ई-उपवास

रघुनाथ.केरकर's picture
रघुनाथ.केरकर in काथ्याकूट
17 Aug 2016 - 3:34 pm
गाभा: 

आपण बर्‍याच प्रकारचे उपवास करतो, कुणी अमुक एक महिन्यात मांसाहार टाळतो, कुणी चपला वापरायचे टाळतो, कुणी एकवेळ जेवतो, कुणी आपल्या मागण्यांसाठी अन्न पाणी त्याग करतो. वैगरे वैगरे, मी सुद्धा दर शनीवारी न चुकता उपवास करायचो. मग पुढे शनीवारी लांबचे प्रवास घडायला लागले तेंव्हा मात्र शनीवारी उपवास करायचे सोडुन दीले. पण शनीवारचा मांसाहार करीत नाही.पण हे झाले ठरवुन केलेले उपवास. कधी कधी न ठरवता देखील उपवास घडतो.मागच्या आठवड्यात असाच उपवास मला घडला.

शुक्रवारी सकाळी नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी बदलापुर स्टेशन गाठलं, स्टेशन वर पोहचुन बघतो तर काय स्टेशन ला तुफ़ान गर्दी, लोक रेल्वे रुळावर उतरले होते. दोन लोकल्स च्या मोटरमन केबीन मध्ये आंदोलन कर्त्यानी ताबा घेउन दोन्ही गाडया मध्येच थांबवुन धरल्या होत्या. बर्राचा वेळ स्टेशन वर घुटमळत राहीलो, गाडया सुटायची काही चिन्हे दीसेनात, एव्हाना २० - २५ जणांना फोन करुन तिथला आंखो देखा हाल सांगीतला. मग १०-१५ फ़ोटु वेगवेगळ्या कोनातुन काढले, आणी पाउणतास टाईमपास करुन घरी परतलो. घरी परतताना मी जरा खुशीतच होतो, त्याची दोन कारणं होती एक म्हणजे भर पगारी रजा, आणी दुसरं म्हणजे चार दीवस आलेला वीकांत. लोकांचा रेल रोको माझ्या पथ्यावर पडला होता. शुक्रवार, शनीवार, रवीवार आणी सोमवार अशी सलग चार दीवसाची रजा मिळणार होती, कोकणात रहाणार्‍या चाकरमान्याना असे प्रसंग म्हणजे "सोनीयाचा दीनु".

मी सुद्धा घरी आल्या आल्या जाहिर केलं की मी गावी चाललो. एवढा मोठा विकांत आहे म्हटल्यावर मी गावी जाणरच हे आई ला अभीप्रेत असल्याने तीने फ़ार काही प्रतीक्रिया दील्या नाहीत. बायकोने मात्र प्रश्नांचा भडीमार केला, तीला थोडक्यात समजावुन घरच्यांचा निरोप घेतला.सावंतवाडीपासुन १५ कीमी वर बांदा नावाचे एक गाव आहे, त्यात आरोस बाग नावाची एक लाहानशी वाडी आहे, तीथे माझे दुरचे नातेवाईक रहातात , मला त्यांच्याकडे २ दीवसांसाठी एका कामा नीमीत्त जायचं होतं. ऑफ़ीसचा ल्यापटॉप आणी दोन जोडी कपडे, एवढच सामान घेउन निघालो. बाय रोड थेट पनवेल गाठलं, पनवेल स्टेशन वर चौकशी केली तर कळालं कि १ वाजता कुठली तरी लेट झालेली गणपती स्पेशल येणार आहे.
गाडीत बसल्यावर लक्षात आलं की मोबाइल फोन ची ब्याटरी ४५% वर आलिय. आनंदाच्या भरात ब्याग भरताना, पॉवर ब्यांक घ्यायला विसरलो होतो. "हुश्शार फ़ोन" असल्याने ब्याटरी भराभरा उतरते. आणी त्यातच सकाळी रेल रोको दरम्यान केलेली फ़ोटोग्राफी आणी फ़ोनाफ़ोनी यातच ब्याटरी उतरली होती. गाडी "हॉलीडे स्पेशल" गाडी असल्याने जुने डब्बे होते, आणी त्यात सुधा जनरल डब्बा असल्याने त्यात मोबाईल चार्जींग पॉईंट नव्हते, मग सगळ्यात आधी डेटा कनेक्शन बंद केलं, मग स्क्रीन लाईट कमी केला, नेटवर्क CDMA वरुन GSM केलं. रोहा येईस्तोवर ब्याटरी २५ टक्क्यांवर आली. आता मात्र फोन बंद करावा लागला. घरी फोन करुन तसं कळवल आणी फोन बंद केला. दर दोन तासांनी फोन चालु करुन घरच्याना कॉल करत होतो. आणी त्याच मुळे सावंतवाडी येइ स्तोवर मोबाईल ने दम तोडला. ल्यापटॉप वर मोबाईल चार्ज करावा तर ल्यापटॉप सुद्धा थंड पडला होता. गुरुवारी रात्री लेकाने त्यावर उशीरा पर्यन्त कुंफ़ु पांडा पाहीला होता. त्यामुळे ल्यपटॉप ची ब्याटरी कंप्लीट ड्रेन झाली होती. आता नातेवाईकांकडे पोहोचे पर्यंत बिना मोबाइल रहावे लागणार होते, कल्पनाच डेंजर होती.

गाडी रात्री साडेनऊ ला सावंतवाडी स्टेशन ला पोहोचली. शेवटची एस टी जाउन अडीच तास झाले होते, रेल्वे स्टेशन वरच्या रिक्षावाल्याना विचारलं की बांदा ,आरोसबाग येणार का? तर कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी ४०० रुपयाला एक जण तयार झाला. तो देखील बांदयातलाच होता म्हणुन तयार झाला. माझं सुदैव की त्याला माझ्या नातेवाईकंची वाडी माहीत होती. मी रिक्षात बसलो, रिक्षा बांद्याच्या दिशेने निघाली. वाटेत कीर्र काळोख होता आणी एकदम शांतता होती परीसरात फक्त अमच्याच रिक्षाचा आवाज होता. मध्येच एखाद दुसरा ट्रक हॉर्न मारुन निघुन जायचा. रिक्षा बांद्यात पोहोचली आणी डांबरी रस्ता सोडुन आमची रिक्षा कच्च्या रस्त्याला लागली. रस्ता प्रचंड खराब होता, उंटावर बसल्याचा फ़ील येत होता. एवढ्यात नेमका पाउस आला समोरची वीजीबीलीटी अवघ्या ५-७ मिटर वर येउन ठेपली. रिक्षा अगदी संथ गतीने हिंदकळत पुढे जात होती. घड्याळात ११.३० झाले होते.

