मढे घाट

Shivaandhale's picture
Shivaandhale in भटकंती
12 Aug 2016 - 6:12 pm

मढे घाट
“ शिखर फाऊंडेशन ” ने या वर्षातला पहिल्याच पावसाळी ट्रेक चे आयोजन केले होते . या मध्ये ४७ सदस्यांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला . या ट्रेक चे वैशिष्ट्य म्हणजे , शिखर ने हा ट्रेक मोटारसायकल एक्सपेडिशन म्हणून घोषीत केला होता , पण सदस्यांच्या कुटुंबा चा अतिउत्साह आणि ट्रेक करण्याचे धाडस पाहून त्यांना दिलेल्या परवानगी मुळे मोटारसायकल एक्सपेडिशन चे मोटार एक्सपेडिशन मध्ये कधी रूपांतर झाले ते काळलेच नाही .
चार टाटा नॅनो , एक टाटा झेस्ट , एक टाटा मांझा , आणि एक i 20 आणि दहा बुलेट च्या मदतीने सत्तेचाळीस उत्साही ट्रेकर्स नी सकाळी सात वाजता चिंचवड येथून प्रस्थान ठेवले . राजकीय पक्षाच्या रॅली ला लाजवेल आशा थाटात सर्व जथ्था पुणे - बेंगलोर हायवे वरून पुढे सिंहगड रोड ने जाऊन खडकवासला धरणाच्या चौपाटीवर थांबला . प्रवीण दादा , राजेश चिंचवडे सह पुण्यातून येणारी मंडळी रॅलीत सहभागी झाली .
धुक्यात हरवलेल्या सिंहगडाचे मुख दर्शन घेऊन, गाड्यांची रांग पाबे घाटाच्या चढणीला लागली . गर्द झाडीतून नागमोडी वळणे घेत आणि सतत कोसळणाऱ्या आषाढ सरी अंगावर झेलत आणि रस्त्यावरून वाहणारे पाणी उडवत रॅली पाबे घाटाच्या पायथ्याला थांबली . आषाढ सरी अंगावर झेलत आणि गवताच्या गालिच्यावर साठलेले पाण्याचे टपोरे थेंब पायाने उडवत पावसाचा आनंद लुटला . सिंहगडा च्या तान्हाजी कड्यावरून कोसळणाऱ्या अवखळ धबधब्याचे आणि हिरवा शालू नेसून नटलेल्या डोंगर रंगाचे आणि रंगी बेरंगी पोशाखत अंग लपेटून घेतलेल्या ट्रेकर्स चे छायाचित्रण गुलाबराव जारांडे च्या कॅमेऱ्या मध्ये कैद करत सर्व जण पाबे घाटाच्या दिशेने रवाना झाले . पाबे घाटाच्या खिंडीत पुन्हा एकदा थांबा घेत नव्या पिढीच्या सेल्फी वर फिदा होत पाबे घाटातून दिसणाऱ्या गुंजवणी खोऱ्यातील तुडुंब भरलेल्या भात खाचराच्या आणि हिरवळीने नटलेल्या डोंगर रांगांच्या पार्शवभूमीवर सेल्फी चा मनमुराद आनंद लुटला . पुढे उताराची वळणे घेत तोरणा गडा च्या पायथ्याशी असलेल्या वेल्हा मधील हॉटेल स्वप्नील मध्ये ,काल रात्री पासून अन्नाचा एक कण ही न गेलेल्या पोटाला ठसकेबाज मिसळ ने आधार देण्याचे काम केले . गरमा गरम भजी , सँपल मारके मिसळ , वाफळलेला चाहा आणि वेटर च्या राजकीय संवाद फेकीने तृप्त झालेल्या अवघ्या जनांनी आमचे शिखर चे सहकारी संतोष झेंडे यांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत मढे घाटाच्या दिशेने कूच केली . चापेट धरणा च्या उजव्या बाजूने नागमोडी वळणे घेत , रस्त्यात भेटलेल्या धबधब्या मध्ये भिजत तरी कधी पावसाच्या सरी अंगावर झेलत , तर मध्येच सैराट मधील आर्ची आणि पारशा च्या डायलॉग ची पेरणी करत सर्व उत्साही ट्रेकर्स धुक्यात लपलेल्या मढे घाटाच्या पठारावर पोहचले .
धुक्यात हरवलेला लक्ष्मी धबधबा आणि कोकणचा जलमय भूप्रदेश दिसतच नव्हता . वाऱ्यामुळे धबधब्यातून उडणारे तुषार अंगावर झेलत दुधाची ताहान ताकावर भागवली , पण शिवाजी ने खिंडीतून खाली उतरणाऱ्या रस्त्याची चाचपणी केली आणि सर्वांना खाली घेऊन जाण्याची तयारी केली . ४ फेब्रुवारी १६७० च्या कोंढण्याच्या लढाई मध्ये नरवीर तान्हाजी मालुसरे धारातिर्थि पडले तेव्हा त्यांचे पार्थीव याच वाटेने त्यांच्या मूळ गावी म्हणजे पोलादपूर जवळील उमरठे या गावी नेण्यात आले होते म्हणून या वाटेला मढे घाट नाव पडले आहे . प्रवीण सरांनी खाली उतरण्या संबधी सूचना दिल्या , तर शिवाजी आंधळे यांनी पुन्हा एकदा शिव काळा मध्ये घेऊन जात शिवकालीन इतिहासाला उजाळा दिला . पाण्याच्या नाळेने धडपडत सर्व जण सुरक्षित खाली गेले तेव्हा निसर्गाला ही लाजल्या सारखे वाटले आणि संपूर्ण सह्याद्री वरचे धुक्याचे मळभ हटले . २५० ते ३०० फुटावरून कोसळणाऱ्या लक्ष्मी धबधब्या खाली चिंब होऊन भिजण्याचा आनंद लुटत सर्वांनी धमाल केली . आनंद लुटताना भान ही राखले पाहिजे या हेतूने प्रविण दादा नी सर्वांना वर येण्याची सूचना केली . वर येऊन पठारावरून दिसणाऱ्या कोकणचे आणि सह्याद्रीचे शृंगारीक रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत परतीचा मार्ग धरला . पुढे गावा मधील एका घराच्या पावसाळी वातावरणामध्ये धुंद झालेल्या पडवीत घरीहून घेतलेल्या जेवणावरती येथेच्छ ताव मारला . आणि फणसाचे गरे तोंडात चघळत तुफानी पावसातच पुण्याचा रस्ता धरला .
शिवाजी आंधळे
९८५०५५५९५२

