मराठी प्रतिशब्द हवेत

वर्षा's picture
वर्षा in काथ्याकूट
28 Sep 2008 - 6:16 am
गाभा: 

मला खालील शब्दांसाठी मराठी शब्द हवे आहेत. (खरं तर काही काही शब्द इतके सोपे आहेत पण जाम सुचत नाहीयेत किंवा सुचले तरी खात्री वाटत नाहीये :()

१) Prefecture (eg. Chiba prefecture)
२) Simmer
३) Get together
४) Tableware
५) Sea weed - (म्हणजे समुद्री शेवाळ?)
६) Porcelain - (म्हणजे चिनी माती?)

इंग्रजी-मराठी अशी ऑनलाईन डिक्शनरी आहे का एखादी?

-वर्षा

प्रतिक्रिया

वैशाली हसमनीस's picture

28 Sep 2008 - 6:41 am | वैशाली हसमनीस

Get together---संमेलन्,मेळावा,पण जास्त संयुक्तिक ' संमेलन'
Tableware-----मेजावरण

सुनील's picture

28 Sep 2008 - 6:45 am | सुनील

Tableware-----मेजावरण

मेजावरण हा शब्द पहिल्यांदाच समजला आणि मला तरी तो टेबलक्लॉथसारखा वाटतो टेबलवेअरसारखा नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Sep 2008 - 11:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> Get together---संमेलन्,मेळावा,पण जास्त संयुक्तिक ' संमेलन'

याला कधीकधी "कट्टा" असंही म्हणतात ना?

विजुभाऊ's picture

1 Oct 2008 - 2:55 pm | विजुभाऊ

पण जास्त संयुक्तिक
संयुक्तिक पेक्षा सयुक्तीक हा योग्य शब्द आहे.
संयुक्त = एकत्रीत / अमालगमेटेड (उदा:संयुक्त जनता दल)
सयुक्त = बरोबर्/युक्तीवादासह ( विथ रीझन)
अवांतरः बरेच पुणेकर गणपतीची आरती म्हणताना "संकटी पावावे निर्वाणी रक्षावे " ऐवजी "संकष्टी पावावे निर्वणी रक्षावे" असे म्हणतात. ते त्याना सयुक्तीक वाटते

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

अविनाश ओगले's picture

23 Sep 2009 - 7:26 pm | अविनाश ओगले

विजुभाऊ, हा संकटी , संकष्टी काय प्रकार आहे?

Dilipkumar's picture

29 Sep 2008 - 12:51 pm | Dilipkumar

"मेज" हा मराठी शब्द नाही. "मेज" हा ऊर्दु शब्द आहे.

संजय अभ्यंकर's picture

28 Sep 2008 - 11:02 am | संजय अभ्यंकर

१) Prefecture (eg. Chiba prefecture): प्रभाग, जिल्हा
२) Simmer: उकळ(णे) - द्रव पदार्थाला आलेली उकळ
३) Get together: संमेलन
४) Tableware: (आठवत नाही)
५) Sea weed - म्हणजे समुद्री शेवाळ: बरोबर
६) Porcelain - म्हणजे चिनी माती: बरोबर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2008 - 12:06 pm | प्रभाकर पेठकर

वा माझ्या कार्यक्षेत्रातील शब्द आहे.

Simmer: उकळ(णे) - द्रव पदार्थाला आलेली उकळ
Simmer म्हणजे (द्रव) पदार्थाला उकळी येऊ न देता उष्णता देत राहणे. म्हणजेच द्रवपदार्थाचे मंद आंचेअर बाष्पीभवन करणे.

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 11:08 am | विसोबा खेचर

गेट-टुगेदर हा शब्द आपण आपल्या बोलण्यातून इतका सहज वापरतो की तो आता मराठीच वाटू लागला आहे... :)

बाकी,

मराठी प्रतिशब्द हवेत

हे शीर्षक वाचून मी अन्य एका संस्थळावर आहे की काय असेच क्षणभर वाटले! :)
मिपाकर मंडळी सहसा मराठी शब्द वगैरे शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत म्हणून असेल कदाचित...

असो, बाकी चालू द्या...

आपला,
(मराठी) तात्या.

गणा मास्तर's picture

28 Sep 2008 - 3:03 pm | गणा मास्तर

prefecture म्हणजे परगणा
आपला चिबा केन इचिकावा शि वासी
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

चतुरंग's picture

29 Sep 2008 - 1:04 am | चतुरंग

county = परगणा
prefecture = (एखाद्याच्या) अखत्यारीतील प्रभाग (जहागीर)

चतुरंग

सुबक ठेंगणी's picture

23 Sep 2009 - 5:10 am | सुबक ठेंगणी

चतुरंगशी सहमत. कारण "bridges of the madison county" चं जपानी भाषांतर "मॅडिसन गुन नो हाशी' असं वाचलं होतं. त्यामुळे county=परगणा=गुन
प्रिफेक्चरला मीसुद्धा प्रभागच म्हणीन.

