मोहमद्द अली रोड वरची खादाडी

वेदांत's picture
वेदांत in भटकंती
29 Jul 2016 - 3:19 pm

मोहमद्द अली रोड वरची खादाडी

दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रमजान दरम्यान मोहमद्द अली रोड येथे गेलो होतो. मांसाहारी लोकांसाठी मोहमद्द अली रोड म्हणजे 'जन्नत' आहे. येथील अनेक दुकाने जगप्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायच तर सुलेमान-उसमान मिठाईवाला , तव्क्क्ल स्वीट्स, जेजे जिलेबीवाला , हॉटेल नूर मोहमदी ई.
नेहमीप्रमाणे संध्याकाळी मस्जीद बंदर स्टेशनला उतरून मित्रांची वाट पाहत बसलो,येणारे सगळे या खाद्यजत्रेतले नवखे होते. ७.३०वाजता सर्वजण जमले आणि मग आम्ही निघालो 'जन्नत' कडे.. मस्जीद बंदर रेल्वे स्टेशन वरुन कल्याण दिशेने बाहेर पडलो. समोरच एक हॉटेल आहे (सध्या नाव आठवत नाही), तिथे अप्रतिम कश्मीरी पुलाव मिळतो , तो ही एकदम स्वस्त आणि चवीला मस्त. (अंदाजे ७० रुपये ). पण आलेल्या सर्वाना आज व्हेज नकोच होते,फक्त नॉनव्हेज वर ताव मारायचा होत. तसच पुढे चालत राहिलो आणि मग उजवीकडे वळून मोहमद्द अली रोड कड़े चालू लागलो. पहिल्यांदा सुलेमान-उसमान मिठाईवाल्या कडे जायचे ठरले. एका मोठ्या कढईत मलपुआ तळ्त होते. येथे मालपुआ दोन प्रकारचे असतात,व्हेज आणि नॉनव्हेज (१किवा२ अंडी टाकून). एक-एक मालपुआ (रबडी सहीत)३-४ जणाना पुरून उरतो. भूक तर खूप लागली होती,पण स्वीट डिश नंतर खाउया असे त्याना मी सुचवले आणि मग तसेच पुढे निघालो मिनारा मस्जीद गल्ली मधे................
व्हेज मालपुआ
Malpua

नॉनव्हेज मालपुआ
Nonvej Malpua

मिनारा मस्जीदची गल्ली खूप प्रसिद्ध आहे. येथे कबाब पासून बकर्‍याच्या ईतर अवयवांपासून बनवलेले अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. पहिला ताव आम्ही तेथील चीकन कबाब वर मारला,आणि त्यानंतर मलई कबाब वर. दोन्ही पदार्थ खूपच छान आणि चविष्ट होते. उजव्या बाजूला जेजे जिलेबीवाला होता आणि पुढे शोरमा हा प्रकार .. आम्ही चिकन शोरमा घेतला. शोरमा खाताना समोर लक्ष गेल आणि पाटी पहिली तर चक्क बडे मिया ... येथे सूप छान मिळते अशी माहिती मिळाली. शोरमा खाउन मागे फिरलो आणी निघालो नूर मोहमद्दी हॉटेल कडे..

शोरमा
Shorma

मलई कबाब

malai kabab

नूर मोहमददी हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. यावेळेस त्याने दुकान बरेच वाढवले होते, फुटपाथ पण दुकानाचा भाग बनवला होता. येथील फेमस डिश म्हणजे 'चिकन संजूबाबा' आणि 'चिकन हाकिमी' . आम्ही चिकन संजूबाबा मागवले आणि सोबत रोटी. पहिला घास खातानाच कळले की ही डिश का फेमस आहे.

