साहित्य :
मैदा :दोन वाटी
चीज किसलेले :एक वाटी
जिरे जाडसर पुड :एक चमचा
मीठ : चविनुसार
तेल :दोन चमचे
खायचा सोडा : चिमुटभर
कृती : प्रथम मैदा व सोडा चाळून घेणे.त्यात किसलेले चीज,जिरे पुड,मीठ घालून एकत्र करावे.या मिश्रणात तेल गरम करुन घालावे.आता हे तेल मैद्यास चांगले चोळून घ्यावे.
या मिश्रणात बेताने पाणी घालत घट्ट मळून घ्यावे.अर्धा तास हा भिजलेला गोळा तसाच ठेऊन द्यावा.
एक गोळा पोळपाटावर लाटून त्याचे शंकरपाळे कातुन घ्यावेत.कडकडीत तेल तापवून त्यात अलगद कापलेले शंकरपाळे सोडून मंद आचेवर एकसारखे तळून घ्यावेत.तळलेले शंकरपाळे गार होउ द्यावेत.गार झाल्यावर छान कुरकुरीत होतात.
आता मस्त एखाद्या डिप मधे बुडवून नाहीतर चहा बरोबर शंकरपाळे खा.नुसतेही छान लागतात.
लहान मुलांनाही हे शंकरपाळे खुप आवडतात.
प्रतिक्रिया
25 Oct 2016 - 10:49 pm | पियुशा
यम्मी दिसताहेत !! जिओ :)
25 Oct 2016 - 11:04 pm | स्रुजा
वाह ! हवीच होती हुकुमी शंकरपाळ्यांची कृती. मैद्या ऐवजी कणिक चालते का? की मऊ पडतील शंकरपाळे?
26 Oct 2016 - 1:30 pm | इशा१२३
नाहि व्हायचे, थोडा बारीक रवा मिसळ आणि घट्ट भिजव.ऐनवेळी परत नीट मळ.
27 Oct 2016 - 1:45 am | स्रुजा
ओक्के. करुन बघते.
25 Oct 2016 - 11:12 pm | एस
आधीच दिवाळीचा फराळ खाऊन वजन नव्वदच्या स्पीडने पुढे पळतं. त्यात तुम्ही वर चीज घालता. कुठे फेडाल ही पापे! ;-)
26 Oct 2016 - 12:06 am | Sakhi
यम्मी!!!
26 Oct 2016 - 2:10 am | स्वाती दिनेश
छान दिसत आहेत ग चीज शंकरपाळे,
स्वाती
26 Oct 2016 - 2:33 am | रेवती
वाह! बरे झाले ही पाकृ समजली. नैतर रोज दुपारी काय खायला द्यायचे हा प्रश्न असतो. फोटू पाहून लगेच करायला घ्यावेत असे वाटतेय.
26 Oct 2016 - 6:15 am | त्रिवेणी
मिपा मालक आणि संपादक लोक कुठे गेले? इथे एक तिन चार आयडी बॅन करायचे हेत. लगेच केडी, इशा यांना बॅन करावे ही नम्र विनंती.
सध्या गणपा, सानिका थोडे शांत आहेत त्यांना राहू द्या.
26 Oct 2016 - 12:52 pm | अत्रन्गि पाउस
+1
26 Oct 2016 - 8:55 am | अजया
मस्त रेसिपी!
26 Oct 2016 - 9:08 am | आतिवास
दिवाळीत तुमच्या घरी एक चक्कर टाकायला हवी :-)
26 Oct 2016 - 9:08 am | यशोधरा
अरे वा! थोडी वेगळी पाकृ.
26 Oct 2016 - 10:29 am | कविता१९७८
वाह मस्तच
26 Oct 2016 - 10:53 am | पलाश
मस्त!! चिवडा आणि हे चीज शंंकरपाळे आवडले. आणखी दिवाळी पाककृृतींची वाट पहाते आहे.
26 Oct 2016 - 11:45 am | राजेंद्र देवी
व्वा...छान...चीज झाले....