वर्षा's picture

29 Sep 2008 - 12:14 am | वर्षा

सर्वांचे आभार.
संमेलन शब्द चांगला आहे.

आपला चिबा केन इचिकावा शि वासी
सोs देस का!:)
प्रिफेक्चर साठी 'परगणा' शब्द सांगितल्याबद्दल आभार गणा मास्तर.

पेठकर काका,
Simmer म्हणजे (द्रव) पदार्थाला उकळी येऊ न देता उष्णता देत राहणे. म्हणजेच द्रवपदार्थाचे मंद आंचेअर बाष्पीभवन करणे.
म्हणजे आपण वाफ काढणे म्हणतो तसाच अर्थ आहे का? मग त्याला 'वाफवणे' असा शब्द वापरला तर?

बाकी टेबलवेअर म्हणजे उदा. डिनरसेट असला ज्यात बशी, बाऊल(बोल?), चमचे-काटे वगैरे वगैरे आहे तर त्याला मराठीत काही शब्द नाहीये का?

-वर्षा

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2008 - 9:17 am | प्रभाकर पेठकर

आपण वाफ काढणे म्हणतो तसाच अर्थ आहे का? मग त्याला 'वाफवणे' असा शब्द वापरला तर?

वाफ काढणे, वाफवणे म्हणजे वाफेवर 'शिजवणे'.

'Simmer ' प्रक्रिये आधी पदार्थ शिजण्याची प्रक्रिया झालेली असते. Simmer प्रक्रियेत फक्त ग्रेव्हीतील पाण्याचा अंश बाष्पीभूत होऊन तेल वर तरंगायला लागते आणि पदार्थाला वेगळी चव आणि चकाकी येते.

वर्षा's picture

29 Sep 2008 - 9:37 am | वर्षा

फरक कळला
धन्यवाद :)
-वर्षा

मिसंदीप's picture

29 Sep 2008 - 10:52 am | मिसंदीप

आपण खालील संकेतस्थळाला भेट द्यावी.
http://www.websters-online-dictionary.org/translation/Marathi/

वर्षा's picture

2 Oct 2008 - 1:00 am | वर्षा

संदीप, संकेतस्थळासाठी आभार.
दरम्यानं मलाही जालावर हे एक संकेतस्थळ सापडले.
http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
-वर्षा

भिंगरि's picture

2 Oct 2008 - 3:22 am | भिंगरि

Sea weed ला समुद्रि गवत/ समुद्रि वनस्पति हा शब्द जास्त योग्य वाटतो शेवाळापेक्षा. Simmer म्हणजे मंद आचेवर उकळत रहाणे. अर्थात हे सगळ माझ्यामते

वर्षा's picture

5 Aug 2009 - 1:56 am | वर्षा

हे कुठे विचारावं न कळल्याने मीच काढलेल्या या धाग्यावर विचारतेय.
सध्या मी करत असलेल्या एका भाषांतरात मला हा शब्द अडलाय: ’यथास्थिती’
वाक्य असं आहे:’अधिनियम पाचवा याच्या कलम ५ (३) अनुसार किंवा यथास्थिती या नियमापैकी नियम ३-अ च्या उपबंधानुसार रक्कम नमूद करणे.

इथे यथास्थितीचा अर्थ काय? कोणी सांगू शकेल काय?

धन्यवाद

विंजिनेर's picture

5 Aug 2009 - 7:21 am | विंजिनेर

इथे यथास्थितीचा अर्थ काय? कोणी सांगू शकेल काय?

अवांतरः यथास्थिती हा मराठीत फार प्रचलित शब्द नसावा

वर्षा's picture

5 Aug 2009 - 8:16 pm | वर्षा

ह्म्म. धन्यवाद विंजिनेर!

तर्री's picture

5 Aug 2009 - 8:37 pm | तर्री

स्टेट्स को असा ईंग्रजी शब्द आहे, जवलचा.

