गाभा:
आज टीव्हीवर १६ मराठा बटालियनच्या जवानांचे मनोगत ऐकत होतो तेव्हा एक गोष्ट जाणवली की भारतीय सैन्य हे मराठा गोरखा जाट अशा अनेक रेजिमेंटमध्ये विभागलेलं आहे...आपल्या लढाईत सगळे एकत्र येतात पण मग असे वर्गीकरण का ?देशाच्या सैनिकाला प्रांतिक सीमावादाच्या पलीकडे असायला हवं....अशा रेजिमेंटमुळे नक्की काय साध्य होतं ?
मुळात जर सैन्य भरतीसाठी हे वर्गीकरण असेल तर सैन्यात आल्यावर ते तसे असता कामा नये...कारण प्रांतिक सीमा मागे टाकून तो सैनिक भारतीय म्हणून आलेला असतो....
ब्रिटिशांनी जर हे रेजिमेंट बनवले असतील तर ते अजूनही हद्दपार का करण्यात आलेले नाहीत?
जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत !
प्रतिक्रिया
31 Aug 2016 - 12:16 pm | अमितदादा
Batman ह्या आर्मी शब्दाला बॅटमॅन म्हणायचं कि बटमन/बटमॅन माहित नाही.
31 Aug 2016 - 12:46 pm | विशुमित
हे जवान ऑफिसर बरोबर त्याची पत्नी, मुले यांची ही सेवा करताना दिसतात. हि इंगजी पद्दती बद्दल अनेक जवान मध्ये असंतोष आहे>>>>>>>>
मला नेमकं हेच सांगायचं होतं
31 Aug 2016 - 1:47 pm | सुबोध खरे
मित्र हो
भारतीय सैन्याविषयी आदर असणे एक गोष्ट आहे आणि त्या असलेल्या चुकीच्या परंपरा/ पद्धतींचे समर्थन करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
आर्मीला "होली काऊ" मानणे हे मला पटत नाही. परंतु बरयाच वेळेस काही लोक वस्तुस्थिती न जाणून घेता एकांगी टीका करतात तेही मान्य होत नाही. नागरी जीवनात आर्मी पेक्षा १०० पट भ्रष्टाचार आहे हे काही समर्थन होऊ शकत नाही. हे म्हणजे त्याने गाय मारली म्हणून मी वासरू मारणे समर्थनीय आहे असे म्हणण्यासारखे आहे.
सहायक हा प्रकार "नाहीच"(DENIAL) किंवा असलाच पाहिजे( सो व्हॉट) असे म्हणणारे लष्करी अधिकारीही मी बरेच पाहिले आहेत. दोन्ही गोष्टी चूक आहेत असेच माझे मत आहे.
मी लष्करात २३ वर्षे घालवली त्यातील ११ वर्षे प्रत्यक्ष आर्मीत काढली आहेत. काही गोष्टी मी स्पष्ट करू इच्छितो.
सहायक हा अधिकाऱ्याला त्याच्या आधिकारीक कर्तव्यात मदत करण्यासाठी नेमला जातो पण तो सर्रास त्याच्या इतर कामासाठी( यात पत्नी आणि मुलांच्या मदतीसाठी) वापरला जात आहे हि वस्तुस्थिती आहे. पण हे चूक कि बरोबर हे काळे आणि पांढरे इतके स्वच्छ नाही.
माझ्या माहीतीतील एका डॉक्टरच्या वडिलांना पक्षाघाताचा आजार झाला आणि त्याची पत्नी ७ महिने गरोदर होती. हा डॉक्टर सियाचेन ला होता आणि त्याला रिलीव्ह करणारा डॉक्टर प्रत्यक्ष आल्याशिवाय त्याला रजा देणे शक्यच नव्हते. अशावेळेस. त्याच्या कमांडिंग अधिकाऱ्याने एक सैनिक पुण्याच्या ए डी रेजिमेंट मधून त्याच्या घरी मदतीसाठी रोज पाठवण्याची सोय केली.
