पुण्याला जात आहात... तेथील भामट्यांपासून सावध राहा' !!!!!!!

छोटु's picture
छोटु in काथ्याकूट
25 Sep 2008 - 11:40 am
गाभा: 

खाली ल बातमी ही म.टा.मधे आलेली !!!

'सायबर भामट्यां'चा व्हायरस!

पुण्याला जात आहात... तेथील भामट्यांपासून सावध राहा', असा इशारा देण्याची रीत तशी जुनीच. फसवणूक करणाऱ्यांसाठी, इतरांना गंडा घालणाऱ्यांसाठी 'पुणेरी भामटा' हा शब्द रूढच झालेला. काळाच्या ओघात बदलत गेलेल्या पुण्यासोबत गंडा घालण्याची रीतही बदलली असून 'आयटी हब' झालेल्या या शहरातील 'सायबर भामट्यां'चा सुळसुळाट ही सगळ्यांसाठीच डोकेदुखी होऊन बसली आहे.

सन १६६५ ते १९७५ या काळात पुण्यात मोठे बदल झाले. वाढते औद्योगिकरण दुष्काळ या घटकांमुळे ग्रामीण भागातील लोक पुण्याकडे वळले. बेरोजगारी भेडसावू लागल्याने गैरमार्गाने, फसवून पैसा कमवण्याचे प्रकार सुरू झाले. या फसवणुकीच्या ठराविक पद्धती होत्या. रस्त्यावर सोन्याच्या बांगड्या किंवा पाटल्या ठेवायच्या. रस्त्यावरून जाणाऱ्या कुणी त्या घेतल्यास 'थांब...पोलिसांना सांगतो' अशी भीती दाखवायची. मग घाबरलेली व्यक्ती त्याच्याकडे असलेले पैसे आणि वस्तू देऊन स्वत:ची सुटका करून घ्यायची! याशिवाय अंगावर चिखल, घाण टाकून लक्ष विचलित करून लुबाडण्याचे प्रकारही होत असत.

याच पुणेरी भामटेगिरीचे नवे अवतार सायबर विश्वात अवतरले आहेत. पुण्यात आयटी पार्क झाल्यानंतर विविध राज्यांमधील तरुणांचे लोंढे पुण्यात येऊ लागले. त्यांतील अनेक सायबर गुन्ह्यांत गुंतले आहेत. ठिकठिकाणच्या सायबर कॅफेंमध्ये जाऊन काहीजण गुन्हे करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्डांचा पासवर्ड मिळवून त्याद्वारे एटीएम सेंटरमधून लाखो रुपयांची लूट करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. याशिवाय बेबसाइट हॅक करणे, बनावट ई-मेल पाठवून फसवणूक करणे असेही प्रकार सुरू आहेत. या 'सायबर भामट्यां'ना आळा घालणे, हे एक मोठेच आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.


अहो पण हे जे काही लिहीले आहे ते खरे का !! तुम्हाला काय वाट्ते मिपा कर !!!

तुमचा छोटू !!!

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

25 Sep 2008 - 11:47 am | यशोधरा

..याच पुणेरी भामटेगिरीचे नवे अवतार सायबर विश्वा......

हे वाक्य खटकले! अर्थात मटा सारखी वृत्तपत्र लिहिणार म्हण़जे आनंदीआनंदच आहे म्हणा..

विविध राज्यांमधले लोक पुण्यात येऊन जर गुन्हेगारी करत असतील तर तो पुण्याचा किंवा जे आधीपासून पुण्यात स्थायिक आहेत असे पुणेकर, त्यांचा दोष कसा?

छोटु's picture

25 Sep 2008 - 11:51 am | छोटु

विविध राज्यांमधले लोक पुण्यात येऊन जर गुन्हेगारी करत असतील तर तो पुण्याचा किंवा जे आधीपासून पुण्यात स्थायिक आहेत असे पुणेकर, त्यांचा दोष कसा?

अहो पण हे सगळी कडेच होते !!! पण आधी पुण्या चे नाव का हे ही खुप खटकते !!!

तुमचा छोटू !!!

अमिगो's picture

25 Sep 2008 - 12:32 pm | अमिगो

>> अहो पण हे सगळी कडेच होते !!! पण आधी पुण्या चे नाव का हे ही खुप खटकते !!!

आज काल पुणे आणि पुणेकरांच्या नावाने बोंब मारायची फॅशन आली आहे...चालायचच.