वर्षा's picture

23 Sep 2009 - 4:30 am | वर्षा

नमस्कार लोकहो,
सध्या करत असलेल्या भाषांतरात खालील शब्द अडले आहेत.
punch bag
bubble wrap
stress ball
soft toy
Creative
journal/Diary- रोजनिशी?
Crocheting- क्रोशाचे विणकाम?
Constructive- भरीव?
child line/help line
recycling
internet- महाजाल? की आंतरजाल?
download
glamorous
make up - रंगभूषा?
play dough
bedlam cube, geomag, tangle

यापैकी मुख्यत्त्वे punch bag, bubble wrap, stress ball, bedlam cube, geomag, tangle यांना मराठीत काय म्हणणार हा प्रश्न पडला आहे. नाहीतर ते तसेच लिहिन. पण तुम्हाला शब्द सुचत असल्यास जरुर सांगा. शिवाय इतर उरलेल्या शब्दांचेही प्रतिशब्द माहित असल्यास सांगा.
आभारी आहे.

सुधीर काळे's picture

24 Sep 2009 - 9:21 pm | सुधीर काळे

punch bag
bubble wrap: बुडबुडे-वेष्टण
stress ball
soft toy कापडी खेळणं
Creative सर्जनशील/उत्पादनशील
journal/Diary- वासरी
Crocheting- क्रोशाचे विणकाम?
Constructive- निर्माणक्षम/शील (as against Destructive-विनाशक्षम)
child line/help line
recycling: पुनर्वापर
internet- आंतरजाल (मायाजाल?)
download: अवतरण?
glamorous :मोहक, आकर्षक
make up - रंगभूषा (बरोबर)
play dough:
bedlam: खूप गडबड-गोंधळ cube: , geomag, tangle: गुंता
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सुधीर काळे's picture

23 Sep 2009 - 9:34 am | सुधीर काळे

१) Prefecture (eg. Chiba prefecture): जिल्हा (अख्ख्या जपानमध्ये ४७ प्रिफेक्चर्स आहेत, त्यावरून जिल्हा हा प्रतिशब्द जवळात जवळ वाटतो. "राज्य" क्षेत्रफळाने फार मोठे वाटते.)
२) Simmer: मंदाग्नीवर उकळणे
३) Get together: स्नेहसंमेलन
४) Tableware: भोजनसंच
५) Sea weed - सागरी गवत (शेवाळे बरोबर वाटत नाही)
६) Porcelain - चिनी मातीच्या वस्तू
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

वर्षा's picture

23 Sep 2009 - 9:44 am | वर्षा

धन्यवाद काळे काका!

सुबक ठेंगणी's picture

23 Sep 2009 - 10:07 am | सुबक ठेंगणी

creative: सृजनशील/ सर्जनशील
helpline: तात्काळ सेवा
glamorous: वलयांकित (?)/जादुई
play dough: चिकणमाती

बाकी माहित नाही.
इइ बेंक्योनि नारिमाशिता. आरिगतो. :)

Nile's picture

23 Sep 2009 - 10:28 am | Nile

क्रिएटीव्ह ला बराच कल्पक शब्द सुचवलात! ;)

सुबक ठेंगणी's picture

23 Sep 2009 - 10:39 am | सुबक ठेंगणी

creative ला कल्पक म्हणायचं की सृजनशील हे मला वाटतं संदर्भावरून ठरतं. उदा. एखादी व्यक्ती (मीच का नको?) कल्पक आहे. असं म्हणू शकलो तरी creative minds चं भाषांतर करताना मात्र (मी तरी )"कल्पक मने" न करता "सृजनशील मने"असं करणं पसंत करीन. किंवा creative ideas चं भाषांतर करताना "कल्पक कल्पना" ऐवजी "सृजनशील कल्पना" करणे चांगले नाही का?

सुधीर काळे's picture

23 Sep 2009 - 10:43 pm | सुधीर काळे

निर्मितीक्षम हा शब्द कसा वाटतो creative साठी?

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

मिसळभोक्ता's picture

23 Sep 2009 - 12:04 pm | मिसळभोक्ता

मिसळपावाचे उद्दिष्ट काय ? ह्या संकेतस्थळाची तत्त्वे काय ? त्याचा इतिहास काय ?

याच साठी केला होता अट्टाहास ? असे तात्याला वाटत असणार !

-- मिसळभोक्ता

वर्षा's picture

23 Sep 2009 - 8:28 pm | वर्षा

नाईल, सुबक दोघांनाही धन्यवाद. माझ्याकडील संदर्भात सृजनशील योग्य ठरतय.

विलास आंबेकर's picture

23 Sep 2009 - 9:03 pm | विलास आंबेकर

मला मराठी तील कैवल्ल्य या शब्दाला मराठी तच काय म्हणतात ते क्रुपया सांगाल का?
हा शब्द "कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर" ह्या गाण्यात खुप वेळा आलाय.
धन्यवाद!

चतुरंग's picture

23 Sep 2009 - 9:11 pm | चतुरंग

एकरुप होणे (देवतेशी/देवाशी तद्रूप होणे).

