एक मरा'ठी', लाख मरा'ठी'

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
18 Oct 2016 - 12:42 pm
गाभा: 

मोर्चाला उदंड प्रतिसाद! खरंच गंमत वाटते या सगळ्या लोकांची. केवढा जमाव, केवढी बांधाबांध, घोषणा, सोशल मिडियावर संदेश... सॉलिड सगळं. पण नक्की कशासाठी आहे हे? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला केला तर कदाचित उत्तर चटकन मिळणार नाही. कारण तसा विचारच केलेला नसेल. आणि तेच हवं असतं मोर्च्याच्या मागे असणार्‍या मंडळींना. पण आश्चर्य वाटतं की कुणाचाच विचार व्यापक कसा होत नाही? पदोपदी आपल्याला मॅनिप्युलेट केलं जातंय तरी कळूच नये ही गोष्ट? म्हणजे मोजके लोक हजारो लोकांना एका अशा गोष्टीसाठी एकत्र आणू शकतायत, जी गोष्ट मिळेल, न मिळेल, तिचा आपल्याला नेमका काय फायदा होईल याची काडीमात्र कल्पना त्या लोकांना नाही. यायचं फक्त एकत्र! तेही सहपरिवार, कामधंदे सोडून. अरे विचार करा ना थोडा... टीव्हीवर बघितलं मी, एक लहानगं मूल बाबांच्या कडेवर बसून माईक समोर धरताच म्हणालं 'एक मराठा, लाख मराठा'. बाबा पण लगेच 'शाब्बास!' म्हणाले त्याला. कीव करावीशी वाटली. काय करतोय आपण? त्या मुलाला काहीच कळत नाही तो पाठ केलेलं म्हणाला. पण त्याच्या बाबांनी नीट विचार केला का, की आपण हे सगळं कशाला करायचंय? त्यात आपलं नक्की उद्दिष्ट काय आहे? आरक्षण! बरं आरक्षण म्हणजे काय? त्याने आपण नेमकं काय साधू? ते आपल्या विकासाला कारण होईल का राजकरण्यांच्या? एकदम कुणीतरी उठावं, आणि 'मी तुला न्याय मिळवून देईन' म्हणत आपल्या खांद्यावर हात टाकावा.. यातलं काळंबेरं कसं काय दिसत नाही तिथे जमलेल्या एकालाही? अरे केवढं काय काय त्या मोर्चासाठी; टीशर्ट, झेंडे, बॅनर, जाहिराती... कोण पैसे देतंय याला? का? वास्तविक या जगात कुणालाच कुणाबद्दल इतका पुळका नसतो हे सूज्ञ जाणतीलच. सो इट इज क्लियर की यामागचा हेतू दुसराच आहे आणि जमलेली माणसं ही केवळ निमित्त ठरतायत.

आणि मग दुसरीकडे अजून कुठल्या एका समाजाचा क्रांती मोर्चा निघाला. आणखी एका समाजानेही व्हॉट्सॅपवर संदेश फिरवला, 'आम्ही पण मोर्चा काढणार, स्वयंशिस्तीची ताकद वगैरे दाखवणार'. आनंद आहे. डिव्हाईड अँड रूल इंग्रजांनाही जेवढं जमलं नाही तेवढं आपल्याच लोकांना जमलंय. तिथे अमेरिकन व्हिजाच्या कार्यालयात कुठल्या भाषेत घोषणा होतात, कॅनडात तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कुठली आहे गूगल करून बघा. इथे आपण आपल्या आपल्यातच शक्तीप्रदर्शनं करून कुठे जातोय, वर की खाली ते वेळीच समजा. इथे महाराष्ट्रात मराठी माणसालाच आरक्षण द्यायची वेळ आलीय ऑलरेडी! त्यामुळे मराठा किंवा अजून कुणाला आरक्षण मिळो न मिळो काहीही फरक पडणार नाहीये हे लक्षात घ्यायला हवं. तो फरक पडूच द्यायचा नाहीये खरं तर धूर्त राजकारण्यांना. त्यामुळे हे मोर्चे कशाच्या पार्श्वभूमीवर प्रेरित केले जातायत, वगैरे सगळं नीट विचार केला तर स्पष्ट दिसेल. पण नेमका तोच आपण करत नाही आणि हरत जातो. इतर भाषिक (जातींमधे न अडकता) किती व्यवस्थितपणे आपापल्या लोकांचं हित जपतात ते शिकण्यासारखं आहे. आपल्या माणसाला थोडं नुकसान करूनही धंदा मिळवून देतील, मग भले बाकी वेळी फसवेगिरी करतील पण आपल्या वर्तुळाबाहेर काम जाऊ देणार नाहीत.

