसांच्या गराड्यातच होतास. तुझ्या सोर्सेसकडून ज्या बातम्या, माहिती तुला मिळावी अशी आमची इच्छा होती, ती आम्हीच तिथपर्यंत पोहोचवली होती."
"पण कशासाठी?"
"कशासाठी? पख्तुनी, ती लॅब... ते संशोधन भारताचं नव्हे, तर पाकिस्तानचं होतं. आणि पाकिस्तानचं होतं म्हणूनच अक्साईच्या चीनच्या भागात असूनही चिनी सैन्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं... रादर त्याला संरक्षण दिलं होतं. म्हणूनच जेव्हा ही लॅब उद्ध्वस्त करायचं ठरवलं, तेव्हा आमच्यापुढे विश्वासाचं एकच नाव आलं, ते म्हणजे मेजर दिलबागखान पख्तुनी."
"आता जेव्हा या घातपाताचा पाकिस्तानमध्ये तपास केला जाईल, तेव्हा कॅप्टन बक्ष आणि त्याचे जवान एकच नाव घेतील आणि ते असेल मेजर दिलबागखान पख्तुनी. यापुढे पख्तुनी हे नाव पाकिस्तानसाठी त्यांच्या बहाद्दर शिपायाचं नाही, तर एक गद्दार म्हणून घेतलं जाईल. यू आर फिनिश्ड पख्तुनी. धिस वॉज माय लास्ट गेम विथ यू अँड मी जिंकलोय...."
पख्तुनीच्या चेहर्‍यावर संताप आणि वेदना दोन्हीचं मिश्रण होतं. श्रीनगरमधल्या भारतीय सैन्याच्या मुख्य छावणीत ते होते.
"ओके डेडशॉट, या वेळी तू जिंकलास. एक पाकिस्तानी एजंट म्हणून कदाचित पख्तुनी संपेल यापुढे. पण आपली दुश्मनी संपणार नाहीये. आजपर्यंत फक्त राजकीय शत्रू होतो आपण. यापुढे आपण वैयक्तिक शत्रू आहोत एकमेकांचे आणि मी लवकरच गायब होईन पुन्हा मेजर. वेट फॉर दॅट डे... फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की तो छोकरा माझ्या हातून मारला जायला नको होता."
तसा चैतन्य हसायला लागला.....
"पख्तुनी, तुला ती गन लिओनेच दिली होती ना रे? आणि लिओवर किती गोळ्या झाडल्यास तू?"
"दोन गोळ्या झाडल्या मी त्याच्यावर. त्यानंतर पिस्तूलमधल्या गोळ्या संपल्या, म्हणून मी दुसरं मॅगझीन लोड केलं, तोपर्यंत तो लिओ अंधारात गायब झाला होता...."
"गायब झाला होता?"
"यस, यस, तो गायब झाला अंधारात. म्हणजे त्या गनमधल्या त्या शेवटच्या दोन गोळ्या त्याने स्वतःसाठीच राखून ठेवल्या होत्या तर. माय गुडनेस. डेडशॉट, इतना बडा प्लॅनिंग. वो छोकरा वही था ना... शिरीष.. शिरीष भोसले?"
"करेक्ट पख्तुनी, तो शिर्‍याच होता. प्रचंड मेहनत घेतली होती त्याने. कोरियन बनणं, त्यांची भाषा, त्यांचा अॅक्सेंट, त्यांचं वागणं, चालणं-फिरणं. त्यानंतर एथिकल ड्रॅगन्ससारख्या घातकी संघटनेमध्ये प्रवेश मिळवणं. अर्थात हा प्रवेश त्याने फक्त 'किम्स डेन'चा वापर करण्यापुरताच केला होता. तू ज्या व्यक्तीकडे तुझा निरोप सोडलास, ती व्यक्ती त्याच दिवशी आकाशातल्या बापाला भेटायला गेली. आणि लिओ बनून शिर्‍या तुझ्याबरोबर चिकटला....."
"पख्तुनी, शेवटी एकच प्रश्न विचारायचाय मला. तू लिओला किती पैसे दिले होतेस हे काम करण्यासाठी?"
"छोडो ना कॅप्टन, मुझे खुशी इस बातकी है, के बंदा अभीभी जिंदा है, मुलाकात जरूर होगी. तब अपना सारा पैसा वसूल करूंगा उससे."
कॅप्टन चैतन्य निंबाळकरने शेवटचा फोन केला चीफला..
"चीफ, पाखरू परत आलं. ऑपरेशन 'ब्लाइंड' हॉ़क इज सक्सेसफुल."
ब्लाइंड 'हॉक'? पख्तुनीची ट्यूब पेटली. त्याच्या विश्वात तो 'किलर हॉ़क' म्हणून ओळखला जात होता आजपर्यंत. पण आज चैतन्य आणि शिर्‍या दोघांनी त्याची गणना 'ब्लाइंड' हॉकमध्ये करून टाकली होती.
आणि त्या वेळी शिर्‍या मात्र डॉलर्स ते रुपये या कन्व्हर्जनच्या घोळात अडकून पडला होता.

