सहज सुचलं म्हणून सुचून जाते एखादी ओळ...
अपेक्षित असते साधीच ठिणगी, उठतो युगांचा लोळ...
मग भांबावून जातो आपणच अन् होतं कसंनुसं...
प्रश्न पडतो आपल्यालाच.. हे असलं सुचलं कसं??
पण एकदा सुचल्यावर हात नाही झटकता येत..
मुळात कविता आपला हात सहजासहजी नाही कोणाच्या हातात देत..
मग ह्या असल्या सुचण्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते..
आणि ही बया त्यावर फार विचित्र गोष्टींचं दानही मागते..
कधी चंद्र, कधी रात्र... आणि अश्रू तर ठरलेलेच..
साधं सरळ काहीच नाही... सार्यांच्या पोटी मुलखाचे पेच..
ध्यानीमनी काहीही नसताना होऊन बसतो आयुष्यभराचा घोळ...!
जेव्हा अगदीच सहज सुचलं म्हणून सुचून जाते एखादी ओळ...
- वटवट (चेतन दीक्षित)
प्रतिक्रिया
29 Oct 2016 - 11:56 am | यशोधरा
मस्त!
30 Oct 2016 - 7:58 am | रेवती
मस्त झालिये कविता.
31 Oct 2016 - 4:42 pm | पैसा
खूप आवडली
4 Nov 2016 - 10:43 pm | नूतन सावंत
सुरेख जमलीये कविता.
4 Nov 2016 - 10:48 pm | पद्मावति
खरोखर सुरेख.
4 Nov 2016 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा
झ्याक!
7 Nov 2016 - 6:00 pm | अनुप ढेरे
मस्तं!
25 Nov 2016 - 2:15 pm | नाखु
आवडली.
25 Nov 2016 - 3:13 pm | बरखा
"मुळात कविता आपला हात सहजासहजी नाही कोणाच्या हातात देत.."
मस्तच लिहलय.
25 Nov 2016 - 3:27 pm | पाटीलभाऊ
चांगलं सुचलंय
25 Nov 2016 - 11:24 pm | सतिश गावडे
काय राव, यमकामागून यमके जुळवली आहेत आणि म्हणत आहात सहज सुचलं म्हणून ;)
21 May 2017 - 5:05 am | सत्यजित...
>>>सहज सुचलं म्हणून सुचून जाते एखादी ओळ...
अपेक्षित असते साधीच ठिणगी, उठतो युगांचा लोळ.>>>क्या बात है!
>>>मुळात कविता आपला हात सहजासहजी नाही कोणाच्या हातात देत..>>>कमालीच्या ताकदीची ओळ!
खूप आवडली कविता!मनःपूर्वक अभिनंदन!
21 May 2017 - 7:58 am | एस
कविता छान आहे. कसं काय सुचलं? ;-) मस्त. आवडली.