गाभा:
मागील धागा मूळ उद्देशातून भटकला म्हणून परत काही प्रश्न
1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ?
2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ?
3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ?
4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ?
5) कसाब ला फाशी नेमक्याच वेळी झाली तसे उरण मध्ये ह्याचवेळी अतिरेकी आले हे शक्यता असू शकत का ?
मुख्य
6)
अमेरिकेचे प्रगती आरक्षण नसल्यामुळे झाली का ? जगात किती देशांमध्ये आरक्षण आहे ?
प्रतिक्रिया
26 Sep 2016 - 12:48 pm | मुक्त
26 Sep 2016 - 1:46 pm | मुक्त
26 Sep 2016 - 1:47 pm | मुक्त
26 Sep 2016 - 3:07 pm | वाल्मिक
कुठे कुठे
26 Sep 2016 - 1:49 pm | भाते
संमं, आता हे असले धागे खरंच आवरा.
वाल्मिक, दोन महिने निःशब्द रहाणार असल्याचे मागे तुम्हीच जाहिर केले होते ना? मग पुन्हा हा आणखी एक धागा कशाला? धागा काढल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही का?
26 Sep 2016 - 1:50 pm | अमर विश्वास
या मोर्चाशी संबधित दोन मित्रांबरोबर या शनिवारी चर्चा झाली (हे मित्र आधीपासून होते.. मोर्चाशी संबधित आहेत हे परवा कळले).. चर्चेचे निमित्त नेहेमीचेच... वीकेंड पार्टी.. या चर्चेचा सारांश :
ह्या मोर्चामागची भावना उत्स्फूर्त आहे. यामागे नेहेमीचे यशस्वी नेते नाहीत त्यामुळे हा मोर्चा उत्स्फूर्त वाटू शकतो पण यामागे भरपूर प्लॅनिंग आहे. हे सर्वा करणारे राजकीय नेते नाहीत.. (भविष्यात ते राजकीय नेते म्हणून पुढे आले तर फार आश्चर्य वाटणार नाही)..
ह्या मोर्चाच्या सर्वा मागण्या जरी पाटल्या नाहीत तरी शांततापूर्ण मार्गाने केलेले शक्ति प्रदर्शन म्हणून या अनोख्या घटनेची नोंद घ्यावीच लागेल
या चर्चेतील सर्वा मुद्दे व शब्द येथे देता येणार नाहित.. पण चर्चेच्या अनुषंगाने बाकीच्या मुद्द्य्यांवर जरूर लिहायला आवडेल.
26 Sep 2016 - 3:37 pm | सुखीमाणूस
हे लै डेन्गेर बघा
फिल्म बनेल याच्यावर जबरा
जर तरुण लोक असे सगळे करत असतिल अन वाढत्या जातियतेबद्दल त्याना काही वाटत नसेल तर अवघड आहे
26 Sep 2016 - 3:53 pm | अमर विश्वास
वाढत्या जातियतेबद्दल त्याना काही वाटत नसेल... हा निष्कर्ष तुम्ही कसा कढला हे कळले नाही.. मी असे कुथलेही विधन केले नाही..
26 Sep 2016 - 4:28 pm | भोळा भाबडा
सातार्यात ब्राह्मण महासंघ देखील मराठा मोर्चात उतरणार आहे.
आता बोला
27 Sep 2016 - 11:59 am | महासंग्राम
भोभा लिंक कुठे आहे बातमीची कि नुसताच महाराजांच्या टैमाला सारखं आहे
27 Sep 2016 - 4:53 pm | भोळा भाबडा
हे घ्या
27 Sep 2016 - 5:05 pm | महासंग्राम
धन्यवाद
27 Sep 2016 - 5:14 pm | नाखु
मराठा क्रांतीला पाठींबा देणे आणि त्यांनी स्वतःसाठी आरक्षण मागणे हे दोन्ही वेग्वेगळे आहे.
बातमीत्पून पहिल्या बाबीचा अर्थबोध होतो पण दुसरी बाब नसताना तशी दिशाभूल करून ब्राह्मण संघ आरक्षणाची मागणी करत आहे असे का भासविता.
तुम्ही ना भोळा आहात ना भाबडा.
अजूनही पहिल्या धाग्यातील काही प्रश्नांचि उत्तरे दिली नाहीत.
अत्ताच का? आरक्षण फक्त याच सरकारची जबाबदारी आहे काय? मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला.
27 Sep 2016 - 5:43 pm | सचु कुळकर्णी
मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला.
मागिल सरकारला महित होते कि ते सत्तेत येणार नहि आहेत, त्यामुळे हे पिल्लु तर जाणिवपुर्वक सोडण्यात आल.
त्यामधुन अनेक हेतु साध्य करायचा प्रयत्न होतोय. बोत लंबा गेम है काका ये.
27 Sep 2016 - 10:25 pm | भोळा भाबडा
तुम्हीच भोळे आहात हो!!
हे सरकार हलवण्यासाठी मराठे बाहेर पडलेत किंबहुना त्यांना बाहेर पाडलं गेलं आहे हा तुमचा गोड गैरसमज आहे,त्याचा तुम्हाला लखलाभ.
>>> मोर्चा अत्ताच का?
→ दूध कडक तापल्यावरच ऊतू जातं ओ,त्यामुळे तुमचा प्रश्न अस्थानी आहे.
>>> मागील सरकारने शेवटच्या काही दिवसात कायदा न करता (न्यायालयात टिकणार नाही असा ) अध्यादेश का काढला
→ मागचे सरकार नालायक होतेच,
पण मराठ्यांनी सेना भाजपला रेकाॅर्ड मतदान केले आहे हे का विसरता,सरसकटीकरण कशाला ओ करता?
मराठा म्हणजे पवार आणि पवार म्हणजे राष्ट्रवादी हे समीकरण तुमच्या डोक्यात फिट्ट झालयं आता त्याला माझ्याकडे औषध नाय.
28 Sep 2016 - 9:13 am | श्री गावसेना प्रमुख
तरीही प्रश्न उरतोच कि दुध आत्ताच का उतु गेल.
28 Sep 2016 - 9:24 am | महासंग्राम
गॅस बंद केला नै म्हणून
27 Sep 2016 - 3:00 pm | सुखीमाणूस
आधिच बदनाम आहेत जात्यान्ध म्हणून त्यावर शिक्कामोर्तब होइल
Actually Brahmins should never ask for caste based reservation. They should participate in no reservation movement.
26 Sep 2016 - 7:25 pm | अशोक पतिल
खरच चांगली गोष्ट आहे. समजात अश्या गोष्टीनींच सहिष्णुता वाढ्ते .
26 Sep 2016 - 7:37 pm | अशोक पतिल
अरे मराठा मोर्चा आताच का ? हा धागा कुठे गेला राव ? सेन्सार केला की काय ?
26 Sep 2016 - 8:45 pm | वाल्मिक
कोणीतरी माझ्या धाग्याने 500 पार केले म्हणून ................................................अभिनंदन केले
26 Sep 2016 - 10:56 pm | शिद
पहील्या भागात आलेले प्रतिसाद संख्या पाहून मन भरलं नाही वाटतं अजून?
27 Sep 2016 - 7:04 am | एमी
27 Sep 2016 - 7:05 am | एमी
27 Sep 2016 - 7:42 am | संदीप डांगे
एकदा हॉस्टेलमधे थर्डयिअर फोर्थयीअर पोरांची मारामारी झाल्यावर आमच्या रेक्टरने सर्वांना फैलावर घेतले. आमच्यासारख्या काही दोन्ही वर्गातल्या काही 'नामांकित' धुरंदरांना साहेबांनी क्रॉसचेक केले. प्रत्येकजण आपण मारामारी करत नव्हतो तर मारामारी करणार्यांना रोखत होतो, आवरत होतो असे सांगत होता. साहेब थोड्यावेळाने वैतागून बोललं,
"भेंडी, तुम्ही सगळे मारामारी रोखत होते तर मग मारामारी नेमकी कोण करत होतं?"
-आमच्यावर अन्याय झाला अशी हाकाटी करणार्या सर्वांचीच कैफियत ऐकून मलाही हल्ली हाच प्रश्न पडायला लागलाय-
27 Sep 2016 - 11:38 am | वाल्मिक
लोळलेलं
27 Sep 2016 - 8:20 am | अशोक पतिल
सध्या ह्या राज्यत मराठा समाजाचे अभुतपुर्व व शातंतामय असे मोर्चे व तेहि सपुंर्ण महाराष्ट्र भर निघत आहेत. फक्त काही मागण्या ! आता पर्यंत ह्या राज्यात भरपुर मोर्चे , आदोंलन निघाले/झाले. तसा तो प्रत्येक समाजाचा कायदान्वये अधिकार पण आहे.व त्याचा समाजजीवनवर प्रतिक्रिया म्हणुन काही फारसा फरक पडत नव्हता . पण आता वेळी मात्र तसे झाले नाही. ह्या मोर्चे विषयी सहानुभुती राहु द्या पण ह्या संस्थंळावर टोकाची मते वाचायला मिळाली.
मागच्या धाग्यावर जास्ती करुन एकतर्फी भुमिका बघायला मिळाली. कारण दुसरी बाजु मांडणारे इथे कमी असतिल कींवा जास्त कळफलक बडवता येत नसेल .
मागच्या धाग्यावर प्रतिक्रिया विक्रमी संख्येत नेण्या मधे प्रा. बिरुटे यांचा मोलाचा वाट राहीला. त्यानी जे मत प्रदर्शन व तेही इतक्या हिरीरीने केले त्याचे खुप आश्चर्य वाटले. माणुस हा समाज जीवनात वेगळा व खर्या आयुष्यात वेगळा वागतो हे खरे असेल, तरीही त्यांना सांगु इच्छितो की जर त्यांचे कोणी मराठा मित्र असतील तर ते ही मते त्यांना सरळ सांगु शकतील का ?
खरे म्हणजे हाच एकमेव असा समाज आहे त्याने आता पर्यंत जाती विरहीत मतदान केले आहे. फार पुर्वी पसुन मग कान्ग्रेस असेल आता राष्ट्र्वादी असेल, शिवसेना, भाजपा, शेकाप, फार काय जनसंघ लाही मत दिले आहे.
पन एकगठ्ठा मते क्वचित दिली असतिल. त्या मुळे ह्या समाजाला आपल्याला वापरुन घेतल्याची भावन आहे व ती अगदी अनाठाही नाही. आजचे जे सरकार आहे त्यात ही त्याचा मोठा वाटा आहे.
आज तो समाज आत्ममग्नेतुन बाहेर पडुन आत्मचिंतन करतोय व त्याला आता कुठे आत्मभान येत आहे. हा समाज जो आता पर्यंत सिनेमा , कथा कादंबर्या त दाखवता तसा नाहिहे. व कोणताही समाज जसा वाटतो तसा नसतो. हा एक सभ्य, शिक्षित , समजुतदार समाज आहे.व जसे अपवाद कोणत्याही समाजात असतात तसे तेही ह्या समाजात आहेत हे ही मान्य करायला हवे. म्हणुन ह्या समाजा कडे शकेंने पहायला पाहीजे असे नाही.
27 Sep 2016 - 8:30 am | संदीप डांगे
इथे मांडले गेलेले चिकित्सक प्रतिसाद हे कोणीतरी मराठासमाजाचा भयंकर द्वेषच करतंय म्हणून विरोधाच्याच भूमिकेतून मांडले गेलेत इतका ठाम विश्वास का बरे आहे?
27 Sep 2016 - 9:53 pm | खटपट्या
बर्याच अंशी सहमत
27 Sep 2016 - 9:21 am | नावातकायआहे
चान चान
बाकि चालुद्या...
27 Sep 2016 - 1:41 pm | तिमा
ह्या आरक्षणाच्या लढाईत, जे खुल्या वर्गातले आहेत, त्यांची स्थिती, 'मेलं कोंबडं आगीला भीत नाही' अशी आहे. आरक्षणाने २७ टक्क्यांवरुन ५० टक्क्यांवर झेप घेतली तेंव्हाच ते समजून चुकले की एकदिवस हे आरक्षण १०० टक्के होईल! त्यादृष्टीने त्यांची मानसिक तयारी झालीच आहे. त्यानुसार त्यांनी अन्य पर्यायांचा मार्ग शोधला आहे. ज्यांनी अजून शोधला नसेल त्यांनी तो लवकर शोधावा. आणि पुढे मागे खाजगी क्षेत्रातही हे लोण पोचले तर देशांतराचा पर्याय खुला ठेवावा. लोकानुनय म्हणजेच राजकारण, असे सिद्धांत असलेल्या देशांत , पुढे काय होणार हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही.
27 Sep 2016 - 1:52 pm | सचु कुळकर्णी
'मेलं कोंबडं आगीला भीत नाही' अशी आहे.
वास्तव आहे. दुर्दैवाने कोटा १००% पर्यंतच वाढवता येईल.