समाप्त.

विशाल कुलकर्णी.

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

29 Oct 2016 - 2:37 pm | महासंग्राम

अगदी थरारक झालिये कथा !!!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 Oct 2016 - 3:45 pm | भाग्यश्री कुलकर्णी

लई भारी. ऐका दमात वाचली कथा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

30 Oct 2016 - 8:45 am | कैलासवासी सोन्याबापु

आईची जय! लेका विकु तुझा शिऱ्या लैच भन्नाट आहे बे! आपला शिऱ्या गुणी बाळासारखा मुंबईला आला तेव्हापासून पाहतोय.शिऱ्या आता बिलाट झालंय राव! एकदम अरभाट

स्पार्टाकस's picture

30 Oct 2016 - 9:36 am | स्पार्टाकस

विशाल,
ही सिरीज पुढे चालू कर पुन्हा!
मस्तं झालेत सगळेच भाग आतापर्यंत्चे!

शिर्‍या तर तेव्हाच आवडला होता आणि आता हीच कथा वाचताना तसेच मनात आले होते. तेच बरोबर ठरले.

आता शिर्‍या सिरीजचा एक ग्रंथच काढ ना भौ..

बोका-ए-आझम's picture

30 Oct 2016 - 12:02 pm | बोका-ए-आझम

पण विकुभाऊ, गेल्या वर्षीच्या दिवाळीनंतर डायरेक्ट या दिवाळीला लेख? केवढी ती मोठी गॅप!

नाखु's picture

1 Nov 2016 - 9:08 am | नाखु

सुपारी द्यायला पाहिजे कुणाला तरी,वर्ष वर्ष गायब होतो शिर्यासारखा! थांब तुला जीमो आणि मंदार कात्रेंच्या ताब्यातच देतो.

मूळ अवांतर : जबरा झालीय कथा.

आस्वादक नाखु

विशाल कुलकर्णी's picture

30 Oct 2016 - 12:47 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !

मयुरेश सुर्यवंशी's picture

31 Oct 2016 - 1:56 pm | मयुरेश सुर्यवंशी

वाचता-वाचता दूरध्वनीची विजेरी(Battery) संपली। विशाल भाऊ यापेक्षा तुम्ही ग्रंथ काढलेला परवडेल.

प्रीत-मोहर's picture

31 Oct 2016 - 2:00 pm | प्रीत-मोहर

शिर्या इज all time favorite! !

