खेचयाचे बोम्बिल
ही पाककृती माझ्या बाबाची आहे. पावसात ताजे मासे मिळत नाहीत पण जीभ खवऴते तेंव्हा आम्ही तेव्हा आम्ही बर्याचदा हे तोंडीलावाण करतो
फार फार वर्षापूर्वी बाबा सूरतला गेले होते , तिथे त्यानी एका होटेलात हा पदार्थ खाल्ला.
खुप पाउस पडत असताना गर्मागरम भात आणि मग सुक्या सुगंताची कढ़ी हा बेत सहसा असतोच.
खेचयाचे बोम्बिल हे नाव माज्या लेकिने दिलेय , कधी कधी घाई असेल तर बोम्बिल निट भिजत नाहीत आणि मग जरा चिवट होतात.
म्हणून मग “खेचयाचे बोम्बिल.”
साहित्य :
चागले जाड बोम्बिल १-१/२ तास भिजत घालावेत.
मग सुरीने कापून पसरट करावेत.
आम्सुल आणि मिरचीची पेस्ट बनावुन त्यात घोल्वुन खरपुस तळऊन घ्यावेत
प्रतिक्रिया
14 Sep 2016 - 5:00 pm | त्रिवेणी
दिसतायेत छान पण त्यांच्या उग्र वासामुळे कधी खाऊन बघायचा प्रयत्न नाही करुन बघितला.
14 Sep 2016 - 5:06 pm | पैसा
सुके बोंबील तळलेले. पण त्याला इतर काही मसाला नसतो का?
14 Sep 2016 - 5:15 pm | कविता१९७८
सुके बोम्बील कधी असे तळुन पाहीले नाहीत . पहायला हवे
14 Sep 2016 - 5:16 pm | कविता१९७८
सुके बोम्बील कधी असे तळुन पाहीले नाहीत . पहायला हवे
14 Sep 2016 - 6:15 pm | पक्षी
तों पा सु
14 Sep 2016 - 6:22 pm | नीळा
पैसा मैडम...आमसुल आणि सुक्या लाल मीरच्या वाटुन पेस्ट करुन लावली आहे
जी आम्ही ताज्या मच्छीला पण लावतो
15 Sep 2016 - 5:18 am | खटपट्या
या पदार्थाला खेचायचे बोंबील असे नाव का दीले? पाकक्रुतीमधे कुठेच खेचाखेच नाहीय...
15 Sep 2016 - 5:20 am | नीळा
खेचयाचे बोम्बिल हे नाव माज्या लेकिने दिलेय , कधी कधी घाई असेल तर बोम्बिल निट भिजत नाहीत आणि मग जरा चिवट होतात.
म्हणून मग “खेचयाचे बोम्बिल.”
20 Sep 2016 - 3:17 pm | केडी
सुक्कट खायची सवय हि आई कडून आलेली (आई शिरोड्याची). पण वडिलांना तो वास सहन होत नसे, त्यामुळे ते नसले कि आम्ही हे करत असू. हि पाककृती आई ला वाचून दाखवली....मुद्दाम....आता एकदा करून बघतो.... वाह, तो वास असा नाकात घुसला.... बांगड्याची कूसबीर तर माझा वीकपॉइंट.....