प्रतिक्रिया

मोहनराव's picture

12 Aug 2016 - 6:22 pm | मोहनराव

फोटो?

प्रचेतस's picture

12 Aug 2016 - 6:58 pm | प्रचेतस

इतक्या गाड्या पाहून मढे घाटाच्या पर्यावरणाची किती वाट लागली असेल ह्या विचाराने अंगावर काटा आला.

स्वच्छंदी_मनोज's picture

17 Aug 2016 - 7:36 pm | स्वच्छंदी_मनोज

हेच म्हणतो..

प्रसाद_१९८२'s picture

17 Aug 2016 - 7:49 pm | प्रसाद_१९८२

सहमत !
इतक्या मोठ्या संख्येने गाड्या नेऊन पर्यावरणाचे नुकसान करणारे असे ग्रुप आज गल्लोगल्ली उगवले आहेत, याचा खेद वाटतो.

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 Aug 2016 - 8:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

स्वच्छंदी_मनोज's picture

17 Aug 2016 - 7:39 pm | स्वच्छंदी_मनोज

मढे घाट उतरून कर्णवाडी किंवा रानवडी पर्यंत गेलात काय? की फक्त धबधबा पायथ्यापर्यंत गेलात?
मढेघाट हा अगदी पायथ्यापर्यंत उतरणारा घाट आहे हो...