अधिकाऱ्याला जर आपल्या सुटीवर जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण करणे आवश्यक आहे त्यासाठी त्याने रजा मागितली तर त्याला रजा देणे हे कायदेशीर आहे. ( १०० % लष्करी अधिकारांच्या रजा न वापरता रद्द होतात) आयुष्यभरात फक्त ३०० दिवस रजेचे( १० महिने) पैसे आपल्याला निवृत्तीच्या वेळेस मिळू शकतात.
परंतु अधिकारी आरक्षण करण्यासाठी रजेवर गेला तर त्याच्या सहीसाठी कितीतरी जवान अडकून पडू शकतात.
उदा. मी एकदा अशी रजा मागितली होती तेंव्हा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने( कमांडिंग अधिकाऱ्याने) स्पष्ट शब्दात सांगितले डॉक्टर तू रजा घेऊन आरक्षणाच्या रांगेत उभा राहिलास तर तुझ्यासाठी थांबलेले ५० रुग्ण कुठे जातील. इतक्या लोकांना असुविधा करून मी तुला रजा देऊ शकत नाही. तुझ्या आरक्षणाची जबाबदारी माझी.
अशावेळेस अधिकाऱ्याला पाठ्वण्यापेक्षा त्याचे वॉरंट घेऊन एखाद्या सैनिकाला पाठविण्यात येते. "कायदेशीररित्या" हे बरोबर नाहीच.
PURIST AND PRAGMATIST ARE ALWAYS AT WAR
दुसरी गोष्ट -- एका रेजिमेंट मध्ये १२०० सैनिक असतात. त्यांना रोजच्या रोज काही नेमबाजीचा प्रशिक्षण देण्यास पाठवता येणार नाही. इतका दारुगोळा फुकट घालवणे तुमच्या राष्ट्राला परवडणार नाही. मग सकाळी व्यायाम(पी टी) नंतर कवायत (परेड) रूटमार्च इ झाल्यावर अशा सैनिकांना काही तरी काम देणे आवश्यक असते. अन्यथा रिकाम्या डोक्याच्या माणसाचं डोकं कुठे चालेल ते सांगता येणार नाही. म्हणून त्यांना गवत कापणे पासून, रंगरंगोटी, बंदुका, हत्यारे, वाहने इ ची साफसफाई तेलपाणी, रेशन आणणे, बागकाम अशा कामाला लावले जाते. हे बागकाम रंगरंगोटी काही फक्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच असते असे नव्हे तर सैनिकांच्या, कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरही असते.
यानंतरही बराच वेळ रिकामा असतो मग या लोकांपैकी काही लोकांना तुम्ही सहायक म्हणून काम करण्यास तयार आहेत का? असे विचारले जाते.
जे सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर आल्यामुळे संवेदनशील झालेले असतात असे किंवा ज्यांना अंगमेहनतीची काम करण्याचा कंटाळा असतो किंवा आळशी असतात असे सैनिक साधारण अशा कामाना पटकन तयार होतात.
सहसा हे काम कुणाला सक्तीने करायला लावले जात नाही. परंतु जे लोक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी काम करतात त्यांचे वैयक्तिक प्रश्न सुद्धा लवकर सोडवले जातात किंवा त्यांना रजा पण पटकन मिळतात.हि गोष्ट नियमाप्रमाणे बरोबर नाही परंतु मानवी स्वभावाला औषध नाही. वरिष्ठ अधिकाऱ्याचा सहायक असेल तो साहेबाना आपला प्रश्न पटकन सांगू शकतो आणि त्यामुळे त्याला तोडही लगेच निघू शकते.
अशामुळे ज्यांना असे काम करायला आवडत नाही अशा लोकांना ते पटत नाही. परंतु दिसणारे फायदे त्यांना खुणावत असतात. म्हणून ते अशी कामे करायला तयार होतात परंतु मनापासून ते त्यांना पटत नाही.
