काजू गुलकंद विडा

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in लेखमाला
29 Oct 2016 - 12:27 am

काजू-गुलकंद विडा

.

साहित्यः

१ वाटी काजूपूड
अर्धी वाटी साखर
पाच टे.स्पून पाणी
पाव वाटी काजू-बदाम काप
अर्धी वाटी गुलकंद
चांदीचा वर्ख
खाण्याचा हिरवा रंग

.

कृती :

एका नॉन-स्टिक पॅनमध्ये साखर, पाणी व खाण्याचा हिरवा रंग एकत्र करून साखर विरघळेपर्यंत उकळावे.
साखर विरघळली की त्यात काजूपूड घालून मध्यम आचेवर सतत ढवळत राहावे.
हळूहळू मिश्रण कडेने सुटू लागेल व गोळा होऊ लागेल.
एका ताटात मिश्रण काढून हाताला सोसवेल इतके थंड झाले की चांगले मळून घ्यावे.
गुलकंदामध्ये काजू-बदाम काप मिक्स करून घ्यावे.

.

मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन पुरीप्रमाणे लाटावा.
चार भागात तो कापून घ्यावा.
प्रत्येक चत्कोराचा कोन बनवून त्यात गुलकंद भरावा.
तयार विड्याला चांदीचा वर्ख लावून सजवावे.

.
काजू-गुलकंद विडा खाण्यासाठी तयार आहे.

.

दिवाळीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा!!

प्रतिक्रिया

रेवती's picture

29 Oct 2016 - 1:34 am | रेवती

आयडिया चांगली आहे. सर्व खाद्यप्रकारांनंतर विडा, तोही इतका टेस्टी देण्याची कल्पना आवडली.

सविता००१'s picture

29 Oct 2016 - 11:20 am | सविता००१

मस्त ग. असा विडा मी एका लग्नात रुखवतात पाहिला होता. तेव्हाच भन्नाट आवडला होता. आज कृती पण कळाली. मस्तच दिसतोय

क्या बात. कसला दिसतोय विडा..

कविता१९७८'s picture

29 Oct 2016 - 12:33 pm | कविता१९७८

अप्रतिम रेसीपी , तु मिठाईच दुकान सुरु कर आणी टेस्टींग साठी मला अपॉईंट कर बरं

नूतन सावंत's picture

29 Oct 2016 - 1:03 pm | नूतन सावंत

कसला सुरेख दिसतोय तो विडा._/\_

जबराट,खतरा,कातिल दंडवत तुला--^--

पद्मावति's picture

29 Oct 2016 - 9:47 pm | पद्मावति

वॉव....काय सुंदर!!!!!

मदनबाण's picture

30 Oct 2016 - 8:36 am | मदनबाण

ज ब र द स्त्त्त्त... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala

तुषार काळभोर's picture

30 Oct 2016 - 4:49 pm | तुषार काळभोर

आणि सोपी, सुटसुटीत पाककृती

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Oct 2016 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

आवडती पाकृ ! कराचीवालाकडे गेलो की नक्की आणतो. तिथल्या गुलकंदामध्ये कुटलेले खाण्याचे पानही असते.

स्रुजा's picture

30 Oct 2016 - 9:00 pm | स्रुजा

निव्वळ अप्रतिम !! ___/\__

केडी's picture

30 Oct 2016 - 9:27 pm | केडी

सुंदर दिसतोय विडा... एकदम भारी

अत्रुप्त आत्मा's picture

30 Oct 2016 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! अप्रतिम!

स्वाती दिनेश's picture

30 Oct 2016 - 11:41 pm | स्वाती दिनेश

मस्तच टेम्टिंग आहे हा विडा.
स्वाती

इशा१२३'s picture

31 Oct 2016 - 9:06 am | इशा१२३

काय दिसतोय विडा! अप्रतिम!

असाच उचलून तोंडात टाकावा वाटतोय!
अप्रतिम _/\_

वा! सुंदर दिसत आहे एकदम!

विशाखा राऊत's picture

1 Nov 2016 - 3:41 am | विशाखा राऊत

वाह

मराठमोळा's picture

1 Nov 2016 - 6:50 am | मराठमोळा

आवडले.. _/\_

अनन्न्या's picture

2 Nov 2016 - 1:04 pm | अनन्न्या

मस्त दिसतायत विडे

पूर्वाविवेक's picture

2 Nov 2016 - 3:56 pm | पूर्वाविवेक

सुरेख. तुझ्या रेसिपी म्हणजे दृष्टी सुख.

सस्नेह's picture

2 Nov 2016 - 4:00 pm | सस्नेह

मिठाईच्या दुकानात गेल्यासारखं वाटलं !

पैसा's picture

2 Nov 2016 - 5:10 pm | पैसा

लै भारी प्रकार!

मृत्युन्जय's picture

2 Nov 2016 - 7:54 pm | मृत्युन्जय

सारखे सारखे काय तेच तेच प्रतिसाद द्यायचे. त्यामुळे परत प्रतिसाद देत नाही.

अन्नू's picture

2 Nov 2016 - 10:38 pm | अन्नू

नेमक्या वेळी आल्याचं सार्थक झालं. ;)
आल्याआल्या स्वीट-स्वीट विडे बघून मन तृप्त झालं.
किती दिवसापासून वाट पाहत होतो सानिकाताईंची? आज मनोकामना पुर्ण झाली. ;) लगेच पेजच सेव्ह करुन ठेवतो. =)) =))
बाकी या बाबतीत आमच्या सानिकाताईंका जवाब नहीं! स्वतः अन्नपुर्णा आहेत त्या :)

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2016 - 11:08 pm | बोका-ए-आझम

या सानिकातै विड्यालाही सोडत नाहीत! क्या बात है! असा विडा खायचा तर फराळ कमी करावा लागेल!