इतक्यात रिक्षावाला रिक्षा थांबवुन म्हणाला "तुमचा घर इला हा." मी बाहेर पाहीलं तर किर्र अंधार, मध्ये मध्ये काजवे पेटत होते. रिक्षावाल्याला विचारलं की कुठे आहे घर. तर त्याने रस्त्याच्या डावी कडे बोट दाखवलं आणी म्हणाला "ह्या काय सामक्या आसा" (हे काय समोरच आहे). इतक्यात एक माणुस रॉकेलचा दीवा घेउन आमच्या दिशेने आला. निटसं दीसत नव्हतं पण डोळे थोडे ताणल्यावर लक्षात आलं की हेच ते नातेवाइक ज्यांच्याकडे मी एवढ्या लांब आलो होतो. रिक्षावाल्याला त्याची बिदागी दीली आणी त्याला मोकळं केलं. रिक्षावाल्याने रिक्षा वळवुन माघारी जाण्यापर्यंतच रिक्शाचा आवज आणी प्रकाश होता, मग मात्र तो सुधा कमी कमी होत गेला. मग मी त्या नातेवाईक काकां बरोबर चालु लागलो. त्यांच्या मागोमाग मी एका पडवी सद्रुश्य खोलीत आलो. त्या पडवी सद्रुश्य घरात काळोख होता, कदाचीत लाइट गेले असावे असं मला वाटलं आतुन त्यांच्या पत्नी बाहेर आल्या, त्यानी अजुन मोठा रॉकेलचा दीवा आणुन एक टेबल सद्रुश्य वस्तुवर ठेवला. आणी त्या दीव्यासमोर मला बसायला एक खुर्ची ठेवली, दोन्ही कडच्या खुशाल्या वीचारुन झाल्यवर मी त्याना लाइट गेले आहेत का वीचारल तर त्या दीव्याच्या उजेडात काकांच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर एक छद्मी स्मित दीसलं, मला पुढे काही जास्त बोलवेना झाल.

बाहेर धो धो पाउस कोसळत होता, वातावरणात वेगळाच गारवा होता. त्यात पायाखाली शेणाने सारवलेली जमीन होती. पडवी सोडली तर बाहेर सभोवताली गच्च अन्धार होता, वेगळाच अनुभव होता तो. एवढयात गरमागरम जेवण आलं. जेवण करुन आडवा झालो. पावसाच्या आणी रातकीड्यांच्या आवाजात कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी ७ ला जाग आली, पडवीतुन बाहेर येउन पाहीलं तर पाउस थांबला होता, बाहेर उन पडलं होतं. घरा भोवती गच्च झाडी होती, चुलीवर अंघोळीचं पाणी तापत होतं. चुलीच्या धुराचा वास मला माझ्या बालपणीची आठवण देउन गेला. मग नकळत पाय चुलीकडे वळले, चुलीच्या समोर बरुन मी विस्तवाचा शेक घेउ लागलो. थोड्याच वेळात ब्रश वैगरे करुन चहा नाष्टा झाला. एवढयात घरी फोन करायची आठवण झाली. ब्यागेतुन मोबाइल काढला आणी चार्जींग करायला निघालो. चार्जर हातात घेउन भिंतीवर लाइटीचा बोर्ड शोधायला लागलो. पडवीच्या सगळ्या भींती शोधल्या पण एकही बोर्ड सापडला नाही. साधी वायरींग पण दीसली नाही. काका माझा हा कर्यक्रम टक लाउन बघत होते. माझं त्यांच्याकडे लक्ष जाताच ते हसुन म्हणाले "लायट अजुन येउक नाय आसा. गणपती च्या नंतर येयत असा सरपंच सांगा व्हते." मी एकदम शांत झालो. मोबाइल आणी चार्जर पुन्हा ब्यागेत ठेवला. मला खुप प्रश्न पडले होते. कुठला प्रथम वीचारु हेच कळत नव्हतं. तरी सुद्धा न रहावुन मी बोललोच:
मी: लायट केवा पासुन नाय आसा?
काका: पैल्या पासुनच नाय आसा.
मी : म्हणजे?
काका: तरी ६० - ७० वर्षा झाली.
मी: तुमी अर्ज करुक नाय काय?
काका: गेल्यावर्षी केल्लो. सगळे कागद बनवन घेतले. मगे तो सायब बदाललो आनी ते कागद सुधा तेनी धापो केल्यान मेल्यानं. फुडल्या वाडीताकात लायट इली आसा. सरकारी बाईर सुधा पंपाक लायन इली, आमका देवकच लायट नाय आसा गवरमेंटाकडे.आमका आता सवय झाली आसा पन पावने सोयरे इले की पंचायत जाता.

काकांच्या बोलण्यात विषाद जाणवत होता. मी कल्पनाच करु शकत नव्हतो की विजेशीवाय त्या काकांच्या कुटुंबाने इतके दीवस कसे काढले. खुप अस्वस्थ वाटायला लागलं, पुढचे दोन दीवस मी विना मोबाईल, विना ल्यापटॉप काढले. दोन दीवस सतत, प्रत्येक क्षणाला मला सारखा एकच विचार यायचा की विजेशीवाय इतकी वर्ष हे लोक कसे राहीले.

ज्या कामा साठी आलो होतो ते काम उरकले आणी तीसरर्‍या दीवशी पुन्हा मुंबई ला जायला निघालो, सावंतवाडीहुन कोकणकन्या पकडली, गाडितच मोबाइल आणी ल्यापटॉपचार्ज करुन घेतला. मागचे दोन दीवस मी अपघाताने का होइना पण. इ-उपवास केला. कुठल्याही प्रकारचं ईलेक्ट्रीक किंवा ईलेक्ट्रोनीक यंत्र मी ह्य दोन दीवसात वापरलं नव्हतं परतीच्या प्रवासात रात्र भर फक्त डोक्यात एकच वीचार होता,
काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु?

​टीप: पहीलाच प्रयत्न असल्याने शुद्धलेखन व मांडणी मधल्या चुकांकडे दुर्लक्ष करावे.​

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

17 Aug 2016 - 3:45 pm | अरुण मनोहर

मिपावरील पहिल्या लेखनाचे अभिनंदन!
लिहीत रहा.

आता मिपा स्टाईल प्रतिसाद!

क्रमश: लिहिणे राहिले का?

काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु?

मोदीना लिहा

बापरे!! बांद्याजवळच्या वाडीत ही परिस्थिती आहे?
धक्का बसला.

काका आणी त्यांच्या कुटुंबाचा उपवास मी कसा सोडवु?

स्नेहांकीता ताईंना विचारले पाहिजे.

रघुनाथ.केरकर's picture

17 Aug 2016 - 4:23 pm | रघुनाथ.केरकर

सावंतवाडी तालुक्यात अजुनही ३७० कुटुंबे अन्धारातच आहेत. आणी हा ऐकीव आकडा नाहीय, हि वस्तुस्थीती आहे.

सस्नेह's picture

17 Aug 2016 - 6:55 pm | सस्नेह

वाडी/वस्तीचा नेमका पत्ता मिळाला तर छडा लावता येईल आणि उपाययोजनासुद्धा. सध्या अशा विद्युतिकरणासाठी ब-याच सरकारी योजना आहेत.

रघुनाथ.केरकर's picture

17 Aug 2016 - 7:08 pm | रघुनाथ.केरकर

बाय रोड जायचं असेल तर कास मार्गे जावं लागतं. कोलेभाट आणी आरोस बाग च्या मध्येच हे घर आहे. तेरेखोल खाडीच्या अगदी शेजारी ऐलतीराहुन दगड भिरकावला तर तो पैलतीरी तोरशीत(गोव्यात) पडतो.

पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या.

केरकर सर उत्तम स्फुट्/लेख अजून येऊद्यात असे अनुभवी लेख..

स्न्हेहांकिता तै : आज मला कळाले वीज आधी चमकते आणि मगच आवाज येतो ते.. तुमची तत्पर सहाय्य मदत (करण्याची तयारी/भूमीका) पाहून खूप खूप आनंद झाला...

मिपाकर धर्म म्हणतात तो हाच असावा, अश्या दुर्गम वाड्यांवर विजेचा आणि विज्ञानाचाही उजेड पडू दे हीच गणरायाकडे मागणी..

