मिपा दशकपूर्ती - उपक्रम सुचवा

आदूबाळ's picture
आदूबाळ in लेखमाला
29 Oct 2016 - 12:02 am

मिपाला यंदा दहा वर्षं पूर्ण होतील. दहा वर्षांत पुलाखालून किती पाणी (आणि कमानीखालून किती टेम्पो) गेले हे आपण सगळेच जाणतो. मिपाच्या या दशकपूर्ती वर्षात काही विशेष उपक्रम राबवून हे वर्ष संस्मरणीय व्हावं अशी इच्छा आहे. हे उपक्रम नेमके काय असावेत, त्याचं स्वरूप, व्याप्ती काय असावी, यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा संपादकीय विभागातच काढत आहोत. आपणांस विनंती करतो की आपल्या मनात असलेल्या कल्पना या धाग्यावर विस्ताराने लिहाव्यात. यातूनच भविष्यातल्या मिपाची पायाभरणी होईल.

वेगवेगळ्या उपक्रमांबाबत आपल्या कल्पना मांडण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी ही जागा.

आणखी विस्ताराने लिहीत नाही.

आपले,
सासं

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 8:18 am | यशोधरा

इच्चार करण्यात यील!

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Oct 2016 - 12:52 pm | माम्लेदारचा पन्खा

जरा विचार करुन सांगतो....

दहा वर्षे झाल्यावर त्यातही थोडासा बदल व्हायला हवाय.संरचना म्हणजे format या अर्थाने.

नक्की सांगणार आहे.

सोसंल तेव्ह्ढ काम करनारा सोसल वर्कर नाखु

गेल्या दहा वर्षांत अनेक आयडी आले आणि त्यातले काही सध्या सक्रिय नसलतीलही.
मिपाच्या निवडक ३६५ आयडींच्या एका लेखाचं पुनर्प्रकाशन - रोज एका आयडीचं आणि प्रत्येक आयडीचा फक्त एकच लेख - असं काही करता आल्यास मजा येईल. वृत्तपत्रात कसं पन्नास वर्षांपूर्वी आजच्या दिवशी असं काहीतरी असतं त्या धर्तीवर.

विजुभाऊ's picture

1 Nov 2016 - 4:49 pm | विजुभाऊ

उत्तम सूचना. सहमत. त्यामुळेचमागे पडलेले अनेक चांगले लेख पुन्हा वाचायला मिळतील

फार उत्तम सुचना. याबरोबरच मिपावरील सर्व विक्रमांवरदेखील एक धागा काढावा. म्हणजे सर्वाधीक वाचने, प्रतिक्रीया, सर्वात मोठा धागा वगैरे.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2016 - 11:18 am | चौथा कोनाडा

एकदम सही आयडिया आहे.

हा मिपासिध्दहस्त अंक पीडीएफ स्वरूपात देखील प्रकाशित करावा.
म्हंजे नॉन मिपाकराना पण सर्क्युलेट करता येइल्.

हा अंक मिपाच्या इतिहासातला एक महत्वाचा टप्प्याचे डॉक्युमेंटशन होइल.

हिस्ट्री ऑल्वेज ट्रस्टस डॉक्युमेंटेशन.

चौथा कोनाडा's picture

2 Nov 2016 - 11:19 am | चौथा कोनाडा

* सही

आतिवास's picture

3 Nov 2016 - 3:37 pm | आतिवास

एकदम शी आयडिया आहे.
शी आयडिया - हा काहीतरी नवा शब्दप्रयोग असेल असं म्हणून गुगल करणार होते तेवढ्यात हा प्रतिसाद वाचला. :-)

चौथा कोनाडा's picture

3 Nov 2016 - 10:26 pm | चौथा कोनाडा

प्रतिसाद प्रकाशित झाल्यानंतर शी च लक्षात आले
इतकं ऑकवर्ड झालं
ताबडतोब दुरुस्ती प्रतिसाद टाकला.

मोबाईलवरुन केलं की असले ज्याम प्रॉब्लेम होतात

कल्पना खूपच आवडली. यामुळे माझ्यासारख्या नवीन वाचकांची जुन्यानव्या उत्तम लेखनाशी आणि त्याच्या लेखकांशी ओळख होईल. 'मिसळपाव क्लासिक्स' असं संकलनही करता येईल.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Oct 2016 - 10:24 am | मिसळलेला काव्यप्रेमी

एखादा काव्यवाचनाचा कार्यक्रम होऊन जाऊ दे की...
काय म्हणता?