धमाल मुलगा's picture

25 Sep 2008 - 4:45 pm | धमाल मुलगा

>>आज काल पुणे आणि पुणेकरांच्या नावाने बोंब मारायची फॅशन आली आहे...चालायचच.
हे तर कित्येक वर्षांपासून चालू आहे. आजकाल कसलं आलंय?

चालुद्या तिच्यामारी, देतील शिव्या आन् तोंडं दुखली की पडतील गप.

मटासारख्या बायस्ड वर्तमानपत्रांना पुणेकर आणि पुणं सरळ सरळ फाट्यावर मारतं हे कोणाच्या लक्षात आलं नाहीय्ये काय?

टारझन's picture

25 Sep 2008 - 12:47 pm | टारझन

बाबारे ... येतोच कशाला पुण्यात ? युपी-बिहार मधे दिवसा ढवळ्या गनशॉट वर लुटतात म्हणे ....
ह्या धाग्यावरुन फक्त एवढं लक्षात आलं की फक्त पुण्यात असे प्रकार होतात. मुंबैचं वैयक्तिक नाव घेण्यामागे काही कारण नाही पण तिथे म्हणे बोलता बोलता पण कानावरचा मोबाइल पळवतात असो, आय लव्ह मुंबै

डेबिट किंवा क्रेडिट कार्डांचा पासवर्ड मिळवून त्याद्वारे एटीएम सेंटरमधून लाखो रुपयांची लूट करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे.
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ला पासवर्ड नाही पिन असतो भाऊ.
डेबिट कार्ड वरून पैसे काढतात (क्रेडिट कार्ड वरून काढले तर मरशील रे बाबा इंट्रेस्टनेच ) , आणि त्याचं डेली लिमीट असतं बरं सॉफ्टवेअर मधे डोक्याचा वापर होतो छोटू , आणि जरी समजा लिमीट नसेल तरी कार्डावर लाखो रुपये हवेत ना भौ ... तु मेंदूनेच अंमळ छोटा दिसतोय.

पुण्याच्या नावाने हागणार्‍याची फाट्यावर हाडे मोडणारा
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

छोटु's picture

25 Sep 2008 - 1:08 pm | छोटु

डेबिट कार्ड वरून पैसे काढतात (क्रेडिट कार्ड वरून काढले तर मरशील रे बाबा इंट्रेस्टनेच ) , आणि त्याचं डेली लिमीट असतं बरं सॉफ्टवेअर मधे डोक्याचा वापर होतो छोटू , आणि जरी समजा लिमीट नसेल तरी कार्डावर लाखो रुपये हवेत ना भौ ... तु मेंदूनेच अंमळ छोटा दिसतोय.

टारु बुवा !! मी मेंदूने छोटा असायचे कारण च नाहीय कारण वरील लेख हा मी नाही लिहिलेला हा !! म.टा. मधे प्रकाशित झालेला !!!

मिपा चा .
छोटु !!!

टारझन's picture

25 Sep 2008 - 1:12 pm | टारझन

च्यामारी ... कसल्यावी हागर्‍या पादर्‍या बातम्या टाकतोस ... मटा काय संध्यानंद काय ? काही गरज होती का असला धागा सुरू करायची..
मटा मधेच अजुन काही जाहिराती येतात "जसे मरेपर्यंत विना-चिरफाड इलाज केला जाईल" वगैरे वगैरे ... घ्या न्युज आणि करा धागे सुरू मग

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

नीलकांत's picture

25 Sep 2008 - 1:09 pm | नीलकांत

पुण्याच्या नावानं गळे काढण्याची फॅशन आहे. त्यामुळे ही बातमी काही वेगळी नाही.

वरच्या मजकुरातील जी बातमी आहे ना , ती भारतातील कुठल्याही शहरात घडू शकते. अगदी मुंबईत सुध्दा असे प्रकार घडतच असतात ना?

असं असतांना

..याच पुणेरी भामटेगिरीचे नवे अवतार सायबर विश्वा......

हे मात्र खटकलंच.

नीलकांत

ही भमटेगीरी भारतातील कुठल्याही शहरात घडू शकते, त्यात 'पुण्याला जाताय.....' शीर्षक देणे मलाही खटकलेच. त्यामुळे यशोधरा, अमिगो, टारझन, नीलकांत इ. शी सहमत!