नाखु मिपाकर

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2016 - 12:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपाकर धर्म म्हणतात तो हाच असावा, अश्या दुर्गम वाड्यांवर विजेचा आणि विज्ञानाचाही उजेड पडू दे हीच गणरायाकडे मागणी..

+१००

ब्राव्हो स्न्हेहांकितातै !

राजाभाउ's picture

18 Aug 2016 - 1:12 pm | राजाभाउ

+१०१
असेच म्हणतो.

अर्धवटराव's picture

19 Aug 2016 - 1:06 am | अर्धवटराव

एक नंबर.

आता सुषमा स्वराज मॅडमला 'भारताच्या स्नेहांकिता' असा किताब देण्याचा प्रस्ताव मिपा दरबारी दाखल करतो.

सस्नेह's picture

19 Aug 2016 - 10:57 am | सस्नेह

कैच्या कै... =))

अजया's picture

19 Aug 2016 - 3:35 pm | अजया

:)

संजय पाटिल's picture

20 Aug 2016 - 12:08 pm | संजय पाटिल

याला आमचे कचकून अनुमोदन..

टवाळ कार्टा's picture

19 Aug 2016 - 3:41 pm | टवाळ कार्टा

पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित
स्नेहांकिता - Wed, 17/08/2016 - 20:35
पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या.

अश्या कश्या इतक्या तत्पर तुम्ही... ;)

पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या.

तुम्ही पण..??

तुम्ही पण..????

पैसा's picture

17 Aug 2016 - 4:45 pm | पैसा

छान लिहिलंत! तुमचे अनुभव लिहीत रहा. इतक्या लोकांकडे लाईट नाही तेही बांद्यासारख्या हायवेवरच्या गावात हे फार विचित्र आहे. त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काही करता येईल ना.

रघुनाथ.केरकर's picture

22 Aug 2016 - 6:36 pm | रघुनाथ.केरकर

मागच्या शनीवारी कुणीतरी उपोषणाला बसले होते, पण त्याचा कही उपयोग झालेला दीसत नाही, काहीठीकाणी खुप दीवसांपासुन खांब येउन पडलेयत पण वीज आली नाही.

एकीकडे सर्व ग्रामपंचायती फायबर ने जोडण्याचा काम जोरात चालु आहे, तर दुसरी कडे अजुन विजच नाही. खुप वीषण्ण करणारं चीत्र आहे. शनीवार संध्याकाळचा हा एक फोटो.

Lamp

पण खरं सांगू का? मला तुमचं हे गाव एका अर्थी फार सुखी वाटतंय विजेसारख्या आधुनिक सुखसुविधा नाहीत तर. 'तुका म्हणे होय मनाशी संवाद| आपुलाचि वाद आपणांसी||' हे तिथे जास्त सोपं असेल असं वाटतं. :-)

रघुनाथ.केरकर's picture

24 Aug 2016 - 11:20 am | रघुनाथ.केरकर

एक दोन दीवसच "आपुलाचि वाद आपणांसी" बरा वाटतो. पण नंतर मात्र अडचणी जाणवायला लागतात.

बाळ सप्रे's picture

24 Aug 2016 - 3:13 pm | बाळ सप्रे

तंबाखू सिगारेट व्यसनाच्या धाग्यावरील गांजाच्या अध्यात्मिक प्रतिसादाची आठवण झाली !!

एस's picture

17 Aug 2016 - 6:48 pm | एस

छान लिहिलंय.

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2016 - 7:47 pm | धर्मराजमुटके

कोणी सांगीतले की एक दिवस टिव्ही बघू नकोस, मोबाईल वापरु नकोस तर आपण ते मुळीच ऐकणार नाही. त्यामुळे सक्तीने का होईना उपवास केलात त्याबद्द्ल अभिनंदन ! असा एखादा दिवसाचा ई उपवास मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आवश्यकच आहे.

आता मुळ मुद्द्याबद्द्ल. आपल्या नातेवाईकांबद्द्ल सहानुभुती आहेच. आमच्या आजी आजोबांनी देखील आत्तापर्यंत बिना वीजेचे आयुष्य व्यतीत केले. त्यामुळे बिना वीजेचे आयुष्य थोड्या वेळेकरीता का होईना पण बर्‍याच वेळा अनुभवले आहे. ठाण्यात देखील घरी बरीच वर्षे इन्वर्टर नव्हता. दोन वर्षांपुर्वी लावला मात्र आवर्जुन टिव्ही, फ्रीज, इंटरनेट राऊटर, गीजर ई. साधनांना बॅकअप दिलेला नाही. या वस्तूंशिवाय जगायची सवय असलीच पाहिजे असे माझे मत. (इतरांच्या मताचा आदर आहेच.)

वाडीवर वीज जोडणी नाहीये, ६०-७० वर्षे वीज नाहिये म्हणजे त्यांना वीजेशिवाय जगायची सवय आहे हे नक्की. पारंपारीक वीजेऐवजी सोलार चा पर्यायाचा विचार करण्याची तयारी आहे काय ? वीजेवर मासिक किती खर्च करायची त्यांची मानसिक तयारी आहे ? या मुद्द्यावर विचार करावा.

सध्या मी सोलार एनर्जी विषयावर लक्ष केंद्रित करत आहे. सोलार एनर्जीचा सुरुवातीचा सेटअप अजुनही महाग आहे मात्र काही गोष्टींवर सरकार सवलत देत आहे. साधारण ५-१० हजाराच्या बजेटमधे खेड्यातल्या छोट्या घराच्या प्राथमिक गरजा भागवता येतील काय या दृष्टीने अभ्यास चालू आहे.
उदा. ५ ते ७ वॅट चे १ ते २ दिवे, १ पंखा, एक मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि एखादा रेडीयो ही खेड्यातल्या छोट्या घराची गरज असू शकेल असे वाटते.
हा सेटअप कमीत कमी ५ वर्षे विनातक्रार चालवता येईल काय या दृष्टीने विचार करत आहे. म्हणजे साधारण महिना १०० रु वीज बील भरणारी व्यक्ती ह्या सेवेचा लाभ घेऊ शकेल.

दैनंदिन मेंटेनन्स घरातल्याच किंवा लोकल माणसाला शिकवायचा असा एकंदरीत विचार आहे. अडचणींचा आणि त्यावरील उपायांचा विचार करत आहे.

हा विषय मी वेगळा धागा काढून लिहिणारच होतो. मात्र त्याअगोदरच हा धागा आला.
मिपाकरांनी आपले अभिप्राय कळविले तर अभ्यासास मदत होईल. कुणाकडे सोलार सिस्टीम वापराचा अनुभव असला तर उत्तमच.

साधारण दिपावलीच्या सुमारास राहत्या सोसायटीपासूनच प्रयोग सुरु करायचे ठरविले आहे. तुमच्या नातेवाईकांसारखी अशी एखादी जेन्युईन केस असेल तर केवळ प्रायोगिक तत्त्वावर ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करायची देखील तयारी आहे.

साधारण २०१७ च्या सुरुवातीला पुर्णपणे यात उतरायचे ठरविले आहे. बघूया कसे जमते ते !

अरे वा मुटके साहेब, हि चांगली आयडिया आहे. 10 हजारापर्यंत तुम्ही म्हणताय तेवढी उपकरणे चालत असतील तर लै भारी. खरे सांगायचे झाले तर मलाही तेवढेच वीज लागती. दिवसभर मी हापिसात. तरीसुद्धा मी 700 रु बिल भरतो घराचे.
तुम्ही याचे डिटेल्स जाहीर करा, जमेल तेवढी मदत करिन.

