नागपूरची स्पेशल संत्रा बर्फी

Primary tabs

अनन्न्या's picture
अनन्न्या in लेखमाला
29 Oct 2016 - 12:23 am

सर्व मिपाकरांना ही दिवाळी आनंदाची जावो!!

.
नागपूरवारीत हमखास आणली जाणारी मिठाई म्हणजे संत्रा बर्फी!! पण आम्हा कोकणातल्या मंडळींना नागपूर फारच लांब! त्यामुळे आता घरी केल्याशिवाय काही संत्रा बर्फी मिळणार नाही. या दिवाळीसाठी घेऊन आलेय खास मिपाकरांसाठी!!!!!

साहित्य :
तीन वाट्या कोहळा,
दोन वाट्या खवा,
तीन वाट्या साखर,
अर्धा टीस्पून ऑरेंज इमर्शन (कलर+इसेन्स),
दोन वाट्या संत्र्याचा रस,
संत्र्याची साल किसून दोन टेबलस्पून,
वेलची पावडर.

.

कृती :

कोहळा किसून घ्या. संत्र्याची साल किसताना त्याचा पांढरा भाग किसायचा नाही. फक्त वरची केशरी साल किसून घ्या. मला तीन मोठी संत्री लागली. संत्र्याचा रस काढून घ्या. आता सर्व साहित्य मोजून एकत्र करा. कोहळ्याचा कीस, संत्र्याच्या सालीचा कीस, संत्र्याचा रस, साखर, खवा,इमर्शन आणि चिमूटभर वेलची पावडर हे सर्व कढईत एकत्र करून मंद गॅसवर ठेवा. गोळा होऊ लागला की ताटाला तूप लावून थापा. तुम्हाला वडी, बर्फी जे हवे असेल त्याप्रमाणे कमी-जास्त आटवा.

.

आता तुम्ही म्हणाल, संत्रा बर्फीत कोहळा का? तर मी जी प्रसिद्ध बर्फी खाल्ली, त्यात घातलेले घटक बॉक्सवर वाचून त्यात कोहळा असतो असे मलातरी वाटले. आणि मी प्रयोग केला तर परफेक्ट चव आली. बघा तुम्हीही प्रयोग करून!!

.

प्रतिक्रिया

मस्त दिसतिये बर्फी. आवडलीच! रंग छान आलाय.

स्रुजा's picture

29 Oct 2016 - 2:01 am | स्रुजा

सुरेख !

इशा१२३'s picture

29 Oct 2016 - 8:50 am | इशा१२३

अप्रतिम!सुंदर रंग दिसतोय ग !

सविता००१'s picture

29 Oct 2016 - 11:24 am | सविता००१

आणि कसली भारी आहेस तू... त्यात कोहळा आहे अस वाटल म्हणजे..
झकास दिसतेय गं. उचलून खावीशी वाटली लग्गेच.

स्वाती दिनेश's picture

31 Oct 2016 - 12:13 am | स्वाती दिनेश

खूप छान दिसतेय संत्रा बर्फी, अगदी उचलून घ्यावी असे वाटते आहे.
स्वाती

पिलीयन रायडर's picture

31 Oct 2016 - 3:22 am | पिलीयन रायडर

अप्रतिम!!!!!!!!

कविता१९७८'s picture

31 Oct 2016 - 9:13 am | कविता१९७८

मस्त

केडी's picture

31 Oct 2016 - 8:59 pm | केडी

नक्कीच करून बघणार!

रुपी's picture

1 Nov 2016 - 2:42 am | रुपी

वा! अप्रतिम!

अनन्न्या's picture

1 Nov 2016 - 8:06 pm | अनन्न्या

करून पहा नक्की.

अत्रुप्त आत्मा's picture

1 Nov 2016 - 8:24 pm | अत्रुप्त आत्मा

यम्मी यम्मी! एक नंबर!

झक्कास..!
नक्की करून बघणार.

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2016 - 2:25 pm | सानिकास्वप्निल

वाह! स्वादिष्ट बर्फी.

पूर्वाविवेक's picture

2 Nov 2016 - 3:52 pm | पूर्वाविवेक

खूप सुरेख. रंग लाजवाब. तुकडा उचलून तोंडात घालावयास वाटतोय.

पैसा's picture

2 Nov 2016 - 5:26 pm | पैसा

सुरेख रंग आलाय!

देशपांडेमामा's picture

3 Nov 2016 - 9:32 am | देशपांडेमामा

होय. नागपुरच्या सुप्रसिद्ध बर्फीमध्येपण कोहळा असतोच

बर्फी छान दिसतेय! मस्तच झाली असणार!

देश

आमच्याकडे फार आवडते संत्रा बर्फी!आवर्जून प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार!

नूतन सावंत's picture

5 Nov 2016 - 10:45 am | नूतन सावंत

मी आले की करशील न?

अनन्न्या's picture

5 Nov 2016 - 2:29 pm | अनन्न्या

ये तर आधी

सस्नेह's picture

5 Nov 2016 - 2:55 pm | सस्नेह

देखणी बर्फी.

पद्मावति's picture

5 Nov 2016 - 2:58 pm | पद्मावति

मस्त!

पियुशा's picture

5 Nov 2016 - 4:03 pm | पियुशा

जबराट !!!

Maharani's picture

12 Nov 2016 - 4:29 pm | Maharani

Jabardast........

छान पाकृ. किती दिवस टिकते?

अजया's picture

14 Nov 2016 - 10:31 pm | अजया

एकदम सुंदर.