नूर मोहमददी हॉटेल

nur mohd

चिकन संजूबाबा

Chikan sanjubaba

तिथून पुढे निघालो माझ्या आवडत्या दुकानात, तवकक्ल स्वीट्स .. तवकक्ल स्वीटसच्या बाजूला एका दुकानात चिकन बैदा रोटी खाल्ली आणि ती खात असतानाच डबल एग मालपुआची ऑर्डर दिली. पण तेवढ्यात तवकक्लच्या मालकाने हाक मारुन आत बोलावले. त्याने मलई खाजाची खूप तारीफ केली आणि एकदा खाउन बघाच असा आग्रह केला. मग आम्हीही त्याच्या विनंतीला मान देऊन मलई खाजा मागवला. माझ्या आयुष्यात मी बरेच मलई खाजा खाल्ले आहेत,पण याची टेस्ट काही न्यारीच होती.. तो पर्यंत मालपुआ पण आलाच होता, तो ही आम्ही हादडला आणि त्यानंतर ईद्रिस कोलडड्रींक मधून खस सरबत मागवले. आता आमचे पोट फुटायची पाळी आली होती. तिथून परत येताना मग आम्ही घरच्यांसाठी जेजे जिलेबी मधून जिलेबी आणि चीज&ग्रील मधून बिर्यानी पार्सल घेतली .

बैदा रोटी

baida roti

बैदा रोल
baida roll

रंगीत कबाब
kabab

चिकन तंदुरी
kabab

फिरनी
firani

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

29 Jul 2016 - 3:25 pm | पद्मावति

मस्तं!!

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2016 - 3:26 pm | टवाळ कार्टा

काय त्रास आहे चायला...पोटातले कावळे खवळले...कोणी या रैवारी येईल का कट्टा खादाडीसाठी

कविता१९७८'s picture

29 Jul 2016 - 3:28 pm | कविता१९७८

मस्त खादाडी पण तिथे मान्साहारामधे चिकनचे पदार्थ चाखणे बरे कारण बोकडा बरोबर अन्य प्राण्याचेही मटण मिळण्याची शक्यता असते.

उडन खटोला's picture

29 Jul 2016 - 3:39 pm | उडन खटोला

आधी विचारलं तर व्यवस्थित च देतात असा अनुभव आहे. माणूस बघून चौकशी करावी लागते एवढं च. खोटं बोलण्याची वृत्ती वैयक्तिक असते, सामाजिक नसते.

जगप्रवासी's picture

29 Jul 2016 - 4:17 pm | जगप्रवासी

एखादी अनोळखी डिश मागवली तर मालकाने ती मला खाऊ नको सांगितली कारण त्यात बीफ होते. त्याऐवजी मस्त चिकन डिश सजेस्ट केली आणि ती डिश अप्रतिम होती.

चंपाबाई's picture

29 Jul 2016 - 3:28 pm | चंपाबाई

छान

राजाभाउ's picture

29 Jul 2016 - 3:30 pm | राजाभाउ

मस्त !!!. फोटु पण भारी आहेत. फक्त त्या फोटोंखाली पदार्थंची नावे टाकली असतीत तर अजुन मजा आली आसती.

फोटोंखाली पदार्थंची नावे टाकली आहेत..

राजाभाउ's picture

29 Jul 2016 - 4:57 pm | राजाभाउ

धन्यवाद.

अनुप ढेरे's picture

29 Jul 2016 - 3:36 pm | अनुप ढेरे

कहर!

वेल्लाभट's picture

29 Jul 2016 - 4:05 pm | वेल्लाभट

कहर केलायत राव ! ! ! श्या!

ते फोटोखाली पदार्थाचं नाव टाका ना प्लीज.

वेड लागलंय. नेक्स्ट टॅम जाणार.

वेदांत's picture

29 Jul 2016 - 4:25 pm | वेदांत

फोटो खाली नावं टाकलीत...

सुधांशुनूलकर's picture

29 Jul 2016 - 4:14 pm | सुधांशुनूलकर

एका दुकानात (दुकानाचं नाव आठवत नाहि) पात्रा बिर्यानीही मिळते. ही चिकन बिर्यानीच असते, त्यात पात्रा (अळूवड्या) घातलेल्या असतात.

@ टवाळ कार्टा - एकदा महम्मद अली रोड खादाडी कट्टा झालाच पाहिजे.

त्या दुकानच नाव फिरोझ फरसाण ..

बोका-ए-आझम's picture

29 Jul 2016 - 4:15 pm | बोका-ए-आझम

पण तीन गोष्टी अजून हव्या होत्या - निहारी, हलीम आणि अफलातून. सुलेमान उस्मानकडेच अफलातून नामक मिठाई मिळते. ती कशापासून बनवलेली असते असा प्रश्न पडत नाही कारण ती खाल्ल्यावर जी गुंगी येते त्यात काही आठवण राहात नाही.

वेल्लाभट's picture

29 Jul 2016 - 4:17 pm | वेल्लाभट

अफलातून खाल्लीय दोन चार दा. जब्बरदस्त असते. एक नंबर.

