चेन्नई भेट

उमेश पाटील's picture
उमेश पाटील in काथ्याकूट
27 Jul 2016 - 9:27 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

कार्यालयीन कामानिमित्त चेन्नई ला १५ दिवस राहण्याचा योग आला आहे. कोणी मिपाकर चेन्नई ला असतील तर कृपया कळवा.

उमेश. ८७६७४६८७६८

प्रतिक्रिया

सुंड्या's picture

28 Jul 2016 - 12:21 am | सुंड्या

आठशे छहात्तर सात-४६-आठशे छहात्तर आठ.

विटेकर's picture

28 Jul 2016 - 9:35 am | विटेकर

छहात्तर ?
छहात्तर नाही हो ..... शहात्तर !
लिहा आता १० वेळा शहात्तर ..... शहात्तर

आणिओ चोप्य पोस्त करायचे नाही !

सुंड्या's picture

28 Jul 2016 - 10:50 am | सुंड्या

आधी 'श'च होता हो,पण हिंदी-मराठीची सरमीसळ झाली ...धन्स.
श-शाळेचा,
ह-हत्तीचा (च्या**) 'ह'ला काना -हाss!
त-तलवारीचा 'त' ला अर्धा त -त्तं !
र-रथाचा
श...हा...त्त...रं...(गीरवतो आता)
शहात्तर
शहात्तर
शहात्तर
शहात्तर
शहात्तर
शहात्तर
शहात्तर
शहात्तर
शहात्तर
...

उमेश पाटील's picture

28 Jul 2016 - 11:39 am | उमेश पाटील

नंबर साठी आणि शहात्तर साठी

चेन्नई च्या महाराष्ट्र मंडळ ला भेट द्या. मी तिथे 6 महिने राहिलो होतो. शांत, निवांत ठिकाण आहे. आणि हो, रात्री जेवायला तिकडे गेलात तर पोळी खायला मिळेल :)

उमेश पाटील's picture

28 Jul 2016 - 11:38 am | उमेश पाटील

माहिती साठी आभारी आहे. नक्की भेट देतो

सिरुसेरि's picture

28 Jul 2016 - 12:48 pm | सिरुसेरि

चेन्नई महाराष्ट्र मंडळ हे चेन्नई मध्यवर्ती ( सेंट्रल ) रेल्वे स्थानकापासुन रिक्षाने साधारणपणे २० मिनीटावर आहे . रिक्षाने ३० ते ४० रुपये होतात जे आधीच ठरवावे लागतात . चेन्नई महाराष्ट्र मंडळ हे वेपेरी या भागात आहे . पत्ता सांगताना " जी व्ही के संपत रोड , वेपेरी " असे सांगावे . या मंडळाचे बहुतेक संचालक मंडळ , सभासद हे जरी मराठी असले , तरी अ‍ॅडमिन स्टाफ हा नॉन मराठी आहे . पण त्यांना हिंदी येते . तुम्हाला तिथे राहायचे असल्यास आधीच बुकिंग करुन ठेवणे बरे पडेल .

मुक्त विहारि's picture

28 Jul 2016 - 1:09 pm | मुक्त विहारि

चेनै स्टेशन पासून "बीच" स्टेशनला चालत यायचे. वेळ ५ ते ६ मिनिटे.

"बीच" स्टेशन पासून तांबारम लोकल पकडायची. २रे किंवा ३रे स्टेशन म्हणजे "एगमोर". ५ रु. तिकीट आहे.

एगमोर स्टेशन पासून चालत ३-४ मिनिटे आहे.

रेल्वे नको असेल तर, चेनै स्टेशन पासून एग्मोरला जायला दर ५ मिनिटांनी बस आहे.

बादवे,

विमानाने जाणार असाल तर,

विमानतळ ते "त्रिशूलम" स्टेशन चालत, १०-१२ मिनिटे.

तिशूलम ते बीच लोकल पकडायची (ही लोकल तांबारम हून येते.) आणि एगमोरला उतरायचे.

१० रुपयात जाल.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मी माझा घाम गाळत नाही.