शक्तीचं नुसतं प्रदर्शन करून काय मिळवतोय आपण? उपयोग कधी करणार? आणि उपयोग म्हणजे डोकी बाजूला ठेवून जाळपोळ करणं नव्हे, तर वर्तणुकीत, धोरणांत प्रगल्भता आणणं, जाती-उपजातीच्या जरा पुढचा विचार करणं. लाकडाच्या मोळीची गोष्ट; एकीचं बळ आपण शिकलोत, माकड आणि मांजराची खव्याची गोष्ट आपण शिकलोत, शिकलोत ना? मग त्यात सगळं स्पष्ट सांगितलंय, पण विसर पडलाय आपल्याला. आपण विचारच करत नाही. आणि याचा पुरावा मोर्चातल्या तरूण, सुशिक्षित लोकांना बघून मिळालाच. वाईट वाटलं. आणि हे असंच होत राहणार असं विदारक चित्रही दिसलं. वी आर बीईंग फूल्ड, मॅनिप्युलेटेड इन द नेम ऑफ अ‍ॅन इल्यूजनरी इंटरेस्ट. खरं तर आज एक मरा'ठी' लाख मरा'ठी' म्हणण्याची गरज आहे; पण तसा मोर्चा कधी निघेल का ते ठाऊक नाही. कदाचित नाहीच.

प्रतिक्रिया

नाखु's picture

18 Oct 2016 - 1:03 pm | नाखु

काहीतरीच काय?

मोर्चे कुणाविरूद्धही नाहीत.
आरक्षणाने प्रश्न चुटकी सरशी सुटणार आहेत (तेव्ह्ढ्या सरकारी नोकर्या वाढवायला लागतील ते पाहू)
मोर्चात आम्ही सावित्रीच्या लेकी आम्च्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका (तुम्च्या लेकींकडे कसे पहाय्चे ते आम्ही पाहून घेऊ आनि त्या कुणाच्या लेकी आहेत याची आम्हाला काहीच चाड असण्याचे कारण नाही)
हे सगळे प्रश्न फक्त सत्तबदलानंतर आलेत (आधी सगळे आलबेल होते)
फडणविसांनी प्र्श्न सोडवले नाहीत.
लोक्सत्तातील ती बातमी ई आवृत्तीतून का गायब केली आजतगायत हेडींगच पुरेसे बोलके आहे आणि या मोर्च्याचे बी कुठे होते हे पुरेसे करणारे आहे.

पुरोगामी महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री परवडणार नाही..इती जाणता राजा (साधारण मुम निवड झाल्याबरोबर एक दोन दिवासात आलेली प्रतिक्रिया आहे ही)
सहा लाखाच्या ईबीसीने बराच फरक पडत असूनही सगळे बोलके पोपट (राणेंपासून खेडेकरांपर्यंत सरकारला मोर्च्याच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत (अगदी अंशतःही) उलट फसवणूक झालेली आहे असे सांगतायत पण त्याचे खंडण करण्यास एकही मोर्चा संघटक/समर्थक पुढे येत नाही असे का हे विचारू नका.