अफलातुन छान असते. त्यात ही अंड मिसळतात..

सुधांशुनूलकर's picture

29 Jul 2016 - 4:37 pm | सुधांशुनूलकर

नहारी नल्ली आणि पाया हे नूर महम्मदी होटलची खासियत.

भिंगरी's picture

30 Jul 2016 - 12:25 am | भिंगरी

+++१११

भारी फोटो.. आम्ही मित्रांनी पुण्यात कौसरबागमध्ये खादाडी केली.

बाकी तो प्रकार "शोरमा" असा नसून "शवारमा" असा आहे. अरबी / लॅबनीज प्रकार आहे हा.

वेदांत's picture

29 Jul 2016 - 4:36 pm | वेदांत

माहिती बद्दल धन्यवाद ...

राजाभाउ's picture

29 Jul 2016 - 5:01 pm | राजाभाउ

बरोबर. टर्कीचा खाला होता, भारीय तो प्रकार.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2016 - 4:42 pm | मृत्युन्जय

लैच भारी

कोणतेही फोटो दिसत नाहीयेत. सर्व अक्षरंही गायब आहेत.

एकूण धागा दिसत नाहीये. काय तांत्रिक समस्या आहे काय की..

संदीप डांगे's picture

29 Jul 2016 - 6:28 pm | संदीप डांगे

वेदांत साहेब, गविना थेट मु रोड वर घेऊन गेल्याशिवाय त्यांना धागा दिसणार नाही याची नोंद घ्यावी ☺

मुक्त विहारि's picture

29 Jul 2016 - 4:56 pm | मुक्त विहारि

अशी जोडीच आहे.

छान एंजॉय केलेले दिसत आहे.

चाणक्य's picture

29 Jul 2016 - 5:16 pm | चाणक्य

कहर आहे हा धागा राव.

चाणक्य's picture

29 Jul 2016 - 5:19 pm | चाणक्य

कहर आहे हा धागा राव.

पी. के.'s picture

29 Jul 2016 - 5:35 pm | पी. के.

5:30 ला असला धागा... पोटातले कावळे खवळले ना राव. कावळे शांत करण्यासाठी आता एका कोंबडीचा बळी जाणार..

या हि रमजान मध्ये शवारमा खायचा राहून गेला. दोस्तांनी चोकशी केली होती, हॉटेल नूर मोहमदी मध्ये मिळाला नाही. आता मुंबई मध्ये कुठे भेटेल शवारमा?

बाकी फोटो आणि वर्णन अप्रतिम.

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2016 - 6:58 pm | टवाळ कार्टा

पम्याच्या कळव्यात मिळतो :)

प्रमोद देर्देकर's picture

1 Aug 2016 - 3:14 pm | प्रमोद देर्देकर

बरोबर आहे तु कळव्याच्या बाहेरच राहातोयस. खरा कळवा (पुण्याच्या धर्तीवर) फक्त जुना बेलापुररोड ते जुना पुणारोड यात वसलेला आहे.
तद्वत मनिषानगर म्हणजे तुम्ही कळव्याच्या पलिकडे रहाता. कोई शक

मुक्त विहारि's picture

29 Jul 2016 - 7:18 pm | मुक्त विहारि

आमच्या डोंबोलीतील पी.अँड टी. कॉलनीत, गिरनार चौकात मिळतो.

बोका-ए-आझम's picture

29 Jul 2016 - 7:38 pm | बोका-ए-आझम

Shawarma Factory नावाची जागा आहे. अप्रतिम मिळतो. शिवाय मारूश मध्येही बरा मिळतो लोअर परेलच्या हाय स्ट्रीट फिनिक्समध्ये.

सिरुसेरि's picture

29 Jul 2016 - 6:48 pm | सिरुसेरि

महम्मद अली रोड वरचा फालुदा फेमस आहे .

नूतन सावंत's picture

29 Jul 2016 - 7:20 pm | नूतन सावंत

बरीच वर्ष गेलोय पण गेली आणितीन चार वर्षे जायला मिळत नाहीय मोहम्मद अली रोडवर,पण ती कसर माहीमला,कापडबाजारात भरून काढता येते.जुन्या आठवणी जागवल्यात मात्र.