कपिलमुनी's picture

18 Aug 2016 - 12:32 am | कपिलमुनी

फार्म हाउस वर हा सेटअप नक्की उपयोगी पडेल.
धागा काढून अधिक माहिती द्या

मोदक's picture

18 Aug 2016 - 11:58 pm | मोदक

कुठे कुठे आहेत तुमची फार्महाऊसे..?

कपिलमुनी's picture

19 Aug 2016 - 1:43 am | कपिलमुनी

यादी मोठी आहे , तुमचा पत्ता सांगा

नाखु's picture

19 Aug 2016 - 8:27 am | नाखु

खेळायला न बोलावणार्यांचा निशेध.

बदाम सात नाखु

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Aug 2016 - 9:59 am | डॉ सुहास म्हात्रे

हल्ली मिपावर पत्ते मागण्याची फेसण जोरात आहे असे निरिक्षण नोंदवत आहे ! :) ;)

खटपट्या's picture

18 Aug 2016 - 2:34 am | खटपट्या

धर्मराज, चांगली संकल्पना. यावर बोलायला आवडेल. सवडीने फोन करतो.

रघुनाथ.केरकर's picture

18 Aug 2016 - 11:00 am | रघुनाथ.केरकर

सौर उर्जे बद्दल खुप ऐकुन आहे, सुरवातीचा खर्च सोडला तर पुढे फार काही खर्च नसतो.

पण मला काही प्रश्न पड्लेयत:
१.पावसाळयात काय?
आपल्याकडे ४ महिने पावसाळा असतो.

२. मोटार वायंडींग असलेल्या वस्तुंच्या वापरावर मर्यादा येउ शकते का?

३. टेलीविजन संच चालेल का?

आनंदी गोपाळ's picture

18 Aug 2016 - 11:05 am | आनंदी गोपाळ

बॅटरीच्या रिकरिंग एक्स्पेंडिचरचे कसे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2016 - 12:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम प्रकल्प !

सौर उर्जेसारख्या अपारंपारिक उर्जास्त्रोताबद्दलच्या व्यावहारिक पर्यायांसंबंधी इथेच एक वेगळा धागा काढून माहिती द्यावी असे सुचवतो. अश्या पर्यायांची जेवढ्या जास्त लोकांना माहिती होईल तितके चांगले.

साधा मुलगा's picture

18 Aug 2016 - 12:14 pm | साधा मुलगा

आपल्या प्रयोगासाठी शुभेच्छा आणि उत्सुकताही आहेच. मागे एकदा ठाण्यातील नागरिकाने सोलर आणि पवनचक्कीचा वापर करून विजेचे बिल कमी केले होते, abp माझा वर बातमी होती, त्याचा दुआ आता सापडत नाहीये.

पैसा's picture

18 Aug 2016 - 12:48 pm | पैसा

उत्तम प्रकल्प. आमच्या शेतघरात वीज कनेक्शन मिळणे फार अवघड दिसत आहे. त्यामुळे मी दोन वर्षापूर्वी सोलार उपकरणे, वापर याचा बर्‍यापैकी अभ्यास केला होता. आणि सुमारे २/३ महिने तिथे सोलर फॅन आणि छोटे दिवे वापरून काढलेही होते. धागा काढा. तिथे ते अनुभव लिहीन.

रघुनाथ.केरकर's picture

22 Aug 2016 - 6:39 pm | रघुनाथ.केरकर

वेगळ्या धाग्याची वाट बघतोय, तसे (सौर)विद्युत कुंपणावीषयी पण माहीती लिहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2016 - 8:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही अशी अवस्था पाहिली की काय म्हणावे हे कळत नाही :(

मिपालेखकांत सामिल झाल्याबद्दल अभिनंदन व स्वागत !

बहुगुणी's picture

17 Aug 2016 - 10:30 pm | बहुगुणी

लेख आवडलाच, पण त्या बरोबरच स्नेहांकिता ताईंची तत्काळ मदतीची तयारीही लक्षणीय आहे, आणि त्या अनुषंगाने आलेला धर्मराज मुटके यांचा सौरशक्तीच्या वापराने वीजनिर्मितीचा उल्लेखही वाचनीय. त्यांच्या प्रयत्नांत पुढे काय होतं हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

संदीप डांगे's picture

18 Aug 2016 - 12:37 am | संदीप डांगे

+१०००

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Aug 2016 - 12:59 am | माम्लेदारचा पन्खा

कोकनात लाईटीक येऊचा नाय की येऊन देऊचा नाय...

रघुनाथ.केरकर's picture

18 Aug 2016 - 11:04 am | रघुनाथ.केरकर

कोकाणात लायट इली पण आजुन ती सगळ्यापर्यंत पोचाक नाय, लाल फितीत अडाकली आसा असा वाटता.

प्रसाद_१९८२'s picture

18 Aug 2016 - 1:56 pm | प्रसाद_१९८२

पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित

स्नेहांकिता - Wed, 17/08/2016 - 20:35

पोस्टल अॅड्रेस पिनकोडसहित द्या.

प्रतिसाद द्या

स्नेहांकिता यांच्या वरच्या प्रतिसादाला, तुम्ही अजून उत्तर दिले नाहीत.

रघुनाथ.केरकर's picture

18 Aug 2016 - 2:02 pm | रघुनाथ.केरकर

त्याना व्यनी केलाय

जयन्त बा शिम्पि's picture

18 Aug 2016 - 3:50 am | जयन्त बा शिम्पि

पहिलाच प्रयत्न असला तरीही छान जमले आहे.
नवीन धागा कसा सुरु करावा याचे मार्गदर्शन कोणीतरी मला व्यनि पाठवून करील काय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2016 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही अगोदर 18/07/2015ला मुहुर्तामागचं शास्त्र ! हा धागा काढला आहात ना, तसाच नवीन धागा सुरू करायचा असतो :) ;)

आता विसर पडला असल्यास माहिती : मिपापानाच्या उजवीकडच्या रकान्यातल्या "आवागमन" शिर्षकाखाली असलेल्या "लेखन करा" या पर्यायावर टिचकी मारा, काम होईल.

रघुनाथ.केरकर's picture

18 Aug 2016 - 10:23 am | रघुनाथ.केरकर

हौसला अफ़जाइ बद्दल सगळयांचे खुप खुप आभार.

प्रमोद देर्देकर's picture

18 Aug 2016 - 10:39 am | प्रमोद देर्देकर

मला महिना २५० ते ३०० च्या वर बील जात नाही. कारण गरजा कमी. शिवाय माझ्याकडे गेल्या १० वर्षाचे वापरलेल्या युनिटच्या नोंदी आहेत. एक एक्सेल शीटच बनवली आहे ज्यात रोजच्या रोज मिटरमधल्या युनिटची नोंद करुन ठेवतो. ज्याने महिना किती युनिट वापरले जातात ते समजते.) त्यामुळे भविष्यात अतिरिक्त बिल आले तरी या नोंदीनुसार ते वाजवी करुन घेवु शकतो, धर्मराजजी तुम्ही सौर उर्जा वापरलीत की एक वेगळा धागा काढा म्हणजे सगळ्यांना त्याचा उपयोग होईल.

