बंगळी

Primary tabs

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in लेखमाला
29 Oct 2016 - 9:06 pm

सपरीवर झुलत रायते एकटी बंगळी बही
झुल्वत जात होते तिले हात थे थांबले कई?

माह्या बी घराले कुलूप लागला गाव सामसूम
चिमन्या बी मयालीत आता बसून रायल्या नही

जीवच काडते गा असे सोंग झाले सनाइचे
डीजे वाजते, कापते भीत थरथर तई तई

दोस्तीची जुनी येल सुकते असी लागते नजर
का होते? जडीसीन कोनी कसा टाकते मही?

मारा एक चक्कर घराची तुमी फुरसतीत जी
गझलेतून पूरी कथा येल का आमची कई?

- संकेत

---------------------------
.
1
.

शब्दार्थ:
सपरी:- ओसरी
बंगळी:- लाकडी झोपाळा
बही:- वेडी
मयाल:- तुळई, बीम
सनाईचे:- सणांचे
येल:- वेल
जडीसीन:- मुळाशी
मही:- ताक
भीत :- भिंत

(छायाचित्र: पिलीयन रायडर)

प्रतिक्रिया

ए ए वाघमारे's picture

29 Oct 2016 - 10:32 am | ए ए वाघमारे

सुंदर!

शब्दार्थ आवश्यकच होते.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Nov 2016 - 10:53 pm | अत्रुप्त आत्मा

+१

मित्रहो's picture

29 Oct 2016 - 11:40 am | मित्रहो

बंगळी हा शब्दच बऱ्याच दिवसांनंतर ऐकला. ती छपरीतली नाहीतरअंगणातली बंगळी, त्याचा तो आवाज सार आठवल.
खर आहे बंगळीला झोके देनारे हात आता तिथे नाहीत.मुळात बंगळी सुद्धा आहे की नाही शंका आहे.

यशोधरा's picture

29 Oct 2016 - 11:57 am | यशोधरा

आवडली!

कविता आवडली. आधी समजली नव्हती पण शब्दांचे अर्थ वाचल्यावर आवडली.

पैसा's picture

31 Oct 2016 - 4:44 pm | पैसा

रिकाम्या पडलेल्या घरांच्या हाका खरंच ते घर सोडून गेलेल्यांपर्यंत पोचतील का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2016 - 4:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडलीय कविता.

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

2 Nov 2016 - 9:21 am | संदीप डांगे

मस्त हो स्वामी,

आपल्याकडे बंगई म्हणते, ते बंगळी हाये आज मालूम पळलं

स्वामी संकेतानंद's picture

12 Nov 2016 - 7:47 am | स्वामी संकेतानंद

एकच. वर्‍हाडीत ळ चा य होतो, ळी चे यी होईलच

नूतन सावंत's picture

4 Nov 2016 - 10:49 pm | नूतन सावंत

स्वामी,खूपच छान कविता न त्याला साजेसे पिराचे (तिने काढलेले व संकलित केलेले)प्रकाशचित्र

जयन्त बा शिम्पि's picture

5 Nov 2016 - 6:41 am | जयन्त बा शिम्पि

माझ्या मामांकडे, ज्या ज्या वेळी, सुट्ट्यांमध्ये जात होतो,त्यावेळी मामाकडे असलेल्या बंगळीवर मोठे मोठे झोके घेणे व पाठ केलेल्या कविता म्हणणे हा आम्हा सर्वांचा आवडता खेळ. चौथ्या यत्तेपासून हे सुरु होते. त्यामुळे मोठे झाल्यावर आपण आपल्या घरी अशीच बंगळी बसवायची हे मनाने कधीच पक्के करून ठेवले होते. अर्थात नोकरी लागून स्वतःचे उत्पन मिळेपर्यंत वाट पहावी लागली.कारण तत्पूर्वी घर ही लहान व आर्थिक स्थितीसुद्धा बेतास बात अशीच असल्याने शक्य झाले नव्हते. आज घरी बंगळी आहे. नात-नातू यांना घेऊन बसतो. एकच अडचण आहे की बंगळीवर बसून झोका पायाने घ्यावा लागतो, त्या ऐवजी अशी डिझाईन हवी कि बंगळी छोट्या इलेक्ट्रिक मोटारीवर, मागे पुढे आपोआप जात राहावी. कुणी असा प्रयत्न करून पाहिला असल्यास जरूर येथे लिहावे अगर मौलिक सूचना करावी. लेखामुळे या आठवणी जाग्या झाल्यात.