गूगल मॅप देत आहे.

https://www.google.co.in/maps/place/Maharashtra+Mandal,+Mahaveer+Colony+...@13.0874616,80.2552008,15z/data=!4m5!3m4!1s0x3a5265e2108d8db5:0xc104b7f05dd2fd69!8m2!3d13.082712!4d80.2608013

मुक्त विहारि's picture

28 Jul 2016 - 1:12 pm | मुक्त विहारि

धागाकर्त्याला आहे.

"सिरुसेरी" ह्यांना नाही.

चुकी बद्दल क्षमस्व

उमेश पाटील's picture

28 Jul 2016 - 2:30 pm | उमेश पाटील

माहिती साठी खूप खूप आभारी आहे, खास करून फोनवर उत्तम मार्गदर्शन मिळाले

कधीही फोन करा.

आता चेनैला जाणारच आहात तर,

चेनैच्या आसपासची आणि खूद्द चेनै मधली, जमतील तितकी ठिकाणे पाहून या आणि इथे पण त्याची माहिती दिलीत तर उत्तम.

ही लिंक बघीतलीत तर उत्तम. (http://www.trawell.in/chennai/200kms?more=2)

चेनै रेल्वे स्टेशन पण बघण्यासारखे आहे, अगदी आपल्या बोरीबंदर सारखेच.

इतकी मोठी लिंक देण्यापेक्षा पुढच्यावेळी असा पत्ता द्या की 7M5237M6+38 ;)

उमेश पाटील's picture

28 Jul 2016 - 2:29 pm | उमेश पाटील

माहिती साठी खूप खूप आभारी आहे

कबीरा's picture

28 Jul 2016 - 4:56 pm | कबीरा

तामसिक आहार करत असाल तर चेट्टीनाड चिकन अवश्य चाखून बघा.

वा वा, बाकी हा धागा चालू करून जुन्या दिवसात घेऊन गेलात बघा तुम्ही. लौट आए हम वो गलिया...

अमितदादा's picture

28 Jul 2016 - 5:25 pm | अमितदादा

+11. लौट आए हम वो गलिया...बाकी लेखक महाशय वेळ मिळाल्यास कांचीपुरम आणि महाबलीपुराम ला भेट द्या..

उमेश पाटील's picture

30 Jul 2016 - 6:03 pm | उमेश पाटील

आता चाललोच आहे तर जेवढे जमेल तेवढे फिरणार च आहे

उमेश पाटील's picture

30 Jul 2016 - 6:01 pm | उमेश पाटील

बरेच ऐकून आहे चेट्टीनाड चिकन बद्दल या वेळी खाऊन च बघतो

सिरुसेरीजी तुम्हाला कशी हो ईतकी माहीती? उपरोधाने नव्हे तर खरेच उत्सुकतेने विचारतोय.
तमिळ गाणी, मुव्हीज सगळ्या माहीत असतात, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद पण माहीती आहे, अगदी डिट्टेल खदाड्या आणि पत्ते पण माहीती असतात, कन्नड, तेलुगु पण माहीत असते. खूप फिरला आहात का कामानिमित्त? सिरुसेरी हे चैन्नैच्या सबर्बचेच नाव आहे ना?

उमेश पाटील's picture

30 Jul 2016 - 5:54 pm | उमेश पाटील

आधी बुकिंग करूनच जाणार आहे, बघुया चेन्नई कस आहे ते

धन्यवाद . सिरुसेरि या नावामुळे मी तामिळनाडु/तंजावुरी भागातला आहे असा कोणाचाही समज होणे साहजिक आहे . सिरुसेरी येथे चेन्नईमधील एक आयटी पार्क (सेझ) आहे . तिथे कामानिमित्त होतो . तेव्हाच मिपाचा आयडी या नावाने मिळाला . मी साधारण ३ वर्षांसाठी (त्यापेक्षा जास्त नाही) कामानिमित्ताने चेन्नई , हैदराबाद , बंगलोर या ठिकाणी राहिलो आहे . त्यामुळे वाण नाही पण गुण लागला आहे . हि ३ वर्षे सोडली तर बाकी सर्व वर्षे मी महाराष्ट्रामध्येच राहिलो आहे . राहत आहे. तंजावुरी मराठीबद्दल मी ऐकुन आहे . पण माझा फारसा त्या भाषेशी संबंध आला नाही . एके काळी सोलापुरच्या भागवत थिएटरला रविवारी रात्री ९ ते १२ चा शो बघायचा आणी मग हैद्राबादला जाणारी बस पकडायची असे टाईम टेबल होते. त्यामुळे सोलापुरला जाणे येणे होते .