27 Sep 2016 - 3:17 pm | श्रीगुरुजी
+१
परंतु मराठ्यांची राखीव जागांची मागणी न्यायालयात टिकणार नाही. जाट आरक्षण, मुस्लिम आरक्षण, आर्थिक आधारावर आरक्षण इ. खटल्यात न्यायालयाने जो निर्णय घेतला त्यापेक्षा वेगळा निर्णय मराठा आरक्षणाच्या बाबतीत होण्याची शक्यता नाही. जर कदाचित न्यायालयाने मराठ्यांना जातीवर आधारीत राखीव जागा दिल्या तर गुजरातमध्ये पटेल, उत्तरेत जाट इ. ठिकाणी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलन पेटेल व देशात यादवी माजेल.
27 Sep 2016 - 2:38 pm | मन्याटण्या
पण, विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे कुणीच समाधानकारक देऊ शकला नाही. मागच्या धाग्यात जे प्रश्न बिरुटे संरानी आणि इतरानी विचारले तेच प्रश्न मला पण पडले आहेत मोर्चा आत्ताच का? मोर्चाची प्रमुख मागणी कोणती? आरक्षण हे पन्नास टक्क्यावरती देता येत नाही अस ऐकल, मग मोर्चा का काढायचा. मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात. ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाची उपेक्षा होतेय अस एकजण म्हणाला.मागची कितीतरी वर्ष मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा नेमका समाजाचा सर्वांगीण विकास नेमका कसा झाला ते कोणी सांगू शकेल काय. उदयनराजे म्हणतात (पुण्याच्या मोर्चात) मुख्मंत्र्यानी राजीनामा द्यावा. तो नेमका का द्यावा व् त्यानी प्रश्न कसा सुटणार. खरतर ह्याची उत्तर कोणीच देऊ शकला नाही. इथे पण उत्तर शोधायच प्रयत्न करतोय पण अजुन मिळाली नाहीत.
27 Sep 2016 - 3:31 pm | श्रीगुरुजी
दोन मुख्य कारणे. दोन्ही कारणे जातीयवादी आहेत. (१) राज्यातील सर्वोच्च स्थानावर मराठा नसून दुसर्याच जातीचा माणूस आहे आणि (२) आपल्या जातीच्या मुलीवर अत्याचार करणारे "दलित" आहेत.
इतर दुय्यम कारणे म्हणजे (३) मराठा जातीचे प्राबल्य असलेल्यांच्या हातातून केंद्रातील व राज्यातील सत्ता गेली व आता सहकारातील सत्तेवरही गदा येत आहे आणि (४) या पक्षातील मराठा नेत्यांवर भ्रष्टाचारामुळे कारवाई सुरू झाली आहे
सांगण्यात येणार्या प्रमुख मागण्या - (१) कोपर्डीच्या गुन्हेगारांनी तात्काळ फाशी द्या, (२) राखीव जागा द्या, (३) अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा.
छुप्या मागण्या - (१) अमराठा मुख्यमंत्र्याला हटवा, (२) भ्रष्टाचारावरील कारवाईत बहुसंख्य मराठा नेते असल्याने ही कारवाई बंद करा, (३) सहकारक्षेत्रातील आमच्या मक्तेदारीला धक्का लावू नका, (४) कोणत्यातरी मार्गाने कोठेतरी आम्हाला पुन्हा सत्ता द्या.
कायदा व घटनेतील तरतुदी सामान्य माणसाला फारश्या माहिती नसतात. कोपर्डी, आरक्षण इ. मुद्द्यांवरून भावना अगदी सहज भडकावता येतात. यापूर्वी प्रत्येक निवडणुकीच्या ३-४ महिने आधी मतदारांना राखीव जागा, स्मारके, पुतळे, कर्जमाफी, नामांतर अशांसारख्या अफूच्या गोळ्या देऊन पुढील ५ वर्षांसाठी मते मिळवून सत्ता टिकविली जायची. २०१४ मध्ये या गोळ्यांचा प्रभाव पडला नाही. म्हणून आता नवीन गोळ्या आणल्या आहेत.
बलदंड व धनाढ्य नेते यामागे असल्याशिवाय हे मोर्चे शक्य नाहीत.
विकास कधीच झाला नव्हता. परंतु हीच मंडळी कायम निवडून यायची कारण प्रत्येक निवडणुकीच्या काही महिने आधी सवंग, लोकानुययी घोषणा केल्या जायच्या.
तो त्यांनी द्यावा अशी मागणी होतेय कारण ते अमराठा आहेत. महाराष्ट्रात गेल्या ४१ वर्षात एकाही अमराठा मुख्यमंत्र्याला आपली कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही.
उत्तरे मिळाली असावीत अशी आशा आहे.
27 Sep 2016 - 5:01 pm | भोळा भाबडा
अगदी सहमत आमच्या ह्याच मागण्या आहेत.
27 Sep 2016 - 3:42 pm | विशुमित
<<<<<<मोर्चा आत्ताच का>>>>>>
- ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून, त्याला खाली खेचायला.
<<<<मोर्चाची प्रमुख मागणी कोणती>>>>>>
- अख्या महाराष्ट्रात मोर्चे झाले, अजून तुम्ही अज्ञानी कसे?
<<<<मग मोर्चा का काढायचा>>>
-माज दाखवायला
<<<<मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात.
-श्री शरदचंद्रजी पवार साहेब
<<<<ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाची उपेक्षा होतेय अस एकजण म्हणाला>>>>
- हो...तुम्हाला काही ही समज करून घेण्याचा अधिकार घटनेने दिला आहे.
<<<< मागची कितीतरी वर्ष मराठा मुख्यमंत्री होते>>>>>
-ते सगळे झोपा काढत होते
<<<<<उदयनराजे म्हणतात (पुण्याच्या मोर्चात) मुख्मंत्र्यानी राजीनामा द्यावा>>>>
- राजे हे पण म्हणाले बलात्काऱ्यांना सगळ्या समोर गोळ्या घाला, आता न्यायालय असाच निर्णय देणार आहेत.
<<<<उत्तर शोधायच प्रयत्न करतोय पण >>>
-प्रयत्न करा प्रयत्न करा तुम्हाला शुभेच्छा कारण शेवटी "गरज ही शोधाची जननी आहे"
मन्याटण्या-तुमच्या मनासारखी (खोडसाळ) उत्तरे दिली आहेत... समाधान नाही झालं तर अजून विचारू शकता.
27 Sep 2016 - 2:52 pm | सुखीमाणूस
At least private sector is open today. Why to look at government jobs and institutes. Work hard and smart and sky is the limit.
27 Sep 2016 - 5:59 pm | अनिरुद्ध.वैद्य
We are actively working towards getting reservations in Private Sector. In fact Maha Govt has tried to do so couple of years back, not sure what happened there.
27 Sep 2016 - 6:00 pm | वाल्मिक
misalpav should have marathi only,no english
27 Sep 2016 - 11:43 pm | सुखीमाणूस
म्हणून इन्गजी वापरले• ह घ्या
टन्कनाला त्रास होत होता आणि गप् बसवत नव्हते
28 Sep 2016 - 10:25 am | भीडस्त
वल्मिक सर इ फ़ुल्ल्य अन्द सोलेम्न्ल्य एन्दोर्से योउर विएव्स अस फ़र अस थे उसे ओफ़ लङुअगे ओन मिसल्पव इस चोन्चेर्नेद्. मिसल्पव शोउल्द हवे naay naay o मिसल्पव मुस्त् हवे मरथि ओन्ल्य नो एङ्लिश्
कृ ह घे
लो अ ही वि
27 Sep 2016 - 5:30 pm | चौकटराजा
ओ गुर्जी साहेब तुम्ही आमच्या मागच्या प्रतिसादाची नवी येडीशन काढली आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे रुपांतर अधिकृतपणे मराठवादी कॉंग्रेस असे करावयाचे आहे. आमच्या येथील मराठा आमदाराना मानाचे परत मराठवादी कॉंग्रेसमधे आणायचे आहे. जे भाजपाने फोडले त्याना पुन्हा पदे द्यावयाची आहेत. आम्हाला असे वाटते कारण.... दलित ओबीसी जाट हे गप्प बसणार नाहीत , एका दिवसात कोणाला ( अगदी कसाबला देखील ) फाशी देता येत नाही. फेअर ट्रायल द्यावीच लागते. हे आरक्षण ओपन वाले ही टिकू देणार नाहीत. फकस्त येकच शॉर्टकट आहे. मराठा व कुणबी या काही दोन वेगळ्या जाती नव्हेत हे कोर्टाला पटववून देणे. हे सगळे " जाणत्या" ना ही माहीत आहेच.
28 Sep 2016 - 3:44 pm | हेमन्त वाघे
मराठा व कुणबी या काही दोन वेगळ्या जाती नव्हेत
मराठा आणि कुणबी रोटी बेटी व्यवहार करीत नाहीत
आणि मराठा कुणब्याना तुच्छ मानतात .....
खासकरून हे 96 कुळी बद्दल पहिले aahe
आता मात्र लोकसंखयेचे मोठे आकडे पाहिजेत म्हणून मराठयांना कुणबी लोणचं पुळका आलेला दिसतोय ?
कोण्या 96 कुळाने आपली मुलगी कुणब्यांच्या घरी दिली ती कळेल का ??
27 Sep 2016 - 6:16 pm | श्री गावसेना प्रमुख
आमच्या गावात संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष ह्यांनी नाशिक च्या मोर्चाचे नियोजन केले,
आणी कोण म्हणत कि मोर्चाला नेतृत्व नाही ,धुळे जिल्ह्यात होणार्या २८ तारखेच्या मोर्चासाठी एन सी पी आणी आय एन सी चे माजी मंत्री आमदार सारे झाडुन कामाला लागलेत.ह्या मोर्चामुळे एकच वाईट झाल जे अगोदर बिग्रेडी मानसिकता ठरावीक मेंदुत होती ती आता बर्याच मराठ्यांच्या मेंदुत झिरपली आहे.
27 Sep 2016 - 6:21 pm | संदीप डांगे
हेच ते!
27 Sep 2016 - 6:23 pm | टवाळ कार्टा
+१११११११११
27 Sep 2016 - 6:23 pm | संदीप डांगे
खाणे के दात और दिखाने के दात अलग, म्हणून वाईट वाटले मोरच्याबद्दल, सामान्य लोकांना घोळात घेता येतील अशा परस्पर संबंध नसलेल्या मागण्या पाहून आम्हाला सामान्य नागरिकांबद्दल वाईट वाटत आहे,
लोकांना आम्ही मराठविरोधी आहोत असं सोयीस्कर वाटून घ्यायचं आहे
27 Sep 2016 - 8:05 pm | विवेकपटाईत
कित्येक दिवस आजारी असल्यामुळे (सध्या दिल्लीत इमान्दारीचे राज्य आहे, डासांना मारणे सुद्धा पाप आहे). मिसळपाव वर जास्त फिरकत आले नाही.
1) खरंच सध्याचा मोर्चा उत्स्फूर्त आहे का ? कोणत्याही नेतृत्वाशिवाय एवढे लोक जमणे शक्य आहे का ?
दिल्लीत आम्हाला हि असे वाटले होते. पण आता कळले एका वर्षात मोठ्या संख्येने दारूची दुकाने व बार का उघडले. १५०० DTC बसेस scrap केल्या गेल्या फक्त १०० नवीन विकत घेतल्या गेल्या. निजी मिनी बसेस का चालू लागल्या. ऑटो मागे लागणार्या पोस्टर्स साठी आठवड्याचे १००० रुपये ६ महिन्यासाठी, नुक्कड नाटक कलाकारांना ५०० रुपये रोज शिवाय नाश्ता पाणी (?), टोप्या, प्रभात फेर्या. शिवाय १ बाटली १ नोट. कोट्यावधी रुपये खर्च झाला होता. करणारा कोण किंवा खर्च झाला होता, सांगता येणे कठीण. इथे तर नक्कीच त्या पेक्षा जास्त खर्च होत असेल.
2) अदृश्य हात असेल तर कोणाचा ? कुणाचा हात आहे, हे सर्वांना चांगलेच माहित असेल. जाट आणि पटेलांचे आरक्षण कोर्टाने रद्द केले. कोर्टासमोर आरक्षणची पात्रता पुराव्या सहित सिद्द करावी लागेल. मोर्चे काढण्याने ती सिद्द होऊ शकत नाही. राज्य सरकारने मोर्च्यांना घाबरून आरक्षण दिले तरी कोर्ट रद्द करेल. atrocityचा कायदा हि राज्य सरकार दुरुस्त करू शकत नाही. तो अधिकार केंद्राचा आहेत. आणि कायदा आणखीन सक्त करण्याची मागणी केंद्र सरकार नाकारू शकत नाही. अर्थात हे ज्या नेत्याला चांगले माहित आहे, त्याचाच अदृश्य हात आहे.
3) झेंडे ,फलके ह्यावर कोणी खर्च केला ?-
4) जर नेतृत्व नाहीये तर अमुक तमुक ठिकाणी भेटायचे हे कसे ठरले ?