स्वातंत्र्याच्या वेळेस सर्व सैनिक हे ८ वि पास असत आणि एक चरितार्थाचे सन्माननीय उपाय म्हणून ते भरती होत असत. आजही परिस्थिती हीच आहे परंतु आता मूळ शिक्षण हे कमीत कमी १२ वि आहे. शिवाय उत्तरेकडच्या राज्यात बेकारी इतकी आहे कि कित्येक सैनिक बी ए, एम ए, एम बी ए करूनही भरतीच्या ठिकाणी आलेले दिसतात. असा माणूस सैनिक म्हणून भरती होतो पण खात्यांतर्गत अधिकारी होण्यासाठी परीक्षा असते ती पास होत नाही मग अधिकारी होणे शक्य नसते परंतु सैनिक म्हणून काम करणे त्याला आपल्या पदवीला साजेसे वाटत नाही. तुही एकदा लषकरात भरती झालात कि जे काम दिले आहे ते तुम्हाला केलेच पाहिजे असे तुमच्याकडून लिहून घेतले जाते. अशा उच्च शिक्षित माणसाला इतर १२ पास सैनिकांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात रंगरंगोटी करण्यासाठी पाठवला तर नाराज असतो.
नागरी (सिव्हिल) कर्मचाऱ्याने मी हे काम करणार नाही असे वरिष्ठाला सांगीतले तर त्याला युनियनचे संरक्षण असते. संपावर जाऊ शकतो, विना परवाना रजेवर गेला तर त्याचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही.लष्करात असे केले तर लष्कर चालवणे कठीण जाईल.
दुसरीकडे सहायक हे केवळ नाराजच असतात असे नाही. कित्येक वेळेस त्यांची निष्ठा हि आपल्याला लाजवेल अशी असते. माझा एक मित्र एम एस करायला काश्मीर मध्ये कथुआ येथून पुण्याला आला तेंव्हा त्याच्या सहाय्यकाने रजा काढून स्वतःच्या पैशाने झेलम एक्स्प्रेसचे तिकीटहि काढले होते कि डॉक्टर साहेब को पुणे पहुंचाके उनका सबकुछ "सेट्ल" करके आऊंगा. माझ्या मित्राला धक्काच बसला. त्याने त्याला कितीही सांगितले तरीही तो मान्यच करेना. शेवटी मित्राने त्याच्या जायचे यायचे तिकिटाचे आणि वरखर्चाचे पैसे घेतलेस तरच तुला यायला देईन असे सांगितले.
माझा दुसरा मित्र पॅरा कमांडो आहे तो ४/३ गुरखा रेजिमेंट मध्ये होता परंतु रूटमार्च मध्ये त्याच्या सैनिकांनी त्याला कधीही ओहोळ नाल्यात आपले पाय आणि बूट ओले करू दिले नाहीत. प्रत्येक वेळेस कोणीतरी त्याला पाठीवर घेत असत. हा स्वतः कमांडो होता आणि त्याने कितीपरीने विनवून धमकावून सांगितले पण हमारे डॉक्टरके पैर गिले कैशे हो शकते है म्हणून ते गुरखा सैनिक त्याला कधीही आपल्या पायाने नाला पार करू देत नसत.
याच बरोबर अधिकरी सुद्धा अशा अनेक सहाय्यकांच्या अडीअडचणीला धावून येताना मी पाहिले आहे. पुण्यात कमांड रुग्णालयात असताना मला कित्येक मित्रांचे/ ओळखीच्या अधिकाऱ्यांचे फोन येत असत अरे माझ्या सहाय्यकाचे वडील कर्करोगाने आजारी आहेत जरा पाहून ये आणि त्याला काय मदत लागेल ते बघ.
नौदलात किंवा वायुदलात असे "सहायक" नाहीतच. कारण या दोन्ही दलात प्रत्यक्ष "जमिनीवर" माणूस उभा करायला लागत नाही. किंवा जिंकलेला भूभाग प्रत्यक्ष ताब्यात ठेवायचे काम हि दोन्ही दले करीत नाहीत.