पिशी अबोली's picture

18 Aug 2016 - 11:22 am | पिशी अबोली

लेख आवडला, विशेष करून यासाठी, की अन्य कुणी कदाचित लाईट नसल्याने स्वतःचे कसे हाल झाले ते रंगवून सांगितले असते आणि उगाच अजून लाईट नाही म्हणून खोटा उमाळा काढून सरकारला शिव्या घातल्या असत्या. तुमची खरी कळकळ लेखातून पोहोचली. तसेच तुमची खरोखर त्यांना वीज मिळावी यासाठीची धडपड करायची तयारीही पोहोचली.
स्नेहाताईचा प्रतिसाद पाहूनपण खूप अभिमान वाटला.
धर्मराजमुटके यांच्या उपक्रमाबद्दल औत्सुक्य आहे. हे यशस्वी झाले तर अनेकांचे कल्याण होईल. त्याबद्दल शुभेच्छा.

बांद्याफुडल्या हेवा़ळेसारख्या अगदी कोपर्‍यातल्या गावात लायटी आसत आणि आरोसबागेत नाय म्हणजे अतिच झाला! गप कित्या रवलेसत लोक? आता स्नेहाताईन सांगला तसा करुन बघा. उपयोग होईत कायतरी.

रघुनाथ.केरकर's picture

18 Aug 2016 - 1:21 pm | रघुनाथ.केरकर

आरोसबागेत लायट आसा पण मांजरेकरांचा घर वाइच फुडे आसा, महावीतरणाक धा एक पोल घालुचे लागतले. पण तेंका काय सवड गावना नाय. ह्याच नाय तर , मांजरेकारांका पाणी हाडुक सुधा एक किलोमीटर येवचा लागता,पावसाचा पाणी उकळुन पितत,दारात न्हय(खाडी)आसा, डीसेंबर पर्यंत तेचा पाणी पीउक गावता, मगे खारा जाता, गिमात मात्र १ किलोमीटर वडी काडुचे लागतत, बाय मारुक परमीशन नाय कारण सात बार्‍यार हेंचा नाव कुळ म्हणान लागला. असा तलाटी सांगता. ह्या पावसात एका पडीयेचो पारो कोसातला, तर तलाटी सांगता कि सातबार्‍यार धनीयाची नावा आसत , तेवा नुकसान भरपाइ गावाची नाय.

इतक्या सगळा असान पण ते नाराज नाय आसत, समाधान जगतत, फक्त लायटीचो वीषय इलो कि मात्र भितुरल्या भितुर खदखदतत.

पैसा's picture

18 Aug 2016 - 1:24 pm | पैसा

:( आम्ही समजत होतो हे असे राजस्थान आणि बिहारमधे असते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 6:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

नेमके काय वाईट आहे त्याची खास काही टोटल लागली नाही, पर बिहार तो ससुरे नाम से ही बदनाम हो गईस! धनवाद हमारे लालू जी का!,

बाकी राजस्थानात असले नसते हो, रस्ते वीज पाणी सब चकाचक! (ह्याचा राजस्थान आमची सासुरवाडी असण्याशी संबंध नाही, जोडणाऱ्याला भर वाळवंटात मांजर सोडतात तसे पोत्यात घालून सोडण्यात येईल)

पैसा's picture

20 Aug 2016 - 7:23 pm | पैसा

त्या नॅशनल highway वरच्या गावात ३७० कुटुंबाना वीज नाही आणि ६ महिने पिण्याचे पाणी एक किमी अंतरावरून आणावे लागते. ती कुळे असल्याने घराजवळ विहीर पाडायला परवानगी मिळत नाही. :(

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Aug 2016 - 10:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

आयला कुळे म्हणजे तापच असतो! अन तो ऑल इंडिया समान असतो, कधी कुळ म्हणून, कधी हिश्शेदार बटाईदार म्हणून तामिळनाडू मध्ये पंगाली म्हणून तर बिहारात पटीदार म्हणून!असो ते कळले, शिवाय मला वाटते कोकणात छोट्या छोट्या वाड्या एकमेकांपासून लांब अंतरावर असणे हे ही एक कारण असावे, बहुतेक गडचिरोलीकडे सुद्धा असेच आदिवासी पाडे दूर असल्यामुळे बेसिक पायाभूत सुविधा तिकडे नेणे इतर जागांपेक्षा कठीण अन खर्चिक होते अन पर्यायाने कोणीच काम करतही नाही बेटे!

केरकरांच्या नातलगांकडेकडे लवकर वीज पोचावी अशी आशा करतो, अन स्नेहांकिताताईंचे कौतुक!

तलाठी खरो बोलतासा मां? नायतर उगा आप्लो काय्येक सांगून दितस, असा नको! कागदपत्रां बघितलेली आसत काय?
धनीयांवांगडा बोलणत कित्या नाय बाय घेवचे खातर?

रघुनाथ.केरकर's picture

18 Aug 2016 - 2:05 pm | रघुनाथ.केरकर

धनी कित्या मदत करतलो, धनीयांका आदीच कुळा नको आसत,

सहसा असा बगूक नाय. दोघांयका समोरासमोर बसवून बोलून मार्ग काढूक व्हयो. दोघांयचे काही बाजू असतले मां.

रघुनाथ.केरकर's picture

19 Aug 2016 - 12:34 pm | रघुनाथ.केरकर

धन्याक सगळाच कवळुचा आसा, सगळा मेळान २० एक एकर व्हयत.

यशोधरा's picture

19 Aug 2016 - 12:47 pm | यशोधरा

केरकर, धन्याक कवळूचा आसा म्हंजे? तेंच्याच मालकीचे मां ते २० एकर? तुमच्या पावण्यांक सोयी मिळूक व्हये ह्या मान्य पण धनी स्वतःच्याच मालकीचे असलेले २० एकर - असले तर - कित्या गिळात?

रघुनाथ.केरकर's picture

19 Aug 2016 - 12:58 pm | रघुनाथ.केरकर

सात बार्‍यार कुळ म्हणान नाव लागला आसा, पावण्यांकडे २ पीढीयेंपासुन हि जमीन आसा.

क्रुषकदीना नंतर दोन वर्षांनी हेन्चा नाव लागला कुळ म्हणान.

कुळ म्हणून नाव लागला म्हंजे काय? कूळच आसत मां ते? तुम्ही पूर्ण म्हायती नाय सांगणत हो..

रघुनाथ.केरकर's picture

19 Aug 2016 - 1:22 pm | रघुनाथ.केरकर

ते कुळच आसत, आता कुळाक काय सवलती असततं ता काय माका ठाव नाय. आनी माझ्या कडे इतकीच म्हायती आसा. फाल्या वाडीक जातलय आसय. गेलय काय परत सगळा इचारुन घेतय. पण कुळ असला तरी तेका लायट पाणी घर्कुल योजना गावक व्हयी. असा माका वाटता. कायदो काय म्हणता ता काय आपल्याक म्हायत नाय. ता सुधा तपासुन घेतय आसय सध्या.

पण आता हय वीषय इलोच आसा म्हणान बोलतय, कुळ कायद्या बद्दल माहीतीपर एखादो धागो कोणी तरी काढुक व्हयो, कोकणात कुळ कायद्याच्या कचाट्यात बरेच जमीनी , जमीनींचे मालक आणी ते जमीनी खाणारी कुळा अडाकली आसत.

होय, सगळी माहिती होयी, त्या आधारान तुमकाही प्रश्न सोडवूक मदत होयत.
रवळनाथाक चिंता बाकी.

रघुनाथ.केरकर's picture

19 Aug 2016 - 4:01 pm | रघुनाथ.केरकर

आणी सगळया मिपा वाल्यांचा पण.