विशाल कुलकर्णी's picture

1 Nov 2016 - 12:11 pm | विशाल कुलकर्णी

_/!\_ :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

1 Nov 2016 - 1:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

हरामखोर शिऱ्या अन त्याचा मानस बाप म्हणजे तू इतक्या दिवसांनी लिहिते अन साहस करते झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन विकु!!, तुझा गंडा बांधतोय, आमचे मानसपुत्र राजेश देशकर मोठे करायचे आहेत, बाळराजे हल्लीच रांगू लागले आहेत, तरीही लेखणी पकडून आमच्या हातून श्रीगणेशा करवून घ्यावा ही पंतोजी विकुस बालके बापुसाहेबाची विनंती!

विशाल कुलकर्णी's picture

3 Nov 2016 - 4:16 pm | विशाल कुलकर्णी

वत्सा, तुजप्रत कल्याण असो ... a

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Nov 2016 - 9:52 pm | अनिरुद्ध.वैद्य

खीळवुन ठेवलेलं कथानक.

भटकंती अनलिमिटेड's picture

2 Nov 2016 - 10:56 am | भटकंती अनलिमिटेड

काही स्थानिक संदर्भ मिसमॅच आहेत. पण कथा एकदम थर्राट झाली आहे.

ऋषिकेश's picture

2 Nov 2016 - 4:41 pm | ऋषिकेश

खणखणीत कथानक

सॉरी, मात्र अधिक मुद्रीतशोधन आणि संपादन आवश्यक होतं. हिंदी वाक्यांच्या शेवटी दंड हवेत, विरामचिन्हे, बोली आणि लेखी भाषेतील क्रियापदातील बदल हे जरा नजरेतून सुटल्याने छान चवदार लाडूत मधेच किंचित कचकच लागत रहाते

विशाल कुलकर्णी's picture

3 Nov 2016 - 1:03 pm | विशाल कुलकर्णी

सहमत आहे ऋषिकेश. पण फार घाईघाईत लिहावं लागलं. ज्योतायने तरी बराच वेळ दिला होता, परंतू माझ्या सतत फिरतीमुळे लॅपटॉप उघडायचा वेळच मिळत नसे. जवळपास ७०% लिखाण मोबाइलवर केलय. त्यातल्या स्पेलचेकरशी मारामारी करत. त्यामुळे लेखनात बर्‍याचश्या तृटी राहून गेल्यात... क्षमस्व आणि मन:पूर्वक आभार :)

क्षमस्व नको प्लीज .. खुपच छान लिहिलंय. फक्त इतका हत्ती दिमाखदार असल्यावर शेपुट राहु नये म्हणून नोंदवून ठेवलं (खंतरतर ते मुशो करणार्‍यांसाठी होतं :प आणि करड्या रंगाची शेड चुकल्याने ठसठशीत दिसतंय पण मला ते पुसट लिहायचं होतं)

असो. :)

मारवा's picture

2 Nov 2016 - 7:29 pm | मारवा

झकास !

अ.वि's picture

3 Nov 2016 - 7:50 am | अ.वि

लय भारी ना राव..!

अद्द्या's picture

3 Nov 2016 - 10:46 am | अद्द्या

अतीच भारी

विशाल कुलकर्णी's picture

3 Nov 2016 - 1:03 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी :)

पैसा's picture

6 Nov 2016 - 3:26 pm | पैसा

कथा बघताक्षणी त्यातली शिर्‍या आणि पख्तूनी ही नावे बघितली आणि दिल गार्डन गार्डन हो गया! मस्त जमली आहे. पुढची कथा आताच लिहायला घे! ;)

विशाल कुलकर्णी's picture

6 Nov 2016 - 6:09 pm | विशाल कुलकर्णी

जरूर ताई !
बऱ्याच वर्षांनी कथा लिहीली , ती तुझ्यामुळे. आता यापुढेही प्रयत्न करेनच ...

