अंबाड्याचे लोणचे

जागु's picture
जागु in पाककृती
21 Jul 2016 - 3:08 pm

साहित्यः
१ किलो अंबाडे
पाव किलो जाडे मिठ (नसेल तर घरचे बारीक चालेल)
१०० ग्रॅम राईची डाळ
१ चमचा मेथी
१ छोटा चमचा हिंग
४ चमचे हळद
८ चमचे लाल तिखट
तेल पाव किलो (गरज लागल्यास जास्तही लागू शकत).

कृती :
अंबाडे म्हणजे लहानपणीचा रानमेवा. लहान असताना अंबाडे म्हणजे आंबट कैरीसारखे तिखट मिठ लावून खाण्याचा एक टाईमपास खाऊ. ह्याचे मोठे झाड असते. जेव्हा अंबाड्याचा सिझन नसतो तेव्हा आम्ही लहानपणी ह्या झाडाचे देठ व कोवळी पाने खायचो. त्यालाही आंबाड्याचा वास व आंबटपणा असायचा. आंबाडे खाताना एक विशिष्ट गंध जाणवतो अंबाड्याचा. हे पिकले की बाठा तयार होऊन पिवळे होतात. गर मऊ होतो व थोडी गोडच चव व अंबाड्याचा विशिष्ट वास एकत्र झाल्याने खायला मजा येते. कच्चे अंबाडे मिठात मुरवूनही खातात. मिठाच्या पाण्यात अंबाडे टाकून ठेवायचे व साठवणूक करुन हवे तेव्हा खायचे. अंबाड्याची चटणी, रायते केले जाते. जुन-जुलै दरम्यान लोणच्यासाठी तयार होतात. शक्यतो बाठा धरण्यापूर्वीच लोणचे घालायला घ्यायचे. म्हणजे गरही जास्त मिळतो आणि कापायलाही सोपे पडतात.

आता आपण रेसिपी पाहू.

अंबाडे स्वच्छ धुवून त्याच्या उभ्या चार फोडी कराव्या.

मिठ भाजून घ्यायचे, थोड्या तेलावर मेथी परतायची. मिठ व मेथी एकत्रच मिक्सरमधे बारीक करून घ्या.
आता मोहरीचा गर, हिंग, हळद्, लाल तिखट, व बारीक केलेले मेथीसकट मिठ एकत्र करून घ्या.

हे मिश्रण अंबाड्यांच्या फोडींवर मिसळून घ्या.

कढईत तेल चांगले कडकडीत तापवून मग थंड करुन ह्या मिश्रणावर ओतुन एकजीव करा.
झाले लोणचे तयार. आठ दिवसांनी खायला काढा.

टिपा:
बरणीत भरल्यावर तेल फोडींच्या वरती राहील असे पहा म्हणजे खराब होणार नाही. जर तेल कमी पडत असेल तर अजून गरम करून थंड करून घाला.

लहान मुलांना हे लोणच जास्त आवडत.

प्रतिक्रिया

बरखा's picture

21 Jul 2016 - 3:24 pm | बरखा

अंबाडे हे नाव मि प्रथमच एकले आहे. हे फळ पुण्यात मिळते का ? फळांच्या मिळण्याचा काही सीझन असतो का?
रेसीपी बघुन छान वाटते आहे. अंबाडे मिळाले तर करुन बघेन.

रघुनाथ.केरकर's picture

21 Jul 2016 - 5:20 pm | रघुनाथ.केरकर

आमच्या कोकणात "खारातले आंबाडे" करतात, आंबाडे स्वच्छ धूउन खारट पाण्याच्या बरणीत भरुन ६ -१२ महिने टीकवता येतात, आमच्या घरी मात्र २ - ३ महीन्यात फस्त होतात. लहानपणी आम्ही आंबाड्याच्या फांद्यांच्या टोकाकडच्या पानांना चाउन खात असु. आंबटशी चव लागायची.

आम्ही पण खायचो. आणि कोवळा पालाही.

कविता१९७८'s picture

21 Jul 2016 - 3:34 pm | कविता१९७८

मस्तच

अंबाड्याचे थोडक्यात वर्णन मी वर दिलेले आहे. कोणतेही नविन भाजी किंवा फळ घेताना खात्रीपूर्वक घ्या ही नम्र विनंती.
अंबाडे आंबट असतात.

मुक्त विहारि's picture

21 Jul 2016 - 5:43 pm | मुक्त विहारि

बी लावल्या नंतर साधारण किती वर्षांनी अंबाडे मिळतात?

आमच्या शेतात लावायचे म्हणतो.

आंबाड्याचे बाठे असतात. मोठ्या नर्सरीत मिळू शकतील रोपे. तुम्ही कुठे रहाता?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2016 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटच्या ताटवाल्या फोटूत जाऊन बसलो हाय. अता नै येणार भायेर!

आता तुम्हाला बरणीत बसावे लागेल. (हाहा ..)

तोंपासु.यांना आंबाडे म्हणतात माहितच नव्हतं. आता आणुन बघेन.

हे पण मस्तच दिसतंय....तों पा सु !

स्रुजा's picture

22 Jul 2016 - 12:57 am | स्रुजा

भारी दिसतंय. पण अंबाडीची भाजीच माहिती होती इतके दिवस. फळ पहिल्यांदा च पाहिलं.