मीटिंग इत्यादी निश्चित होत असणार, काय आणि कसे करायचे ठरत असेल. समाचार वाहिनींवर काही नेत्यांचे वक्तव्य पहिले असेल तर नेतृत्व करणाऱ्यांची कल्पना करता येते.
पटेल आणि जाट समुदाय मूर्ख बनले. शेकडो जाट तरुण आज जेल मध्ये आहे. त्या पैकी अधिकांश तरुणांना त्यांच्या कर्माचे फळे भोगावीच लागणार आहे. नेते अदृश्य झाले आहेत. पण जाट आणि इतर समुदायांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. महाराष्ट्रात हि असे घडण्याची शक्यता नाकारता नाही. जर अक्कल असेल तर मराठा तरुणांनी या मोर्च्यान्पासून दूर राहावे. खरे तर या नेत्यांचा बहिष्कार करावा. पण तसे घडणार नाही. आरक्षणाची लालसा प्रत्येकाला आहे. फक्त १% टक्के लोकांना सरकारी नौकरीचा लाभ होतो. पण ९९ टक्के मूर्ख बनतात. बाकी विधी लिखित अटळ असते.
27 Sep 2016 - 9:08 pm | संदीप डांगे
लै वेळा सहमत!
28 Sep 2016 - 5:02 pm | तुषार काळभोर
शेवटचा परिच्छेद खासकरून
जाती आणि धर्मांमध्ये आगी लावण्याचे परिणाम दिसू लागले आहेत.
हिन्दू तालिबानी प्रवृत्ती झालेली काही मुले पाहण्यात आहेत.
मराठ्यांचा घाऊक द्वेष करणारे ब्राह्मण व ब्राह्मण आणि दलितांचा घाऊक द्वेष करणारे मराठे पाहण्यात आहेत.
कुणालाच काही समजावून उपयोग नसतो. अश्या मनोवृत्तींपुढे लॉजिक व रिजनिंग चालतच नाही.
कदाचित येत्या ३-४ वर्षांमध्ये तेढ कधीही न भरून येण्याएवढी वाढेल.
27 Sep 2016 - 9:31 pm | अशोक पतिल
आरक्षन हे ५१% चे वर नेता येत नाही. ठीक आहे. पण कुठलीच गोष्ट अशक्य नसते. सध्या तामिळनाडुत ६९ % आहेच. सुप्रिम कोर्टाने ते जरी अमान्य केले असले तरीही ते सध्या लागु आहेच.
पटेल व जाट समुदाय ह्यांनी हिंसक मार्ग अवलंबिला म्हणुन ते टिका योग्य आहेत.
पण आता समुदायांचा आकांक्षा वाढल्याने समाजात असंतोष आहे.
राहील मुद्दा atrocityचा कायदा हा जरी कायदा केद्रांचा असला तरी त्याची अमंलबजावणी राज्या ची आहे. तो कडक काय म्हणुन करायचा ? त्यात संशोधन नक्कीच करता येवु शकेल . तसे संकेत श्री रामदास आठवले व प्रकाश आबेंडकर यानी दिलेच आहेत.
खरे तर जर आरक्षन हे फक्त गुनवत्तेवर जसे अपंग , निराधार , आर्थिक दुर्बल असेच फार अगोदर दिले असते तर आज इतक असंतोष नसता.
28 Sep 2016 - 8:42 am | नाखु
तामिळनाडुत ६९ % आहेच.
कारन असे असेल तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असेल. खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार ५० कि ५१ % पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही.
खात्रीशीर पुरावा देणे.
या सगळ्या गदारोळात करते कर्विते साहेब म्हटले होते ते सगळे मिपाकर साफ विसरले
अॅट्रोसिटीचा गैरवापर/दुरुपयोग सर्वात जास्त बहुजनांनीच केला मग त्यात त्या कायद्याचा काय दोष?
लोक्सत्तामध्ये अशी थेट बातमीही आहे.
28 Sep 2016 - 9:46 am | चौकटराजा
६९ टक्के ची केस सर्चोच्च न्यायालयात प्रलंबित आहे असी पुसट माहिती आहे.
27 Sep 2016 - 9:39 pm | सन्दिप मोहन नलवदे
गुरुजी
उत्तर द्या
दोन मुख्य कारणे. दोन्ही कारणे जातीयवादी आहेत. (१) राज्यातील सर्वोच्च स्थानावर मराठा नसून दुसर्याच जातीचा माणूस आहे आणि (२) आपल्या जातीच्या मुलीवर अत्याचार करणारे "दलित" आहेत.>>
Bjp सत्तेत आल्यावर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जवळ जवळ नक्की होते तरीपण मराठा लोकांनी बाजप ला का मत दिल आणि थे पण मराठा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असेलेल्या पक्ष्यांना न देऊन.
आणि तसेही भाजप हा ब्राह्मणांचा पक्ष आहे आसा समज/गैरसमज असून सुद्धा मराठा समाजाने भाजप ला मतदान केले म्हणजे
ब्राम्हण मुखमंत्री हटाव हि मागणी आहे असे मानाने चुकीचे आहे ...मराठ्यांना दलित मुख्यमंत्री चालतो तर ब्राम्हण का नाही चालणार.
2-या पक्षातील मराठा नेत्यांवर भ्रष्टाचारामुळे कारवाई सुरू झाली आहे>> कुठे आहे कारवाई, भाजप ला कारवाई करायला कोणी थांबवले आहे उलट ह्या लोकांनी भ्रष्ट्राचार केला म्हणूनच भाजपा ला लोकांनी मतदान केले. पण 1 भुजबळ वगळता दुसऱ्या कोना वरती कारवाई का होत नाही ते समजत नाही कंदाचीत मराठा समाज दुखावेल ह्या जातीयवादी भावनेतून भाजपा कारवाई करत नाही असे दिसतंय
3-भ्रष्टाचारावरील कारवाईत बहुसंख्य मराठा नेते असल्याने ही कारवाई बंद करा>> कारवाई चालूच नाही तर बंद करा हि मागणी कशी ?
4- यापूर्वी प्रत्येक निवडणुकीच्या ३-४ महिने आधी मतदारांना राखीव जागा, स्मारके, पुतळे, कर्जमाफी, नामांतर अशांसारख्या अफूच्या गोळ्या देऊन पुढील ५ वर्षांसाठी मते मिळवून सत्ता टिकविली जायची. २०१४ मध्ये या गोळ्यांचा प्रभाव पडला नाही. म्हणून आता नवीन गोळ्या आणल्या आहेत.>>
म्हणजे भाजपा ला मतदान केलं कि विकासाला मतदान आणि दुसऱ्या पक्ष्याला केलं कि अफूची गोळी हे चुकीचं आहे आणि राखीव जागा पुतळे ह्या पैकी किती मागण्याला भाजपा चा विरोध आहे. 2014 चा आधी हि भाजपा चा मराठा आरक्षण ला सपोर्ट होता आणि आत्ताही आहे.
5-मोर्चाच नियोजन कोण करत व् एवढे पैसे कुठून येतात.
बलदंड व धनाढ्य नेते यामागे असल्याशिवाय हे मोर्चे शक्य नाहीत.>>
आस काही नाही, लोक स्वतः खर्च करून मोर्चाला जातात
तो त्यांनी द्यावा अशी मागणी होतेय कारण ते अमराठा आहेत. महाराष्ट्रात गेल्या ४१ वर्षात एकाही अमराठा मुख्यमंत्र्याला आपली कारकीर्द पूर्ण करता आलेली नाही.>>
त्या मध्ये मराठ्यांचा काय दोष. ex - मनोहर जोशींना राजीनामा द्यायला काय मराठ्यांनी सांगितलं का ?
हिते काही लोक असं म्हणत आहेत कि मोर्च्या मागे ncp आहे आणि आत्ता फडणवीस असे म्हणत आहेत कि मराठ्यांना आरक्षण देऊच तर मग ncp आणि bjp मध्ये फरक कसा काय ?
28 Sep 2016 - 3:07 pm | श्रीगुरुजी
भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. खडसे सर्वात वरीष्ठ असल्याने आपणच मुख्यमंत्री होणार असे त्यांना वाटत होते. नितीन गडकरीसुद्धा मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून होते. गोपीनाथ मुंड्यांची लेक व इतर मागासवर्गियांपैकी असल्याने व महिला असल्याने आपलाच नंबर लागणार असे पंकजाताईंना वाटत होते. आपण तरूण व मराठा असल्याने आपणच अशी विनोद तावड्यांची समजूत होती. मुनगंटीवारसुद्धा शर्यतीत होते. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निवडणुकी अजिबात ठरलेले नव्हते. निकाल लागल्यावर पवारांनी गडकरींसाठी गुपचुप प्रयत्न केले. गडकरी व त्यांचे सख्य असल्याने पवारांना गडकरी मुख्यमंत्री हवे होते. परंतु सर्वांना बाजूला करून मोदी-शहांनी धक्कातंत्र वापरून फडणविसांना निवडले. असेच धक्कातंत्र त्यांनी हरयाना व झारखंडमध्येही वापरले होते.
त्यामुळे मुख्यमंत्रीपदी फडणविस या ब्राहमणाची निवड होणार हे माहित असूनही मराठ्यांनी भाजपला मत दिले हा निष्कर्ष वस्तुस्थितीला धरून नाही.
राष्ट्रवादीतील अजित पवार व तटकरेंची चौकशी सुरू आहे. रमेश कदम व भुजबळ अनेक महिन्यांपासून तुरूंगात आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व सहकारात २ टर्म पद भोगलेल्यांना नवीन कायद्यानुसार निवडणुक लढायला बंदी घातली आहे (सहकार क्षेत्रात मराठा सर्वाधिक आहेत).
काँग्रेस व राष्ट्रवादीने पुतळे, स्मारके, कर्जमाफी, फुकट माफी इ. लोकानुययी घोषणांशिवाय दुसरे काहीच केले नाही. लोकांना भुलविणे व मनसोक्त भ्रष्टाचार करणे एवढेच त्यांनी १५ वर्षे केले. निदान भाजपतरी निव्वळ लोकानुययी घोषणा न करता विकासाच्या मार्गाने जाईल या भावनेतून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला घरी बसवून भाजपला सत्तेत आणले.
आधीच्या धाग्यात याविषयीची सविस्तर माहिती आली आहे.
सुशीलकुमार शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून काढून विलासरावांना का परत आणले? सुधाकरराव नाईकांना का जावे लागले?
राष्ट्रवादी व भाजपमध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे.
5 Oct 2016 - 11:06 pm | वगिश
भुजबळ मराठा आहेत?
6 Oct 2016 - 8:36 am | नाखु
सिलेक्टीव वाचू नका हो.
भुजबळ राष्ट्रवादीचे माजी उपमु होते आणि साहेबांच्या कृपाशीर्वादाने माया गोळा केली त्याची फळे भोफत आहेत आणि पुढील नंबर अजित पवार-सुनील तटकरे लागू शकतो (कंबहुना लागेलच कारण तशी कागदपत्रे केंन्द्रीय पुन्हा एकवार केंद्रीय तापास पथकाने तयार केलेली आहेतच ) मग सगळ्यांचे लक्ष विचलित करण्याचा हा अतिषय आत्मघातकी व जाती-जातीत द्वेष निर्माण करणारा प्रकार चालू केला आहे.
कोपर्डी घटना निंदनीय आहेच पण त्याचा जितका पाठपुरावा आपल्याच सुप्रिया सुळे करतात (आणि रोज अगदी खालच्या भाषेत देवेंद्र फडवणिसांना शिव्या देत असतात) तोच बाणा या पुर्वी इतर संतापजनक घटनांमध्ये दाखविला नाही अखैर्लारलांजी असो,की कोल्हापुरातील ऑनर किलींग असो.
इकडे दुस्र्यांना जातीचे राजकारण करतात म्हणून भाजपाला (याच धाग्यात ब्राह्मणांचा पक्ष असा शिक्काही मारला आहेच) आणि स्वतः फक्त स्वजातीवर झालेल्या अन्यायाचे भांदवल करायचे.
जरा सोलापुरात निघालेल्या ओबीसी मोर्चातील फलक पहा (खैरलांजी साठी).
या मोर्चाने महाराष्ट्राला किमान १५-२० वर्षे मागे नेऊन ठेवले आहे सामाजीक अभिसरणाबाबत (जाती-पाती तून वर येण्यामध्ये) कारण आंतरजालाचा वापर करून अतिष्य विखारी प्रचार-मते-विचार धुमाकुळ घालीत आहे.
ज्यांना मिपावर मराठी मोर्चा अत्ताच का निघाला याचे संयुक्तीक आणि खरे उत्तर देता येत नाही त्यांनीच अन्यायाची आणि आरक्षणाची लंगडी सबब दिली.