गामा पैलवान's picture

7 Nov 2016 - 12:49 am | गामा पैलवान

विकु,

कथा भारी आहे. चित्रपटासाठी पटकथा म्हणून अधिक योग्य ठरावी. अर्थात प्रत्यक्षात हेरगिरी अशी नाट्यमय क्वचित असते. अकसाई चीनमध्ये मनुष्यवस्तीवाली गावं आहेत हे वाचून नवल वाटलं.

आ.न.,
-गा.पै.

विशाल कुलकर्णी's picture

12 Nov 2016 - 11:38 pm | विशाल कुलकर्णी

अक्साई चीन मध्ये नाही, बॉर्डरवर आहेत. तो भाग निर्मनुष्य आहे म्हणून तर लॅबसाठी निवडला गेला ना? आणि हि गुप्तहेरकथा नाही, थ्रिलर आहे. शिर्‍या हा एक बिलंदर गुम्हेगारच आहे, हेर नव्हे.

धन्यवाद.

गामा पैलवान's picture

13 Nov 2016 - 1:22 pm | गामा पैलवान

विशाल कुलकर्णी,

गुप्तहेर हा बोलंदर गुन्हेगारासारखाच हालचाली करतो. मात्र गुन्हेगारी मनोवृत्तीचा नसतो. त्यामागची उद्दिष्टे वेगळी असतात. शिऱ्या किंवा चार्ल्स शोभराज नक्की कशांत मोडतात हे केवळ हालचालींवरून ठरवणे अवघड आहे. अगदी हल्लीचं उदाहरण द्यायचं झालं तर छोटा राजनचं देता येईल. हा माणूस अफलातून आणि उच्च दर्जाचा आस्थापीय व्यावसायिक (= कॉर्पोरेट इंडस्ट्रीयालिस्ट) आहे. त्याचप्रमाणे तो भारतीय गुप्तहेरखात्यास मदत देखील करतो आहे. तो अट्टल गुन्हेगारही आहे.

सांगायचा मुद्दा काये की शिऱ्या गुप्तहेरगिरीत प्रवीण असायलाच हवा.

आ.न.,
-गा.पै.

मित्रहो's picture

7 Nov 2016 - 2:38 pm | मित्रहो

मस्त कथा आहे राव मजा आली शिऱ्या जबरदस्त

स्वाती दिनेश's picture

8 Nov 2016 - 3:37 am | स्वाती दिनेश

शिर्‍या खूप दिवसांनी भेटला.
गोष्ट मस्तच.
स्वाती

पिलीयन रायडर's picture

8 Nov 2016 - 5:02 am | पिलीयन रायडर

जब्रा! आवडलीच!

पिलीयन रायडर's picture

8 Nov 2016 - 5:19 am | पिलीयन रायडर

फक्त ते १२ जवानांना खरंच मारलं?

विशाल कुलकर्णी's picture

12 Nov 2016 - 11:35 pm | विशाल कुलकर्णी

नाही, तो पख्तुनीला विश्वास बसावा म्हणुन करण्यात आलेला फार्स होता> लिओ हा शिर्‍याच असल्यामुळे त्या बारा भारतीय जवानांना मारण्याचा प्रश्नच येत नाही ना?

धन्यवाद !

पिलीयन रायडर's picture

14 Nov 2016 - 8:14 pm | पिलीयन रायडर

हो, मलाही असंच वाटलंच होतं. पण तरी विचारुनच घेतलं! टेन्शनच नको! :)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

15 Nov 2016 - 4:57 pm | घाशीराम कोतवाल १.२

शिर्या इज बॅक मस्त झालि आहे हि कथा भावा झक्कास

मद्रकन्या's picture

16 Nov 2016 - 1:41 pm | मद्रकन्या

__/\__ खुपचं आवडली. लिओ च कॅरॅक्टर छान उभं केलंत. एकदम बॉण्ड सिरीज वाचल्या सारखा अनुभव मिळाला.

शान्तिप्रिय's picture

17 Nov 2016 - 4:01 pm | शान्तिप्रिय

थरारक आणि मस्त कथानक!