वांग्याची घोटलेली भाजी

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in पाककृती
4 Oct 2016 - 2:07 pm

मागच्या आठवड्यात सांगलीला जाणे झाले.तर तिथली हिरवी वांगी घ्यायचीच होती.भिलवडीच्या बाजारात मिळाली वांगी. त्यापुर्वी मागच्या दोन तीन दा जावून ही वांगी दिसली नव्हती म्हणून ख फ वर विचारुन झाले होते वांगी कुठे मिळतील तेव्हा नेहमी प्रमाणे कंजुस काका मदतीला धावून आले.
तर अशी सांगलीची वांगी आणि खान्देशी पध्दतीची ही भाजी.
साहित्य-
वांगी- एक किलो,
हिरवी मिरची १० ते १५,
लसुण- १० ते १५ पाकळ्या,
तेल-अर्धी वाटी,
जि,,मोहरी आणि कढिपत्ता,
मीठ- चवीप्रमाण,,
हळद,
पाणी-अर्धा ग्लास.
ृकती-
वांगी शक्य तितकी बारीक चिरुन घ्यावीत.
थोड्या जास्त तेलाची फोडणी करुन त्यात मोहरी,जिर चांगले तडतडू द्यावे मग कडिपत्ता हळद टाकावी.आणि लसून मिरचीचा खर्डा टाकावा.
मिरची छान परतली गेली की वांग्याच्या फोडी टाकाव्या.पाच मिनिटांनी अर्धा ग्लास पाणी टाकून झाकण ठेऊन शिजू द्यावी.
थोडयावेळाने वरण घोटायच्या रवीने चांगली घोटून घ्यावी.परत वांगी पुर्ण शिजून झाल्यावर मीठ टाकून अजुन घोटून घ्यावी.
फोटो आपल्या गणपा दा, सानिका आणि के डी दा सारखे भारी नाही काढता येत तरी मंडळी गोड मानून घ्या.
वांगी
.
.
वांगी

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

4 Oct 2016 - 2:42 pm | सामान्य वाचक

शेवटी टाकलिस बै रेसिपी

करून बघते

Btw सांगली मिरज ला वांगी प्रत्येक भाजीवाला कडे असतात ग

कविता१९७८'s picture

4 Oct 2016 - 2:48 pm | कविता१९७८

वाह , चविष्ट असणार

मिरच्या एवढ्या पाहून ठसका लागतोय.या वांग्याची शेंगदाणे-तिळकुट टाकलेली घट्ट रस्सा भाजी करतात.एक काटेरी वांगी प्रकार कमी दिसतो.आजकाल गावच्या बाजारांतही शहरी भावानेच शेतमाल मिळतो( त्यांनाही फ्रिज टिव्ही कुठे स्वस्तात मिळतात?)

पंधरा मिरच्या म्हणजे अंमळ कमीच झाल्या नै? रेशिपी मस्त!!

इशा१२३'s picture

4 Oct 2016 - 3:22 pm | इशा१२३

हेच म्हणणार होते.मिरच्या,लसणाचे प्रमाण पाहूनच जिभ भाजलि.
बाकी रेसिपि मस्त.

रेवती's picture

4 Oct 2016 - 3:42 pm | रेवती

घोटलेली भाजी असते हे पहिल्यांदाच समजले. छान झाली असणार.

भाकरी बरोबर छान लागेल हि भाजी. मस्त! थोडीशी अरेबिक/इजिप्शियन बाबा गनुष ची आठवण करून देणारी (हे बाबा गनुष असेच घोटलेले/प्युरी केलेले असते).

पैसा's picture

4 Oct 2016 - 4:11 pm | पैसा

भरीतासाठी वांगे आधी भाजून मग त्याचा गर वापरतो. इथे पातेल्यात फोडणीवर गर घोटला आहे. मस्त लागत असणार. एक किलोला १५ मिरच्या? मी पाव किलो भाजीत एक मिरची घालते. =))

त्रि ने तिच्या स्वभावाइतका ठसका लावलेली भाजी वाचायला फार आवडली!

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीया वाचून खरच वाटायला लागलय की मी जास्त मिरची खाते का?? मी खुपदा प्रयत्न केला कमी तिखट खायचा पण मग जेवल्यासारखच वाटतच नै.खान्देशी लोकांची सवय आमची सुटता सुटत नै तिखट खायची आणि भाजीवर वरुन कच्च तेल खायची ही.

गणामास्तर's picture

4 Oct 2016 - 4:41 pm | गणामास्तर

जास्त बिस्त काय नाय. .बरोबरंय प्रमाण मिरचीचे. वरून लाल तिखट आणि काळा मसाला घातला तरी चालतंय.
तसेही भरीत किंवा हि अशी भाजी खाताना वरून कच्च तेल पाहिजेचं.

बोका-ए-आझम's picture

4 Oct 2016 - 5:09 pm | बोका-ए-आझम

हे म्हणायचं खाणं! या बरोबर खुरासन्याची चटणी अाणि तेल हे पाहिजेच बरं का! किंवा मग झणझणीत आंबा लोणचं! श्रश्रश्रश्र

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीया वाचून खरच वाटायला लागलय की मी जास्त मिरची खाते का??

हो हो ;)
तिखटीची रेसिपी पण द्या हं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Oct 2016 - 4:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक किलोला १५ मिरच्या आणि लसणीच्या १० ते १५ पाकळ्या ??? वाचूनच जीभा भाजली :)

तरीही, जरा कमी तिखट टाकून खायला मस्त लागेल असे वाटते.