बोका-ए-आझम's picture

31 Jul 2016 - 7:07 pm | बोका-ए-आझम

तिथे खिचडा अफाट मिळतो. पण बाकी प्रकारही मिळतात?

नूतन सावंत's picture

22 Aug 2016 - 10:06 pm | नूतन सावंत

लेडी जमशेटजी मागरगाच्या सुरुवातीपासून वीर सावरकर मार्गपर्यंत आणि कापडबाजार ठेले लागलेच असतात.तसेच ताजा,सागर,पॅरामाउंट,शहनाझ,आणि आता दिल्लीदरबार आहेच.शावरमा दिल्लीदरबारमध्येही छान मिळतो.

जबरदस्त आलेत फोटो...भुक चाळवली.

महंमद अली रोडला मी माझ्या मुस्लिम मित्रांसोबत जात असे ते दिवस आठवले. दिवसभर त्यांची ईदच्या खरेदीसाठी सोबत फिरून इफ्तारनंतर भरपूर पेटपूजा...धम्माल होती.

द फुडीचा खालील एपिसोडपण पाहण्यासारखा आहे.

खटपट्या's picture

29 Jul 2016 - 9:33 pm | खटपट्या

बाबौ...नका ओ नका

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Jul 2016 - 9:41 pm | माम्लेदारचा पन्खा

फोटोतले रंग मात्र छानच !

त्रिवेणी's picture

29 Jul 2016 - 9:49 pm | त्रिवेणी

माकड

टेम्प्टींग आहेत सगळे फोटो...यातला एकही पदार्थ खाण्याचा योग अजून आला नाहीये.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

31 Jul 2016 - 7:39 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

बिफचं टेंशन घेऊ नका ,आजकाल ढाब्यावर मिळणार्या खिमा पदार्थात सर्रास बीफचा खिमा असतो.

वेदांत's picture

22 Aug 2016 - 10:28 am | वेदांत

शनिवारी अत्तर आणण्यासाठी मोहमद्द अली रोड ला गेलो होतो, येताना तवक्कल स्वीट्स मधून सीतफळ मलई, मँगो मलई आणी मलई खाजा घेऊन आलो.

malai khaja

malai -khaja-2

malai khaja -3

पद्मावति's picture

22 Aug 2016 - 4:00 pm | पद्मावति

ओह....वॉव....मस्तं, मस्तं!
sinfully आकर्षक.

च्यामारी. कसलं भारीय हे. एक लंबर टेम्प्टिंग फटू

जुलूम आहे तवक्कल म्हणजे. मलई खाजात अगदी हलकं केशर असतं. त्याने अशी भूक चाळवते....

वेदांत's picture

24 Aug 2016 - 9:42 am | वेदांत

गुलाबजल ही असतं..

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Aug 2016 - 2:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

जुलुमी धागा आणि प्रतिसाद !

नुसती नावे वाचूनच तोंडाला पाणि सुटले. हे एक बर झाल मला फोटोच दिसत नाहीत.

समीरसूर's picture

23 Aug 2016 - 10:01 am | समीरसूर

बेहतरीन लेख! जबरस्त वर्णन!

चतुरंग's picture

24 Aug 2016 - 1:14 am | चतुरंग

धागा हा कहर गडे
उघडुनि मज खिजवु नका!
फोटो हे जुल्मि गडे
दावुनि मज खाऊ नका!

-(सपशेल संपलेला)रंगा

बॅटमॅन's picture

24 Aug 2016 - 2:17 am | बॅटमॅन

संपलो, मेलो, वारलो. काय कहर धागा तेच्यायला. एस्पेशली तो मलई खाजाचा फटू म्हणजे अगायायायायायायायायाया, ठार झाल्या गेले आहे. _/\_

कैलासवासी सोन्याबापु's picture

24 Aug 2016 - 9:58 am | कैलासवासी सोन्याबापु

बा बॅटू बऱ्याच दिवसांनी दिसल्यास भावा!

विशाखा राऊत's picture

24 Aug 2016 - 3:13 am | विशाखा राऊत

मस्त धागा

२६ मेपासून या वर्षीचा रमजान सुरु झाला आहे.

त्यातला एकही फोटो दिसत नाही हे उत्तम.

पुढच्या आठवड्यात जायचा प्लॅन नक्की झालाय. हलीम कुठं भेटेल?

धागा उघडल्याचा पश्चात्ताप होत आहे.