साहित्य
३५ ते ४० हिरव्या मिरच्या
२० ते २५ लसणीच्या पाकळ्या
१ चमचा जिरं
एक मोठी मूठ कोथिंबीर
१ मोठा चमचा तेल
एक चिमूट साखर
मीठ, चवीनुसार
कुंडीत लावलेल्या मिरचीच्या झाडाला भरपूर मिरच्या येतात, मग त्याचा असा अधून मधून खर्डा करून ठेवतो. हा खर्डा साधारण एक ते दिड आठवडा टिकतो (खराब होत नाही, त्या आधीच संपवला जातो)
कृती
मिरच्या स्वच्छ धुवून, कोरड्या करून घ्याव्या. त्याचे बारीक तुकडे करावेत. एक पॅन गॅस वर ठेऊन, मिरच्या आधी ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर कोरड्या भाजून घ्याव्या. मिरच्यांना थोडा चटका लागला, कि थोड्या बाजूला करून, १ चमचा तेल पॅन मध्ये घालावा. तेल थोडं तापलं, कि मिरच्या तेलात एकदा परतून घ्या. आता पॅन मध्ये लसणीच्या पाकळ्या टाकून, हे मिश्रण अजून थोडा वेळ परतून घ्यावे (साधारण २ ते ५ मिनिटे).
मिरच्या आणि लसूण बाजूला सरकवून, पॅन मध्ये जिरं टाकावा. तेलात जिरं तडतडलं, कि मग ते मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्यात मिसळून घ्या. चवीनुसार मीठ, एक चिमूट साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण थंड करायला ठेवा.
हे मिश्रण आता आपल्याला खलबत्यात कुटून घायचंय. खलबत्ता नसेल, तर मग मिक्सर मधून ह्याची जाडसर भरड काढून घ्या, पण खर्ड्याची अस्सली मज्जा हि कुटूनच आहे.
अर्थातच, भाकरी बरोबर खायला घ्या, किंवा मग ह्याच मस्त खर्डा चिकन करा!
प्रतिक्रिया
8 Oct 2016 - 8:18 am | कंजूस
झाड,खरडा,फोटो सर्वच छान.
8 Oct 2016 - 8:39 am | त्रिवेणी
आता कस आपली आवडती रेसिपी.भाकरी कुठय.
8 Oct 2016 - 1:55 pm | अनन्न्या
भाकरी हवीच सोबत
8 Oct 2016 - 2:27 pm | यशोधरा
फोटो मस्त देखणे आलेत!
8 Oct 2016 - 6:53 pm | रेवती
ग्रेट दिसतोय खर्डा.
8 Oct 2016 - 7:10 pm | माम्लेदारचा पन्खा
येकच नम्बर राव...
8 Oct 2016 - 8:47 pm | मोदक
झक्कास, यात आलं घालत नाहीस का?
8 Oct 2016 - 8:47 pm | मोदक
झक्कास, यात आलं घालत नाहीस का?
9 Oct 2016 - 8:57 pm | केडी
नाही, खरड्यात आलं घालत नाही. तसंही मिरच्या तिखट असतात, आल्याच्या उग्रपणा अजून तिखटपणा वाढवेल.
9 Oct 2016 - 10:57 pm | आनंदी गोपाळ
आल्याचा तिखटपणा घशाजवळ जाणवतो. मिरचीचा जिभेच्या शेंड्याजवळ.
तिखटपणाची डेप्थ जाणवेल आलं प्लस मिरची कॉम्बो वापरून. करून पहा. भारी लागतं ते पण.
9 Oct 2016 - 7:39 am | नूतन सावंत
झक्कास.
9 Oct 2016 - 3:23 pm | आनंदी गोपाळ
हा झाला खर्डा. सजवलेला फोटो नाही. चिकन तिकडे टाकलंय. सी सॉल्ट आहे. साखर वापरलेली नाही. मिरची मध्यम तिखट होती.
9 Oct 2016 - 4:39 pm | केडी
सलाम तुम्हाला, आणि सी-सॉल्ट म्हणजे धमाल आयडिया! जियो, दर्दी आहात, भेटलाच पाहिजे तुम्हाला लवकर!
10 Oct 2016 - 8:58 pm | आदूबाळ
लय भारी दिसतंय राव!
सी सॉल्ट म्हणजे नेमकं काय?
13 Oct 2016 - 9:01 am | प्रचेतस
खडे मीठ.
9 Oct 2016 - 10:16 pm | चाणक्य
.
9 Oct 2016 - 10:24 pm | पैसा
जबरदस्त प्रकार!
9 Oct 2016 - 11:37 pm | उल्का
फोटो मस्त आले आहेत.
आवडता प्रकार.
10 Oct 2016 - 8:52 pm | सूड
आमचे जुने शेजारी लसूण मिरच्या लोखंडी तव्यात भाजून त्याच तव्यात पितळी तांब्याच्या बुडाने ते मिश्रण फेसत असत. तो खर्डा अप्रतिमच असायचा.
11 Oct 2016 - 7:07 am | विवेकपटाईत
खर्डा आवडला. एक प्रश्न चित्रांत दिलेली वेबसाईट आपलीच आहे का? (नंतर कुणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे).
11 Oct 2016 - 1:07 pm | केडी
हो, गेली ३ वर्ष मी माझ्या फूड ब्लॉग वर माझे प्रयोग टाकत आहे
http://www.EatLiveCook.com
11 Oct 2016 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर
ठेचा आवडातोच. पॅन मध्ये मिरच्या, तेल, लसूण, जीरं ह्या क्रमाने पदार्थ टाकण्याचे कांही खास प्रयोजन आहे का?
सर्वसाधारणपणे, आख्या मिरच्या निखार्यावर किंवा थेट ज्वाळेवर भाजून घेतात आणि तेलावर जिरे परतून (ते तडतडल्यावर) त्यात लसूण मिसळून परतून भाजलेल्या मिरचीचे तुकडे करून परतून घेतले जातात आणि सर्वात शेवटी कोथिंबिर मिसळली जाऊन खलबत्यात खर्डा कुटला जातो. पण आपल्या क्रमवारीने पदार्थ पॅन मध्ये मिसळल्याने कांही खास फरक पडणार असेल तर त्याप्रमाण बनवायला नक्कीच आवडेल.
11 Oct 2016 - 2:23 pm | केडी
तुम्ही म्हणताय ती पद्धत सुद्धा योग्य आहे, पण एकाच पॅन मध्ये सगळं उरकून घायचे म्हणून मी अश्या पद्धतीने करतो. मिरच्या वेगळ्या नं भाजता पॅन मध्येच आधी भाजून, मग तेलात जिरं घालून करून घेतो.
अर्थातच निखार्यावर भाजून घेतलेल्या मिरच्या आणि लसणीच्या खरड्याची चव केव्हाही भारीच!
11 Oct 2016 - 6:28 pm | chitraa
छान
12 Oct 2016 - 3:16 pm | सविता००१
झक्कास रेसिपी.
सी-सॉल्ट ची आयडिया तर अजूनच मस्त आहे
13 Oct 2016 - 12:55 am | रुपी
मस्तच!
हा प्रतिसाद फोटोतल्या चाकूला घाबरुन दिला नाहीये ;)
14 Oct 2016 - 10:14 am | केडी
लोल..... :-))
26 Oct 2016 - 2:14 pm | दक्षिणा
पदार्थ नेहमीचा आणि सवयीचा असला तरीही तुम्ही टाकलेले फोटो अतिशय कल्पक आहेत.