रव्याची कचोरी

इशा१२३'s picture
इशा१२३ in पाककृती
4 Oct 2016 - 4:28 pm

K

साहित्य :
सारणासाठी :- बटाटे उकडलेले २
मटार ,गाजर,लाल,हिरवी व पिवळी ढब्बु मिरची,गाजर,कांदा प्रत्येकी :एक छोटी वाटी
आले :अर्धा चमचा
मिरच्या :आवडीप्रमाणे बारीक तुकडे
चाट मसाला :अर्धा चमचा
धणे पुड ,गरम मसाला:अर्धा चमचा
कोथिंबीर व लिंबुरस
जिरे,मीठ,तेल.

S

आवरणासाठी साहित्य :बारिक रवा :एक वाटी
पाणी :दोन वाट्या
ओवा :२ चिमूटभर
S

कृती :प्रथम कढईत तेल तापवून जिरे हळदीची फोडणी करावी.मिरचिचे तुकडे व आले घालावे.त्यात कांदा गुलाबी परतून घ्यावा.कांदा परतून झाल्यावर त्यातच वाफवलेले मटार,ढब्बु मिरच्या,वाफवलेले मटार, गाजर घालून परतावे.त्यात चाटमसाला,धने पावडर,तिखट (हे मि मिरचि कमि वाटल्याने ऐनवेळी टाकले)आणि मीठ घातले.
त्यातच उकडलेला बटाटा कुस्करून टाकला.आता परत सगळे एकत्र करुन परतले. शेवटी कोथिंबीर व लिंबू पिळून एकत्र केले.हे सारण गार होण्यास ठेवावे.

R

आता आवरणासाठि दोन वाट्या पाणी उकळत ठेवावे.त्यात उकळी आल्यावर एक वाटि रवा आणि ओवा घालावे.छान एकत्र करुन वाफ आणावी व गार होण्यास ठेऊन द्यावे.गार झाल्यावर जरा मळून त्याचे गोल करावेत.

Sahity
आता हातावर याची एक पारिकरुन त्यात सारण भरावे. हलकेच बंद करुन कचोरी तयार करुन घ्याव्यात.

Ss

कढईत तेल चांगले तापवून घ्यावे. नंतर आच कमी करुन एक एक कचोरी बदामी रंगावर तळून घ्यावी.

Kachori

गरमागरम, खुसखुशित कचोरि चटणी,सोस कशाबरोबरही छान लागते!

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

4 Oct 2016 - 4:30 pm | महासंग्राम

रावस पाककृती तोंपासु.

अजया's picture

4 Oct 2016 - 4:38 pm | अजया

अहाहाहाहाहाहा.....

कविता१९७८'s picture

4 Oct 2016 - 4:39 pm | कविता१९७८

यम्मी

सूड's picture

4 Oct 2016 - 4:39 pm | सूड

फोटो दिसेनात!

स्मिता चौगुले's picture

4 Oct 2016 - 5:59 pm | स्मिता चौगुले

मलाही

अरेच्या! असे का होतय? काहींना दिसताहेत काहींना दिसेनात.

वाह! हा प्रकार कधी करून नाही पाहिला. मुलाला उपम्याचा कंटाळा आलाय. आता कचोर्‍या करून पाहते.

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2016 - 9:15 pm | पिलीयन रायडर

उपम्याचा मलाही कंटाळा आलाय. खुशखुशीत लागत असणार आणि ह्या कचोर्‍या!
ह्या रेसेपीत काही फसण्यासारखे दिसत नसल्याने कचोर्‍या करुन पहाण्यात येतील. ;)

नाही कसं? तो रवा करपू शकतो :प आणि मी यायच्या आत सराव कर २-३ वेळा.

रेसिपी भारी हो इशा तै ! कधी येऊ फ्लॉवर विरहीत कचोर्‍या खायला (पिरा ने मुद्दाम करपवुन खायला घातलं तर बॅक अप असलेला बरा) ?

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2016 - 11:13 pm | पिलीयन रायडर

खरंय. जर बेसन भात करपु शकतो तर रव्याची कचोरी जळु तरी शकतेच. पण मी प्रयत्न करेन जमवायचा!

पिराबाई रेसिपि करणार असाल तर लेख हवाच मग ती कशी का होवो.

(फकस्त मला ब्लेम द्यायचा नाहि.स्रुजा आहे ना, तिला देऊ शकतेस(हि स्वतः पोळ्या करायला लागेस्तोवर तिच्यावर कसलाही ब्लेम करता येईल)

कर तु करच!

इशा१२३'s picture

5 Oct 2016 - 12:31 pm | इशा१२३

अगबाई खरच की यात फल्ॊवरहि घालता येईल!

हवतर भोपळा,पडवळ नाही घालणार.बास.