आरक्षणाचा मुद्दा आधीच्या सरकारने (हो उपमुख्यमंत्री मराठाच होता तेही पॉवरबाज) तरीही शेवटच्या सहा महिन्यात तकलादू निर्णय घेतला आणि समीती कुणाची तर नारायण राणेंची (त्यांच्या सारखे अभ्यासू व्यक्तीमतव पाहता काय दिवे लागणार आहेत हे माहीत असूनही)
पहिल्या धाग्यात इतर राज्यांनी ५१% पेक्षा आरक्षन जास्त कसे दिले याचे कुणीही समाधान-स्पष्टीकरण दिले नाहीच आणि देणारही नाहीत.
बाकी चालू द्या...
6 Oct 2016 - 2:48 pm | श्रीगुरुजी
+ १
भुजबळ मराठा नसले तरी समीर भुजबळ, छगन भुजबळ, रमेश कदम इ. नंतर कुर्हाड आपल्यावर चालणार हे अजित पवार, तटकरे इ. नी ओळखलेले आहे. त्यामुळे जितक्या लवकर फडणविस जातील तितका आपला धोका कमी होईल हे ते ओळखून आहेत. २०१४ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री निवडायची वेळ आली तेव्हा थोरल्या पवारांनी नितीन गडकरी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी प्रयत्न केले होते. गडकरींशी असलेल्या 'मित्रत्वाच्या' संबंधांमुळे आपल्या पक्षाच्या भ्रष्टाचारी नेत्यांविरूद्ध ते मऊ असतील अशी पवारांची धारणा होती. परंतु मोदी व शहांनी गडकरींना मुख्यमंत्री न करता अत्यंत स्वच्छ प्रतिमा असलेल्या व राष्ट्रवादीशी लागेबांधे नसलेल्या फडणविसांना मुख्यमंत्री केले.
या मोर्चासाठी कोपर्डी हे केवळ निमित्त आहे. मूळ उद्देश ब्राह्मण वि. मराठा हा जातीयवाद भडकावून फडणविसांना घालविणे हा आहे. ब्राह्मण मुख्यमंत्री झाल्याचे यांना सहन झालेले नाही. आपल्या पक्षातील एकेक प्रकरणे बाहेर येत असून नेते अडकत असल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. फडणविसांना घालविले तर ब्राह्मण मुख्यमंत्री घालविणे व आपल्या पक्षावरील भ्रष्टाचाराची कारवाई थांबविणे असे एका दगडात दोन पक्षी मारता येतील. त्यासाठी यांना कोपर्डीचे आयतेच निमित्त मिळाले आहे. मूळ उद्देश लपविण्यासाठी कोपर्डी, मराठ्यांना राखीव जागा, शेतकरी, शिवाजी महाराजांचे स्मारक इ. विषय घुसडण्यात आले आहेत. सुरवातीला निर्नायकी असलेल्या मोर्चात आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते चोरपावलांनी घुसले आहेत.
7 Oct 2016 - 9:51 am | विशुमित
अतिशय हास्यापद रडका प्रतिसाद...!!
7 Oct 2016 - 12:12 pm | एमी
खिक् :-P
बरेच प्रतिसाद मलादेखील फारच रोचक आणि उद्बोधक वाटायला लागलेत. अगरोफोबिया आहे की काय इथल्या लोकांना %-) माबोवर यापेक्षा फारच चांगले किंवा अॅटलीस्ट न्युट्रल प्रतिसाद आलेत.
===
फडणवीस मुख्यमंत्री असूदे नाहीतर उडणसाडेतेहतीस! व्हु केअर्स? निवडून आलेत म्हणजे नक्कीच साडेतीन टक्क्यांखेरीज इतरांनीदेखील त्यांना मतदान केलंय. आणि एकदा निवडून आले म्हणजे ते सगळ्यांनाच रिप्रेझेंट करतायत; मत देणारे असो किंवा न देणारे...
आणि तसेही ब्राह्मण फारच कष्टाळू, सरळमार्गी, कोणाकडूनही कोणत्याही प्रकारच्या मदतीची अजीबात गरज नसलेले, तरीही प्रगती करणारे इ इ असतात. मगतर नक्कीच मुख्यमंत्री काही ना काही योग्य मार्ग शोधून काढतील. वाय अदर्स आर सो वरीड?
7 Oct 2016 - 2:04 pm | श्रीगुरुजी
आहेचत ते तसे. घरं जाळली, शेती हिसकावून घेतली, राजकारणातून हद्दपार केलं, राखीव जागा आणून शिक्षण व नोकर्यांवर गदा आणली, ब्राह्मणांवर अत्यंत घाणेरडी पुस्तके लिहून बदनामी केली, घडलेला इतिहास नाकारून व खोटा इतिहास लिहून इतिहासातील ब्राह्मणांचे योगदान नाकारले . . तरीसुद्धा कोणाचीही मदत न घेता ब्राह्मण स्वबळावर प्रगती करीत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याची गरजच नाही. ब्राह्मण स्वबळावर, कोणाच्याही मदतीशिवाय प्रगती करण्यास समर्थ आहेत. राखीव जागा, शेती, राजकारण सरकारी मदत इ. चे पाठबळ नसताना ब्राह्मण इथवर आले आहेत. अगदी १००% जागा राखीव ठेवल्या तरी ब्राह्मण प्रगती करतीलच. कोणताही ब्राह्मण राखीव जागांची अजिबात काळजी करीत नाही. ब्राहमणांना काळजी असलीच तर ती १९४८ किंवा १९७८ ची पुनरावृत्ती होऊ नये हीच काळजी असेल. झुंडशाही व गुंडगिरीमुळे सर्वांनाच काळजी वाटू शकते. भांडारकर प्राच्य संधोधन संस्थेमध्ये व जिजामाता बागेतील शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा जबरदस्तीने हटविताना झालेली झुंडशाही सर्वांनाच माहिती आहे. मराठे, जाट, पटेल, मुस्लिम किंवा इतरांना राखीव जागा देण्यासाठी आटोकाट प्रयत्न होणारच याची ब्राह्मणांना पूर्ण जाणीव आहे. भविष्यात आता आहेत त्यापेक्षा शिक्षणाच्या, नोकरीच्या संधी कमीच होणार आहेत. त्यामागे राखीव जागा हे प्रमुख कारण नसणार आहे व बेसुमार वाढलेली लोकसंख्या हेच मुख्य कारण असणार आहे व ब्राह्मण त्यासाठी तयार आहेत.
7 Oct 2016 - 2:48 pm | विशुमित
तुम्ही सरळ सरळ जातीवाद करताय श्रीगुरुजी...!!
7 Oct 2016 - 2:50 pm | श्रीगुरुजी
माझ्या प्रतिसादातील कोणती वाक्ये जातीयवादी आहेत?
मी फक्त खालील उपसाहात्मक जातीयवादी प्रतिसादाला जातीयवाद मध्ये न आणता उत्तर दिले आहे.
7 Oct 2016 - 3:13 pm | विशुमित
तुमच्या बऱ्याच प्रतिसादामध्ये असे का उद्घोषित करत आहेत की ब्राह्मण मुख्यमंत्री झाला म्हणून हे मोर्चे निघत आहेत.
काँग्रेस राष्ट्रवादीचं तुमच्या साठी एकवेळ मानू पण शिवसेना, भाजप मधील पदाधिकारी का मोर्चा ला पाठिंबा देत आहेत.
भाजप च्या कार्यकारणी बैठकीत का आरक्षण ला पाठिंबा दिला जात आहे? http://www.esakal.com/Tiny.aspx?K=VBGQSK
अजून पर्यंत तरी कोण्या मोर्चेकार्यानी मुख्यमंत्रांचा राजीनामा मागितला नाही. मग एवढी धास्ती का वाटत आहे फडणवीसांना?
भीती वाटतेय तर पदभार सोडून देऊन राजकीय सन्यास घ्यावा.
भाजप ने ब्राह्मण मुख्यमंत्री नव्हे बुजगावणं बसवलं आहे महाराष्ट्रात, असे खेदाने म्हणावं लागतंय.
बाकी पवार द्वेष अगदी ठळक उठून दिसतोय
7 Oct 2016 - 3:50 pm | श्रीगुरुजी
त्यांचं कारण असं की मराठा आरक्षणाला जाहीर विरोध करणे ही राजकीय चूक ठरेल म्हणून.
सुप्रिया सुळे, उदयन भोसले यांच्याकडून ही मागणी आधीच आलेली आहे.
मग तसं म्हणा.
अजिबात नाही. धोरणांना विरोध म्हणजे व्यक्तीद्वेष होत नाही.
7 Oct 2016 - 4:00 pm | संदीप डांगे
धोरणांना विरोध म्हणजे व्यक्तीद्वेष होत नाही.
^^^
बरोबर आहे,
अपवाद फक्त मोदी, संघ, भाजप.
7 Oct 2016 - 4:09 pm | एमी
मी फक्त खालील उपसाहात्मक जातीयवादी प्रतिसादाला जातीयवाद मध्ये न आणता उत्तर दिले आहे. >> उपसाहात्मक का वाटला प्रतिसाद? ब्राह्मण आयडींनी या किंवा उडालेल्या धाग्यावर जे लिहलंय तेचतर मीपण लिहलंय.
===
तरीसुद्धा कोणाचीही मदत न घेता ब्राह्मण स्वबळावर प्रगती करीत आहेत. >> अगदी अगदी. सरकारी कॉलेजातून सबसिडाइज्ड शिक्षण घेणे ही बाकी सगळ्या पब्लिककडून घेतलेली मदत नाहीचय. किंवा जैनमराठ्यांनी उभारलेल्या कॉलेजातील ८०% जागा ना नफा ना तोटापद्धतीने सर्वजातीवर्गात वॉलंटरी वाटल्या तीदेखील मदत नाहीच!
===
मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याची गरजच नाही. ब्राह्मण स्वबळावर, कोणाच्याही मदतीशिवाय प्रगती करण्यास समर्थ आहेत. >> अहो मराठा मोर्चाच्या गहन प्रश्नावर मुख्यमंत्री योग्य तोडगा काढतील म्हणतेय मी. ब्राह्मणांच्या स्वबळाचा कुठे प्रश्न आला यात?
===
अगदी १००% जागा राखीव ठेवल्या तरी ब्राह्मण प्रगती करतीलच.
कोणताही ब्राह्मण राखीव जागांची अजिबात काळजी करीत नाही. >> अगदी सहमत आहे. म्हणूनचतरते इतकी वर्ष सरकारी आणि जैनमारवाड्यांच्या कॉलेजातील जागा ताठमानेने नाकारतायत.
===
ब्राह्मण त्यासाठी तयार आहेत. >> अगदी मान्य म्हणूनचतर मराठा शिक्षणसम्राटांनी 'ब्राह्मण क्षमस्व' बोर्ड लावून टाकावा. तो बघायलादेखील कोणी ब्राह्मण तिकडे फिरकणार नाही.
7 Oct 2016 - 4:44 pm | शब्दबम्बाळ
तुम्हाला एक फुकटचा सल्ला देतो,
माबो वॉर चांगली चर्चा झालीये ना! मग सोडून द्या..
इथे मिपावर योग्य चर्चेची अपेक्षा करू नका... काही जण सोडले तर प्रत्येकाला मी कसा शहाणा, आमची जात यांव आमची जात त्यांव हेच सांगायचे असते.
तर, आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका कोणाला उत्तरे देण्यात. वयानुसार झालेली/करून घेतलेली लोकांची मते पक्की आहेत ती बदलायची कोणाला पडलेली नाही.
7 Oct 2016 - 11:50 pm | श्रीगुरुजी
सबसिडाईज्ड शिक्षण ब्राह्मण घेताहेत? काहीतरीच काय? खुल्या वर्गातील सर्वांना जेवढी फी भरावी लागते तेवढीच फी ब्राह्मणही भरतात. इतर मागासवर्गियांना खुल्या वर्गापेक्षा कमी फी भरावी लागते तर मागासवर्गियांना अत्यल्प फी भरावी लागते. खुल्या वर्गाला मात्र संपूर्ण फी भरावी लागते.
कोणीही कोणालाही जागा व्हॉलंटरी किंवा ना नफा ना तोटा पद्धतीने वाटत नाहीत. भारती विद्यापीठ, सिंहगड, डी वाय पाटील, जयंतराव सावंत इ. संस्था मराठ्यांनी सुरू केलेल्या आहेत. या संस्थातून उदाहरणार्थ अभियांत्रिकीला प्रवेश फक्त सीईटी च्या गुणांवर मिळतो व खुल्या वर्गाला प्रतिवर्ष सुमारे १ लाख रूपये फी भरावी लागते. जागा वाटप व्हॉलंटरी नाही, ना नफा ना तोटा या पद्धतीने नाही व शिक्षण सबजिडाईझ्ड देखील नाही.
मी आधी म्हटल्याप्रमाणे ब्राहमणांना आरक्षणाची अजिबात काळजी नसून त्या निमित्ताने किंवा आरक्षण न मिळाल्यास १९४८/१९७८ ची पुनरावृत्ती होण्याची काळजी आहे.
