स्वीट न स्पायसी एग्

केडी's picture
केडी in पाककृती
20 Aug 2016 - 6:26 pm

Sweet n Spicy Eggs

साहित्य

४ अंडी
१ कांदा बारीक चिरून
५ ते ६ लसूण पाकळ्या, बारीक चिरून
१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून
३ ते ४ लाल सुक्या मिरच्या
१ चमचा तिखट चिली सॉस
१ चमचा सोया सॉस
१ चमचा टोमॅटो सॉस
१ चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर
१ चमचा मध
१ मोठा चमचा तेल
मीठ, चवीनुसार

Ingredients

कृती
नेहेमीची अंडा भुर्जी, बॉइल्ड एग भुर्जी खाऊन कंटाळा आलेला असेल तर हा एक थोडा वेगळा प्रकार करून बघा. थोडासा गोडसर तिखट असल्यामुळे मुलं आवडीने खातात. तिखट हवे असल्यास मिरच्या वाढवा किंवा तेलात हिरवी मिरची वापरू शकता. कांद्या ऐवजी कांदेपात वापरली तर चव अजून खुलेल.

अंडी उकडून, सोलून त्याच्या गोल चकत्या कापून घ्या. पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लाल मिरच्यांचे तुकडे करून घाला. मिरच्या थोड्या परतून मग त्यात आलं, लसूण घाला. थोडा वेळ परतून मग चिरलेला कांदा घालून कांदा मऊ होऊं द्या.

आता पॅन मध्ये, सोया, टोमॅटो आणि चिली सॉस घालून मिश्रण एकजीव करून घ्या. एक चमचा मध घालून ढवळून घ्या. अंड्यांच्या चकत्यांवर कॉर्नफ्लॉवर भुरभुरा आणि त्या हळुवारपणे पॅन मध्ये घाला. अलगद हाताने अंडी परतून मसाला सगळीकडून लावून घ्या.

Step1 Step2Step3 Step4Step5 Step6Step7

चवीनुसार मीठ घालून, गरम गरम स्वीट न स्पायसी एग्स सर्व्ह करा!

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

20 Aug 2016 - 6:30 pm | किसन शिंदे

हीच पाककृती अंडे न घालता कशी करता येईल?

संजय पाटिल's picture

20 Aug 2016 - 6:40 pm | संजय पाटिल

अंडं तुम्ही नं घालता कोंबडीने घातलेले वापरले कि झालं..

किसन शिंदे's picture

20 Aug 2016 - 6:48 pm | किसन शिंदे

धागा त्यांचा मिरच्या तुम्हाला झोंबल्या?

धाग्यावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल हलकं घ्यायचं कि कसं ते दिक्षीत साहेब पाहून घेतील. तुम्ही तेवढं ते वैयक्तीक प्रतिसाद आवरा.

उडन खटोला's picture

21 Aug 2016 - 11:47 am | उडन खटोला

सामना मिक्सड डबल नाहीये तर एकेरी आहे का?
कैच्या कै प्रतिसाद कसं काय देतायत किसनदेव?

केडी's picture

20 Aug 2016 - 6:47 pm | केडी

अगदी बरोबर.:-):-)

किसन शिंदे's picture

20 Aug 2016 - 6:50 pm | किसन शिंदे

माणसाचंच काय, कोंबडीचंही अंडं खात नाही म्हटल्यावर माझा आपला साहजीक प्रश्न. ;)

किसन्या, तू श्रावण महिना असून अगदी ठळक स्पायसी एग असा लिहिलेला धागा उघडलाच कशाला?
.
कुठं कुठं म्हणून न्यायची सोय नाही ह्याला.
बारमध्ये गेलो तर बूस्ट मागणार हे देव.

उडन खटोला's picture

21 Aug 2016 - 11:48 am | उडन खटोला

इंग्रजी नाव असूनही मराठीत लिहिल्यामुळे धागा उघडला असेल ;)

केडी's picture

20 Aug 2016 - 6:50 pm | केडी

हे ह्या साठी होत

धाग्यावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल हलकं घ्यायचं कि....

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2016 - 12:14 am | पिलीयन रायडर

पनीर नाही तर बटाटे घालुन..

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 6:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी पयला!

उडन खटोला's picture

21 Aug 2016 - 11:46 am | उडन खटोला

मी पाह्यलं, पण तू पयला नाय बापु.

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2016 - 12:14 am | पिलीयन रायडर

छान रेसेपी! करुन बघेन!

जावई's picture

21 Aug 2016 - 1:03 am | जावई

खाल्लावर सांगतो.

संदीप डांगे's picture

21 Aug 2016 - 12:34 pm | संदीप डांगे

फोटो जीवघेणा आहे तो पहिला!!

सोत्रि's picture

21 Aug 2016 - 12:55 pm | सोत्रि

कांदा बारिक चिरण्याऐवजी अंड्याच्या चकत्यांप्रमाणे त्याच्याही चकत्या केल्यास अजून मस्त सागेल!
रेसिपी ट्राय करून पाहतो, मस्तच आहे!