(अवांतर - धमाल्या तुझ्यासाठी प्रश्न आहे रे बाबा, कैवल्य म्हणजे काय? ;) )

चतुरंग

धमाल मुलगा's picture

23 Sep 2009 - 9:32 pm | धमाल मुलगा

खरंच की :)
मला एका प्रवचनकारबुवांनी सांगितलं होतं कैवल्य म्हणजे आध्यात्मिक आनंद..मोक्ष!

(अर्थात, नावाप्रमाणे त्या त्या माणसानं असु नये ह्या नियमाला आम्हीही जागतोच की ;) )

आपला,
-(कैवल्याचा मागमुस नसलेला नामधारी कैवल्य ;) ) ध.

सुनिल पाटकर's picture

23 Sep 2009 - 10:16 pm | सुनिल पाटकर

Prefecture- प्रांत
Tableware:-मेजोपयोगी

अजय भागवत's picture

4 Oct 2009 - 12:01 pm | अजय भागवत

Tableware:-मेजोपयोगी
चांगला शब्द आहे!

विलास आंबेकर's picture

4 Oct 2009 - 11:25 am | विलास आंबेकर

वर्षाताई,
"कैवल्याच्या चंदण्याला" मधील कैवल्य या शब्दाचा अर्थ कळु शकेल का? मला खुप डोके खाजवुन पण आठवत नाही म्हणुन तुम्हास त्रास देत आहे. धन्यवाद!

चेतन's picture

4 Oct 2009 - 4:45 pm | चेतन

http://misalpav.com/user/383 धमाल मुलगा यांना विचारा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Oct 2009 - 4:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कैवल्य म्हणजे मुक्ती, मोक्ष.

वर्षा's picture

1 May 2010 - 12:43 am | वर्षा

मराठी शब्द सुचवा
Browse = ’चाळणे’ शब्द कसा वाटतो?
Buyer = ग्राहक? (मी कुठेतरी ’खरेदीदार’ असा शब्द वाचला. असा शब्द आहे का मराठीत?)
Real estate = ?
Disclaimer = ?
Post = (उदा. आपण मिपावर टाकतो त्या पोस्ट्स...त्याला काही मराठी शब्द आहे का?)

हुप्प्या's picture

1 May 2010 - 1:33 am | हुप्प्या

रियल इस्टेट : स्थावर मालमत्ता
पोस्ट : प्रकटन, लेख.
बायरः गिर्‍हाईक, ग्राहक.
डिस्क्लेमरः आगाऊ खुलासा, आगाऊ सूचना. सोपा प्रतिशब्द सुचत नाही.

सुधीर काळे's picture

1 May 2010 - 2:44 am | सुधीर काळे

हॅलो वर्षा,
बर्‍याच दिवसांनी दिसलीस. कशी आहेस?
काका
सुधीर काळे, सध्या मुक्काम विठ्ठलाच्या पंढरपुरीत (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

वर्षा's picture

6 May 2010 - 8:19 am | वर्षा

धन्यवाद हुप्प्या.

वर्षा's picture

6 May 2010 - 8:30 am | वर्षा

वॉरंटी आणि गॅरंटीमध्ये फरक काय? दोन्हीला मराठीत ’हमी’ म्हणतात ना? की काही वेगवेगळे शब्द आहेत?

लॉग-इन व साईन-इन मध्ये फरक काय? दोन्हींचा अर्थ ’प्रवेश करणे’च होतो ना?
इंग्रजीत ’Terms & Conditions' असतात त्याला मराठीत काय म्हणतात? बऱ्याच ठिकाणी ’नियम व अटी’ वाचलं आहे. पण Terms & Conditions या दोन्हींचा अर्थ फक्त ’अटी’ च होतो ना? की इथे 'टर्म्स' हे कालावधी (period) या अर्थाने असतो?

बाकी, खालील शब्दांना मराठी शब्द हवे आहेत:

To promote (eg. Promotional ad) = ?

Blond (Hair) = सोनेरी केस? (की ब्लॉंडच म्हणावे?)

Rule of thumb = ?

Version (e.g full version of a program)

Co-branding = ?

Cashier's cheque = ?

Keyword = ?

Alphanumeric = ?

Personalize = (eg. Personalize your email)

Salary 'range' = यात rangeला काय म्हणावे?

Username = काही ठिकाणी ’सदस्यनाम’ लिहिलेले पाहिले, ते बरोबर आहे का? खरं सदस्य म्हणजे member. बाकी ’वापरकर्ता’, उपभोक्ता’, ’उपयोगकर्ता’ हे शब्द userसाठी वापरलेले पाहिले आहेत पण ’वापरकर्त्याचे नाव’ इ. जरा लांबलचक वाटते.

आभारी आहे!