सर्वत्र फिरवलेले मोर्च्यातील संदेश ढळढळीत्पणे कोपर्डी हा मराठी अस्मितेचा(विनाकारण) मुद्दा केल्याचे जाणवत होते आणि विशीष्ठ जातीने मराठ्यांवर अत्याचार केल्यावरच जाग आल्याचे दिसत असूनही (अगदी मिपावरही) त्यात कुणाला वावगे वाटले नाही.
गुन्हेगाराला जात नसते त्यांना फक्त कठोर शासन होऊन जरब बसली पाहिजे हे कधी कळणार ते माहीत नाही.
एकूणच मोर्च्या निमित्ताने मलाही मित्राकडून (आतल्या आत गावकडे/घरातील जेष्ठ्यांअध्ये ब्राह्मणांबद्दल किती सत्ता आकस आहे ते कळाले)
कारण मोठ्ठ्या गर्दीच्या मोर्च्यानंतरच सुप्रिया सुळे अचानक सक्रीय होऊन मुख्यमंत्र्याविरूद्ध विखारी विधाने करू लागल्या हा नक्की योगा योग नाही.

बाकी सावकाश सवडीने.....

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2016 - 1:54 pm | टवाळ कार्टा

अक्षरा अक्षराशी सहमत...आणि जे लोक परदेशात मोर्चा काढत आहेत त्यांच्या गुढग्यात तरी मेंदू असेल का अशी शंका आहे...बाकी हा लेख व्हत्सप्पवर नावासकट फिरवू का?

वेल्लाभट's picture

18 Oct 2016 - 2:03 pm | वेल्लाभट

हरकत नाही.

परदेशात वगैरे ती तर हाइट्ट आहे. एका मित्राशी बोललो आत्ता. I couldn't believe that I was talking to one of those bright fcking students of my batch! ABSURD logics! काय तर म्हणे माझ्या काकावर विनाकारण कसली तरी केस टाकून त्रास दिला... I was like... ओके मग? तू तिथे मोर्चात जाऊन काय मिळवलंस? केस मागे घेतली का? I mean; are you out of your goddamned mind?!!!

काहीच बोलू शकत नाही म्हटलं मी. धन्यवाद. बायबाय.

नवशक्तीमधून जसाचा तसा.

आपले आणि आपल्या पक्षाचे कोटकल्याण करण्यात मग्न राहायचे व निवडणुका तोंडावर आल्या की आपण जनतेसाठी फार काही मोठे करीत आहोत, असा आव आणण्यासाठी धावत पळत फुसक्या योजना गाजावाजा करून सुरू करायच्या या आजवरच्या खटाटोपामुळे या सगळ्या योजनांचा फजितवडा होतो आहे, हे आमचे सरकार आणि सत्ताधारी पक्ष कधी समजून घेणार?नाव गरीबाचं आणि कल्याण श्रीमंताचं असाच आपल्या अनेक शासकीय योजनांचा खाक्या राहिला आहे. त्यामुळेच गोरगरिबांच्या भल्यासाठी ज्या ज्या म्हणून योजना साकारल्या गेल्या त्याचे बहुतांशी फायदे हे बडय़ा धेंडानीच आजवर लाटल्याचा इतिहास निर्माण झाला आहे. अत्यंत गाजावाजा करून राजीव गांधी जीवनदायी योजना गेल्याच आठवडय़ात नागपूरमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नागपुरात सुरू झाली. तिच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी तिचा बोजवारा उडाला. या योजनेसाठी ज्या खिडक्या उघडल्या होत्या तिथे माहिती देण्यास कुणीही नव्हते. रुग्णालयातील कुणालाही योजनेची सविस्तर माहिती नव्हती. अन्य खाजगी रुग्णालयांनाही त्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे योजना असून नसल्यासारखीच ठरली. या योजनेची जी कार्डे देण्यात आली ती श्रीमंत व उच्चभ्रू व्यक्तींना देण्यात आल्याचा गौप्यस्फोट एका वाहिनीने केला आहे. ज्यांना ही कार्डे मिळाली त्यांच्या नावा पत्यानिशी व आर्थिक स्थितीनिशी या वाहिनीने हे वृत्त दिल्याने अंमलबजावणीच्या शुभारंभाला योजनेत घोटाळा अशी स्थिती झाली आहे. कोणतीही योजना राबविण्यापूर्वी पूर्वतयारी धड करायची नाही. ही आमच्या केंद्र आणि राज्य सरकारला लागलेली वाईट खोड आहे.त्यामुळे कर्जमाफी असो,की निराधारांना वाटप करावयाची घरकुले असोत की विधवा, परित्यक्तता आणि निराधारांना अर्थसहाय्य देण्याची योजना असो या सगळ्यांचा फायदा लाटण्यासाठी नेहमीच सत्तेतले आणि राजकारणातले धनदांडगेच पुढे सरसावले आहेत. त्यातून अनेक घोटाळे झाले तरी आमचे सरकार काही शहाणपणा शिकत नाही. त्यातूनच मग विदर्भातल्या अतिवृष्टीग्रस्तांना आणि नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंब व द्राक्ष उत्पादकांना वर्षानुवर्ष झाली तरी भरपाई मिळत नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या आप्ताना मात्र अगदी तत्परतेने भरपाई मिळण्याचा चमत्कार घडतो तर गारपीट आणि अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्यांसाठी जाहीर झालेली भरपाई त्यांना मिळत नाही. परंतु मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्रीपद भूषविणार्या पतंगराव कदमांच्या मतदारसंघात अतिवृष्टी सोडा सर्वसाधारण पाऊसही झालेला नसताना पाच कोटीची भरपाई मिळण्याची किमया घडते. हे सगळे प्रकार `आमचं ते आमचं आणि तुमचं ते ही आमच्याच बापाचं’ अशाच खाक्याने सगळा कारभार सुरू असल्याचे द्योतक आहे. चार वर्षे झोपन राहायचे. आपले आणि आपल्या पक्षाचे कोटकल्याण करण्यात मग्न रहायचे व निवडणुका तोंडावर आल्या की आपण जनतेसाठी फार काही मोठे करीत आहोत, असा आव आणण्यासाठी धावत पळत फुसक्या योजना गाजावाजा करून सुरू करायच्या या आजवरच्या खटाटोपामुळे या सगळ्या योजनांचा फजितवडा होतो आहे, हे आमचे सरकार आणि सत्ताधारी पक्ष कधी समजून घेणार?
==========
हे डोळ्यासमोर दिसत असूनही ज्यांनी केले त्यांना जाब विचारावा वाटत नाही? हात बांधले आहेत का मोर्च्याकर्यांचे कुणी? का मोर्चा बोलविता धनीच या वाटमारीत असल्याने विचारायची लाज वाटते?