राघव कारेमोरे's picture

1 Nov 2016 - 1:38 pm | राघव कारेमोरे

mipa varche sarvat uttam kevhachi link १ka dhagyavar deu shakta

राघव कारेमोरे's picture

1 Nov 2016 - 1:39 pm | राघव कारेमोरे

Manje lekhanchi link☺

पण एखादं स्नेहसंमेलन आणि मागे डांगे सरानी सूचना केली तशी मिपा टी शर्ट्स चं मनावर घ्या कोणीतरी. प्रायोजक हि मिळतील आणि मिपाकर विकतही घेतील

जी रक्कम जमा होईल त्यातून एखाया चांगल्या संस्थेला देऊ शकतो.
मायबोलीवर अनेक वर्षे हा उपक्रम सुरु आहे. असाच काही चांगला उपक्रम आपण सुरु करु शकतो.

जी रक्कम जमा होईल त्यातून एखाया चांगल्या संस्थेला देऊ शकतो.

मायबोली संपूर्ण कमर्शियल साईट आहे. फेसबुक ज्याप्रमाणे त्यांचा युजरबेस दुकान चालवायला वापरते, त्या लॉजिकनुसार माबो पैसे कमवते.

मिसळपावलाही सर्वर चालवणे व मेण्टेन करणे यासाठी खर्च आहेच की. ते पैसे मिसळपावच्या अकाउंटला जमा करा, असे सुचवतो.

मायबोली संपूर्ण कमर्शियल साईट आहे.

बरं, मग? त्याचा आणि मायबोलीकर जे समाजोपयोगी उपक्रम राबवतात, त्याची तुलना अस्थानी वाटते. साईट कमर्शिअल होण्याआहीही हे उपक्रम सुरुच होते.

असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2016 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मिसळपावलाही सर्वर चालवणे व मेण्टेन करणे यासाठी खर्च आहेच की. ते पैसे मिसळपावच्या अकाउंटला जमा करा, असे सुचवतो.

मिपामालक नीलकांत यांना विचारलं पाहिजे. बहुतेक ते असा खर्च उचलण्यासंबंधी फारसे अनुकुल नसतात. असे आठवते.

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ's picture

12 Nov 2016 - 7:24 pm | आनंदी गोपाळ

५०० च्या नोटांत देणगी स्वीकारण्याची काही स्कीम काढा. भरपूर चालेल.

संस्थळाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार जितके कमी तितकं चांगलं असं मत आहे.

ते परस्परांवरील विश्वासावार आणि पारदर्शक व्यवहारावर अवलंबून असतं. मायबोलीवर अनेक वर्षं असा उपक्रम यशस्वीरीत्या सुरु आहे अणि चांगल्या संस्थांना काही ना काही मदत करण्यात मी स्वतः अणि अनेक माबोकरांनी अतिशय आनंदाने वाटा उचललेला आहे.

संदीप डांगे's picture

3 Nov 2016 - 4:00 pm | संदीप डांगे

कल्पना चांगली आहे, माझ्या मुलाच्या शाळेसाठी मला फंडरेझिंग करायचे आहेच, काही करता येईल अशा प्रकारे.

अतिवास ताईंची सूचना आवडली.
मलाही संरचनेबद्दल एक-दोन मुद्दे सुचवायचे आहेत.

एक महागेटटुगेदर करूया. निवडक सिद्धहस्त लेखकिंना पुरस्कार देता येतील.

ऋषिकेश's picture

3 Nov 2016 - 3:30 pm | ऋषिकेश

मिसळपाव.कॉम या साईटला १० वर्षे पुर्ण होणे ही या साईट इतकीच मराठी आंतरजालासाठी मोठी गोष्ठ आहे. आपल्या सगळ्यांचेच अभिनंदन

लेखन ही फक्त लेखक, संपादक आणि समीक्षकांची सत्ता असण्याच्या काळात मिसळपावसारख्या संस्थळांनी मराठीतनं व्यक्त व्हायला भक्कम व्यासपीठ दिलं. त्या सगळ्या संस्थळांच्या मांदियाळीत मिपाचं स्थान अचल आणि महत्त्वाचं आहे. मराठी माणूस जिथे जिथे आहे तिथे तिथे मिपा आहे. भरपूर उत्साह आणि समीक्षकी चष्म्याला झुगारल्याने आजवर कधीही न लिहिलेल्याला इथे लिहावेसे वाटते - ते ही मराठीतून हे महत्त्वाचे आहे.

या संस्थळाचा प्रवास खूप मोठा आहे आणि सुदैवाने त्यातील ८-९ वर्षे मी हा प्रवास बघत आहे. अनेक अशा बाबी आहेत ज्याचे प्रतिबिंब या सोहळ्यात पडणे गरजेचे आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब पडेल असा एकच एक मोठा उत्सव होणे शक्य नाही असे माझे मत आहे. जशी मिपाकरांमध्ये विविधता आहे तसेच भौगोलिक अंतरेही खुप आहेत.