तात्पर्य एवढेच आहे कि प्रत्येक माणसाला सहायकचे काम त्याच्या मर्जीशिवाय दिले जात नाही. परंतु अधिकाऱ्याच्या घरी काम करायला लावणे हि गोष्ट सुद्धा बरोबर नाही. लष्करात जसे जसे जास्त शिक्षित लोक येत आहेत आणि जशी जशी तांत्रिक प्रगती होत आहे तशी सहाय्यकाची गरज कमी होत आहे.( उदा आरक्षण मोबाईलवर करता येते. विजेचे किंवा फोनचे बिल मोबाईलवर भरता येते)
कॅन्टीन मध्ये सहसा अत्यावश्यक गोष्टीच आणायला पाठविले जाते. ( कोणती स्त्री आपली शॉपिंगची संधी दुसऱ्याला देईल) आणि अधिकाऱ्यांची कॅन्टीनस वेगळी असतात तेथे सैनिकांना प्रवेश नाही.
वतर्मानपत्रात येतात ति वर्णने अतिरंजित असतात पण तरीही त्यात काही प्रमाणात तथ्य आहेच.
सत्ता आणि अधिकार आला कि त्याचा गैरवापर हा आलाच. बिहारचे(कि उ. प्र.) पोलीस महासंचालक तेथील गृहमंत्राचें पाय धरतानाचा फोटो मी पहिला आहे. आताच मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री यांचे पाय ओले होऊ नयेत म्हणून पोलीस त्यांना उचलून नेतानाचा फोटो आलेला आहे.
बदलत्या काळानुसार सहायकच्या कामाचे स्वरूप निर्धारित करणे आणि त्याला इतर कामांसाठी वापरणे रद्दबातल करणे हे काळाला धरून सुसंगत होईल.
प्रतिसाद विस्कळीत झाला आहे( तीन वेळा रुग्ण आल्याने) मुद्दे अस्ताव्यस्त आहेत. क्षमस्व.
31 Aug 2016 - 2:44 pm | शाम भागवत
विस्कळीत वगैरे नाही वाटला. उलट खूपच समतोल वाटला.
31 Aug 2016 - 10:41 pm | अमितदादा
वस्तुस्थिती दाखवणारा प्रतिसाद.
1 Sep 2016 - 11:02 pm | चंपाबाई
सरकारी पगारातून स्वतःचा खाजगी नोकर ठेवणे !
किती ही राष्ट्रभक्ती !
3 Sep 2016 - 12:55 am | चलत मुसाफिर
काळे-पांढरे करता येणार नाही हे पूर्ण सत्य. पण तसे ते बोलून दाखवता येत नाही.
सहाय्यक म्हणजे नक्की काय, हे असैनिक दृष्टीने समजून घेणे कठीण आहे. सहाय्यक हा सर्वप्रथम एक सैनिक असून युद्धभूमीवर त्या-त्या अधिकाऱ्यांच्या सोबत जाण्यासाठी नियुक्त असतो. त्याला सैन्यातील सर्व शारीरिक, तांत्रिक, वैद्यकीय व शैक्षणिक पातळ्या दरवर्षी उत्तीर्ण कराव्याच लागतात. किंबहुना ते करवून घेणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य असते. अनिच्छुक जवानाला मारूनमुटकून सहाय्यक म्हणून नेमणे हे शक्य नसते आणि तसे कुणी करतही नाही. तसे करणे हे नैतिकदृष्ट्या चूक असेलच, पण अकल्पित संकटांना आमंत्रण देणारेही ठरू शकते. याउलट सहाय्यकांचे अधिकारी व त्याचे कुटुंब यांच्याशी भावनिक लागेबांधे निर्माण होऊन ते वर्षानुवर्षे टिकून राहिल्याची असंख्य उदाहरणे सैन्यात सापडतात.
हे सर्व जरी सत्य असले तरी आजच्या अधिकाधिक egalitarian (मराठी शब्द?) होण्याच्या वाटेवर असलेल्या जगात केवळ सहाय्यक नव्हे तर अधिकारी मेस, सेना कँटीन, निःशुल्क मदिरा असे अनेक मुद्दे वादग्रस्त होऊ लागले आहेत हे खरे. यातून मार्गही सेनेलाच काढावा लागेल हेही तितकेच खरे.
3 Sep 2016 - 7:44 am | चंपाबाई
सरकारी खर्चाने जर मला सहाय्यक मिळणार असेल तर मीही त्याच्याशी वर्षानुवर्षे भावनिक संबंध जोडुन दाखवीन.... सहाय्यकावर जर इतके प्रेम अधिकारी करतो , तर त्याला पगार पेन्शन स्वतःच्या खिशातून का देत नाही ?
