सहस्रधारा प्रकाशाच्या लेवुन अवतरली दीपावली
प्रसन्नतेने सजते मनोमनी आज आनंदाची रंगावली
दरवळला मृदुल सुगंध उटण्याचा भारावुनी दशदिशा
अभ्यंगस्नात लज्जित तारका नभी शोभते नवउन्मेषा
सौंदर्याची करीत उधळण उजळली ही धरा देखणी
अवघा आसमंतही गातसे चैतन्याची सुमधुर गाणी
अंधकाराचे करीत निर्दालन भूतली प्रकटे तेजोवलय
सकल जनांत नांदो शांती आशिष हाच मागते हृदय
प्रतिक्रिया
30 Oct 2016 - 7:59 am | रेवती
कविता आवडली.
31 Oct 2016 - 4:43 pm | पैसा
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!
31 Oct 2016 - 4:44 pm | टवाळ कार्टा
मम्
6 Nov 2016 - 10:38 pm | एस
आत्मन्
6 Nov 2016 - 10:53 pm | सतिश गावडे
श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्रित्यर्थम तथा प्रतिसाद कार्ये सर्वेषाम देवता प्रित्यर्थं पूजनमहं करिष्ये
6 Nov 2016 - 11:40 pm | एस
आयडी आधी पाहिला. आत्मबंधांनी तर नव्हे ना टाकला प्रतिसाद? ;-)
31 Oct 2016 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली कविता. चित्रही छान आहे. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
4 Nov 2016 - 10:44 pm | नूतन सावंत
कविता आणि चित्र दोन्ही आवडले.
6 Nov 2016 - 10:36 pm | सुचेता
कविता आणि चित्र दोन्ही आवडले.
7 Nov 2016 - 2:57 pm | मित्रहो
कविता आणि चित्रे दोन्ही