मिपाच्या 'दशकपूर्ती'साठी एक कल्पना सुचवतो. एकच एक कार्यक्रम करण्यापेक्षा वेगेवेगळ्या शहरांत एकाच महिन्यात/आठवड्यात अनेक कार्यक्रम करता येतील. थोडक्यात एकच मोठा धमाका करण्याइवजी खणखणीत कार्यक्रमांची लडी लावता येईल नि तेही वेगवेगळ्या शहरांत. हे कार्यक्रम जाहिर असावेत - खुप प्रचार व्हावा. शक्यतो कमी कालखंडात अनेक जागी असावेत ज्यामुळे यांचे सलगपण अधोरेखीत होऊन कित्येक नव्या लोकांपर्यंत मिपा पोहोचु शकेल. मिपाबद्दलची माहिती त्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांत पोचेल.

केवळ मुंबई, पुणे म्हणजे मिपा नव्हे!

उदा. बेंगलोरकर आणि इतर इच्छुक स्वातीताईनी वर्णन केलंय त्या अंधार्‍या हॉटेलात गेटटूगेदर करू शकतात
दुसर्‍या एखाद्या शहरात एखाद्या संस्थेला ऐच्छिक वर्गणीतून देणगी देण्यासा फंडरेझिंग कार्यक्रम होऊ शकतो (गाणी, कविता वगैरेंचा)
तर तिसर्‍या एखाद्या शहरात मिपाकर (मिपाच्या टिशर्टसह) सायकलिंग करू शकतात. पुण्यासारख्या मोठ्यपुव बरेच मिपाकर असणार्‍या शहरात एखादी छोटी शोभायात्रा काढली जाउ शकते.

अर्थात खर्च सगळे मिळूनच करायचा. आयोजन वेगवेगळ्या शराहरातीया मिपाकर करतील. पण सगळ्यांना एकजिनसीपणा यावा यासाठीचे नियम एखादी कोअर टिम करेल.

===

अर्थात ही निव्वळ एक सुचवणी! मनःपूर्वक शुभेच्छा!

प्रभाकर पेठकर's picture

3 Nov 2016 - 8:46 pm | प्रभाकर पेठकर

चुकुन संपादकिय मध्येच सुचविले. इथे पुन्हा टंकतो....
लवकरच २०१६ संपून २०१७ सुरु होईल. २०१६च्या संध्येला २०१७ चे नविन मनसुबे, नवे संकल्प, सामाजिक उपक्रमाच्या शपथा वगैरे वगैरे विनोदी, गंभीर, वास्तवदर्शी लेखन केंद्रस्थानी योजून एक 'नववर्ष विशेषांक' काढावा असे मी सुचवितो.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 5:24 pm | शिव कन्या

सहमत

ज्योति अळवणी's picture

5 Nov 2016 - 1:55 am | ज्योति अळवणी

मिपाच्या 'दशकपूर्ती'साठी एक कल्पना सुचवतो. एकच एक कार्यक्रम करण्यापेक्षा वेगेवेगळ्या शहरांत एकाच महिन्यात/आठवड्यात अनेक कार्यक्रम करता येतील. थोडक्यात एकच मोठा धमाका करण्याइवजी खणखणीत कार्यक्रमांची लडी लावता येईल नि तेही वेगवेगळ्या शहरांत. हे कार्यक्रम जाहिर असावेत - खुप प्रचार व्हावा. शक्यतो कमी कालखंडात अनेक जागी असावेत ज्यामुळे यांचे सलगपण अधोरेखीत होऊन कित्येक नव्या लोकांपर्यंत मिपा पोहोचु शकेल. मिपाबद्दलची माहिती त्या निमित्ताने वेगवेगळ्या शहरांत पोचेल.

खरच छान आहे ही कल्पना. यामुळे अनेक नवीन जोडले जातील आणि ज्यांना अशा आंतजालाची माहिती नसते त्यांना माहिती होईल. या सुचनेशी एकदम सहमत

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2016 - 12:38 pm | स्वाती दिनेश

ज्या 'क्रमश:' वाल्या लेखमालिका आहेत त्या व गणेश लेखमाला ह्यासाठी एक 'लेखमाला' असा वेगळा टॅब असावा वर साहित्य, काथ्याकूट, काव्य, पाककृती.. इ. सारखा.
तसेच दिवाळीअंक व अनाहिताचे अंक ही आत्ता जसे उजवीकडे दिसत आहेत ते तसेच कायमस्वरूपी दिसावेत. म्हणजे हवे तेव्हा वाचता येतील. किवा मग 'विशेषांक' असा अजून एक टॅब वर असावा. म्हणजे फक्त त्याच वर्षीचा दिवाळी अंक/ अनाहिता अंक न दिसता तेथे सगळे मागचेही अंक एकत्रित मिळतील.
स्वाती

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2016 - 2:53 pm | चौथा कोनाडा

अगदी योग्य सुचवणी. अनुमोदन.
जुने विशेषांक / दिवाळी अंक शोधताना त्रास होतो.

