गाभा:
नमस्कार
नाट्यसंगीत हे मराठी भाषेचे एक चिरंतन लेणे आहे . १८८५ सालापासून आजतागायत १३२ वर्षे मराठी ऱसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारा एक विलक्षण संगीतप्रकार म्हणजे नाट्यसंगीत .
नाट्यसंगीताचा आणि मराठी संगीत नाटकांचा टी इतिहास विकास अन सद्य:स्थिती यांचा आढावा घेणे / चर्चा करणे आणि अप्रतिम नाट्यगीतांचा खजिना रसिकजनाना उपल्ब्दह होइल यासाठी एक ग्रूप असावा असे वाटते . इच्छुकानी व्यनि करावा
धन्यवाद
प्रतिक्रिया
30 Sep 2016 - 8:36 am | उपयोजक
आपल्या उपक्रमास अनेकानेक शुभेच्छा.
3 Nov 2016 - 6:15 pm | शशिधर केळकर
अभिषेकीबुवांचे एक नाट्यगीत काही काळापासून शोधतो आहे.
नाटकाचे नाव वगैरे काहीच माहीत नाही.
गाण्याचे शब्द - सांग प्रिये तुज काय हवे, मम हृदयाची तूच स्वामिनी, सांग हवे तुज काय नवे!
बहुतेक दरबारी मधली रचना आहे.
तुमच्या खजिन्यात हे गाणे आहे का? असेल तर उपलब्ध करून देता येण्याजोगे आहे का?
धन्यवाद!
3 Nov 2016 - 9:57 pm | मंदार कात्रे
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sang_Priye_Tuj_Kaay
सांग प्रिये तुज काय हवे ते ?
मम हृदयाची तूच स्वामिनी
काय हवे तुज सांग नवे ?
तू तेजाची मूर्त देवता
वीरश्रीची समूर्त माता
होईल दशरथ त्रिभूवन पालक
प्रिय कैकयी तुझ्यासवे
गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - पं. जितेंद्र अभिषेकी
नाटक - कैकयी
गीत प्रकार - नाट्यगीत
ऑडियो क्लिप या साइट वर आहे