साहित्य:
पातळ पोहे १/२ किलो
शेंगदाणे भाजलेल (हवे तेवढे)
पंढरपुरी डाळ :एक वाटी
खोबरे काप :आवडीनुसार (वाटीभर पुरे)
काजु पाकळ्या :आवडीनुसार
कढिपत्ता :एक वाटी
मिरचीचे तुकडे :चविनुसार
तिळ :चार चमचे
मीठ, पिठीसाखर
फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हिंग,हळद
कृती:
पातळ पोह्यांचा चिवडा तसा सोपा पण बरेचदा करताना पोहे आकसतात आणि चिवड्याच रुप बिघडत.यासाठी पातळ पोहे
शक्यतो चाळून,उन्हात ठेऊन कुरकुरीत करुन घ्यावे. आता घरात उन्हाचाच पत्ता नसेल तर सरळ कढईत मंद आचेवर थोडे
थोडे पोहे घेऊन परतत रहावेत.आच जराही मोठी करु नये.
आता पोहे एकसारखे चुरचुरित झाले कि एका पसरट भांड्यात काढावेत.कढईत तेल गरम करुन आता एक एक.
पदार्थ तळून घ्यावा.सुरवातीला तेल बेताच तापलेल असताना काजु तळून घ्यावेत.नंतर खोबरे, दाणे,डाळ,कढिपत्ता तळावे.हे तळलेले जिन्नस चुरचुरित केलेल्या पोह्यांवर घालावेत.
त्यावर मीठ व पिठीसाखर घालून एकत्र करुन घ्यावे.
आता कढइत तेल तापवून फोडणी करावी.मोहरी,जिरे,हिंग,मिरची तुकडे घालून फोडणी होत आली कि शेवटी तिळ, हळद घालावे म्हणजे करपत नाहि.चिवड्याचा रंग छान रहातो.
या फोडणीत पोहे घालून छान परतावेत.मला यात चुरमुरे घातलेले आवडतात.तर तेही कुरकुरीत करुन घातलेत.(चुरमुरे अतिरिक्त तेलहि शोषून घेतात.
खमंग चिवडा तयार!!
प्रतिक्रिया
24 Oct 2016 - 11:57 am | मृत्युन्जय
मला पातळ पोह्याच्या चिवड्यात चुरमुरे अजिबातच अवडत नाहित पण हा फोटो एकदम कातिल आला आहे,
26 Oct 2016 - 11:37 am | स्वाती दिनेश
म्हणते..
दिवाळी फराळ करणे जोरात सुरू दिसतेय.
स्वाती
24 Oct 2016 - 11:58 am | पियुशा
झक्कास, आणि मी पयली ;)
24 Oct 2016 - 12:14 pm | त्रिवेणी
नेहमीप्रमाणे मस्त दिसतय.
दिवाळीचा फराळ सुरु झाला म्हणजे.
24 Oct 2016 - 1:12 pm | सस्नेह
१०० पैकी १०० !!
24 Oct 2016 - 1:23 pm | औरंगजेब
मस्त
-चिवडाभक्त प्रणव
24 Oct 2016 - 1:26 pm | प्रभास
शेवटचा फोटू खासच...
एक युक्ती आहे... अशा तयार चिवड्यावर ओले खोबरे, कोथिंबीर, नारळाचे पाणी, खिसलेले आले घालून दडपून ठेवायचे... इन्स्टंट दडपे पोहे तयार
24 Oct 2016 - 1:34 pm | गिरिजा देशपांडे
मस्त!!!!!!!!!! तोंपासु :)
24 Oct 2016 - 1:50 pm | पद्मावति
मस्तं!
24 Oct 2016 - 1:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुठभर पटकन उचलून घ्यावे असे वाटले. भारी. और भी आने दो.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2016 - 2:19 pm | Maharani
Mastach g
24 Oct 2016 - 3:13 pm | कंजूस
हा सतत चालूच असतो आमच्याकडे. पावसाळ्यात मात्र "पहिलाच प्रयत्न आहे चिवडा करण्याचा" असे सांगावे लागते.फोटो भयानक चांगले आलेत.
24 Oct 2016 - 3:29 pm | पूर्वाविवेक
एकदम भारी !
24 Oct 2016 - 3:31 pm | रेवती
या चिवड्यासाठी कायपण! फोटू व पाकृ आवडलीच.
24 Oct 2016 - 7:36 pm | विवेकपटाईत
फोटो पाहताच खाण्याची इच्छा झाली. बाकी आमची सौ. पोह्यांना आधीच कढईत भाजून कुरकुरीत करून घेते. शिवाय फोडणीत तिखट हि घालते.
25 Oct 2016 - 7:00 pm | इशा१२३
धन्यवाद!
मी तेच सांगितलय, कढईत आधी पोहे कुरकुरीत करुन घ्यायचे.
24 Oct 2016 - 8:12 pm | मोदक
चिवडा हा अत्यंत आवडीचा प्रकार आहे...
थोडी बडीशेप भरडून घाला. चांगली लागते.
25 Oct 2016 - 11:36 pm | इशा१२३
हो छान लागते.त्यात अजुन चिवडा संपत आला कि खाली उरलेल्या मसाल्यातलि तर अजुनच छान लागते.
25 Oct 2016 - 12:53 am | पिलीयन रायडर
आईने फराळाचे कुरियर केलेल असल्याने बाबांच्या हातचा चिवडा मिळणार ह्या आनंदात ही पाकृ उघडणार होते. तेवढ्यात मांसाहेबांचा फोन आला की चिवडा, करंज्या आणि भाजणी घरातच विसरली आहे.. हॅप्पी दिवाळी!
जड अंतःकरणाने आपल्या पाकृचा लवकरच उपयोग करण्यात येईल...
25 Oct 2016 - 1:00 am | पिशी अबोली
लाळ गाळली. पण उद्याच घरी जातेय. आईला ऑर्डर देणार भरपूर कर, आणि पहिला हाच कर म्हणून. हा आईकडून करून घ्यायचा आनंद यासाठी कारण यात मला काहीही मदत करावी लागत नाही.(कारण मदत करण्यासारखं काही नसतंच) :D
मला या चिवड्याच्या बाजूला दही घेऊन खायला भयंकर आवडतं. आणि चकलीवर घरचं लोणी..
25 Oct 2016 - 1:24 am | रुपी
वा! मस्तच दिसत आहे चिवडा!
25 Oct 2016 - 2:25 am | विशाखा राऊत
वाह खमंग दिसतोय चिवडा. :)
25 Oct 2016 - 10:47 am | पिंगू
कसला खमंग दिसतोय चिवडा. मुठीत उचलून तोंडात टाकावासा वाटतोय..
25 Oct 2016 - 5:50 pm | यशोधरा
खमंग दिसतोय चिवडा!
26 Oct 2016 - 2:02 pm | दक्षिणा
पातळ पोह्यांचा चिवडा म्हणजे जीव की प्राण. माझी बहिण सुंदर करते. तुम्ही पण मस्त केलाय. डिश एकदम कातील दिसतेय.
27 Oct 2016 - 10:36 am | अनन्न्या
एकदम चविष्ट झालाय.