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे , तो ऐषो आरामात राहिला पाहिजे , हे तत्वज्ञान शतकोशतके राजे महाराजे सामान्य जनतेच्या डोक्यात घुसवण्याची लबाडी करत आहेत.. आता लोकशाही आली तरी या प्रथा अजुन सुरुच ठेवायच्या का ?
3 Sep 2016 - 9:28 am | सुबोध खरे
चंपाबाई
तुम्हाला जगातील प्रत्येक बाबतीत इतका आत्यन्तिक द्वेष का आहे? कुठे तरी काहीतरी खातंय? का दुसऱ्याचं काहीच चांगलं बघवत नाही.
तुम्ही रुग्ण पाहताना तुमच्या सहाय्यकाला पाणी आणायला सांगता का कि स्वतः उठून जाऊन घेता?
मग तो तुमचा सहायक नाही का?
लष्करात एकच सहायक आयुष्यभर असतो हे कुणी सांगितले. त्याची पहिली बढती झाली कि त्याला अशा कामावर ठेवत नाहीत. तेंव्हा सहायक हा सरकारी फाईल्स एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात नेण्यासाठी, सामान हलविणे, टपाल पाठविणे अशा कामासाठी खात्रीचा माणूस (पण सर्वात कनिष्ठ) म्हणून नेमलेला असतो.
अधिकारी त्यांचा गैरवापर करतात हि वस्तुस्थिती आहे हे मी मान्य केलेले आहेच. उगाच तिरकस जबाब देऊन चांगलि चर्चा गढूळ करण्याशिवाय तुम्हाला दुसरे काही येत नाही का?
आणि एवढा दुःस्वास असेल तर तुम्हालाही लष्कर भरती होण्यासाठी मी खुले आमंत्रण दिलेले आहे. वय वर्षे ४५ च्या अगोदर कधीही डॉक्टर म्हणून आर्मीत कॅप्टन या हुद्द्यावर भरती व्हा. फुकट भारत भ्रमण करून घ्या. प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग पिचक्या टाका
3 Sep 2016 - 10:45 am | चंपाबाई
रस्ते निकृष्ट बांधले की आमचे पैसे गेले असे तुम्ही / इतरही ओरडतात.
सैन्यातील अधिकारी सरकारी सरकारी खर्चाने सहाय्यक ठेवतो , हा आपल्या जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे , असे मी किंवा कुणी बोलले तर बिघडले कुठे ?
3 Sep 2016 - 11:42 am | चंपाबाई
सैन्याबद्दल काहीही विरोधी बोललं की खरेसाहेब लगेच चॅलेंज देतात ... सैनिक होउन दाखव !
नायक शिनेमात अमरिश पुरीला कुणी भ्रष्टाचाराविरुद्ध बोललं की तोही लगेच चॅलेंज देत असतो ... मुख्य्मंत्री होउन दाखव .
खरेजींचे ते चॅलेंज वाचून मला आता सतत अमरिश पुरीची आठवण होते.
3 Sep 2016 - 12:02 pm | सुबोध खरे
भम्पकबुवा
बाकी तुम्हाला तुमचा चपराशी पाणी आणून देत असेल तर तो सरकारी पैशाचा अपव्ययच आहे कि नाही हे अगोदर सांगा.
१२०० माणसांना कायम काम देऊन गर्क ठेवणे हि सोपी गोष्ट नाही.
लष्करात काम उकरून काढावे लागते अन्यथा रिकामे डोके सैतानाचे घर म्हटल्याप्रमाणे ते तिरपे चालते.
त्या सैनिकाला काम दिले किंवा तो नुसता बसून राहिला यात सरकारला येणाऱ्या खर्चात एक दमडीचा फरक नाही. त्यात जनतेच्या पैशाचा अपव्यय कसा ते सांगा बरं. त्याला फक्त बंदूक चालवण्याचे काम दिले तर गोळ्यांचा अपव्यय होतो हे आपण वाचले नाही का?