===
अगदी १००% जागा राखीव ठेवल्या तरी ब्राह्मण प्रगती करतीलच.
कोणताही ब्राह्मण राखीव जागांची अजिबात काळजी करीत नाही. >> अगदी सहमत आहे. म्हणूनचतरते इतकी वर्ष सरकारी आणि जैनमारवाड्यांच्या कॉलेजातील जागा ताठमानेने नाकारतायत.
कसली ताठ मान आणि काय नाकारताहेत? ते जे काही मिळवित आहेत ते राखीव जागांच्या माध्यमातून नसून मिळालेल्या गुणांवर आहे.
तसा बोर्ड लावायला अजिबात हरकत नाही.
10 Oct 2016 - 10:54 am | एमी
शुरुसेशुरु करू. आधी जो प्रतिसाद जातियवादी, उपहासात्मक वाटला त्याबद्दल थोडे:
फडणवीस मुख्यमंत्री असूदे नाहीतर.... मत देणारे असो किंवा न देणारे. >> याचा अर्थ असा आहे की: मुख्यमंत्री कोणत्या जातीचा आहे याने सर्वसामान्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे 'ब्राह्मण फडणवीस' vs 'पवारांची पावर' या काँस्पायरसी थेअरीज एवढ्या ऑब्सेसिवली मांडायची गरज नाही.
आणि तसेही ब्राह्मण फारच कष्टाळू... काही ना काही योग्य मार्ग शोधून काढतील. वाय अदर्स आर सो वरीड? >> याचा अर्थ असा आहे की:
फडणवीस = ब्राह्मण
ब्राह्मण = कष्टाळू, सरळमार्गी, कोणाकडूनही कोणत्याही प्रकारच्या मदतीची अजीबात गरज नसलेले, तरीही प्रगती करणारे इ इ
म्हणजेच
फडणवीस = कष्टाळू, सरळमार्गी, कोणाकडूनही कोणत्याही प्रकारच्या मदतीची अजीबात गरज नसलेले इ इ
सो जरा त्यांच्या क्यापेबिलीटीवर विश्वास ठेवा आणि मराठा मोर्चाच्या गहन प्रश्नावर योग्य तो तोडगा ते काढतीलच असे म्हणा की!
आता त्या वाक्यांत इतर ब्राह्मण, त्यांचे स्वबळ अन् त्यांच्या मनात अ/नसलेली आरक्षणाबद्दलची भिती वगैरे तुम्हाला कुठून दिसले माहीत नाही. त्यावर ह्यो भलाथोरला प्रतिसाद टंकलात की बस...
===
सबसिडाईज्ड शिक्षण ब्राह्मण घेताहेत? काहीतरीच काय?.... खुल्या वर्गाला मात्र संपूर्ण फी भरावी लागते. >> अहो सरकारी कॉलेजातला प्रत्येक विद्यार्थी सबसिडाइज्ड शिक्षण घेत असतो. खाजगी कॉलेजपेक्षा त्यांची फी निम्मी का असते विचार करा की. ट्युशन फीचा बराच भार सरकार उचलते + इतर स्वस्त सोयी असतात. आता 'हे फक्त ब्राह्मणांना थोडीच मिळतं?' म्हणू नका. साडेतीनटक्के लोकसंख्या असलेल्यांनी गेली दिडशे वर्ष सरकारी कॉलेजातील किती टक्के जागा व्यापल्यात बघा. 'ते त्यांना गुणवत्तेवर मिळालं' असे म्हणण्याला खाली उत्तर दिलंय.
कोणीही कोणालाही जागा व्हॉलंटरी किंवा ना नफा ना तोटा पद्धतीने वाटत नाहीत.... शिक्षण सबजिडाईझ्ड देखील नाही. >> दुसर्या पानावर एवढ्या लिंक देऊन चर्चा केली तरी तुम्ही परत तेच म्हणताय. सरकारी मान्यताप्राप्त खाजगी कॉलेजातील जागावाटप वॉलंटरीच आहे. कुठल्यातरी परीक्षेत मार्क मिळाले, फी भरायची तयारी असली म्हणजे शिक्षणसंस्थेतली जागा आपल्याच हक्काची होते या समजातून बाहेर या. तो हक्क नसतो, भिकही नसते, मदत मात्र नक्कीच असते. कारण त्यातून देणार्याचा काहीच फायदा होत नाहीय. त्यामुळे देणारा (ie सरकार किंवा जैनमराठा) ठरवणार तुम्हाला जागा द्यायची की नाही ते.
मी आधी म्हटल्याप्रमाणे ब्राहमणांना आरक्षणाची....१९४८/१९७८ ची पुनरावृत्ती होण्याची काळजी आहे. >> शांततेत चाललेल्या मोर्चांना प्रोवोक न करणे याखेरीज वैयक्तीत पातळीवर बाकीकाही करता येणार नाही. तो आधीचा धागा शेवटीशेवटी ब्रिगेडी पोस्ट आल्या म्हणून उडवला म्हणे. सुरवातीपासूनच 'बिग्रेड का निर्माण होते ते कळेल' अशा पोस्टी येत होत्या त्याचं काय? प्लिज नोट मोर्चावर, मराठ्यांवर टिका करू नका असे अजीबात म्हणणे नाही. तिकडे माबोवर लिंब्याच्या धाग्यावर दिमित्रिने चांगला ऋण प्रतिसाद दिलाय, इथेही अभ्या..ने झिरो आणि पॉइंट झिरो छान लिहिलेय, झालंचतर डांगेंचा आरक्षणाशिवाय कसे जगावे धागा चांगलाय.
कसली ताठ मान आणि काय नाकारताहेत?... राखीव जागांच्या माध्यमातून नसून मिळालेल्या गुणांवर आहे. >> च्यक च्यक. ब्राह्मणांना कोणाकडूनही कोणत्याही मदतीची गरज नसते ना? आणि मदत ही फक्त राखीव जागा आणि फीसवलत या फॉर्ममधेच असते का? जैनमराठ्यांनी खाजगी कॉलेज काढली नसती किंवा त्यातल्या जागा केवळ आपापल्या धर्मजातीपुरत्या लिमीट केल्या असत्या तर ब्राह्मणांनी काय केलं असतं? काहीतरी केलंच असतं असं मोघम उत्तर नको; तेतर सगळेच करतात. पण यांच्यामुळे किंवा नोकर्या निर्माण करणार्या पारशीबनिया वगैरेंमुळे बर्याचजणांची आर्थिक परीस्थिती सुधारली हे मान्य करायला हरकत नसावी. ब्राह्मण अन् त्यांच्या स्वबळाचा असा ढोल वाजवला जातोय की 'त्यांच्यात हरीतद्रव्यच आहे. त्यामुळे ते स्वतःचे अन्न स्वतःच बनवतात' असे वाटायला लागेल काही दिवसांनी. जरा प्रत्येक माणूस इतरांवर अवलंबून असतो मान्य करा की...
10 Oct 2016 - 3:10 pm | श्रीगुरुजी
त्यांच्या केपेबिलिटीवर विश्वास आहेच. ते योग्य तो तोडगा काढणारच. परंतु तो तोडगा मराठ्यांना "योग्य" वाटेल का याविषयी शंका आहे.
ब्राहमण स्वबळावर जगतातच हे सत्य आहे व त्यांच्या मनात आरक्षणाबद्दल भीति नसून वेगळीच भीति आहे हे आधीच २-३ वेळा लिहिले आहे.
सबसिडाईज्ड शिक्षण ब्राह्मण घेताहेत? काहीतरीच काय?.... खुल्या वर्गाला मात्र संपूर्ण फी भरावी लागते. >> अहो सरकारी कॉलेजातला प्रत्येक विद्यार्थी सबसिडाइज्ड शिक्षण घेत असतो. खाजगी कॉलेजपेक्षा त्यांची फी निम्मी का असते विचार करा की. ट्युशन फीचा बराच भार सरकार उचलते + इतर स्वस्त सोयी असतात. आता 'हे फक्त ब्राह्मणांना थोडीच मिळतं?' म्हणू नका. साडेतीनटक्के लोकसंख्या असलेल्यांनी गेली दिडशे वर्ष सरकारी कॉलेजातील किती टक्के जागा व्यापल्यात बघा. 'ते त्यांना गुणवत्तेवर मिळालं' असे म्हणण्याला खाली उत्तर दिलंय.
सरकारी कॉलेजे अत्यल्प आहेत. पुणे विद्यापीठांतर्गत ४०० हून अभियांत्रि़की महाविद्यालये आहेत. त्यापैकी फक्त १ सरकारी आहे.
तुम्ही ज्याला खासगी कॉलेजे समजता ती त्या अर्थाने खाजगी नाहीत (उदा. सिंहगड, पुणे विद्यार्थी गृह इ.). विनानुदीत म्हणजे खाजगी नव्हे. त्यांना उपलब्ध जागांपैकी फक्त २० टक्के जागा व्यवस्थापन कोट्यातून भरता येतात. उर्वरीत ८०% जागा या सर्व सरकारी नियमांनुसारच भरल्या जातात. ते स्वतः एकही जागा भरून शकत नाहीत. उदाहरणार्थ अभियांत्रिकीच्या या ८०% जागा सीईटीतील गुणांनुसार, जातीय कोट्यातून व विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रमानुसार थेट डीटीई कडून भरल्या जातात. महाविद्यालयांना फक्त फी ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे आणि फीची सुद्धा कमाल मर्यादा सरकारने ठरविली आहे. तिथले जागावाटप व्हॉलंटरी नाही.
10 Oct 2016 - 3:18 pm | श्रीगुरुजी
मोर्चे अजूनपर्यंत शांततेत असले तरी आता त्यात चोरपावलांनी नेते घुसले आहेत व प्रक्षोभक धमक्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच भविष्यातील मोर्चे असेच शांततेत निघतील का याविषयी शंका आहे.
जैनांना स्वतःची खाजगी कॉलेजे काढण्याचा कायदेशीर हक्क आहे व त्यात जास्त ५०% जागा स्वतःच्या कम्युनिटीसाठी राखीव ठेवता येतात. मराठ्यांना तो हक्क नाही. मराठे स्वतः काढलेली कॉलेजेस फक्त एखाद्या विशिष्ट जातीसाठी राखीव ठेवूच शकत नाहीत. ते असे करू शकत नाहीत कारण ते फार मोठ्या मनाचे आहेत असे नसून कायदेशीरदृष्ट्या त्यांना असे करण्याची परवानगी नाही. मराठ्यांनी कॉलेजेस काढली ती ब्राह्मणांवर किंवा इतरांवर उपकार करण्यासाठी काढलेली नसून कॉलेजेसच्या माध्यमातून प्रचंड पैसा मिळविण्यासाठी काढली आहेत.
बाकी हरितद्रव्याचं म्हणाल तर सर्वचजण एकमेकांवर अवलंबून असतात. आम्ही शेती केली नाही तर भारत उपाशी मरेल असली किंवा अशासारखी टाळ्याफेकू वाक्ये ब्राह्मण उच्चारत नाहीत. ब्राह्मण राखीव जागा, सरकारी मदत, नुकसानभरपाई इ. शिवायही स्वतःची उन्नती करू शकतात हेच लिहिले आहे.
7 Oct 2016 - 12:31 pm | नाखु
रडका प्रतिसाद.
कोपर्डी घटनेचे उघड आणि निर्लज्ज भांडवल केलेले दिसत नाही का या मोर्च्यात ? पीडीत व्यक्ती कुठल्या जातीची हे पाहूनच हे गलिच्छ राजकारण चालले आहे.(पीडीतेले न्याय मिळावी ती पिडीता आहे म्हणून फक्त कुठल्या जातीची आहे म्हणून मिळावा अशी मागणी करणे अगदी गौरवास्पद बाब असावी आप्ल्यासाठी नाही का?
खालील दुवे पहा आणि ठरवा जरा.
सत्ताहरण
इमेज सावरण्यासाठी सारे काही
आणखी हे अगदी महत्वाचे प्र्तयेक वेळेला सार्वासारवी साठी ब्रिगेड आणि छावा संघटना पदाधिकारी का येतायेत समोर.
पुन्हा एकदा सांगतो आरक्षणाच्या मागण्या रास्त असतीलही पण मार्ग आणि पद्धत (मोर्च्या ने द्बाव आणून) अतिषय चुकीची आणि गावपातळीवर ही जातीचे विखारी विष पसरवणारी आहे.
7 Oct 2016 - 2:46 pm | विशुमित
"सत्ताहरण" ... हे सांगणारं साहेबांचं कोकरू आहे. त्याच लय मनावर नका घेऊ.
तशी इमेज च्या बाबतीत मग माफीवीर व्यंगचित्रकारांची कोणीच हात धरू नाही शकत.
""अअॅट्रोसिएटीचा सर्वाधीक दुरुपयोग मराठ्याम्कडून केला गेला हे दस्तुरखुद्द तुमच्या जाणत्या राजाम्चेच मत आहे , त्या वर का मिठाची गुळणी धरली तुम्ही?""