अभ्या..'s picture

29 Jul 2016 - 3:11 pm | अभ्या..

भारीच.
या आता एकदा सोलापूरला. भागवतमध्येच आता दोन मल्टीप्लेक्स झालेत. जुनी थियेटर पण आहेतच. चित्रमंदीर वगैरे.

मद्रासेत आता रिक्षा मीटर ने धावतात

पी. के.'s picture

30 Jul 2016 - 3:09 pm | पी. के.

सरावांना भवन ला अल्पउपाहार जरुर करा.
मांसाहारी असाल तर चेन्नई मध्ये बऱ्याच हॉटेल मध्ये रॅबिट (ससा) मसाला भेटतो जरुर खा.
चेन्नई मध्ये संग्रहालय हि खूप छान आहे. मरिना बीच ला तर जाल च जवळचं विवेकानंद हौस ( आईस हौस) ला सुद्धा जा आणि टी नगर ला खरेदी तर झालीच पाहिजे.

टीप:- भात चमच्याने खायचा टाळा.

उमेश पाटील's picture

30 Jul 2016 - 5:57 pm | उमेश पाटील

ससा मला पण फार आवडतो नक्की खाणार आणि खरेदी च्या टीप देऊ नका अजून नाहीतर बायकोचा प्लॅन तयार होईल चेन्नई जाण्याआधी

वरुण मोहिते's picture

30 Jul 2016 - 4:11 pm | वरुण मोहिते

बाकी एग्मोर ला पण फिश छान मिळत वेळ असला जरूर जा ...तिथून पुढे अंदमान ला बोटी जातात आमचे कामगार असायचे मग त्यांचा उपडेट घेणं आणि ७०mm नावाचा बार होता तिथे रोज बसणं .. हा कार्यक्रम होता ..फिश जरूर खा खात असलात तर

उमेश पाटील's picture

30 Jul 2016 - 5:59 pm | उमेश पाटील

नक्की, मासे तर आपले आवडते, अर्थात सर्व मांसाहार करतो तरी काही अडचण नाही येणार

कानडाऊ योगेशु's picture

30 Jul 2016 - 6:11 pm | कानडाऊ योगेशु

चेनैमधले वातावरण कसे आहे ते कळविणे. मी येत्या दोन तीन महीन्यात तिथे जायचा विचार करतो आहे. मागच्या वर्षे पावसाळ्यात चेनैत प्रलयसदृश परिस्थिती झाली होती.

उमेश पाटील's picture

31 Jul 2016 - 7:34 pm | उमेश पाटील

नक्की कळवितो

उमेश पाटील's picture

8 Aug 2016 - 7:46 pm | उमेश पाटील

चेन्नई मध्ये वातावरण साधेपण आहे, दुपारी चटके बसतात उन्हाचे.

विनटूविन's picture

22 Jan 2019 - 2:32 pm | विनटूविन

मुलगा 2015 पासून चेन्नईत (थिरुनिन्रावूर) ला शिकायला असतो.
नेहमी आम्ही प्लान करून विमानाचे तिकिट काढतो.
पण यावर्षी परिक्षेने दगा दिला आहे. तारीख लांबली आहे आणि ती कोणती हे कळत नाही. तरीही साधारण आठ दिवस मिळत आहेत. विमान प्रवास तातडीच्या बुकिंग साठी भलताच महाग आहे.
अशा परिस्थितीत बसने प्रवास करून येऊन आठ दिवस राहून जाता येईल का अशा शक्यतेस अजमावून पाहतो आहोत.
कुणाला चेन्नई पुणे बसेस बद्दल काही माहिती असेल तर प्लीज इथे शेअर करा.