पी. के.'s picture

18 Oct 2016 - 3:06 pm | पी. के.

आरे वा,

आणखी एक धागा.. किती झाले चार कि पाच?
मोर्चा काढणारे मोर्चा कडून मोकळे झाले आणी आपापल्या कामाला लागले. आपण मात्र एक महिना झालं मिपा वर मोर्चा मोर्चा खेळतोय.

चालू दे

रडून रडून पार डोळ्यातलं पाणी संपलं तरी बाळ रडतच आहेत... उग्गी उग्गी

कुणी विचार मांडले तर त्यावर विचारही न करता आपल्याला सोयिस्कर नाही म्हणून विरोध सुरु करण्याचा विकार गेल्या दशकात विशेष ठळकपणे दिसतो.

विशुमित's picture

18 Oct 2016 - 4:15 pm | विशुमित

सहमत..

मराठी_माणूस's picture

18 Oct 2016 - 4:59 pm | मराठी_माणूस

परत एका आरटीआय कार्यकर्त्याची हत्या झाली. त्याला न्याय मिळावा म्हणुन एखादा मोर्चा निघु शकेल का ?
ते समाजाच्या जीवंतपणाचे आणि परीपक्वतेचे लक्षण असेल.

विशुमित's picture

18 Oct 2016 - 5:29 pm | विशुमित

नक्कीच दुर्दैवी घटना...
तुम्ही आयोजन करा मोर्चाचे, मी सह कुटुंब सहभागी होतो.

चौकटराजा's picture

18 Oct 2016 - 7:26 pm | चौकटराजा

या मोर्चाचे नेत्रुत्व साहेबानी केले पाहिजे.आपण खरेच जातीच्या पलिकडे जाउन अण्णा हजारेंसारखे मराठा आहोत हे दाखविण्याची मोठी संधी आहे त्याना !