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर

म.टा.च्या सामान्य वाचकांची दिशाभूल करणारी हीन दर्जाची बातमी आहे ही.
अशा शब्दरचनेचा मी तीव्र निषेध करतो.
जाणूनबुजून अत्यंत 'खोडसाळ' भावनेतून दिलेल्या ह्या बातमीचे मिपावर प्रसिद्धी देण्याचे प्रयोजन लक्षात आले नाही.
ह्याहून काही महत्त्वाचे विषय नाहीत का?

सखाराम_गटणे™'s picture

25 Sep 2008 - 1:43 pm | सखाराम_गटणे™

सहमत

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 2:00 pm | जैनाचं कार्ट (not verified)

१००% सहमत. !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

झकासराव's picture

25 Sep 2008 - 4:39 pm | झकासराव

पेठकर काकांशी सहमत.
आता पुण्याच्या सॉफ्टवेअर पार्कात काय फक्त पुणे किंवा महाराष्ट्रातीलच लोक आहेत का कामाला??
अख्ख्या भारतातुन येतात.
आणि भामटेगिरी (फसवणुक ह्या अर्थी) ही कोणत्याही शहरात चालतेच की. मग पुण्याचच नाव मुद्दाम का पुढे???

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

यशोधरा's picture

25 Sep 2008 - 1:49 pm | यशोधरा

अगदी अगदी पेठकरकाका!

नाखु's picture

25 Sep 2008 - 2:14 pm | नाखु

मि
लक्शात ठेवा..
तुम्हाला पुण्यात किंवा पुण्याबाहेर प्रसिद्धी हवी मग बिनबुडाचि टिका करा

जर महाराष्ट्रात प्रसिद्धी हवी मग महाराष्ट्रवर बिनबुडाचि टिका करा

पण भारतात प्रसिद्धी हवी मग
मराठिवर/मरठि पणावर टिका करा

आजकाल मंगल कार्यालयातिल पाट्या टिंगलीचा विषय झाला आहे.

नाद खुळा
पुण्यालाच काय पण ईतर कुठल्याहि शहरांना "पाण्यात न पाहणारा"

मला वाटते आहे की ख फ प्रमाणे
नवीन धागा सुरू करण्याचे अधिकार सुध्धा
सरपन्च यान्नी हाती घ्यावेत.

limbutimbu's picture

25 Sep 2008 - 3:45 pm | limbutimbu

मला नाही वाटत की हा धागा सुरू करण्यात चूक झाली हे!
अन्यथा पुणेकरान्ना त्यान्च्याबद्दल हे मुम्बैतले मटा सारखे पेपर काय खोडसाळ खरडतात हे सहजासहजी कसे कळणार?
अन्यथा आख्ख्या देशातील कोणतेही गाव सोडून यान्ना उठसुठ पुणेच का आठवावे बरे?

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2008 - 3:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> अन्यथा पुणेकरान्ना त्यान्च्याबद्दल हे मुम्बैतले मटा सारखे पेपर काय खोडसाळ खरडतात हे सहजासहजी कसे कळणार?
माझी खात्री आहे पुण्यातल्या लोकांनाही तोच पेपर मिळतो जो मुंबईकरांना मिळतो.

अनिल हटेला's picture

25 Sep 2008 - 5:49 pm | अनिल हटेला

असो !!

नो कॉमेंट्स !!!!

असले धागे काढण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा

काही तर चांगल लिही की छोटू !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

टारझन's picture

25 Sep 2008 - 5:59 pm | टारझन

काही तर चांगल लिही की
अरे आन्या बैला .... ते दुसरीकडचे लेख कंट्रोल +सी करून कंट्रोल +व्ही करण्याचं महान कार्यं चांगलं नाही ? यडा की खुळा ?

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

छोटु's picture

25 Sep 2008 - 6:15 pm | छोटु

आयला !! म.टा.मधली वरील ही बातमी या टारुला उद्देषूण तर नव्हती ना !!!!!
=)) =)) ...

अनिल हटेला's picture

25 Sep 2008 - 6:21 pm | अनिल हटेला

आरे उगाच्ग एनर्जी वाया त्याची ,

आणी वाचुन प्रतीक्रिया द्यायला आपली ,

वाया जाते !!!

हे वाचवण्याच्या उदात्त हेतूने प्रेरीत होउन आम्ही सदरहू सल्ला दिला !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..