- (बल्लव) सोकाजी

आधी ते 'कॉकटेल' सोकाजीराव कुठे गेले ते सांगा. जमाना उलटून गेला की लाष्टचं कॉकटेल रिचवून (म्हणजे धागा वाचून.)

चाणक्य's picture

21 Aug 2016 - 8:39 pm | चाणक्य

करून बघणार.

आनंदी गोपाळ's picture

21 Aug 2016 - 9:46 pm | आनंदी गोपाळ

हे अस्ले फोटू टाकून आमचा जीव का घेता तुम्ही? च्याय्ला! कस्ला जीवघेणा फटू आहे!!!

ती डिश, अन त्यातली डिश!! आहाहा. केदारभौ! मान गये उस्ताद!

केडी's picture

21 Aug 2016 - 10:36 pm | केडी

..... __/\__
-- --

सदानंद पाटील's picture

21 Aug 2016 - 10:51 pm | सदानंद पाटील

कांदा ज्यांना "बारीक" चिरता येतो,त्यांना सलाम.फार पेशंसचं काम हो.पण जिथे तिथे 'बारीक कटा हुवा प्याज'च सांगतात.आमचं तर अर्ध अवसानच तिथेच गळते.

वजनाने जड पात्याची धारधार सुरी वापरा आणि त्या पात्याला अगदी नियमीतपणे (शक्यतो आठवड्यातून एकदा) धार करा.

भुश्श्यासारखा बारीक कांदा चिरायचा असेल तर सगळे काही सुरीवर अवलंबून असते.

हा व्हिडीओ बघा.

उडन खटोला's picture

22 Aug 2016 - 10:42 pm | उडन खटोला

मोदक, 'स्वयं' पाकसिद्धी करत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे काय? ;)

बकेट लिस्ट हो.. बकेट लिस्ट..!! :D

वजनाने जड पात्याची धारधार सुरी वापरा आणि त्या पात्याला अगदी नियमीतपणे (शक्यतो आठवड्यातून एकदा) धार करा.

अहो अशी दर आठवड्याला धार काढली तर सूरी 4 महिन्यात खलास होईल! :-)

व्हिडिओत दाखवलंय, किंवा मास्टर शेफ वर आपण बघतो, कि एका स्टील च्या खरखरीत रॉड वर ते सुऱ्या घासतात, त्याला होनिंग म्हणतात.
स्टेनलेस स्टील च्या सुऱ्या साधारण २ ते ४ वेळा वापरल्या कि होनिंग कराव्या, कार्बन स्टील ची पाती मात्र प्रत्येक वेळी वापरताना होन करावी.

सुऱ्यांना धार मात्र सहा महिने किंवा वर्षातून एकदा काढली कि पुरते.

सुऱ्या बद्दल लिहीन एकदा सविस्तर.

रुस्तम's picture

23 Aug 2016 - 11:26 am | रुस्तम

सुऱ्या बद्दल सविस्तर लवकर लिहा

मग बहुदा मी होनिंग म्हणत असेन.

सुर्‍यांबद्दल लिहा सविस्तर..

नूतन सावंत's picture

22 Aug 2016 - 12:32 pm | नूतन सावंत

करूनच पाहिली पाहिजे ,दिसायला तर देखणी आहेच.

अजया's picture

22 Aug 2016 - 9:22 pm | अजया

+१
करुन पाहिली पाहिजे अशी पाकृ.

बाबा योगिराज's picture

22 Aug 2016 - 11:07 pm | बाबा योगिराज

कॆडी भावा, कुठं फेडशील ह्ये पाप. निसत्ये कातिल फटू.
असलं कै टाकत नका जाऊ रे.
दुत्त दुत्त केदार.

बाबा योगीराज.

केडी's picture

23 Aug 2016 - 6:01 am | केडी

बाबा, एकदा तो कट्टा का काय करा, आणि आम्हाला ह्या पापातून मुक्ती द्या. :-)

आनंदी गोपाळ's picture

24 Aug 2016 - 12:16 am | आनंदी गोपाळ

चव सुंदर आली होती. लेकीने फन्ना उडवला.

पिलीयन रायडर's picture

24 Aug 2016 - 2:12 am | पिलीयन रायडर

तुम्हाला गप्प बसवत नाही का हो?!!

साधी पाकृ टाकायची सोय नाही. हा माणुस आहेच झब्बु द्यायला!

आनंदी गोपाळ's picture

24 Aug 2016 - 9:08 am | आनंदी गोपाळ

तुम्ही 'साध्या' पाकृ टाकत नाही. पाहून जीव जळतो. मग करून चव घ्यायची, तर झब्बू द्यावाच लागतो.

अरे क्या बात है! जियो सरजी जियो! कमाल फोटो! आपण टाकलेली पाकृ कोणीतरी करून बघावी आणि चव आवडावी ह्या पेक्षा दुसरं सुख नाही. खरंच तुमचं मनापासून कौतुक आणि आभार!

जागु's picture

24 Aug 2016 - 11:42 am | जागु

फोटो काय भारी दिसतोय.