विवेकपटाईत's picture

18 Oct 2016 - 7:07 pm | विवेकपटाईत

एकच प्रश्न महाराष्ट्रात कोणी मराठी माणूस राहतो का? महाराष्ट्रा बाहेर गेल्यावर त्याला तो मराठी असल्याची जाणीव येथे.

वैभव पवार's picture

18 Oct 2016 - 7:20 pm | वैभव पवार

मराठी नाही हो !!मराठा!!

आणि हे मोर्चे कशासाठी म्हणाल तर काही लोक्कांच्या ( वैयक्तिक टीका टाळली ) पोटात गोळा आणण्यासाठी .....आणि सावित्रीच्या लेकी नाही .. जिजाऊंच्या लेकी . तस सावित्रीच्या लेकी म्हंटलं तरी काही अडचण नाही. दया येते मला .एखादा समाज संगठीत होत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? बाकी भारतात खूप जातीय संगठना आहेत .खूप पेक्षा प्रत्येक जातीची संगठना आहे. मग मराठ्यांच्या संघटनावर एव्हडे कोकलने का ?. बहुदा रात्रीच्या झोपा येत नसाव्यात . रात्री १०-१० वेळा जावा लागत असेल.

संदीप डांगे's picture

18 Oct 2016 - 7:53 pm | संदीप डांगे

एखादा समाज संघटित झाला की काय होतं हे नाशिक ने आठवडाभर अनुभवलं पुरेपूर...

असो.

वैभव पवार's picture

18 Oct 2016 - 8:03 pm | वैभव पवार

असो

खटपट्या's picture

18 Oct 2016 - 10:29 pm | खटपट्या

पवार साहेब. संघटीत व्हायला कोणाचीच ना नाही. नसावी. संघटीत होउन लोकोपयोगी कामे कराकी. अगदी स्वत:च्या जातीसाठी करा, चालेल. पण या मोर्चात सामील झालेल्या माझ्या भावकीतील कीत्येक लोकांना मी विचारले "अरे का जाताय? कशासाठी जाताय?" त्यावर बरेच जणांना माहीत नव्हते आपण का जातोय. तरुणांमधली उर्मी दुसर्‍या कामात वापरता येणार नाही का? उद्या मी जर म्हणालो की आपण सर्व कील्ले स्वच्छ करायचे आहेत, मोठ्या संख्येने उपस्थीत रहा.तर कीती तरुण येणार आहेत. कीत्येक मुले तर आपण मराठा आहोत हे दाखवण्यासाठी मोर्चात सामील झाली होती. भावनांना हात घालून लोकांना जमा करता येते, आणि लोकं मेंढरासारखी जातात हेच दुर्दैव आहे. घरातून निघताना जरी स्वतःला विचारले की आपण का जातोय तरी पुरे.
कोपर्डी प्रकरणात येवढा मोर्चा काय कामाचा? न्यायालयात कायदेशीर मार्गाने लढा की.
आरक्षण - यावर न बोललेच बरे.
परदेशातील मराठ्यांचे मोर्चे बघीतल्यावर हसावे की रडावे ते कळत नव्हते. जर यांच्यावर शिक्षणात अन्याय झाला असता तर हे लोक शिक्षणाच्या जोरावर परदेशात कसे आले असते?

वेल्लाभट's picture

18 Oct 2016 - 11:14 pm | वेल्लाभट

इतकं जरी कळलं असतं ना...

गदी जमवली की आरक्षण मागता येते असं साहेबांनी सांगीतले,अता सगळे थोडीच तिथे कायमस्वरूपी नोकरी,रहायला जागा किंवा सरकारी निवासात आहेत तेंव्हा मोर्चा काढून शक्तिप्रदरशन केले परदेशात तर कुठे बिघडले?

उगा तुम्च्या पोटात दुखते,आणि वर तोंड करून कशाला विचारता की जिजाऊच्या लेकी का म्हणून बाकी कुणाच्या लेकी आहेत आम्हाला कशाला फिकीर?