26 Oct 2016 - 12:07 pm | सस्नेह
खमंग !
26 Oct 2016 - 12:46 pm | नाखु
अगदी चीज होत असेल असे वाटते. पा कृ आवडली
फराळी मदतनीस नाखु
26 Oct 2016 - 1:03 pm | पद्मावति
मस्तं!
26 Oct 2016 - 4:35 pm | पूर्वाविवेक
वा !क्या चीज है. :)
26 Oct 2016 - 5:31 pm | भुमी
सोपी पाककृती,फोटोपण मस्त आलेत.
26 Oct 2016 - 5:43 pm | मृत्युन्जय
छान दिसत आहेत.
26 Oct 2016 - 6:19 pm | पैसा
झकास!
26 Oct 2016 - 6:25 pm | पुंबा
तोंपासु..
27 Oct 2016 - 12:31 am | रुपी
वा.. मस्तच..
फराळ बनवून पाकृ टाकायलाही जमवत आहेस म्हणून खास कौतुक! :)
27 Oct 2016 - 1:51 am | वेल्लाभट
जबरा!
27 Oct 2016 - 4:17 am | मराठमोळा
मस्त.. रेडीमेड चीज बाईट्स वगैरे प्रकार घेण्यापेक्षा कधीही चांगले..
करायला सोपी पाकृ आवडली.
27 Oct 2016 - 10:35 am | अनन्न्या
दिवाळीत नाही पण नक्की करून बघणार, आणि तुला फोटो पण पाठवणार!
27 Oct 2016 - 11:14 am | विनअता पुजारि
मि केले चिज शन्कर्पाले .....सहि झालेत.....आवदले...
27 Oct 2016 - 2:34 pm | इशा१२३
करुन कळवल्याबद्दल धन्यवाद!
27 Oct 2016 - 2:35 pm | इशा१२३
करुन कळवल्याबद्दल धन्यवाद!
28 Oct 2016 - 11:14 am | स्मिता श्रीपाद
केल्या केल्या केल्या
काल केल्या....कणीक, बारीक रवा, चीज, चिली फ्लेक्स, ईटालिअन हर्ब घातले
झक्कास झाल्यात.
धन्यवाद ग ईशा.
28 Oct 2016 - 11:21 am | स्नेहल महेश
छान दिसत आहेत.
28 Oct 2016 - 11:22 am | इशा१२३
धन्यवाद सगळ्यांना!
हो ग,हर्ब्ज घालुन छान होतात,मी तशा लांब पट्ट्या कापून तळते, मस्त दिसतात.
28 Oct 2016 - 11:22 am | इशा१२३
धन्यवाद सगळ्यांना!
हो ग,हर्ब्ज घालुन छान होतात,मी तशा लांब पट्ट्या कापून तळते, मस्त दिसतात.
28 Oct 2016 - 12:22 pm | प्रयोगिका
पीझझा टॉपिंग आणि काळी मिरी घालून केले.. मस्त झाले आहे.
29 Oct 2016 - 8:35 pm | अत्रुप्त आत्मा
एक नंबर.!
30 Oct 2016 - 8:30 am | मदनबाण
दिल एकदम चीज चीज झाला... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masala
31 Oct 2016 - 5:10 am | रमेश आठवले
आपण मीठा ऐवजी साखर किंवा गुळ वापरून केलेल्या पाळ्यांना ही शन्करपाळे (हिंदीत शक्करपारे) म्हणतो . तरी यांना चीझ नमकपारे म्हणावे का ? चीझ शक्करपारे चांगले लागतील असे वाटत नाही.
31 Oct 2016 - 9:53 am | त्रिवेणी
मी डाॅमिनोजचे मिक्स हर्ब पॅक संपवले यात.
31 Oct 2016 - 12:35 pm | इशा१२३
मस्त दिसताहेत.धन्यवाद त्री _/\_
31 Oct 2016 - 2:02 pm | त्रिवेणी
गप तू.एकतर कामाला लावतेस.