'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी धन्यवाद. या मालिकेमुळे तुमचा संवाद समजला. :=))

रघुनाथ.केरकर's picture

19 Aug 2016 - 4:34 pm | रघुनाथ.केरकर

ज्यांच्या घरी कायम मालवणी बोलली जाते अशा लोकंना ह्या मालीकेतली भाषा बील्कुल आवडत नाही.

आमच्या आई च्या शब्दात सांगायचं तर रात्रीस् खेळ चाले मधले उच्चार म्हणजे १४ कॅरेट मालवणी.

उदा..
"माका माझ्या आयशीचे बांगड्यो हवेत" इती सुसला

बाळ सप्रे's picture

23 Aug 2016 - 4:47 pm | बाळ सप्रे

ह्या बाकी खरा हा केरकरानुं.. तेंचा मालवणी का कोकणी धडगुजरी वाटतां..
त्या गौरीच्या आज्येचा पन कोकणी तसाच.. भेसळ कित्या करतंत रवळनाथाक म्हायत..

रघुनाथ.केरकर's picture

23 Aug 2016 - 5:30 pm | रघुनाथ.केरकर

पण तेंचा सुधा बरोबर आसा, अस्सल मालवणी बोलली तर ती मालीका फक्त कोकणातल्यांकाच कळतली. बाकीच्यांचा काय?

मालवणी चो आजुन योक प्रकार कोकणातच बघुक गावता. एखादो मुंबयकार मुंबयसुन गावात गेलो काय गावातले तेच्या वांगडा मराठीतच बोलतले, जरी तो मालवणीत बोलत असलो तरी, आणी गावातल्याची मराठी म्हणजे भारीच.

हालीची एक गजाल सांगतय, माका वेंगुर्ल्याच्या बाजारात माजो योक जुनो दोस्तदार गावलो. माका सांगता यंदा आमच्या कडे गनपतीला ये हा, ह्या वर्षी गरुडावयला गणापती हाडणार हायेत. मेल्याची भाषा आयकान हसा की रडा ताच कळाक मारग नाय. तेका होय म्हटलय आनी पाय उलचलय.

हा माझा वैयक्तीक अनुभव आहे, काही अपवाद देखील असतात हा.

पैसा's picture

24 Aug 2016 - 1:00 pm | पैसा

=))

इतकं वाईट बोललो काय आम्ही? =))

खटपट्या's picture

19 Aug 2016 - 9:24 pm | खटपट्या

नाय गो यशो, माका तर माज्या घरातल्या गजालीच वाटल्या.

बाकी कुळकायद्यार कोनीतरी लीवूक व्होया.

एस's picture

19 Aug 2016 - 11:03 pm | एस

अरे हा जोक होता!...

यशोधरा's picture

20 Aug 2016 - 8:54 am | यशोधरा

हो की :) त्या मालिकेत इतकं वाईट मालवणी बोलतात, त्यावरुन मीही ज्योकचा एकदमच क्षीण प्रयत्न केला.. :)
कोणाही मालवणी भाषिकाला विचाराल तर त्या मालिकेच्या भाषाबेढबपणाला शिरा पडोच म्हणेल!

'रात्रीस खेळ चाले' स कोटीकोटी धन्यवाद. या मालिकेमुळे तुमचा संवाद समजला. :=))

अगदी मनातलं बोललात...मी तर प्रत्येक वाक्य माईच्या आवाजात ऐकून समजून घेत होतो..

साधा मुलगा's picture

18 Aug 2016 - 12:08 pm | साधा मुलगा

माझा HONGKONG मधील एक मित्र सांगतो कि मी दिवसातले १२-१४ तास लाप्तोप वर असतो त्यामुळे विकांताला डोळ्यावर ताण नको म्हणून मी कुठेतरी ट्रेकिंग अथवा निसर्गरम्य ठिकाणी जातो, घरचे, नातेवाईक यांचा फोन आला तरच उचलतो.
वीजेच म्हणाल तर आपल्या गावी लवकरात लवकर वीज यावी अशी प्रार्थना करतो, कोकणातील माझ्या आजोळीसुद्धा १५-२० वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती पण आता विजेमुळे परिस्थिती खूप नाही पण बर्यापैकी सुधारली आहे. लोडशेडिंगची कटकट आहेच पण घरी गेल्यावर charger लावायला मिळतो, गेल्या दोन वर्षांपासून तर जरा नदीकाठी गेल्यावर मोबाईलला उत्तम रेंज मिळते. मोबाईलवर रेंज नसली तरी चालते उगा कटकट होते कधी कधी पण वीज आणि पाणी या दोन गरजा असणे मात्र आवश्यक आहे.
सरकारने काही दिवसांपूर्वी एक डॅशबोर्ड प्रसिद्ध केला होता त्यात भारतातील दुर्गम भागामध्ये वीज पोहोचवण्याचे काम कसे चालू आहे याची माहिती मिळते, यात मला वाटत फक्त विकानसशील राज्यांचा समावेश आहे , त्यात प्रगत महाराष्ट्राचे नाव दिसत नाही. यात मागे मी संपूर्ण भारताचा नकाशा बघितला होता कि त्यात त्यांनी कुठे कुठे वीज आली आहे, पोहोचणार आहे आणि पोहोचायची आहे हे झूम करून कळायचं तो आता मला सापडत नाहीये.

ते लालफीत वगैरे कायबी नसते.गावातल्या लोकांत एकी पाहिजे.आमदार नेक पाहिजे त्याने हात वर केला तर अर्ध्यातासात एसटी गावात येते आणि कितीही चिंधी रोड असेल आणि कितीही पाऊस पडला तरी फेय्रा बंद होत नाहीत.( पनवेल -धोधाणी बस ,रस्ता).चार महिन्यांत शिमिटचा भक्कम रस्ता आणि नळपाणी येते.( गव्हे रस्ता, दापोली .)सोलर दिवेसुद्धा लावून देतात.(राजमाची , ढाक गाव).उत्तम खेळणी ठेवलेली अंगणवाडी/बालवाडी देतात ( कोंडेश्वर,बदलापूर).उत्तम पॅालिटेक्निक - म्हसळा,आंबेत.

रघुनाथ.केरकर's picture

18 Aug 2016 - 2:09 pm | रघुनाथ.केरकर

?????

किसन शिंदे's picture

18 Aug 2016 - 3:43 pm | किसन शिंदे

लेख आवडला.

हेमन्त वाघे's picture

18 Aug 2016 - 11:33 pm | हेमन्त वाघे

पेडल मारून वीज बनवली तर ?

vij

संदर्भ

http://nuruenergy.com/

http://www.alternative-energy-news.info/technology/human-powered/pedal-p...

अमितदादा's picture

18 Aug 2016 - 11:58 pm | अमितदादा

तुम्ही मनोज भार्गवा ह्या अमेरिकन-भारतीय उद्योगपती च्या Billions in change ह्या प्रोजेक्ट च्या ट्रेलर ची खालील लिंक पहा. तुम्ही सांगितलेला उपायावर ते मोठ्या स्केल वर काम करत आहेत. आणखी माहिती गुगल करू शकता
https://m.youtube.com/watch?v=mMfzR9Lu-os
http://billionsinchange.com/solutions/free-electric

अमितदादा's picture

19 Aug 2016 - 12:01 am | अमितदादा

लेखा बरोबर प्रतिसाद हि आवडले...