आणि हो उगा इतिहासाची पाने तपासायला सांगू नका , शिवरायांना त्रास्,उपद्रव सगळ्यात जास्त त्यांच्याच (जातीच्या) सगा सोयर्यांनी दिला (आणि तेही ९६ कुळीच होते) संभाजीराजांना दगाफटका करून पकडून देणारे कोण होते आणि त्यांची जात विचारू नका?

मोर्च्याच्या वतीने वकिली करणारे संभाजी बिग्रेड आणि मराठा महासंघाचे लोक का आहेत असे विचारू नका ? ते मोर्चाचे बोलविते धनी आहेत का ते विचारू नकाच.

सध्या फक्त इतकेच (आणि हो धडकी बिडकी भरत नाही मला) इतकीच गर्दी मुंबईला कामाला असताना सहा महिने (अंबरनाथ ते छ.शि.स्थानकापर्यंत प्रवास) पाहिली आहे? किमान त्या गर्दीला दिशा आणि उद्देश तरी होता इथे तोही नाही.

विशुमित's picture

19 Oct 2016 - 11:16 am | विशुमित

नाखु जी,

इतिहास आम्ही चाळला तर आम्हाला तुम्ही ब्रिगेडी असल्याचा ठपका लावाल.
त्यामुळे तुम्ही यावर विचार करा.

बाकी प्रत्येक धाग्या वर हेच चर्चिले आहे आहे की हा मोर्चा--
1) शांततेत चालू आहे
2) कोणाला कसला ही त्रास देण्याचा हेतू नाहीय
3) शरद पवार साहेब हे या मोर्चा मागील सूत्रधार नाहीत.
4) कोठे ही जाळपोळ दंगा मस्ती नाहीये
5) काटकोर आणि शिस्तबद्ध आहे
6) इतर समाजाचं पण लाक्षणिक पाठिंबा आहे.
7) मत मतांतर असू शकते पण मागण्या बऱ्याच अंशी रास्त आहेत (रास्त आहेत हे विचार तुम्हाला मान्य नाही तर रास्त नाहीत हे तुमचे विचार सुद्धा आम्हाला मान्य नाही)
8) ब्राह्मण मुख्यमंत्री हटवणे हा हेतू बिलकुल नाही (ते आपोआपच आपल्या कर्माने राहतील नाहीतर हाकले जातील)
9) येथील काही प्रतिक्रिया वाचल्या नंतर असा दिसतंय की दलित समाजापेक्षा ब्राह्मण समाजालाच मराठ्यांची जास्त भीती वाटत आहे, जी अनाठायी आहे. 1948-1978 वगैरे काही होणार नाही काळजी करू नका.
10) आरक्षण मिळो अथवा न मिळो, त्यावर कोणी अवलंबून राहत नाही हे सर्व जण जाणतात पण जर शक्यता असेल आणि कोणाचा वाटा घेत नसेल तर काय हरकत आहे घेण्यात.
11) कोपर्डीची घटना जर मराठा समाजाची मुली बाबत झाली असली तरी या मोर्चा मुले नक्कीच एक जन जागृती झाली आहे की कोण्या ही बालिके वर अत्याचार करण्या पूर्वी नराधम 10 वेळा विचार करतील की लोक आता पहिल्या सारखी शांत बसणार नाही. (आता 2 आठवड्यांपूर्वी लोणारी समाजाने त्यांच्या समाजातील मुली वर झालेल्या अत्याचारावर मोर्चा काढला होता त्यात लक्षणीय सर्व समाजाचा सहभाग होता)
12) मराठ्यांचा तुम्हाला माज, गुर्मी, गुंठेगिरी, स्कॉर्पिओ, बुलेट, 96-92 कुळी एवढाच दिसत असेल तर माझा नाईलाज आहे. कारण मराठे दिलदार, मैत्री साठी वाटेल ते करणारे, कोणाच्या ही ताटात बसून खाणारे, रांगडे, आणि तेवढेच हळवे असतात. (ही चांगली वाईट वैशिट्ये सर्व समाजामध्ये असतील मराठे त्याला अपवाद नाहीत)
12) ब्रिगेडी आणि मराठा महासंघाचे लोकही या मोर्च्यात असतील/आहेत पण अजून तरी कोणत्याच मोर्चाने डोक्यावरचा बर्फ वितळून दिला नाही. मोर्चा च्या वतीने बाजू मांडणे याला तुम्ही वकिली म्हणत असाल तर तुम्हाला मी ब्राह्मणी कावा करणारे आहेत असे हिणवणं मला ही योग्य नाही वाटत.
13) तुमच्या म्हण्या प्रमाणे हा कळप आहे त्यामुळे कृपया असले विखारी प्रतिसाद देऊ नका त्याने खरंच जातीय सलोखा बिघडेल. उदाहरण द्याच झालं तर शिवसेना प्रमुखांनी जाहीर माफी मागितली आहे. आठवले, बडोले, चंद्रकांत पाटील याना समाजाने फटकारले आहे.