अगगगग... पुणेरी आमंत्रण आहे हे ! आमंत्रण देतानाच लोकं येणार नाहीत अशी सोय करायची ;)

इशा१२३'s picture

6 Oct 2016 - 9:30 am | इशा१२३

सोय पाहिली तरि अस,तरि येच!

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Oct 2016 - 11:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्या ! तुमचा तुमच्या कर्तबगारीवर पुरेसा विश्वासच नाय ! काय हे :) ;)

(पुढच्या फसलेल्या प्रयोगाचा खुसखुशीच लेख वाचायला मिळावा ही सकारात्मक इच्छा यामागे आहे हो. दुसरे काssssssयबी नाssssssय :) )

दिपक.कुवेत's picture

5 Oct 2016 - 11:43 am | दिपक.कुवेत

हि प्रति मोदकाची उकड आहे. रव्याची उकड हलके गरम असतानाच नीट मळली नाहि तर एक तर त्याची पारी होणार नाहि आणि त्याला तडे जाण्याची शक्यता फार आहे. हा पण तुझ्या ब्लेमगेम साठि जरुर ट्राय कर....आम्हि वाचायला उत्सुक आहोत.

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2016 - 7:11 am | पिलीयन रायडर

कुणी माझ्या बापड्या नवर्‍याचाही विचार करा की रे!!

स्वाती दिनेश's picture

4 Oct 2016 - 5:45 pm | स्वाती दिनेश

कचोरी मस्त दिसतेय, तोंपासु..
स्वाती

पद्मावति's picture

4 Oct 2016 - 7:58 pm | पद्मावति

सूपर दिसताहेत कचोरी.

कचोरी मस्त दिसतेय. पण कटलेटही शॅलो फ्राय करतांना विरघळवणे,मोडणे या सगळ्यात एक्सपर्ट असल्याने करायची हिंमत नाही आहे.

अग काय मस्त दिसतेय कलरफुल न वेगळी रेसेपी मस्त मस्त मस्त!

भुमी's picture

4 Oct 2016 - 8:23 pm | भुमी

फारच सुंदर,मस्त दिसताहेत कचोरी

भुमी's picture

4 Oct 2016 - 8:23 pm | भुमी

फारच सुंदर,मस्त दिसताहेत कचोरी

यशोधरा's picture

4 Oct 2016 - 8:25 pm | यशोधरा

भा हा री ही ही!

नूतन सावंत's picture

4 Oct 2016 - 10:20 pm | नूतन सावंत

इशा,वन मील डिश म्हणूनही वापरता येईल की,ही राव कचोरी.झकास रंगबेरंगी दिसतेय.

पैसा's picture

4 Oct 2016 - 10:24 pm | पैसा

एकच नंबर!

वा.. मस्त.. इथे अचानक थंडी पडलीये, अशी कचोरी खायला मजा येईल या हवेत :)

रातराणी's picture

4 Oct 2016 - 11:00 pm | रातराणी

यम्मी!

विशाखा राऊत's picture

5 Oct 2016 - 2:42 am | विशाखा राऊत

ओह इट लुक सो यम्मी :) मस्तच

सपे-पुणे-३०'s picture

5 Oct 2016 - 8:50 am | सपे-पुणे-३०

मस्त गं! सोपी वाटतेय रेसिपी आणि फसायची शक्यता पण कमी वाटतेय.

नरेश माने's picture

5 Oct 2016 - 11:24 am | नरेश माने

तोंपासु..........

दिपक.कुवेत's picture

5 Oct 2016 - 11:45 am | दिपक.कुवेत

अत्यंत खुशखुशीत दिसत आहेत कचोर्‍या. सकाळी सकाळी असले फोटो ऑफिसात बसून पाहणे हा निव्वळ अत्याचार आहे.

नीलमोहर's picture

5 Oct 2016 - 12:44 pm | नीलमोहर

वेगळी रेसिपी

सामान्य वाचक's picture

5 Oct 2016 - 12:54 pm | सामान्य वाचक

दिसत आहेत

अनन्न्या's picture

5 Oct 2016 - 1:59 pm | अनन्न्या

वाखू साठवतेय केल्या की फोटो डकवीन!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2016 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

जबार परकार हाय!
बायकूला कराया लावनार मंजी लावनार.

मृत्युन्जय's picture

5 Oct 2016 - 4:27 pm | मृत्युन्जय

जबरा दिसताहेत. पण या खुश्खुशीत होतात की मोदकाप्रमाणे /कटलेप्टप्रमाने मऊ होतात?

ओ भाऊ,चांगल्या खुसखुशित होतात बर :)

पूर्वाविवेक's picture

6 Oct 2016 - 3:11 pm | पूर्वाविवेक

खुसखुशीत आणि आगळावेगळा प्रकार.