भिंगरी's picture

19 Aug 2016 - 4:35 pm | भिंगरी

पहिलाच लेख असूनही सुंदर लिहीलाय.अभिनंदन
स्नेहांकिताताईला धन्यवाद तात्काळ प्रतिसादाबद्दल.
मिपाचा अभिमान वाटतो तो या साठीच.
कितीही दंगा करू दे पण एकमेकांच्या मदतीला तत्पर.

असंका's picture

20 Aug 2016 - 5:51 pm | असंका

सुरेख लेख...!!
धन्यवाद!!

स्नेहांकिता तैंचा लगेच आलेला प्रतिसाद बघून थक्क व्हायला झालंय. यातून आता काहीतरी चांगलं निघू दे ही सदिच्छा!!

शि बि आय's picture

23 Aug 2016 - 5:55 pm | शि बि आय

रघुनाथ दादा

लेखन बोर्डवर स्वागत आहे. बाकी इ उपवास कसा वाटला तेही सांगा.
तुमचा आणि यशोधरांचा संवाद वाचून त्या गावातलेच दोघं बोलत असावी असे वाटले.

रघुनाथ.केरकर's picture

31 Aug 2016 - 1:53 pm | रघुनाथ.केरकर

१७ ऑगस्ट्ला हा धागा प्रकाशीत झाला, बर्‍याच लोकांनी लेखन प्रयत्नांचं कौतुक करत परीस्थीती बद्दल हळ्हळ व्यक्त केली, काहीनी पर्याय देखील सुचवले.

धागा प्रकाशीत झाल्यापसुन आजमीतीस महिना देखील उलटला नसेल. पण स्नेहांकीता या आमच्या मीपा भगीनीने स्वताच्या प्रयत्नाने मांजरेकर प्रकरणात लक्ष घालुन, घटना स्थळापसुन २०० किलोमिटरहुन लांब असुन सुधा या प्रकरणात लक्षणीय प्रगती घडउन आणली. गेल्या चार वर्षात जी प्रगती झाली नव्हती ती अवघ्या १५ -१६ दिवसात झाली.
आता लवकरच मांजरेकर याना वीज कनेक्शन मीळेल असं वाटतय.

स्नेहांकीताजींचे खुप खुप आभार. अभीमान वाटतोय की स्नेहांकीताजीं सारखे सदस्य मीपावर आहेत.

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 1:57 pm | संदीप डांगे

अरेवा! अभिनंदन आणि स्नेहांकिताताईंचे अनेक आभार, आम्हाला तुमचा अभिमान आहे ताई! _/\_ हॅट्स ऑफ!

प्रचेतस's picture

31 Aug 2016 - 1:58 pm | प्रचेतस

+१

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 2:02 pm | अभ्या..

अरेवा. भारीच की.
इधर बटन दबाया, उधर उजेड पड्या.

मोदक's picture

1 Sep 2016 - 6:45 pm | मोदक

फ्लेक्श करा की राव... ;)

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 5:01 pm | संदीप डांगे

फ्लेक्स करेंगे लेकिन लाईट आणे के बाद! दिवे लागलेल्या घराचा फोटो आवश्यक आहे त्याला. दणदणीत फ्लेक्स मारु!

आणि आता गाववाल्यांना सांगा. नुसत्या गजाल्या करन्यापेक्षा आता लाइट इलंय. मिपा मिपा खेळा. फायदा होईल. ;)

यशोधरा's picture

31 Aug 2016 - 2:10 pm | यशोधरा

अरे वा! मस्त काम झालं. स्नेहांकिता, खूप कौतुक आणि अभिनंदन!

नाखु's picture

31 Aug 2016 - 2:15 pm | नाखु

असेच म्हणतो

मिपाकर आणि मिपाचा विजय असो

पैसा's picture

31 Aug 2016 - 3:11 pm | पैसा

स्नेहांकिताला खूप धन्यवाद आणि अभिनंदन!

रघुनाथ.केरकर's picture

20 Aug 2018 - 2:23 pm | रघुनाथ.केरकर

जवळ जवळ एक वर्षांपूर्वी म्हणजे १६ ऑगस्ट ला मांजरेकरांच्या घरी वीज आली. मी माझ्या वैयक्तिक कामामध्ये असल्याने मला मिपावर हा अपडेट देता आला नाही.
या सर्व प्रकरणात आपल्या मिपा भगिनी स्नेहांकिता यांनी खूप मदत केली. मांजरेकरांच्या घरापासून २०० किलोमीटर लांब असून सुद्धा त्यांनी हे सगळं शक्य करून दिला.
स्नेहांकिताजी नी जी काही मदत केली त्यासाठी मी स्वता आणि मांजरेकर कुटुंबीय कायम ऋणी राहू. खरंतर ह्या सगळ्या प्रयत्नांचा लेखाजोखा कागदावर उतरून इथे लिहायचा होता. पण वेळे अभावी ते जमलं नाही त्या बद्दल क्षमस्व.

तसेच ह्या धाग्यावर ज्या लोकांनी आपली मते मांडली त्यांचे पण खूप खूप धन्यवाद.

तुमचे सर्वांचे देव बरे करो.

रघुनाथ केरकर

सस्नेह's picture

31 Aug 2016 - 3:57 pm | सस्नेह

श्री मांजरेकर यांना वीज कनेक्शन मिळेपर्यंत त्यांच्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास मी बांधील आहे, इतकेच सांगते.
__/\__

स्रुजा's picture

31 Aug 2016 - 7:44 pm | स्रुजा

क्या बात !!! तुझ्या वेळोवेळच्या प्रतिसादा वरुन वीज मंडळ योजना करत असतं, त्यांच्या मनात पण सामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे इच्छा असते हे कळतंय. प्रश्न आहे तो जनजागृतीचा. ती ही होईल. हे लवकर बदलेल, असा विश्वास दिल्याबद्दल धन्यवाद. हे खरं सरकारी अधिकार्‍याचं काम ! काऊंटरच्या पलिकडच्या माणसाने नेहमीच जबाबदारीने आणि बांधिलकीने संवाद साधायचा असतो, तो तू करते आहेस त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक !

पाठपुरावा केल्याबद्दल अभिनंदन!!!

सकारात्मक कार्याबद्दल अभिनंदन.

अनन्त अवधुत's picture

1 Sep 2016 - 2:18 am | अनन्त अवधुत

पाठपुरावा केल्याबद्दल अभिनंदन!!! __/\__

पिलीयन रायडर's picture

31 Aug 2016 - 8:05 pm | पिलीयन रायडर

स्नेहाताई ग्रेट आहेस तू!!

जिथल्या चर्चांमधून सभासद देश सुधारणारे भरीव, ठोस कार्य करतात त्या संस्थळावर मी मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो! थेंबे थेंबे तळे साचे. Let us all keep up the good work! जियो मिपा!