आपल्याला लष्कराबद्दल शष्प माहित नसताना केवळ पिचक्या टाकणे चालू आहे याबद्दल हे बोलणे आहे.
3 Sep 2016 - 12:04 pm | सुबोध खरे
अधिकारी त्यांचा गैरवापर करतात हि वस्तुस्थिती आहे
हे वाक्य सुरुवातीला टाकायचे होते ते राहून गेले
3 Sep 2016 - 12:36 pm | गामा पैलवान
चंपाबाई,
>> खरेजींचे ते चॅलेंज वाचून मला आता सतत अमरिश पुरीची आठवण होते.
जरा कुठे भारताच्या सुरक्षिततेवर चर्चा केली तर तुम्ही कशा वस्सकन ओरडायच्या की सीमेवर लढायला जा म्हणून! ते बरं चालायचं!
आ.न.,
-गा.पै.
3 Sep 2016 - 9:20 am | सुबोध खरे
अधिकारी मेस, सेना कँटीन, निःशुल्क मदिरा
गैरसमजावर आधारित माहिती
निशुल्क मंदिर हि फक्त फॉरवर्ड एरिया मध्ये जवानांना दोन पेग रमचे आठवड्यातून दोनदा मिळतात.अधिकाऱ्यांना दारू फुकट "कधीही कुठेही" मिळत नाही.
कॅन्टीन चालू करण्याचा मूळ हेतू एवढाच होता कि अशा भागात कोणताही दुकानदार नसतो तेंव्हा सैनिकांना जरूरीपुरते सामान सर्वत्र उपलबध करण्यासाठी त्यांचे युनिटच कॅन्टीन चालविते. हि केंद्र सरकारची सेवा असल्याने त्यांना राज्यांचा विक्रीकर आणि अबकारी कर यातून सुटका आहे. शिवाय यात लष्कर फक्त ५ % नफा आकारून सैनिकांना सामान उपलब्ध करून देते. यात घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांची दलाली वजा होत असल्याने साधारण लिहिलेल्या जास्तीत जास्त किमतीच्या लक्ष हे २० % कमी दरात मिळते.
वस्तुस्थिती -- डी मार्ट /मॉलमध्ये मला सामान कॅन्टीन पेक्षा स्वस्त मिळते. फक्त दारू १/३ दरात मिळते हि वस्तुस्थिती आहे ( ती मी पीत नाही). त्यामुळे आजहि मला कॅन्टीनची सुविधा उपलब्ध असली तरीही मी कॅन्टीनचे कार्ड काढलेले नाही.
अधिकारी मेस बद्दल मी वर लिहिलेले आहे तेवढे वाचून घ्या.
तेंव्हा हे मुद्दे वादाचे नाहीतच.
सहायक बद्दल मी वर लिहिलेले आहेच
1 Sep 2016 - 2:54 pm | दा विन्ची
धन्यवाद अमित दादा अँड डॉ खरे. बापूसाहेबांच्या जाणकार प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
1 Sep 2016 - 4:07 pm | कैलासवासी सोन्याबापु
माझा डॉक्टरसाहेबांच्या पूर्ण प्रतिसादाला +100, nothing more to add, कदाचित माझाच प्रतिसाद विस्कळीत किंवा किंचित आर्मी बायसचा असू शकेल पण डॉक्टरांनी समतोल अन नीट उलगडले आहे सगळे असे म्हणतो :)
1 Sep 2016 - 4:11 pm | विशुमित
++11111
3 Sep 2016 - 3:50 pm | तेजस आठवले
निंदकाचे घर असावे शेजारी असे तुकाराम महाराज म्हणून गेले आहेत. काही आयडी हे शब्द तंतोतंत सार्थ करत आहेत.
बाकी तुकोबांनी ज्या पद्धतीने अश्या लोकांचा उपयोग स्वसुधारणेसाठी करून घेतला तसाच आपण पण करूया, असे सुचवावेसे वाटते.
काही आयडींमुळे आमच्यातील देशप्रेमाची तसेच आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची जाणीव आणि भावना वाढीस लागते आहे आणि पुढेही वाढीस लागो असे वाटते.