कपिलमुनी's picture

17 Aug 2016 - 8:01 pm | कपिलमुनी

अहो ते ४७ जण गाड्या घेउन कसलातरी एक्सपेडीशन करायला गेले होते !
आणि कर्णवाडी पर्यंत गाडी जात नै !
=))

बिस्किटांचे रॅपर्स, चिप्स ची रिकामी पाकिटं, चहाचे प्लास्टिकचे कप ह्यांचं काय केलं ते ही लिहीलं असतंत तर बरं झालं असतं.

असल्या भुरट्या पोलिटिकल रॅली छाप आयडिया डोक्यात येतातच कशा राव. भंकस तिच्यायला. वर शिवबाचे गुणगान, साहस, धाडस, निसर्गप्रेम, इतिहासाला उजाळा टाईप फेसबुकी तडके मारले कि लाईकाचा जोगवा मागायला तयार.

विखि's picture

17 Aug 2016 - 10:41 pm | विखि

पटल....

हेच म्हणायला आलो होतो. असल्या फेसबुकी ट्रेकरांना (?) आवरा कुणीतरी.

हेच म्हणायला आलो होतो. असल्या फेसबुकी ट्रेकरांना (?) आवरा कुणीतरी.

Nitin Palkar's picture

17 Aug 2016 - 8:46 pm | Nitin Palkar

प्रतिसाद खूप छान आहेत. बहुतेक पुण्यातले वाटतात. सात चार चाकी आणि दहा बुलेट्स घेउन कुठेही जाउन येणे हे नक्की क्रेडिटेबल आहे.

दहा बुलेट्स घेउन कुठेही जाउन येणे हे नक्की क्रेडिटेबल आहे.

होय हो, हल्ली शष्पाएवढी पोरं परसाकडला देखील बुलेट घेऊन जातात. हे तर गडावर जाऊन आलेत म्हटल्यावर कवतिक व्हायलाच हवं.

अभ्या..'s picture

19 Aug 2016 - 3:42 pm | अभ्या..

आसूड

शैलेन्द्र's picture

17 Aug 2016 - 9:07 pm | शैलेन्द्र

....................

थॉर माणूस's picture

18 Aug 2016 - 12:02 am | थॉर माणूस

ट्रेकर्स? या शब्दाची व्याख्या बदललेली दिसतेय आजकाल.

संदीप डांगे's picture

18 Aug 2016 - 12:45 am | संदीप डांगे

लांबलचक वाक्यरचना आवडली, बहुतेक लांबलचकपणाची आवड दिसते!

गणेश उमाजी पाजवे's picture

19 Aug 2016 - 3:19 pm | गणेश उमाजी पाजवे

पाण्याच्या नाळेने धडपडत सर्व जण सुरक्षित खाली गेले तेव्हा निसर्गाला ही लाजल्या सारखे वाटले आणि संपूर्ण सह्याद्री वरचे धुक्याचे मळभ हटले .

राजकीय पक्षाच्या रॅली ला लाजवेल आशा थाटात सर्व जथ्था पुणे - बेंगलोर हायवे वरून पुढे सिंहगड रोड ने जाऊन खडकवासला धरणाच्या चौपाटीवर थांबला .

चापेट धरणा च्या उजव्या बाजूने नागमोडी वळणे घेत , रस्त्यात भेटलेल्या धबधब्या मध्ये भिजत तरी कधी पावसाच्या सरी अंगावर झेलत , तर मध्येच सैराट मधील आर्ची आणि पारशा च्या डायलॉग ची पेरणी करत सर्व उत्साही ट्रेकर्स धुक्यात लपलेल्या मढे घाटाच्या पठारावर पोहचले .