रघुनाथ.केरकर's picture

1 Sep 2016 - 11:38 am | रघुनाथ.केरकर

१००० टक्के सहमत.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Aug 2016 - 9:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्नेहाताई तुम्हाला हार्ट फेल्ट सॅल्यूट! खफ वर स्रुजाताईंनी कॉमेंट वाचली तसा धागा उघडला अन ही बातमी मिळाली! मन प्रसन्न झाले, तसेही मी सरकारी लोकांना (वादविवादात) डिफेंड करणारा म्हणून (कु)प्रसिद्ध आहेच म्हणा ;), पण माझा तो आटापिटा बरोबर ठरवल्याबद्दल आपले विशेष वैयक्तिक आभार

आमच्या फोर्स मध्ये किंवा आर्मी मध्ये डिफेन्स मध्ये, तुम्हाला मिळणारे "क्लायंट" किंवा तुमचा "वर्कफोर्स" हा एक किमान लेव्हलचा असतो MPSC/UPSC करणाऱ्या लोकांचे तसे नसतात! डायव्हर्स चॅलेंजेस असतात, पूर्ण बुद्धीचा कस लावून परीक्षा पास व्हायची अन ती झाल्यावर ज्याला सेवा द्यायची आहे त्या ग्राहकवर्गातले विपुल डिफरन्सस सुद्धा मॅनेज करायचे हे खायचे काम नव्हे, माझे काही मित्र MPSC मधून तहसीलदार झाले आहेत त्यांचे काम बघितले का हात जोडले जातात आपोआप, गडी अगदी संयमितपणे एखाद्या ग्रामीण माणसाला नरेगा योजना समजावत असतो, कधी डोक्यात बर्फ ठेऊन एका पूर्ण गावाला हागणदारीमुक्तीचे फायदे सांगत असतो, तर कधी तितकाच शांतपणे एखाद्या डोक्याला शॉट आमदाराला सुद्धा कटवत असतो. प्रचंड जास्त डिमांडिंग काम आहे प्रशासनात करायचे ठरवल्यास एखाद्याने.

असो, स्नेहाताईंचे कौतुक करता करता विषय थोडा लांबला खरा, पण त्या निमित्ताने एक सकारात्मक सुखद चित्राचा आनंद घेता आला,

केरकारानु तुमचे सुद्धा कौतुक, संयतपणे प्रॉब्लेम मांडल्याबद्दल, मांजरेकरांचा आनंद खूप मोठी कमाई असेल तुमची :) . धन्यवाद

स्रुजा's picture

31 Aug 2016 - 11:42 pm | स्रुजा

येस, केरकरांचे खास कौतुक. आम्हाला मांजरेकरांची प्रतिक्रिया नक्की कळवा.

झेन's picture

1 Sep 2016 - 7:32 am | झेन

असेच म्हणतो

माझी नाही, स्नेहांकीताजींची, ह्या व्यासपीठाची.

मी फक्त नीमीत्त असेन.

+१२३
मस्त स्नेहांकीताताई.

रेवती's picture

31 Aug 2016 - 9:31 pm | रेवती

लेखन आवडले व स्नेहातैचा अभिमान वाटला.

नावातकायआहे's picture

1 Sep 2016 - 6:16 am | नावातकायआहे

खरच!

रातराणी's picture

31 Aug 2016 - 11:35 pm | रातराणी

मस्त!! स्नेहातै _/\_

रुपी's picture

1 Sep 2016 - 12:09 am | रुपी

छान लेखन.
स्नेहांकिता ताईंचे खरेच कौतुक आहे! :)

मैत्र's picture

2 Sep 2016 - 4:57 pm | मैत्र

रघुनाथराव अतिशय उत्तम लिखाण आणि स्नेहांकिता ताईंचे आभार मानावे तेवढे थोडे.

यानिमित्ताने थोडी माहिती देतो आहे.

हरीष हांडे - आय आय टी खरगपूर, University of Massachusetts Lowell ची डॉक्टरेट - एनर्जी इंजिनिअरिंग मध्ये.
गेली अनेक वर्षं social entrepreneur म्हणून कार्यरत आहेत.
२०११ चा मॅगसेसे पुरस्कार.
असो तर इतका उच्च विद्याविभूषित मनुष्य काम करतो आहे कमी खर्चात आणि सोयीची सौर उर्जा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी. आणि हौस म्हणून नव्हे तर पूर्ण वेळ काम म्हणून - गेली वीस वर्षे !
https://www.youtube.com/watch?v=6xSx_ujm240

सेल्को ही त्यांची कंपनी यासाठी काम करते. बंगलोर मध्ये ही कंपनी आहे आणि मुख्य काम कर्नाटकात असले तरी त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात मध्येही काम केले आहे.
यापूर्वी काही कारणाने संपर्क केला तर उत्तर देतात असा अनुभव आहे.
http://www.selco-india.com/technology.html
http://www.selco-india.com/enquiries.html

इतरांना काही अधिक माहिती असेल तर इथे दिल्यास सर्वांनाचा उपयोग होईल.

त्यांच्याकडून घेत असलेल्या सिस्टीम्वर बँकेकडून अर्थ सहाय्याची व्यवस्था आहे काय?

तसेच ग्रामीण भागातील शाळेला बस्वायची असल्यास त्यांना काय माहीती द्यावी लागेल?येथील त्यांचा प्रतिनिधी भेटू शकेल काय?

सध्या फक्त सोलर हिटर व सोलर कुकर वापरणारा नाखु

अभिजीत अवलिया's picture

3 Sep 2016 - 6:28 pm | अभिजीत अवलिया

चांगले झाले.
स्नेहांकिता ताईंचे आभार.

संजय क्षीरसागर's picture

27 May 2017 - 12:07 am | संजय क्षीरसागर

तुमचा रेल्वे प्रवास धाग्यावरचा खुमासदार प्रतिसाद वाचून हा धागा उघडला. मस्त स्टाईल आहे लिहीण्याची. असेच लिहीत राहा. आली का वीज मांजरेकरांकडे ?

रघुनाथ.केरकर's picture

1 Jun 2017 - 10:29 am | रघुनाथ.केरकर

विज आजुन आली नाही, पण स्नेहांकीता ताइंच्या प्रयत्नाने बरीच प्रगती आहे. थोड्याच दीवसात उपास सुटेल मांजरेकरांचा.

एस's picture

1 Jun 2017 - 11:49 am | एस

स्नेहाताई, जियो! मांजरेकरांच्या घरी लवकर वीजपुरवठा येवो ही सदिच्छा.

रघुनाथ.केरकर's picture

12 Jan 2023 - 8:54 am | रघुनाथ.केरकर

आज ७ वर्ष होऊन गेलीत. मांजरेकरांकडे वीज पुरवठा चालू झालाय.
याचं सर्व श्रेय महावितरण चे वरिष्ठ अधिकारी आणि मीपा च्या स्नेहांकिता ताई यांनाच जातं.

सायंकाळच्या प्रत्येक दिवेलागणीच्या वेळी स्नेहांकिता ताईंची आठवण काढत असतील मांजरेकर.

देव तुम्हा सर्वांचे बरे करो

सस्नेह's picture

12 Jan 2023 - 4:05 pm | सस्नेह

__/\__
:)
स्नेहा

सर टोबी's picture

12 Jan 2023 - 4:43 pm | सर टोबी

सगळ्या ऊदात्त भावनांनी चिंब करणारा, आणि माणुसकीवरील विश्वास दृढ करणारा हा अनुभव आहे. स्नेहांकिता ताईंना सलाम.

स्नेहांकिता ताईंना सलाम आणि रघुनाथ.केरकर यांनाही. रघुनाथ.केरकर यांनी मिपावर आपला अनुभव, व्यथा मांडली आणि त्याचे निराकरण झाले. छान!

स्मिताके's picture

25 Jan 2023 - 8:06 pm | स्मिताके

स्नेहांकिता आणि केरकर खूप चांगलं काम केलंत.

श्वेता व्यास's picture

27 Jan 2023 - 4:44 pm | श्वेता व्यास

हॅट्स ऑफ स्नेहाताई! खूप छान वाटलं वाचून :)