माझ्याकडे गाजर हलवा करायला आणलेला खवा शिल्लक आहे, तरी झटपट करता येतील अशा रेसिपी सूचवाव्यात अशी विनंती.
बऱ्याचदा आपण एखादा पदार्थ करण्यासाठी काही विशिष्ट साहित्य आणतो पण ते पूर्ण वापरले जात नाही तर इतर कुणाला ह्या धाग्यावर असे प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावेत, इथल्या पाककलानिपुण सदस्यांच्या सूचनांचा माझ्यासारख्या नवशिक्या स्वैपाकघरात लुड़बुड करणाऱ्याना फायदा होईल आणि सामान वाया जाण्याचे दुःखही होणार नाही.
धन्यवाद
प्रतिक्रिया
13 Oct 2016 - 4:05 am | रेवती
किती खवा शिल्लक आहे त्यावर अवलंबून आहे.
खव्याच्या पोळ्या, साटोर्या, गुजीया, पेढे, बर्फी, गुलाबजाम, खव्याचा केक, रवा + खवा लाडू असे माहित आहे नैतर मग पुन्हा हलवा करायचा.
13 Oct 2016 - 8:46 am | chitraa
उरलेल्या खव्याचे भरपूर गुलामजामुन करा.
मग तेही उरतील.
मग उरलेल्या गुलामजामुनचे कोफ्ते करुन एखाद्या ग्रेवी भाजीत टाका.. कोफ्ते तयार.
13 Oct 2016 - 9:24 am | अजया
मलई कोफ्ता भाजी आवडत असेल तर कमी खवा असताना करता येईल.उपासाच्या कचोर्या पण खवा वापरून करता येतात.सानिकाची पेढे रेसिपी पण करुन बघण्यासारखी आहे.कोणताही फ्लेव्हर घालुन खवा बर्फी करता येईल.
13 Oct 2016 - 11:16 am | तुषार काळभोर
याच्याविषयी सांगता येईल का??
प्लीज, प्लीज... :)
13 Oct 2016 - 1:35 pm | अजया
मलई कोफ्ता
13 Oct 2016 - 9:52 am | टवाळ कार्टा
अजून थोडा गाजर हलवा बनवा
13 Oct 2016 - 11:07 am | मदनबाण
गुलाबजामचा पाक आठवला !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India can’t ban Chinese products but individuals can decide not to buy: Manohar Parrikar
13 Oct 2016 - 1:03 pm | स्वाती दिनेश
बाणा, मलाही पाकच आठवला. :)
खवा उरला तर पेढे, बर्फी करता येईल. गाजरहलवा झाला, दुधीहलवा करता येईल. साटोर्या, खवा घालून रवानारळ लाडू.. अनेक पदार्थांचे ऑप्शन्स आहेत की. नाहीतर दिवाळीपर्यंत खवा फ्रिज करून ठेवा, करंज्यात घालता येईल किवा यातले कोणतेही पदार्थ दिवाळीत करता येतील.
स्वाती
13 Oct 2016 - 12:21 pm | कंजूस
शेवटी काय केलं ते लिहा.
आमच्याकडे असले पदार्थ कधी काय करावं याचं अशी सीमा गाठत नाहीत.गायब होऊ नयेत म्हणून वॅाचमन ठेवावा लागतो.
१) थोडी साखर घालून पॅटीसएवढे पेढे करा तव्यावर खरपूस पॅटीसप्रमाणे भाजा.२)लाल भोपळ्याच्या किसात घालून केशरी वड्या होतील.
13 Oct 2016 - 12:32 pm | यशोधरा
नुसता खा! हवी तर वरुन पिठीसाखर भुरभुरवून खा.
7 Nov 2016 - 3:09 pm | Nitin Palkar
13 Oct 2016 - 12:42 pm | एस
मला द्या.
13 Oct 2016 - 12:48 pm | यशोधरा
=)) हे भारी!
13 Oct 2016 - 1:25 pm | बाजीप्रभू
मी दिलेला प्रतिसाद तुम्ही वाचेपर्यंत "खवा" शिल्लक असेल कि माहित नाही, पण वरील सगळे उपाय शक्य नसतील तर "खवा" हलवायाला परत द्या... घेतला तर घेतला. हाकानाका. कारण वरील सगळ्या उपायांत "खवा" संपवायला तुम्ही ज्या इतर गोष्टी घ्याल त्या संपणार नाहीत, मग परत "खवा संपला आता गाजर उरलेत त्याचं काय करू?" नावाचा दुसरा धागा येईल.
13 Oct 2016 - 2:18 pm | पाटीलभाऊ
+११११
13 Oct 2016 - 1:41 pm | माम्लेदारचा पन्खा
"खवा कसा वाचवावा" हा धागा काढावा लागेल !
13 Oct 2016 - 2:07 pm | नाखु
पळवून कसे लावायचे या करिता उगा काहीतरीच धागा काढावा लागेल ते वेगळेच !
13 Oct 2016 - 2:30 pm | सूड
खव्याच्या पोळ्या करा.
13 Oct 2016 - 2:36 pm | अभ्या..
त्या खव्याचा एक हत्ती बनवा. त्याची हळदेकूंकू वाहून पूजा करा. त्या पूजेसाठी शेजारपाजारी बोलवा. त्यांना आमच्याइथे मिपापंचांगाप्रमाणे गजखवा पौर्णिमा आहे म्हणून सांगा. उरलेला खवा त्यांना प्रसाद म्हनून वाटा. अजुन जास्त मेंबर आल्यास त्या हत्तीचा ह्याप्पी बड्डे करा.
13 Oct 2016 - 4:35 pm | सुखीमाणूस
साटोरी, ओला नारळ + खवा करन्जी
13 Oct 2016 - 5:31 pm | दिलीप सावंत
बासुंदी बनवताना पण तूमी तो खावा उपयोगात आणू शकतात. अधिक मराठी पाककृती साठी भेट द्या माझापपेर ला.
13 Oct 2016 - 8:15 pm | इना
सर्वांना धन्यवाद, खव्याच्या पोळ्या आणि पेढ़े ट्राय करणार आहे. हलवा प्रकार आता पुन्हा लगेच नाही खायचा आणि लाडू करंजी आता दिवाळीला करणे होईल त्यामुळे ते नाही करता येणार. या आठवड्यात एक्सपायरी डेट आहे त्यामुळे फ्रिज करून ठेवता येणार नाही. सर्व सूचनांचे आभार :)
13 Oct 2016 - 8:26 pm | माम्लेदारचा पन्खा
अजून उपयोगी सल्ले आलेसुध्दा नाहीत आणि दाराला कुलूप लावलं इतक्यात ?
13 Oct 2016 - 8:44 pm | इना
नाही हो, कुलुप कशाला लावू? अजून सल्ले असतील तर त्यांचे स्वागत आहे, इतर कुणाला उपयोग होउ शकतो.
13 Oct 2016 - 9:01 pm | इना
खव्याच्या पोळीची रेसिपी आहे का इथे?
13 Oct 2016 - 9:55 pm | अजया
खव्याची पोळी
13 Oct 2016 - 11:56 pm | इना
धन्यवाद! फारच सुबक झाल्या आहेत पोळ्या, अशा जमतील की नाही काय माहीत :)
21 Oct 2016 - 11:54 am | कैलास अंकुश सोनावणे
बसुन्दि छान होइल