कविता१९७८'s picture

18 Oct 2016 - 10:32 pm | कविता१९७८

लेखकाशी सहमत

सुखीमाणूस's picture

18 Oct 2016 - 11:39 pm | सुखीमाणूस

ते जातिव्यवस्था दुर व्हावी म्हणुन झटले त्यान्च्या सगळ्या प्रयत्नान वर पाणि फिरवतायत ही लोक

एवढा मोर्चा निघतो आहे पण आरक्शण उपभोगणारे काही म्हणत नाहीत की सगळ्या व्यवस्थेचा पुनर्विचार होउदे. जो तो फक्त निवडणुका आणि जिन्कणे या कैफात

मराठी लोकांना हात लावायची ?

पण लक्षात कोण घेतो ??????

वेल्लाभट's picture

19 Oct 2016 - 10:29 am | वेल्लाभट

नेमकं हेच!

रविकिरण फडके's picture

19 Oct 2016 - 2:57 pm | रविकिरण फडके

धागाकर्त्याने उपस्थित केलेल्या वरील प्रश्नाचे उत्तर कुणाला माहीत असण्याची शक्यता कमी आहे.

शेअर बाजारात जसे 10-20 मोट्ठे ब्रोकर्स असतात ते ठरवितात कुठला शेअर वर न्यायचा, कुठला धोपटायचा, आणि त्याच्या प्रतिक्रिया दिसू लागल्या की तज्ञ् मंडळी आव आणतात त्यांचे विश्लेषण वगैरे करण्याचा. सामान्य माणसांना ते सगळे खरे वाटते, आणि तेही लागतात शेअर्स घ्यायला नाहीतर विकायला. अशी सर्वत्र हवा होते त्यात काही दिवस जातात, ते जे कुणी मोट्ठे ब्रोकर्स असतात ते आपली कमाई झाली की दुसऱ्या कामाला लागतात आणि आपण बसतो आपले हात चोळीत, चर्चा करीत.
तर तसेच आहे इथेही. हा खेळ कोण करतोय, का करतोय, कुणाला ठोकायचे आहे आणि कुणाला चढवायचे आहे, काही माहीत नाही कुणाला. त्या खेळियाचा फायदा होईल, तोटा होईल, जे काही होईल ते कदाचित 5-10 वर्षांनी समजेल. तोपर्यंत आपण सर्व विसरलेलेही असू सगळे. खेळिये दुसऱ्या डावाला सुरवात करतील. तोही खेळ असाच रंगेल.
बाकी राहिला प्रश्न सामान्य माणसे का वाहवत जातात, हा. ते काही नवीन नाहीच. भयगंड हे फार प्रभावी अस्त्र असते लोकांना पेटवायचे. मराठी माणसाच्या नोकऱ्या ह्या यंडु गुंडू लोकांनी हिरावल्या, त्यांचे धंदे भय्ये लोकांनी काबीज केले, त्यांच्या जागा गुजराती श्रीमंतांनी घशात घातल्या, असे काही म्हटले की आम्ही दंगा करायला तयार. पण लोकांना भडकाविणारे जे आहेत त्यांनी मराठी माणसांचे शिक्षण किती केले, कोणत्या नवीन संधी शोधल्या, कोणते प्रश्न खरोखर धसाला लावले, ह्याचे उत्तर ते देऊ शकतील का?
एकूण काय, वाहवत जाणे, कुणाचातरी झेंडा खांद्यावर घेणे, सोपे. योग्य प्रश्न विचारणे कठीण. कारण ते विचारायला अभ्यास लागतो, आणि अप्रिय उत्तरे स्वीकारण्याची तयारी लागते.

