कारवीची फुले कुठे पाहायला मिळतील?

पथिक's picture
पथिक in भटकंती
16 Sep 2016 - 11:27 am

नमस्कार.
दर ७-८ वर्षांनी फुलणारी कारवी यावर्षी पण फुलणार आहे असं वाचलं. मागे एकदा पेपर मध्ये कारवीच्या फुलांनी पूर्ण निळा झालेल्या डोंगराचा फोटो पहिला होता आणि ठरवलं होतं कि प्रत्यक्ष हे पाहायचंच. हे दृश्य पुण्याजवळ कुठे पाहायला मिळण्याची जास्त शक्यता आहे कुणी सांगू शकेल काय ?

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

16 Sep 2016 - 11:28 am | प्रचेतस

अपेक्षाभंग.

पथिक's picture

16 Sep 2016 - 11:31 am | पथिक

शीर्षक वाचून मी पाहून आलोय आणि माहिती देतोय असं वाटलं असेल..

प्रचेतस's picture

16 Sep 2016 - 11:33 am | प्रचेतस

ह्म्म.

बाकी कारवीची फुलं भीमाशंकर परिसरात बघायला मिळतील. यंदा फुललीय का ते माहित नाही.

पथिक's picture

16 Sep 2016 - 11:35 am | पथिक

आभार.

शीर्षक बदलून 'कारवीची फुले कुठे पाहायला मिळतील?' असे करण्याची विनंती करतो..

आमच्या साताऱ्याला कास पठारावर कारविची फुले उमलली आहेत संपूर्ण पठार निळे जांभळे झाले आहे.

कास पठार च्या संकेतस्थळा वर जाऊन लेटेस्ट फोटो पाहु शकता लिंक - http://www.kaspathar.com/

कास पठार च्या संकेतस्थळा वर जाऊन लेटेस्ट फोटो पाहु शकता लिंक - http://www.kaspathar.com/

कंजूस's picture

16 Sep 2016 - 4:45 pm | कंजूस

राजगडावर फुललीय असं एका मिपाकराने लिहिलं होतं.राजगड जवळच आहे.

धन्यवाद. मी एकटा तीन चार वर्षांपूर्वी राजगड करून आलोय. पण सहकुटुंब जायचं आहे कारवी बघायला आणि त्यात असा गड चढणे हा पर्याय नाही...

Nitin Palkar's picture

19 Sep 2016 - 1:44 pm | Nitin Palkar

सुमारे बारा तेरा वर्षांपूर्वी राजगड परिक्रमा केली होती. त्या वेळेस कारवीची झुडपे व फुले विपुलतेने पाहिली होती. प्रत्यक्ष राजगडावर कारवी बघितल्याचे स्मरत नाही.

सह्याद्री उतारावरची वेगळी.ही टोपली कारवी.

मागच्या वर्षी कास पठारावर पाहिलेली कारवी फुललेली.लोक कारवीचे गुच्छ बनवून तोडत होते आणि कोणीही काही बोलत नव्हतं :(

परवाच एस डी महाजन सर बोलले, "कास ला वाचवायचं असेल तर एकच करावं - तिथे जाऊच नये !" :)

लोक एवढं का कास-कास करत असतात तेच कळत नाही. कास एवढीच किंबहुना त्यांहूनही सुंदर आणि जास्त प्रमाणात सुंदर फुले रायरेश्वर-कोळेश्वर पठार, तापोळा घाट उतरतानी डाव्या बाजूला उंचावर दिसणारे पठार, रायलिंग पठार इथे दिसू शकतात. वनस्पतीशास्त्रज्ञांच्या मते सह्याद्री रांगेतल्या दुसऱ्या फळीतले सर्व पठारी प्रदेश अशा फुलांसाठी अनुकूल आहेत. अगदी सप्टेंबर महिन्यात महाबळेश्वरच्या केट्स पॉइंट वरही खूप सुंदर फुले फुललेली असतात.

लोकांना हि ठिकाणे माहित नाहीत तेच बरं आहे.. :)

जव्हेरगंज's picture

19 Sep 2016 - 2:03 pm | जव्हेरगंज

karvi

पथिक's picture

19 Sep 2016 - 4:31 pm | पथिक

वा !!

महाबळेश्वरला सुद्धा कारवीची फुले पहायला मिळतील

अजया's picture

19 Sep 2016 - 2:07 pm | अजया

नकाच लिहु अजून ठिकाणं.सगळ्यांचं कास होऊ नये हीच इच्छा

पथिक's picture

19 Sep 2016 - 4:31 pm | पथिक

खरंच!

.
मागच्या वर्षीचा कारवीचा बहर- कास

सुंदर.. पण मला हवीय ती डोंगर उतारांवरची कारवी...

नूतन सावंत's picture

19 Sep 2016 - 6:09 pm | नूतन सावंत

या वर्षी मुंबईत पाहायला मिळाली चक्क कारवीची फुलं.

धनावडे's picture

19 Sep 2016 - 7:00 pm | धनावडे

कमळगडावर पण पाहचा येतील

Rahul Sable's picture

22 Sep 2016 - 8:05 pm | Rahul Sable

मागील आठवड्यात परिवारासोबत सिंहगडला गेलो होतो
तेव्हा सिंहगडच्या घाटात कारवी फुललेली पाहिली
फोटो सुद्धा काढले
लोनावळावरून राजमाची कडे जाणार्‍या मार्गावरही कारवी पहायला मिळेल
लोनावळावरून सहारा सीटी कडे जानार्या मार्गावरही कारवी पहायला मिळते पण आता तिथे फुलोरा आला आहे की नाही ते माहीती नाही
परिवारा सोबत जानार असाल तर सिंहगड हाच जवळचा उत्तम पर्याय आहे पण सिंहगडावरील वर्दळ वाढल्यामुळे कारवी चा मोठा फुलोरा पहायला मिळने कठिन आहे वाढत्या पर्यटनामुळे तेथील जैव विविधता धोक्यात आली आहे