मग मोर्चा मागे साहेब आहेत हे का म्हणता तुम्ही?
7 Oct 2016 - 4:06 pm | नाखु
मुख्यमंत्री बदल हे महाराष्ट्रात नवीन का आहे.
अगदी गोवारी मोर्चा,मुंबईवर हल्ला,नामांतर मोर्चा लाठीमार आणि कधी कधी कथीत भ्र्ष्टाचार प्रकरण.
अत्ता मुख्यमंत्री बदलले तर सर्वात मोठ्ठा राजकीय फायदा कुणाला? बाशींग बांधून तयार असलेल्या भावी मुख्यमंत्र्यांपेक्षाही आप्लया सोईचा आणि चौकशी पुढे न दामटणार्या बोटचेप्या मऊ माणसाची पवार साहेब वाट पहात आहेत.
पवार साहेब हे सध्य स्थीतीत राजकारणातील विनोद कांबळी आहेत हे सत्य आहे.
विनोद कांबळी गुणवत्तेत्/क्षमतेत गांगुलीपेक्षा सरस आणि दर्जा असलेला होता पण अंग्भूत गुणांमुळे स्व:ताची माती करून त्याचे खापर तेंडुलकरपासून इतरांवर फोडत राहिला. तसेच काहीसे आहे.(पंतप्रधान पदासाठी सारखी कॉन्ग्रेसशी धरसोड नडली किमान दोनदा कॉन्ग्रेसशी फारकत घेऊन शेवटचे मंत्रीपद त्यांच्या कडून फक्त उपद्रवमुल्यतेवर मिळवले)
त्यांचा जनसंपर्क्/अभ्यास्/लोकांवर पकड निर्विवाद अत्यंत उच्च दर्जाची आहे पण सत्तेची प्रचंड हाव आणि विधिनिशेध न बाळगणारी सत्ता-पैसा लालसा,पक्षातील लोकांचाही नि:संदिग्ध विश्वास नसणे (म्हणून रा रा प्रत्येक नेत्याने स्वतःची संरक्षीत कुरणे तयार केली .भुजबळ्,तटकरे,नाईक्,जाधव)
एक एक प्रकरण न्याय प्रविष्ठ होत असताना सगळ्यांनी अचानक सक्रीय होणे हा नक्कीच योगायोग नाही.
ह्या मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या सहकार्यांनीही आरक्षणाला अनुकुलताच दाखविली आहे कारण त्याही पक्षाचे मतदार/आमदार मराठा आहेत.प्रत्यक्षात
मागच्या धाग्याअव्र एक प्रतिसाद दिला होता तो तुम्ही वाचला असेल तर कार्यकारण भाव लक्षात येईलच.
तसेच आरक्षणाचा मुद्दा शिजायला/भिजायला १०-१२ वर्षे लागली तो निस्तरायला किमान २-३ वर्षे तरी लागतील की नाही,का फुसका अध्यादेश काढून पुढे न्यायालयात तोंडावर पडायचे आणि आम्ही दिले होते पण न्यायलयाने नाकारले असे म्हणायचे.
सगळ्यांना विश्वासात बैठक घेऊन प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
7 Oct 2016 - 4:41 pm | विशुमित
पवार साहेबांचं जाऊ द्या हो, मुख्यमंत्री एवढे का गांगरलेत ते सांगा ?
7 Oct 2016 - 11:40 pm | श्रीगुरुजी
मुख्यमंत्री गांगरलेत? कधी?
15 Oct 2016 - 5:00 pm | चिनार
म्हणजे कसंय..जाणते राजे पवार साहेबांनी इतके वर्ष मराठा आरक्षणाचा विषय तसाच रेंगाळत ठेवला तर ती त्यांची राजकीय थोरवी !! आणि मुख्यमंत्र्याने लक्ष घालून आरक्षणाचा प्रश्न निकाली लावायचा प्रयत्न केला तर ते गांगरले !!
आणि म्हणे आम्ही भक्त नाही.
7 Oct 2016 - 4:23 pm | सुखीमाणूस
येताजाता ब्राम्हणाना वाइट ठरवण्यापेक्शा वास्तवात या.
किती भीती साडेतीन टक्कयान्ची.
साडेतीन टक्केवाले घाबरले तर ठीक आहे सन्ख्याबळ कमी आहे.
आणि खेड्यातून ब्राम्हणाना बाहेर काढलत सगळ ताब्यात घेतलत पण काही फायदा करून घेता आला का?
आरक्शण मिळाले तर त्याचा फायदा कशावरून जातीतल्या गरीबानाच होइल?
सगळ्या जातीतले लोक ताकद मिळाली की दुसर्यावर अन्याय करतात पण ब्राम्हणाना सर्वात जास्त झोडपले जाते.
मनूस्म्रूती ला विरोध करणारे त्यासाठी RSS ला पाण्यात पहाणारे स्वतः मात्र जातीवर आधारित मोर्चे काढतात यातच सगळे आले.
7 Oct 2016 - 4:38 pm | विशुमित
तुम्हाला ब्राह्मणवादाचे खूपच अपचन झालेले दिसतंय. उलटी होईल जरा जपून.
मराठा क्रांती मोर्चा आणि ब्राह्मणाचा काय संबंध??
8 Oct 2016 - 3:10 pm | ओम शतानन्द
सत्य काही लोकान्ना झोम्बते
18 Oct 2016 - 8:15 pm | सामान्यनागरिक
शेवटी आपल्या भ्रष्ट नेत्यांना वाचवणे हाच प्रमुख उद्देश आहे. फडणवीसांना घालवून हे साध्य होईल असे त्यांना वाटते.
आता जाहीर केलेले उद्देश साध्य होणार नाहीत हे त्यांना माहीत आहे,ते तर्कसंगत नाहीत आणि जाहीरपणे त्यांना justify करणे शक्य होणार नाही म्हणूनच कोणी ही या मोरचाचे नेते मगणून पुढे येत नाही. नाहीतर इतक्या मोठ्या दबाव गटाचे नेतृत्व म्हणून कोणीही पुढे येत नाही असे कसे होईल ?
27 Sep 2016 - 9:41 pm | संदीप डांगे
मला खालचे लिहिलेले विचायाचे होते, टंकायला वेळ नसल्याने पेस्टत आहे. मूळ पोस्ट फेसबूकवर दिलिप माने यांची.
मराठा आरक्षणाचे समर्थन करणारांना प्रतिवाद करता येत असेल तर अवश्य करावा. दुसर्या बाजूने मुद्देसूद बोलणार्यांची अजूनही वाट पाहत आहे.
-------------------------
एट्रोसिटी कायदा कसा वाईट आहे याच जस दिवस रात्र रडगाण चालु आहे अगदी तसच आता आरक्षण किती वाईट आहे हे सांगण्या साठी सकल समाज एकवटल्याचे जाणवते.
आरक्षणा मुळे कशा प्रकारे 90% वाला भाऊ घरी आहे हे सांगितल जातय.
आमच्या समाजाची जी काही अधोगति झाली ती फक्त आणि फक्त आरक्षणा मुळेच झाली अस final conclusion काढलय.
बर हे आरक्षण आहे तरी किती? ते का भेटत याचा विचार कोणी करत नाही. आला मेसेज केल फॉरवर्ड..
वाईट आहे म्हणजे आहे बस विषय संपला.
थोड़फार सरकारी नोकऱ्यांकड पाहिल तर महाराष्ट्रात किती सरकारी नोकऱ्या आहेत?
MPSC जी जवळ पास सगळ्यांना परिचीत असणारी संस्था आहे जी दरवर्षी जागा काढ़ते.
बर यात जागा किती निघतात?
आता सेल्स टॅक्स च्या जागा आल्या. टोटल 62 जागा त्यात SC ला किती असतील?
फक्त 1 जागा.
ओबीसी ला किती?
त्यांना ज़रा जास्त आहेत, 2 जागा
आणि ओपन ला जागा किती? त्यांना 37 जागा आहेत.
मग इथे त्या 1 जागेसाठी कोण्या ओपन केटेगरी वाल्या पोराच नुकसान झाल का?
2014 ला उपजिल्हाधिकाऱ्याच्या 44 जागा आलेल्या. त्यापैकी ओपन ला 21,
SC ला 3 आणि ओबीसी ला 7 जागा
मग इथे 3 जागांमुळे कोणता 90% वाला स्कॉलर अडून राहिला का? बर कटऑफ चा विषय असेल तर ओपन आणि SC मध्ये असा कितीचा फरक आहे? 3 मार्क्स चा फक्त.
हीच गोष्ट भूमिलेख उपअधीक्षक साठी एकूण 19 जागा त्यातल्या ओपन ला 13 जागा. SC ला 1 आणि ओबीसी ना झीरो
आता कर सहाय्यक ची मोठी जाहिरात आली एकूण 450 जागा आहेत.
त्यात एकट्या ओपन साठी 250 जागा आहेत. SC ला 56 आणि ओबीसी ला 80 आणि भटक्या विमुक्तांसाठी 8 आणि 5 अशा जागा आहेत.
PSI पदासाठी 828 जागांची भरती झाली त्यात एकट्या ओपन ला 642 जागा, SC ला 17 ओबीसी ला 21 आणि NT ला 1 जागा.
एकट्या MPSC ने 2014 या वर्षात एकूण 668 जागा काढल्या त्यात SC ला सगळ्या मिळून 70 जागा सुद्धा न्हवत्या.
मग 70 जागांमुळे तुमचे किती 90% वाले घरी बसले?
बर हे झाल MPSC च बाकीच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये यापेक्षा वेगळ चित्र नाही.
आता हे महाराष्ट्रा पुरत झाल. देश पातळीवर वर पण हेच आहे. भारतातील सरकारी बँकांसाठी IBPS नावाची संस्था सामूहिक परीक्षा घेते. यावेळी एकूण 8822 जागा आहेत त्यापैकी 4500 जागा ओपन ला SC ला 1338 आणि ST ला 600 जागा आहेत.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये पण हेच आहे.
2014 ला बॅंकेच्या लिपिक पदासाठी 3500 जागांपैकी ओपन ला 1500 जागा आणि SC ला 300 जागा.
इथे तर सगळ्यांसाठी कटऑफ एकच आहे.
*******
एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्या सरकारी नोकऱ्या पकडून 1500 च्या पुढे पण जागा निघत नाहीत. या 1500 पैकी SC ला जास्तीत जास्त 100 जागा असतील.
मग या शंभर लोकांमुळे सकल समाजाच नुकसान झाल का?
या 100 पोरांमुळे किती 90% वाले घरी बसले आहेत? तुमच्या अधोगतिला या 100 जागा कारणीभूत आहेत का?
आरक्षणाचा गैरफायदा कसा होतो नेमका?
गैरफायदा होत असता तर एकपण ओपन वाला सेलेक्ट झाला नसता. सगळे SC, ST, OBC आज सरकारी नोकऱ्यांमध्ये घुसले असते.
हिथ ते त्यांच्या राखीव 100 जागांमध्ये लढत आहेत. तुम्ही तुमच्या 1000 जागांमध्ये लढा. सिंपल आहे याचा एवढा मोठा इशू करण्याच कारण नाही.
दुसरा महत्वाचा मुद्दा एकट्या महाराष्ट्रात
SC मध्ये एकूण 59 जाती येतात
ST मध्ये 47
VJ मध्ये 14
आणि ओबीसी मध्ये 346 जाती येतात.
आता विचार करा त्या सेल्स टॅक्स इंस्पेक्टर च्या 1 जागेसाठी 59 जाती लढत आहेत.
त्या 2 जागेसाठी ओबीसी च्या 346 जाती लढत आहेत, किती जीव घेण कॉम्पिटेशन आहे. आणि तुम्ही आम्हाला अगदी सहज फुकटे म्हणुन हिनवता.
आता ज़रा प्राइवेट कंपन्यांकड पाहिल तर दिसून येईल की तिथ महिन्याला लाखो जागा उपलब्ध असतात.
यावर्षी गवरमेंट ने 60 लाख रोजगार उपलब्ध करणार असल्याच जाहिर केलय आणि भारतातल्या IT, Finance, Engineering या क्षेत्रात प्रचंड नोकऱ्या उपलब्ध आहेत. इथे कोणतच आरक्षण उपलब्ध नसत. इथ फक्त आणि फक्त मार्क्स च्या जोरावर पोर लाखांचे पैकेजेस घेतात.
मग तुमच दुखन नेमकं कोनत आहे?
100 जागांमुळे सगळा समाज अधोगतिला जातो का?
मुळात आरक्षण हे मागास लोकांना विविध क्षेत्रात प्रतिनिधि स्वरुपात पाठवन्याची व्यवस्था आहे. आरक्षण म्हणजे एक मार्ग आहे खैरात नाही.
कोणी SC, ST वाला दिवसरात्र झोपा काढून कलेक्टर होत नाही त्याला पण तेवढीच घासावि लागते.
