एम. एस. धोनी चित्रपटावरून चालू असलेला वाद

सुचिकांत's picture
सुचिकांत in काथ्याकूट
24 Aug 2016 - 11:04 am
गाभा: 

हिंदी चित्रपट मराठीत डब करून मराठीसोबत प्रदर्शित केला गेला तर, मराठी चित्रपटसृष्टीचे नुकसान होईल की फायदा?

काही मुद्द्यांवर माझी मते खालीलप्रमाणे :

- हिंदी चित्रपट मराठीत डब होऊ लागले तर मराठी चित्रपट सृष्टी संपेल, कलाकार बेकार होतील.

>>मला वाटते की यामुळे नुकसान होणार नाही उलट, डबिंग कलाकारांना, संवाद लेखकांना, नवीन संधीच मिळतील.
आत्ता फॉक्सस्टार सारख्या मोठ्या चित्रपटसंस्थांना जर विरोध केला गेला तर भविष्यात अशा चित्रपटसंस्था कोणत्याही प्रकल्पाकरता मराठीचा विचार करताना हजारवेळा विचार करतील, जे मराठीसाठी घातक असेल.

- मराठी माणसाला हिंदी समजते मग मराठीतून चित्रपटाची काय गरज?

>>मला वाटते की, महाराष्ट्रामध्ये ५० पेक्षा जास्त बोली आहेत, त्यातील अनेक मराठीपेक्षा पूर्ण वेगळ्या असल्याने त्यांना मराठीच कसे बसे समजते, तर हिंदी कधी समजेल? अशा लोकांना मुख्य मराठीच्या प्रवाहाशी जोडण्याकरता, असे अनेक दर्जेदार चित्रपट, मालिका, मराठीत येणे गरजेचे आहे.

शिवाय मराठी माणसाला हिंदी समजते म्हटले की, आपल्याला अनेक ठिकाणी मराठी मिळणारच नाही. तेव्हा हे आत्मघातकी विधान वाटते. याच करणातून,

- मराठीत ग्राहक सेवा नाकारली जाते
- मराठीत माहितीपत्रके नाकारली जाते
- मराठीत बोलायचे/शिकायचे टाळले जाते इ.

प्रतिक्रिया

स्वामी संकेतानंद's picture

24 Aug 2016 - 11:36 am | स्वामी संकेतानंद

मुद्दे पटले. माझेही तेच मत आहे. हिंदी चित्रपटाला मराठीत डब व्हावेसे वाटते हे मराठी भाषेचे एक 'मार्केट' म्हणून स्थान उंचावत असल्याचे चिन्ह आहे. कानडीमध्ये इतर भाषेतले चित्रपट डब करण्यावर बंदी आणून कानडी चित्रपटांना संरक्षण देण्याच्या नावाखाली कानडी लोकांचेच नुकसान केले गेले. इतर भाषांतील दर्जेदार चित्रपटांचे भंगार रिमेकच जास्त होतात. 'हिंदी समजते ना, मग कशाला करा डब?' ही मानसिकता आणि 'हिंदी समजते ना, मग कशाला पाहिजे मराठी पाट्या?' ही मानसिकता एकच आहे.

संदीप डांगे's picture

24 Aug 2016 - 11:45 am | संदीप डांगे

+१

+१
हिंदी चित्रपटाला मराठीत डब व्हावेसे वाटते हे मराठी भाषेचे एक 'मार्केट' म्हणून स्थान उंचावत असल्याचे चिन्ह आहे.

राजाभाउ's picture

24 Aug 2016 - 2:03 pm | राजाभाउ

+११

संदीप डांगे's picture

24 Aug 2016 - 11:47 am | संदीप डांगे

चित्रपट प्रसिद्धी आहे, बाकी कै नै, लोक स्वतःहून बघायला जातील असे काही नाही, त्यामुळे वाद घालून चर्चेत येण्याचा प्रयत्न

डांगेण्णा, नीरज पान्डे आहे दिग्दर्शक. लोक जातीलच जातील.

साहेब..'s picture

24 Aug 2016 - 12:31 pm | साहेब..

एम. एस. धोनीवर आलेला माझ्या माहितीतील पहिला धागा आणि त्याचाही एम. एस. धोनीशी काहीही संबंध नाही.

एम. एस. धोनी आवडत असल्याने चित्रपट हिंदीतूनच पाहणार आहे,

वाल्मिक's picture

24 Aug 2016 - 2:37 pm | वाल्मिक

आता इंग्लिश चित्रपट हिंदीत डूब झाले म्हणून हिंदी चित्रपट सृष्टी थोडी संपली ?

यातील मुख्य वादाचा मुद्दा हा आहे कि, मराठी चित्रपटांसाठी मल्टीप्लेक्स मध्ये जे राखीव खेळ, बंधन आहे त्याचा फायदा ह्या डब चित्रपटांनी घेतला तर मुळ मराठी चित्रपटांना टाईम स्लॉट, कमी किंवा मिळणार नाहीत.

स्वामी संकेतानंद's picture

24 Aug 2016 - 8:45 pm | स्वामी संकेतानंद

निरर्थक मुद्दा आहे. मराठीला हिंदीइतकाच किंबहुना जास्त प्रेक्षक मिळतो कळाल्यावर राखीव वेळेपेक्षाही जास्त शो दाखवले जातील. मराठी चित्रपट, मूळ अथवा डब, यांनी जास्तीत जास्त शो व्यापले जातील आणि हिंदीचे प्रस्थ कमी होईल. आपण अजूनही 'राखीव/ बंधनकारक स्लॉटपुरतेच मराठी चित्रपट मर्यादित राहणार' या पराभूत मानसिकतेत का असतो? त्याउप्पर जास्त शो मिळणार हा सकारात्मक विचार का डोक्यात येत नाही?

संदीप डांगे's picture

24 Aug 2016 - 9:27 pm | संदीप डांगे

अगदी अगदी!

सैराट च्या शंभर कोटीने भल्या भल्यांच्या झोपा उडवल्यात, त्यामुळे हिंदीवल्याना मराठी मार्केट लक्षात आलंय, त्याचेच हे पडसाद आहेत, मागे बहुतेक शाहरुखच चला हवा येऊ द्या च्या सेटवर आला होता ना?

असे बरेच येऊन गेलेत. मुळात हा मुद्दा ज्या राजकीय पक्षाने
उकरून काढलाय तो अस्तित्वासाठी लढतोय. त्यामुळे ते असे हातपाय मारताहेत. बाकी काही नाही. मुळात एम.एस.धोनी अजून खेळत असताना त्याच्यावर चित्रपट बनवण्याचं कारण कळलेलं नाही आणि अझर बघितल्यावर तर हिंदीवाल्यांना biography films बनवता येत नाहीत हे अगदी स्पष्टपणे समजलेलं आहे. शिवाय आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया - सुशांत सिंग राजपूत धोनीसारखा दिसतो की दिसत नाही यापासून चालू होऊन त्यावर संपणार आहेत. त्यामुळे चित्रपट येऊन, फ्लाॅप होऊन टीव्हीवर येईल तेव्हा बघू. नीरज पांडे चांगला दिग्दर्शक आहे, यात वाद नाही पण मला थिएटरमध्ये नेण्याएवढं चित्रपटात काही असेल असं वाटत नाही.