मदत हवी आहे - वेळणेश्वर

अमृत's picture
अमृत in भटकंती
26 Sep 2016 - 11:03 am

नमस्कार,

दसर्‍याच्या सुट्ट्यात वेळणेश्वरला जाण्याचा बेत आहे. राहाण्याची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामण्डाळाच्या हॉटेलात केली आहे. एकूण चार दिवसाची सहल करणार आहोत. त्यातील दिवस १ व ४ हे प्रवासातच जातील तरी उर्वरीत २ दिवसात काय काय बघता येइल. एकूण २ कुटुन्ब आहोत व २ लहानगे (वय ५ व २.५) तरी कृपया मार्गदर्शन कारावे.
१. पुण्यावरून जाताना जास्त सोयीस्कर रस्ता कोणता? (ताम्हीणीतून दोनदा कोकणात उतरलो आहे पण या वर्षी ऑगस्ट महिन्यात ताम्हीणी सहलीत रस्त्याची झालीली दुर्दशा बघून शक्यतोवर तो टाळायची इछा आहे.)
२. सातारा मार्गे गेल्यास रस्त्यात जेवणासाठी काही चान्गली ठिकाणं?
३. डॉल्फीन कुठे बघायला मिळतील?
४. खाण्याचे काही पर्याय.
५. काजू, कोकम इत्यादी पदार्थान्ची खरेदी कुठे करता येइल?
६. परत येताना सातार्‍याला काही आवर्जून खरेदी करावं असं काही?

इतर काही सूचना व सल्ले असल्यास जरूर कळवावे.

मदतीबद्दल धन्यवाद _/\_

प्रतिक्रिया

१) सातारा मार्गे जाता येइल
२) कराड - उंब्रज साईड ला अनेक धाबे आहेत हाय्वे ला..
६) कंदी पेढे , पालेकर बेकरीची उत्पादने

त्रिवेणी's picture

26 Sep 2016 - 2:13 pm | त्रिवेणी

हो सातारा मार्ग चांगलाय. कोयना घाट.ए म टी डी सी लोकेशन मस्तय एकदम. मी नेहमी चटणी, पोळी, लोणच असा काहितरी डबा नेते बाहेर जातांना आणि एखाद्या शेतात जावून खातो आम्ही. लोकही कधी नाही म्हणत नाही. फक्त कुठेही आपल्यामुळे कचरा होणार नाही हे लक्षात ठेवते. मस्त शेतात पाणी वैगरे सोडलेले असते.
डाॅल्फीन शक्यतो इथे नाही दिसत.

नीलमोहर's picture

26 Sep 2016 - 3:20 pm | नीलमोहर

डॉल्फिन्स शक्यतो शेतात नाहीच दिसणार,
त्यांचे भारी नखरे असतात समुद्र वगैरेच पाहिजे म्हणून,
सुमित्रा भावेंच्या 'घो मला असला हवा' मध्ये डॅंबिस राधिका आपटे, नवरा आणि सासूला शेतात उगवलेली सुरमई दाखवून
हातोहात बनवते, आणि वर त्याचंच कालवण करून आपल्या प्रियकराला खाऊ घालते, ते आठवलं :)

(सॉरी हं, अगदीच रहावलं नाही :)

त्रिवेणी's picture

26 Sep 2016 - 3:49 pm | त्रिवेणी

इश्श कायतरीच बै तुमच.(आवडल मला)
सातारा साईडला कितीतरी शेतात डाॅल्फिन असतात.कुणी है का इथ सातार साईडच.डाॅल्फिनला तर चटणी पोळी लैच म्हणजे लैच आवडते. हा पण ते लोणच फक्त कैरीच खातात ह ते पण माठातल.आपल पुणेरी लिंबाच लोणच हुंगत पण नैत.

डॉल्फिन्स शक्यतो शेतात नाहीच दिसणार,
त्यांचे भारी नखरे असतात समुद्र वगैरेच पाहिजे म्हणून,
=))

अजया's picture

26 Sep 2016 - 7:34 pm | अजया

=))))

नावातकायआहे's picture

28 Sep 2016 - 10:10 am | नावातकायआहे

समुद्र शेतीत दिसतात की....
:-))

अमर विश्वास's picture

26 Sep 2016 - 2:13 pm | अमर विश्वास

सातारा मार्गाला पर्यायी मार्ग : भोर मार्गे महाड गाठावे.. तिथून पुढे मुंबई गोवा हाइवे ने चिपळूण..

या मार्ग माझा आवडता कारण एकतर या मार्गावर गर्दी कमी असते ... दुसरे कारण म्हण्जे भोरला उत्तम नाश्ता करता येतो.. पुढे वाघजाईला भाजी आहेतच.. सोबत वरन्धघटाचा निसर्ग..