आता परिक्षांसाठी सर्वांना सामान फी असावी ही मागणी योग्य आहे. SC ला 100 तर ओपन ला पण 100 ठेवली तर काही बिघड़नार नाही.
पण काही हुशार लोकांना हे मान्य नाही. त्यांच्या मते सरसकट SC,ST ला 600 रूपये फी करा. म्हणजे किती उदात्त विचार आहेत यांचे.
आरक्षणा निमित्ताने इथे फेसबुक वर तर किती राळ उठली? एक गृहस्थ म्हणले माझ्या वडिलांनी त्यांच्या पेक्षा वयाने कमी असणाऱ्या एका शिक्षकाच्या हाताखाली काम नको करायच् म्हणुन राजीनामा दिला.
ही गोष्ट खरच अभिमानस्पद आहे का?
कवियत्री म्हणवणाऱ्या मुली, अभ्यासु वाटनारे गृहस्थ अगदी सगळ्यांचे भाऊ, बहिण, मुल आरक्षणामुळे घरी बसून आहेत.
टीवी वर बोलणाऱ्या मुलींच् तर काय बोलाव?
तिथे तर A to Z मागासवर्गीय मुलींचे बाप हे गर्भश्रीमंत आहेत. आणि त्या सगळ्या मागासवर्गीयांना मुलींना मोजून 50% पडले असून ते परदेशात MS करत आहेत.
तर त्याच वेळी सरसकट सगळ्याच सवर्ण मुलींचे बाप अगदी कफल्लक आहेत. आणि त्यांच्या मुली 90% पाडून पण घरी आहेत.
हे सगळ कशामुळ?
फक्त आणि फक्त आरक्षणामूळ!!
वाह रर पठ्ठे __/\__
27 Sep 2016 - 10:06 pm | अनिरुद्ध.वैद्य
जागेचा हिशोब मांडलातर सगळे समिकरण बिघडतात, त्यामुळेच तर फक्त भावनीक आवेग अन अस्मीता भडकावल्या जातात.
27 Sep 2016 - 10:13 pm | अनिरुद्ध.वैद्य
जर तुमचा आय.आय.टी. किंवा आय.आय.एम अथवा आय.आय.एस. मधला प्रवेश हुकला तर समजु शकु, की हो बुवा, तुमचे आरक्षणामुळे नुकसान झाले.
नाहीतर चिक्कार एन.आय.टी., गव्हर्नमेंट अन ईतर इंजिनिअरींग कॉलेजेस आहेत, जिथे आरामात प्रवेश मिळु शकतो.
28 Sep 2016 - 10:15 am | sagarpdy
राजकारण.
28 Sep 2016 - 11:44 am | sandeepn
मला स्वत:ला अनुभव आहे.
मला ९२ % असुन प्रवेश मिलाला नाही COEP ला. तोच OBC वाल्याला सहज मिळाला . मार्क , अर्थिक परिस्थिती सारखीच असुन :(
हे स्वानुभव आहेत. उगाच इतके लोक जमत नाहीत . अशा भड्कावनीला बळी पड्नारा समाज नाहीये हा.
28 Sep 2016 - 3:43 pm | सुखीमाणूस
पण आज आरक्षण मागून you are repeating history.
त्यापेक्षा अत्ताचे आरक्षण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा
५०% आरक्षण आणि ५०% open seats
Fees same for all.
५०% आरक्षण EBC साठी• त्याच्या फीचे पैसे सरकारने कर्जाउ द्यायचे
कमाइ शुरू झाल्यावर त्याने परत करायचे
5 Oct 2016 - 11:16 pm | वगिश
आरक्षण रद्द करा अशी मागणी आधीपासूनच करण्यात येत आहे (5+ years) पण त्यासाठी आंदोलन केले तर ते इतर समाजाविरुद्ध आहे असा गैरसमज पसरवला जाईल. मुळात आरक्षण रद्द करण्याची हिम्मत अजून तरी सरकार मध्ये नाही.
5 Oct 2016 - 11:33 pm | संदीप डांगे
सरसकट आरक्षण रद्द करण्यापेक्षा क्रिमी लेयरची अट लागू करणे जास्त प्रॅक्टीकल व उपयुक्त आहे. सध्या जे तोटे दिसत आहेत ते फक्त आरक्षण उपभोगून भाग्योदय केलेल्यांनी परत आरक्षणाच्या रांगेत उभे राहिल्यामुळे दिसत आहेत. हे दोन प्रकारचे आहेत. एक तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पण सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या घटकांना अन्याय वाटणे तर सामाजिकदॄष्ट्या मागासलेल्या घटकांना संधी उपलब्ध असूनही आरक्षणाची गरज नसलेल्यांनी घुसखोरी करुन संधी पळवणे हे दुसरे. ह्या दोन्ही गोष्टी क्रिमी लेयर लागू केली तर दूर होण्याची शक्यता आहे.
28 Sep 2016 - 8:23 pm | एकुलता एक डॉन
coep ची गरज नाही
मी इंजिननियग्न 12 वि चा आळस केला ,फक्त BCS केले ,बक्कळ पैसे कमावतो
28 Sep 2016 - 12:57 pm | बबन ताम्बे
28 Sep 2016 - 12:57 pm | बबन ताम्बे
28 Sep 2016 - 12:59 pm | बबन ताम्बे
28 Sep 2016 - 1:00 pm | बबन ताम्बे
28 Sep 2016 - 1:09 pm | बबन ताम्बे
महाराष्ट्रातील राखीव जागा.
SC - 13 % reservation : Total 59 castes
ST - 7 % reservation : Total 47 Tribes
OBC - 19 % reservation : Total 346 castes
SBC - 2 % reservation : Total 7 castes
VJ - 3 % reservation : Total 14 Tribes
NT-B 2.5 % reservation : Total 35 Tribes
NT-C 3.5 % reservation : Total 1 caste
NT-D 2 % reservation : Total 1 caste
Total reservation : 52 %
28 Sep 2016 - 3:03 pm | परश्या
श्री.दिलीप माने यांची आपण पेस्टलेली पोस्ट निव्वळ हास्यास्पद आहे. मुळात त्यांना आरक्षण म्हणजे काय हेच कळलेलं दिसत नाही.
>> ओपन च्या जागा सर्वांसाठी खुल्या असतात. या २१ मध्ये सर्व आले. निवड करताना प्रथम खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी लावली जाते. २१ मध्ये SC ,ST, OBC, NT, VJNT यांचीही निवड होऊ शकते (गुणावत्ते नुसार) आता वर म्हटल्या प्रमाणे कटऑफ मध्ये ३ गुणांचाच जर फरक असेल तर या २१ मध्ये SC ,ST, OBC, NT, VJNT पैकीच बहुतांश निवडले जातील व त्यांच्या प्रवर्गातल्या जागा रिकाम्या राहतील जेथे फक्त आणि फक्त त्यांच प्रवर्गातील उमेदवार भरले जातील. माने यांच्या म्हणण्यानूसार ४४ पैकी ५०% जागा म्हणजे २१ जागा या खुल्यांसाठी याचा अर्थ खुल्यांसाठी आरक्षित नव्हे.
28 Sep 2016 - 3:14 pm | श्रीगुरुजी
ही माहिती कोठून मिळविलीत? राखीव जागांच्या प्रमाणानुसार ६२ पैकी किमान ३३ जागा राखीव असायला हव्यात व खुल्या जागा जास्तीत जास्त २९ असायला हव्यात. वरील आकडे चुकलेले आहेत.
ओपनला फक्त २१ आहेत (४४ पैकी). उर्वरीत २३ राखीव आहेत. फक्त एससीच्या ३ जागांचा प्रश्न नसून एकूण २३ जागांवर ओपनवाल्यांना अजिबात संधी नाही. हे नुकसान नाही का?
आकडे चुकले आहेत.
आकडे चुकले आहेत. ४५० जागांपैकी जास्तीत जास्त २१६ जागा खुल्या असू शकतात. उर्वरीत २३४ जागांवर ओपनवाल्यांना जातीमुळे संधी नाही.
आकडे चुकले आहेत.
आकडे चुकले आहेत. दुसरं म्हणजे या ७० जागांमुळे ७० ओपनवाले तरी घरी बसले ना?
राखीव जागांमुळे एकावर अन्याय होवो वा हजारांवर, अन्याय हा अन्यायच असतो.
28 Sep 2016 - 3:33 pm | संदीप डांगे
माझ्यामते, एखाद्या खात्यात 100 जागा असतील त्यात 70 आधीच भरलेल्या असतील तर ओपनिंग 30 जागा निघतील त्यात त्या 30 मध्ये आरक्षण गणिताप्रमाणे विभागणी होणार नाही, तर खात्यात लोक आधीच काम करत असतात, तेही मोजावी लागतील,
28 Sep 2016 - 3:46 pm | श्रीगुरुजी
तसे होणार नाही. ३० जागा या नवीन टक्केवारीनुसार भरल्या जातील. आधीच्या ७० जागातील टक्केवारी धरली जाणार नाही.
28 Sep 2016 - 3:57 pm | संदीप डांगे
याबद्दल सरकारी खात्यात काम कारणाराकडून खात्रीदायक माहिती हवी आहे
28 Sep 2016 - 3:36 pm | संदीप डांगे
सर्व जागा एकदाच जाहीर व्हायला ते कॉलेजचे प्रवेश नाहीत,
28 Sep 2016 - 3:44 pm | श्रीगुरुजी
बरोबर आहे. कोणत्याही नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या तारखेची घोषणा होते व नंतर तो निर्णय अंमलात आणला जातो. १९९१ मध्ये मंडल आयोग लागू झाल्यानंतर त्या तारखेनंतरच्या सर्व नवीन जागा नवीन टक्केवारीनुसार भरल्या गेल्या. त्या तारखेपूर्वी कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे बघितले गेले नव्हते.
5 Oct 2016 - 4:18 pm | amit१२३
https://www.mpsc.gov.in/Site/Common/ViewPdfList.aspx?Doctype=c1fce94a-52... या लिंक वर जाऊन माहिती घेऊ शकता एकूण 62 पैकी 25 आरक्षण वाल्याना आणि 37 खुल्या वर्गाला त्यात पण काही आरक्षण वाले असतातच. बरं आरक्षण घेऊ द्या पण ह्यांना गुणांमध्ये पण सवलत , फी मध्ये पण सवलत , वयाच्या अटी मध्ये पण सवलत. त्यामुळे अर्धवट माहिती असलेले फेसबुक , व्हॉटस अप चे मेसेज पाठवू नका
5 Oct 2016 - 6:44 pm | संदीप डांगे
62 पैकी 25 आरक्षण वाल्याना आणि 37 खुल्या वर्गाला त्यात पण काही आरक्षण वाले असतातच.
>> सिद्ध कराल काय की खुल्या वर्गातून आरक्षणवाल्या जातींमधले निवडले जातात.
बरं आरक्षण घेऊ द्या पण ह्यांना गुणांमध्ये पण सवलत , फी मध्ये पण सवलत , वयाच्या अटी मध्ये पण सवलत.
>>गुणांमधे सवलत कुठे बघितलीत? फी व वयात सवलत देण्यामागे कारणे आहेत. ती समजून घ्यायचीच नसतील तर असोच.
त्यामुळे अर्धवट माहिती असलेले फेसबुक , व्हॉटस अप चे मेसेज पाठवू नका
>> मला वाटतं, अर्धवट ज्ञानावर किंवा आकसावर आधारित प्रतिसाद तुम्हीच न दिलेले बरे की नाही?
6 Oct 2016 - 10:25 am | परश्या
सोलापूर जिल्ह्यातील सन २०१५ मधील तलाठी भरतीची निवड यादी खाली दिली आहे. खुल्या प्रवर्गाच्या १३ जागांपैकी एका (१) जागेवर इ.मा.व. उमेदवार निवडला आहे (शेवटचा उमेदवार पहा). टक्केवारीचा विचार करता ७.६९ टक्के जागेवर खुलेतर निवडले आहेत. हे प्रातिनिधीक स्वरूपात आहे.अशा टक्केवारीत बदल होऊ शकतो. मला वाटतं हे पुरेसे आहे.

6 Oct 2016 - 10:52 am | संदीप डांगे
13व्या जागेसाठी ओपनवाला मिळाला नाही की त्याला डावलून ओबीसी उमेदवाराला निवडले? काही तांत्रिक गोंधळ तर नाही यात? ओपन वाले गप्प बसतील?
8 Oct 2016 - 10:11 am | मार्मिक गोडसे
.
छान माहीती.
आरक्षण मागून मराठा समाज खुल्या वर्गाच्या अन्यायात भरच टाकत आहे. आम्ही खुल्या वर्गात सवलत मागणार नाही असे मोर्चेकरी म्ह्टल्याचे आठवत नाही. आरक्षण मागण्यापेक्षा खरंतर खुल्या जागांवर होणार्या अन्यायाविरुध मोर्चा काढायला पाहीजे होता.