आनंद लुटताना भान ही राखले पाहिजे या हेतूने प्रविण दादा नी सर्वांना वर येण्याची सूचना केली . वर येऊन पठारावरून दिसणाऱ्या कोकणचे आणि सह्याद्रीचे शृंगारीक रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत परतीचा मार्ग धरला .

वरील वाक्ये वाचून डोके कुठेतरी आपटावेसे वाटत आहे. हसावे कि रडावे हे पण समजत नाहीये.

अतिशय उत्तम आणि ओघवतं वर्णन.
कुठल्याच प्रकारचा भंपकपणा, दिखाऊगिरी अजिबात जाणवली नाही.
अतिशय साधं आणि मनाला भिडणार लिखाण.

आणि वाक्यांची पेरणी तर खूपच लाजवाब, ..वाह मन गाये उस्ताद!

निसर्ग वर्णन तर इतक्या खुबीने केलं आहे कि, वि. स. खांडेकरांच्या ययाती पुस्तकाची आठवण झाली.

धुक्यात हरवलेल्या सिंहगडाचे मुख दर्शन घेऊन, गाड्यांची रांग पाबे घाटाच्या चढणीला लागली .

गर्द झाडीतून नागमोडी वळणे घेत आणि सतत कोसळणाऱ्या आषाढ सरी अंगावर झेलत आणि रस्त्यावरून वाहणारे पाणी उडवत रॅली पाबे घाटाच्या पायथ्याला थांबली

आषाढ सरी अंगावर झेलत आणि गवताच्या गालिच्यावर साठलेले पाण्याचे टपोरे थेंब पायाने उडवत पावसाचा आनंद लुटला .

सिंहगडा च्या तान्हाजी कड्यावरून कोसळणाऱ्या अवखळ धबधब्याचे आणि हिरवा शालू नेसून नटलेल्या डोंगर रंगाचे आणि रंगी बेरंगी पोशाखत अंग लपेटून घेतलेल्या ट्रेकर्स चे छायाचित्रण गुलाबराव जारांडे च्या कॅमेऱ्या मध्ये कैद करत सर्व जण पाबे घाटाच्या दिशेने रवाना झाले .

पाबे घाटाच्या खिंडीत पुन्हा एकदा थांबा घेत नव्या पिढीच्या सेल्फी वर फिदा होत पाबे घाटातून दिसणाऱ्या गुंजवणी खोऱ्यातील तुडुंब भरलेल्या भात खाचराच्या आणि हिरवळीने नटलेल्या डोंगर रांगांच्या पार्शवभूमीवर सेल्फी चा मनमुराद आनंद लुटला .

रस्त्यात भेटलेल्या धबधब्या मध्ये भिजत तरी कधी पावसाच्या सरी अंगावर झेलत , तर मध्येच सैराट मधील आर्ची आणि पारशा च्या डायलॉग ची पेरणी करत सर्व उत्साही ट्रेकर्स धुक्यात लपलेल्या मढे घाटाच्या पठारावर पोहचले .

वाऱ्यामुळे धबधब्यातून उडणारे तुषार अंगावर झेलत दुधाची ताहान ताकावर भागवली

पाण्याच्या नाळेने धडपडत सर्व जण सुरक्षित खाली गेले तेव्हा निसर्गाला ही लाजल्या सारखे वाटले आणि संपूर्ण सह्याद्री वरचे धुक्याचे मळभ हटले

वर येऊन पठारावरून दिसणाऱ्या कोकणचे आणि सह्याद्रीचे शृंगारीक रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवत परतीचा मार्ग धरला .

महासंग्राम's picture

20 Aug 2016 - 12:13 pm | महासंग्राम

लोलवा, भटकंती वर्णन कमी आणि झैरात जास्त वाटली. आणि झैरात म्हंटल कि गोडगोड शब्दांची पेरणी आलीच,हाकानाका .