स्थितप्रज्ञ's picture

26 Sep 2016 - 5:04 pm | स्थितप्रज्ञ

मुंबई-गोवा मार्गावर मागच्या आठवड्यात दुचाकी चालवण्याचा योग आला. राजापूर ते गोवा असा प्रवास केला होता. रस्त्यावरचे निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे पण रस्त्याची स्थिती फार काही बरी नव्हती. दुचाकी असल्यामुळे bottlenecks मधून सुसाट निघणे शक्य होते पण तुम्ही कार ने जाणार असाल तर ट्रक्स/कंटेनर्स (क्वचित प्रसंगी ट्रॅक्टर्स) मागे बराच वेळ खिळून राहावे लागते (शिवाय रफ patches आल्यावर स्थिती आणखी दयनीय होते). राजापूर ते सिंधुदुर्ग रस्ता कंसीस्टंट्ली खराब होता पण तेवढाच scenic होता (आधीचाही तसाच असायची शक्यता नाकारता येत नाही). गुगलबाबाच्या म्हणण्यानुसार सातारा रस्त्याने गेलात तरी जेमतेम अर्धा तास वाचेल. तरी महाड-चिपळूण रस्त्याबद्दल अधिक माहिती घेऊन ठरवा.

त्रिवेणी's picture

26 Sep 2016 - 2:16 pm | त्रिवेणी

ए म टि डी चे जेवण चांगलेय पण खुप हळू सर्व्हिस आहे.मंदिरा मागुन बिचवर गेलात कि डाव्या हाताच्या हाॅटेल मध्ये छान जेवण आणि नाश्ता मिळाला होता.

त्रिवेणी's picture

26 Sep 2016 - 2:18 pm | त्रिवेणी

खरेदी मी गुहागरला गणपती मंदिरला लागुनच जी दुकान आहेत तिथुन केली होती.सगळ्या जिन्नस चांगला होता. वेळ असेल तर गुहागरला जावू शकाल जास्त लांब नै आहे.

>>: भोर मार्गे महाड गाठावे.. तिथून पुढे मुंबई गोवा हाइवे ने चिपळूण..>>पोलादपुरनंतर ६५ किमी घाट फुकट भेटतो.

Driving ची मजा तर या घाटरस्त्यान्वरच असते..
अर्थात हे प्रत्येकाच्या आवडी-निवडीवर अवलंबुन आहे
घाटात योग्य जागा बघून थांबावे.. एखादी चहाची टपरी दिसली तर छागा घ्यावा.. हळूच दरीत डोकववे.. समोरचा कडा चढायला किती अवघड आहे.. किती पिटोन्स लागतील य्यचा अंदाज ग्यवा.. वा पुढे जावे.. 65 किमी सहज पार होतात...

कोयना नगर मार्गे गेलात तर चिपळूण ला उतरून अभिषेक मध्ये मनसोक्त मासेमारी करून या. वेळणेश्वर वरून एका दिवसात गणपतीपुळे आणि गुहागर (वाटेत हेदवी चा गणपती) दोन्ही करता येऊ शकेल.

प्रान्जल केलकर's picture

29 Sep 2016 - 2:37 pm | प्रान्जल केलकर

पुणे सातारा उंब्रज कोयनानगर चिपळूण गुहागर हाच रस्ता चांगला. साताऱ्यात चिपळूण किंवा गुहागरला जेवण करा. सामिष जेवणासाठी चिपळूणच्या हॉटेल अभिषेकला तोड नाही. उत्तम शाकाहारी साठी चिपळूण ऐवजी गुहागर छान. गुहागरला भरपूर चांगली हॉटेल्स आहेत. गुहागर - रत्नागिरी मार्गावर वेळणेश्वर आहे. त्यामुळे तवसाळ जेट्टीचा वापर करून तुम्ही १ दिवसात गणपतीपुळे, जयगड किल्ला, कऱ्हाटेश्वर मंदिर करू शकता. कऱ्हाटेश्वर साठी खास संध्याकाळचा वेळ ठेवा. सूर्यास्ताचा अप्रतिम नजर असतो (इसपु काळातला देऊळ पण हेमाडपंथी होता आता माहित नाही) सदर मंदिर आता JSW च्या मागे आहे त्यामुळे जायचा रस्ता नीट विचारून घ्या. गूगल मॅप शक्यतो नको. डॉल्फिनसाठी तुम्हाला गुहागर वेलदूर जेट्टीवरून दाभोळ दापोली कर्दे असा प्रवास करावा लागेल जो खूप मोठा वळसा पडेल. गुहागरला देवीच देऊळ आहे ते मी अजून बघितलेलं नाही पण खूप सुंदर आहे असा म्हणतात. तरी नक्की जाणे.
गोपाळ गोखले यांचा बंगला आहे डोंगरावर, तिथून पूर्ण समुद्राचा नजारा अप्रतिम.

महासंग्राम's picture

29 Sep 2016 - 4:23 pm | महासंग्राम

गणपतीपुळे, जयगड किल्ला, कऱ्हाटेश्वर मंदिर करू शकता.

याच मार्गात हेदवी गणेश मंदिर पण येते ते सुद्धा नक्की पहा.

अम्हि आता पर्यन्त दोनदा वेळणेश्वर MTDC जाउन आलो. या वेलि service बरोबर नव्हती. बामनघल बघन्यासरखे आहे. हेदवि मन्दिरच्या रस्त्यावरच सुन्दर math आहे.