एस's picture

4 Oct 2016 - 5:07 pm | एस

हुश्श हाश्श हुश्श!

वेल्लाभट's picture

4 Oct 2016 - 5:29 pm | वेल्लाभट

लव्हली.

खान्देशी भरीत करतो आम्ही घरी.. हे जरा वेगळं दिसतंय. त्यात पातीचा कांदा असतो.

स्वाती दिनेश's picture

4 Oct 2016 - 5:49 pm | स्वाती दिनेश

भाजी छान दिसतेय, तिखट बघून सगळ्यांसारखेच झाले.
मिरच्यांचे प्रमाण एक चतुर्थांश करून भाजी केली जाईल.
स्वाती

अनन्न्या's picture

4 Oct 2016 - 7:09 pm | अनन्न्या

पण मला वांगं आवडत नाही त्यामुळे माझ्या तावडीतून ते वाचलेय.

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2016 - 9:12 pm | पिलीयन रायडर

अगदी अगदी!! मलाही वांग आवडत नाही. पण इथे असे गार वारे सुटलेत की असं झणझणीत वांग करुन पहावं का असे फितुर विचार मनात येत आहेत!

१५ मिरच्या घालुन शक्य नाही बै त्रि.. पण प्रयत्न करुन बघेन..

पद्मावति's picture

4 Oct 2016 - 7:52 pm | पद्मावति

मस्तं पाककृती.

वांग आपलं ऑल टाईम फेव्हरिट आहे नक्की करून बघणार पण मिरची कमी घालून :)

भुमी's picture

4 Oct 2016 - 8:29 pm | भुमी

मी तर अर्धी मिरची टाकून ट्राय करू म्हणतेय

लय भारी. यात टोमॅटो टाकला, तर भाजी थोडी का होईना सुसह्य होईल. (निदान माझ्यासारख्यांसाठी तरी)
मॅशर वापरला तर आणखीन चांगली घोटता येईल..

नूतन सावंत's picture

4 Oct 2016 - 10:14 pm | नूतन सावंत

त्रि, मी एका किलोला सहा मिरच्या आणि सहा लसू णपाकळ्या घालून करून पाहीन.खमंग दिसतेय पण भाजी.

अहाहा! खंग्री भाजी! भाकरी करा ओ तै दोन लगोलग :)

मस्त.. माझा आजचा जेवणाचा बेत - वांगी भाकरी :)

विशाखा राऊत's picture

5 Oct 2016 - 3:06 am | विशाखा राऊत

१५ मिरच्या..त्रिके लिए ये तो नॉर्मल है ना ;)
झणझणीत रेसेपी

सपे-पुणे-३०'s picture

5 Oct 2016 - 8:43 am | सपे-पुणे-३०

वेगळ्या प्रकारची भाजी.मी असं घोटून केलेलं भरीत खाल्लं होतं. नक्की करून पाहीन पण जास्तीत जास्त २ मिरच्या घालून.

अश्विनी वैद्य's picture

6 Oct 2016 - 2:20 am | अश्विनी वैद्य

व्वा वेगळ् काहितरी...! छान रेसिपी आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Oct 2016 - 9:46 am | कैलासवासी सोन्याबापु

ही भाजी एक प्रचंड मोठा वीकपॉईंट आहे, सदर भाजी ती ही चुलीवर शिजवलेली ती ही डीसेंबरच्या थंडीत, अहा हा हा हा हमीअस्तु हमीअस्तु हमीअस्तु, त्यात ही जर जेवण चुली पुढे बसुनच होणार असले तर डब्बल हमीअस्तु!, अश्याच एका हमीअस्तु प्रसंगी म्हातारीच्या हातची असली भाजी, १२ कळण्या भाकरी अन दोन लोटे ताक (मठ्ठा) उडवल्याची एक बालसुलभ आठवण जागृत झाली, आता वांगी शोधणे आले म्हणे मी

Maharani's picture

6 Oct 2016 - 1:31 pm | Maharani

Ekadumach zanzanit

पूर्वाविवेक's picture

6 Oct 2016 - 3:09 pm | पूर्वाविवेक

खमंग दिसतेय. याची दुसरीही व्हर्जन्स आहेत का? मी याआधी हि भाजी जळगावच्या शेजाऱ्यांकडे खाल्ली होती. पण ती पावभाजीप्रमाणे पातळ होती. मेबी त्यात बटाटा व टोमॅटो पण असावा.

त्रिवेणी's picture

6 Oct 2016 - 6:33 pm | त्रिवेणी

नाही बटाटा,टमाटा ट‍ाकून पाप लागते.थोडी पातळ असू शकते ग.

सुखीमाणूस's picture

6 Oct 2016 - 6:37 pm | सुखीमाणूस

मस्त पाकक्रूती
इतक तिखट खाल्ल तर सकाळी आगीचा बन्ब बोलवावा लागेल
त्रिवेणी म्हणूनच तुमच्या साबा तुमच्या हातच खात नसणार.ह घ्या.(ref ममो धागा १)

त्रिवेणी's picture

6 Oct 2016 - 8:08 pm | त्रिवेणी

नाय हो नाय मनावर घेत.
त्या उच्चवर्णिय आहेत न म्हणून त्यांना नाय चालत माझ्याहातच.म्हणून तर मोर्चे करावे लागतात न आम्हाला.

विवेकपटाईत's picture

6 Oct 2016 - 7:05 pm | विवेकपटाईत

खाताना डोळ्यांतून पाणी काढण्यातच खरी मजा आहे. मस्त आवडली.