6 Oct 2016 - 1:11 pm | घायाळ
अमित संदीप आणि परश्या
खुल्या प्रवर्गात येणारे लोक हे फक्त खुल्या प्रवर्गातच प्रवेश घेउ शकतात किंवा निवडणूक लढवू शकतात..
आरक्षणात येणा-या उमेदवारासाठी त्याचा विवक्षीत प्रवर्ग अधिक खुला प्रवर्ग असे दोन पर्याय उपलब्ध असतात.
खुला प्रवर्ग याचा अर्थ फक्त खुल्या प्रवर्गात येणा-या लोकांसाठीच त्या जागा आहेत असा होत नाही.
'खुला' हा शब्द स्वयंस्पष्ट आहे. पात्र असणा-या कुठल्याही प्रवर्गातील उमेदवारासाठी ती जागा उपलब्ध आहे असा त्याचा अर्थ होतो.
त्यामुळे तलाठी निवडीच्या उदाहरणातला ओबीसी उमेदवार खुल्या जागेवरूनच का निवडला अशी हरकत घेता येणार नाही.
6 Oct 2016 - 2:53 pm | संदीप डांगे
म्हणजे ह्या प्रकरणात आरक्षण नसलेल्या जातींवर अन्याय झाला असे म्हणता येईल की नाही?
6 Oct 2016 - 4:50 pm | घायाळ
नाही,
या विशिष्ठ प्रकरणापुरते बघू गेल्यास या यादीतील शेवटच्या दोन्ही उमेदवारांची गुणसंख्या समान आहे. त्याच्यामुळे खुल्या प्रवर्गातील उमेदवारावर अन्याय झाल्याचे prima facie तरी म्हणता येणार नाही.
आणि ९०% वाला ओपन आणि ४०% वाला रिझर्वड या हाकाटीला छेद देणारे हे जितेजागते उदाहरण आहे
6 Oct 2016 - 5:21 pm | संदीप डांगे
धन्यवाद! हेच म्हणायचे होते
7 Oct 2016 - 11:12 am | परश्या
गुण संख्या समान आहे म्हणजे अन्याय झालाच नाही असे म्हणता येणार नाही. याच तलाठी पदाच्या भरतीची प्रतिक्षा यादी बघितली तर असे दिसते की प्रतिक्षा यादीतील पहिल्या ३ उमेदवारांना देखील १५२ गुण आहेत. म्हणजे समान गुण आहेत. त्यांचा मुळ प्रवर्ग ही खुलाच आहे. हा आता शासकीय नियमानुसार समान गुण असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवारास संधी मिळते या नियमानुसार भरती झालेली आहे. म्हणजे कमीत कमी पहिल्या तिघांवर तरी अन्याय झाला नाही काय.? ( खुल्या व खुलेतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अटही वेग वेगळी आहे. हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.) महत्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेत ओ.बी.सी. प्रवर्गासाठी जागा उपलब्ध नव्हती.

8 Oct 2016 - 10:45 am | आनंदी गोपाळ
ओबीसीला वयाची अट शिथिल होत नाही. ओबीसी व ओपनची सारखीच आहे.
8 Oct 2016 - 3:15 pm | ओम शतानन्द
१ नम्बर
27 Sep 2016 - 10:20 pm | संदीप डांगे
नाशिकमधे चाळीस लाख मोर्चेकरी जमल्याचा संयोजकांचा दावा होता.
मी थोडा हिशोब मांडला तर किमान २१ किलोमीटरची रांग लागायला हवी होती नाशकात. तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता दोन-अडीच किमी आहे. गोल्फक्लब ची क्षमता सर्व लोक अगदी दाटीवाटीने उभे राहिले तरी आठ लाखाच्या वर जाणार नाही. इथे सर्व मांडी घालून बसलेले दिसले. त्यामुळे फारतर तीन ते चार लाख असतील. सर्व मोर्च्यात मिळून डोक्यावरुन पाणी दहा लाखाच्या वर पब्लिक नसेल. असेच प्रत्येक ठिकाणच्या मोर्च्याचे चित्र दिसत आहे. रोज सांगितली जाणारी रेकॉर्डतोड गर्दीची आकडेवारी 'धूळफेक' आहे असे माझे मत.
प्रामाणिक हेतू (असे दाखवले तरी जात आहे बुवा) असणार्या मोर्च्याच्या संयोजकांना ही हातचलाखी करायची काय गरज पडत असावी?
(बरेच फेसबुकारुढ व्यक्तिमत्वे तोंडाला येईल ती गर्दीची आकडेवारी फेकत आहेत ते एक वेगळंच. कुणीतरी नाशकात ६३ लाख गर्दी झाल्याचे टाकले होते. ६३ लाख लोकांनी नीट उभे राहिले तर किमान अडिचशे एकर जमीन लागेल. साधुग्रामसाठी तीनशे एकर जमीन सरकारने दिली होती. ती किती असते हे पाहायचे असेल तर गूगल मॅप आहेच. )
27 Sep 2016 - 11:00 pm | खटपट्या
धरून चाला की २ लाख लोकंच आले होते..
काय फरक पडतो?
27 Sep 2016 - 11:30 pm | संदीप डांगे
हाच प्रश्न आयोजकांना विचारलाय, काय फरक पडतो खरी आकडेवारी जाहीर केली तर...?
28 Sep 2016 - 8:46 am | नाखु
झाकली मूठ सव्वा लाखाची.
28 Sep 2016 - 9:28 am | श्री गावसेना प्रमुख
४० लाख लोकांना घेउन यायला किती वाहने लागतील्,एका ट्रक मध्ये ५० माणसे बसतात असे जर गृहीत धरले तर कमीत कमी ८० हजार ट्रक लागतील.इतकी वाहने नाशकाच्या गल्ली बोळात उभी करावी म्हटली तरी उभी करता येतील काय.
त्यात अजुन छोटी चार चाकी वाहने वेगळी आहेत.
28 Sep 2016 - 11:18 am | भीडस्त
संदीपभो काहीही अभ्यास ना करता लिहायची तुमची खोड कधी जाणार कुणास ठाऊक !
नाशकात तीन चार लाख म्हणताय
मग पुण्यात किती होते
सात आठ लाखच म्हणणार तुम्ही ...
तुमचंही काय चुकलं म्हणा पुढची गणती तुम्हाला येतच नसणार. तुम्ही तरी काय करणार!
पुण्याचा आकडा सांगू म्हणता .....
नासा माहित आहे का? नसणारच माहीत तुम्हाला
अमेरिकेची नॅशनल अँड एरॉटिक स्पेस असोशन अशी संस्था आहे
तर सारा बाजूला ती झापड डोळ्यांची आणि वाचा
तथ्य समजून लिहीत राहाल अशी आशा करतो
28 Sep 2016 - 11:42 am | अनिरुद्ध.वैद्य
लींक देता का? शेअर करायला आवडेल!
28 Sep 2016 - 11:56 am | नाखु
तिकडे द हिंदू म्हणतेय २० लाख (नासाची अधिकृत लिंक द्याना भिडस्त भौ).मराठी बातम्या म्हणतात २५ लाख
खरे काय तेच कळेना?
28 Sep 2016 - 12:34 pm | भीडस्त
@ अनिरुद्ध आणि @ नाखु
लिंक बिंक आम्ही जाणित नसतो
आम्ही म्हटलं ना एवढे तर एवढेच लोक मोर्च्याला हजर होते.
एवढीच हौस आहे तर नासाच्या साईटवर जाऊन बघा ना
इथे शंका काढण्यात काय हशील
आमच्या 'मक्रांमुमो'च्या WA वर आलेली पोस्ट ही लिंक आहे चालतेय का बघा
28 Sep 2016 - 12:41 pm | वाल्मिक
अक्ख्या पुण्याची एवढी लोक संख्या आहे का ?
28 Sep 2016 - 12:53 pm | भीडस्त
तुम्हाला नासा लिहिलेलं दिसत नाही का
आणि मोर्चा पुण्यातल्या लोकांचा होता का फक्त
28 Sep 2016 - 1:00 pm | वाल्मिक
सॅटेलाईटद्वारा लोक मोजता येतात ? नासाची कृपया लिंक दाखवावी जिथे त्यांनी मोजदाद दाखवली आहे
28 Sep 2016 - 1:00 pm | sagarpdy
माझ्या गणिताप्रमाणे एवढी लोकसंख्या 40 फूट रुंद रस्त्यावर मावण्यासाठी प्रति माणशी 1 चौरस फूट प्रमाणे किमान 300 किमी रास्ता लागेल.
28 Sep 2016 - 1:01 pm | संदीप डांगे
;) =))
28 Sep 2016 - 1:31 pm | नावातकायआहे
साहेब मोर्चा होता.
लोक चालत होते. एका जागी उभे न्हवते हो....
एक फुटात चालत होते काय? :-)
28 Sep 2016 - 2:01 pm | भीडस्त
शेकडो हजारो लाखो वर्षे तुमच्याकडून चहुअंगाने 'दमन' झालेले लोक आहोत आम्ही
आम्हाला कशाला तीनशे किलोमीटर जागा लागते.
तीन किलोमीटर जागेतच आमचे
एवढे लोक मोर्चात हाजरि लावून गेलेले आहेत.
आणि
तुमच्या माहितीसाठी सांगतो
पण हे ही तुम्ही आजच्या सकाळ मधे वाचले नसेलच.
त्यामुळे बारामतीत तर गर्दीचा उच्चांक मोडला जाणार
नासाची यंत्रणा सुद्धा ही गर्दी मोजू शकेल याबाबत मी साशंक आहे .
28 Sep 2016 - 2:26 pm | वाल्मिक
शेकडो हजारो लाखो वर्षे तुमच्याकडून चहुअंगाने 'दमन' झालेले लोक आहोत आम्ही
अश्लील अश्लील अश्लील
28 Sep 2016 - 3:15 pm | भीडस्त
काय शिश्न आणि काय अशिश्न ते कारभारी बघून घेतील इथले
तुम्ही का म्हणे ढुसण्या मारताय सारख्या सारख्या
28 Sep 2016 - 3:17 pm | भीडस्त
shlil ashlil असे वाचावे
मराठीत नीट अक्षर उमटत नाही कंप्युटरमधून सॉरी.
28 Sep 2016 - 3:40 pm | पुंबा
भलतेच भीडस्त बुवा तुम्ही..
28 Sep 2016 - 3:57 pm | भीडस्त
तुम्हाल काय आड्सन आलि ब्वा आता
(काय ब्वा ल्वाकं ह्येत इथुल्लि. काहिऽऽ आयड्या घ्यत्याय्, बबं ह्येत का बाया कायसुदिल कळत नाय्)
28 Sep 2016 - 3:12 pm | sagarpdy
कौतुकास्पद आहे हे. प्रति माणशी 0.01 चौ.फूट जागा लागत असेल तर आरक्षणाची गरज किमान बस-रेल्वे मध्ये तरी नक्की पडणार नाही. पैसे वाचले.
28 Sep 2016 - 1:20 pm | अनिरुद्ध.वैद्य
आम्ही म्हटलं ना एवढे तर एवढेच लोक मोर्च्याला हजर होते.
>>
ठीकायं! अभिनंदन!
28 Sep 2016 - 2:01 pm | वाल्मिक
दिल्ली मध्ये कावळे किती च्या अकबर बिरबल ची आठवण आली
28 Sep 2016 - 2:08 pm | भीडस्त
तुमचंही अभिनंदन
28 Sep 2016 - 12:04 pm | पैसा
त्यांनी पाय मोजून दोनने भागले असणार!
28 Sep 2016 - 2:20 pm | रायबा तानाजी मालुसरे
नॅशनल अँड एरॉटिक स्पेस असोशन????
मग बरोबर आहे. नक्कीच आकडेवारी खरी असणार!
28 Sep 2016 - 2:30 pm | भीडस्त
काय चुकलं आहे यात ते सांगाल तर उपकृत होईल मी
28 Sep 2016 - 2:34 pm | वाल्मिक
National Aeronautics and Space Administration (NASA)
28 Sep 2016 - 2:36 pm | महासंग्राम
ते एरॉनॉटिकस असते ओ भिडस्त जी
28 Sep 2016 - 2:48 pm | वाल्मिक
एरॉटिक = अश्लील
28 Sep 2016 - 3:29 pm | भीडस्त
मंदारभो ध्यानात ठेवीन आता
28 Sep 2016 - 3:17 pm | रायबा तानाजी मालुसरे
हं...हे घ्या आणि व्हा उपकृत.
नासा
बाकी एरॉटीक म्हणजे काय ते तुम्हीच शोधा आणि तुमच्या कोणत्या त्या शिंच्या WA वरती पण कळवा.
28 Sep 2016 - 3:26 pm | भीडस्त
नासा म्हणजे
हिंदी विकिपीडिया मुखपृष्ठ
ही लिंक देऊन उपकारांचा भर चांगलाच वाढवलात अन काय
अशीच 'आमची' दिशाभूल चालू राहूंदेत म्हणजे तुमचा हेतू सध्या होईल