पैसा's picture

19 Oct 2016 - 11:25 pm | पैसा

एवढा सगळा विचार कोण करणार? विचार करणारे लोक असल्या भानगडी करत नाहीत आणि भानगडी करणारे विचार करत नाहीत.

संदीप डांगे's picture

19 Oct 2016 - 11:32 pm | संदीप डांगे

"जाणते, हृदयसम्राट" वगैरे लोक या दोघांनाही एकमेकांपासून दूर ठेवतात, ;))

नाखु's picture

20 Oct 2016 - 8:51 am | नाखु

आणि उपप्रतिसाद फेविकॉलका जोड है आणि तो मी सांगून ढापणार आहे.

सराईत नाखु

सभ्य माणुस's picture

23 Oct 2016 - 11:57 am | सभ्य माणुस

अगदी बरोबर बोल्लात वेल्लंभट. ह्या मोर्चांचा काहिही उपयोग नाहीये हे स्पष्ट आहे.
मागे एक असाच एक मॅसेज फिरत होता, आमुक एक तारखेला internet वापरु नका. त्यामुळे काय तर म्हणे मोबाइल कम्पण्यान्ना खुप मोठा तोटा होइल आणि ते Data rates कमी करतील. ह्या असल्या मॅसेज मागचे logic फक्त तेच लोक लाउ शकतात ज्यान्नी आपली बुद्धी गहाण ठेवलीय. आताही हे मोर्चे म्हणजे whatsapp चे किडे आहेत बाकी काही नाही. काहीही होउ शकत नाही याने.

मोर्चामुळे काहीही उपयोग होणार नाही यापेक्षा काही ही उपयोग होऊ नये असे बरेच बुद्धिजीवी ची सुप्त इच्छा लपून राहत नाही.

मोर्चाला विरोध करणे हे सुद्धा आता व्हाट्सअप्पी किडे झाले आहेत.

मोर्चा मधून नक्कीच फायदा होणार आहे यावर अजून ही आशावादी आहे.

अन्नू's picture

24 Oct 2016 - 4:37 am | अन्नू

मनातलं बोललात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2016 - 7:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेल्लाभट, लेखातील विचार पटला. आपल्या नावासकट आणि मिपा लिंकसहित वाट्सपवर टाकतो. धन्यवाद.

बाकी, चालू द्या.

-दिलीप बिरुटे

वेल्लाभट's picture

24 Oct 2016 - 9:50 am | वेल्लाभट

धन्यवाद बिरुटे सर

औरंगजेब's picture

24 Oct 2016 - 9:03 pm | औरंगजेब

माझा जातीआधारीत आरक्षणिला नेहमीच विरोध राहिला आहे. आणी राहिल. आरक्षण ही संकल्पना नक्कीच चांगली आहे पण ते आर्थिक आधारावर मिळावे. मग तो तथाकथित उच्चवर्णिय आसो वा मागासवर्गिय.

आरक्षण खालिल प्रकारे देता येईल
१- कौटुंबिक वार्षिक उत्पन्न + प्राप्तिकर भरणा हा आधार ठेवावा.

२-जे लोक प्राप्तिकराच्या कक्षेत येत नाहित त्यांना एकुण ४९% आरक्षणाच्या जनगणनेच्या आधार घेऊन आरक्षण द्यावे.

औरंगजेब's picture

24 Oct 2016 - 9:06 pm | औरंगजेब

आरक्षण*

संदीप डांगे's picture

25 Oct 2016 - 7:22 pm | संदीप डांगे

आरक्षण संकल्पनेबद्दल एखादं वेळेस नीट वेळ काढून , पूर्वग्रह बाजूला ठेवून अभ्यास करावा अशी विनंती.

(आरक्षित जातींना क्रिमिलेयर लावावी असे माझे मत आहे)