वेगळा टॅब दिल्यास संमं पासुन मिपाकर लेखक, वाचकांना खुपच सोयिस्कर होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Nov 2016 - 6:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा मालक नीलकांत आणि मिपा तंत्रज्ञ यांनी हे लवकर केलं पाहिजे.

-दिलीप बिरुटे

आंतरजालावर आता यूआरएल युनिकोड कॅरॅक्टर्स मध्येही देता येते असे वाचले आहे. मग मिपाचे डोमेननेम www.misalpav.com याबरोबरच www.मिसळपाव.com असेही ठेवता येईल का? दुसऱ्या वेबसाइटवरून पहिल्या वेबसाईटला रिडायरेक्ट करता येईल. मराठीत अन्य कुठली वेबसाईट अशा प्रकारे देवनागरी डोमेननेम वापरत असल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2016 - 8:23 pm | जयंत कुलकर्णी

हे शक्य आहे का माहीत नाही.
http://www.aathavanitli-gani.com/ ही साईट सगळ्यांना माहीतच असेल. त्यांच्या साईटवर आपण रोज एक गाणे ऐकू शकतो. म्हणजे त्यांच्या प्लेअरवर ते असते. इतरही ऐकू शकतोच. ते कसे दिसते हे आपण साईटवर जाऊन पहावे. तसेच आपण त्यांच्या सहकार्याने मिपावर देऊ शकलो तर फार उत्तम होईल. म्हणजे मिपाकरांना रोज एक मराठी गाणे ऐकता येईल. मी त्यांना एक मेस्सगेही टाकला होता पण नंतर फॉलोअप करण्याचे मला जमले नाही. पण कोणीतरे हे केले तर एक चांगले काम होईल असे मला वाटते...

जयंत कुलकर्णी's picture

6 Nov 2016 - 8:25 pm | जयंत कुलकर्णी

मेसेजही *

ऑनलाईनऑफलाईन असे दोन उपक्रम राबवावे

वैभव पवार's picture

7 Nov 2016 - 5:31 pm | वैभव पवार

लेखकांना स्टार्स द्यावेत !
Id verify karavyat.
Fb, Twitter pramane
स्नेहसंमेलन
आवाॅर्डस.
आणि T-shirts ect

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 5:28 pm | शिव कन्या

दहा मध्यवर्ती मानून छायाचित्रण अंक निघू शकतो.छायाचित्राचा अंक माझ्या माहितीप्रमाणे मिपाने अजून नाही काढलेला.
दशक पूर्ती निमित्त हे करता येईल.

शिव कन्या's picture

12 Nov 2016 - 5:44 pm | शिव कन्या

एकाच विषयावर दहा लेखक कवींनी वेगवेगळ्या प्रकारचे लेखन करावे.
यासाठी साहित्य मंडळास इच्छुक कवी लेखकांचे दहाचे गट करता येतील. विषय ठरवता येतील.
किमान दोन जरी गट झाले तरी वीसेक लोक लिहिते होतील.
दोनच विषयावर वीस वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचता येईल.
यात लिहिणार्यांची मोट बांधणे हे जरा जिकीरीचे आहे, पण आपले मिपाकर कुठलाही चांगला उपक्रम उचलून धरतात. तसा हाही नेटाने पुढे नेतील.
वेगळा प्रयोग होईल. विचार व्हावा.
दहाचे आणखी गट झाले तर आणखी लेखन वाचन होईल.
विशेषांक निघेल.

एखादी "पुस्तक परीक्षण लेखमाला" संपूर्ण सप्ताह किंवा महिना भर आयोजित करावी, आपल्याला आवडलेल्या पुस्तकांची ओळख करून द्यायला अनेक लोक पुढे येतील

छायाचित्रण स्पर्धेचे सर्व विजेते फोटो एका धाग्यात करून व त्या त्या मूळ धाग्याची तेथेच लिंक देऊन एक धागा काढा व सध्याच्या दिवाळी अंकासोबत त्याचीही लिंक देता येईल का?

अरिंजय's picture

13 Nov 2016 - 11:44 am | अरिंजय

दशकपूर्ती निमित्त मिपाकर सायकलस्वारांचा एखादा उपक्रम राबवता येईल काय? कारण मिपाने अनेक सायकलप्रेमींना एकत्र आणले आहे.

हो, एक उपक्रम आहे डोक्यात पण अजून प्रशांत सोबत चर्चेत आहे. त्याला ऑफिशियल स्टेटस यायला आणि तसे मिपा चालक मालकांचे कन्फरमेशन यायला वेळ लागेल.

तूर्तास इतकेच सांगतो की भरपूर सायकल चालावा आणि धाग्यावर + स्ट्रावा ग्रुपवर अपडेट करा. :)