साहित्य:२०० ग्रॅम किसलेले चॅाकलेट,२०० ग्रॅम काजूची पावडर, ३ टेबलस्पुन साखर, १ टीस्पुन कोमट दुध, थोडस केशर, पाव कप तूप,५ हिरव्या वेलायचीची पावडर, ८-१० पिस्ताचे उभे काप
कृती:एका पैन मध्ये ५० मिलीलिटर पाण्यात साखर विरघळवा, याचा एकतारी पाक तयार करा, केशर एक चमचा कोमट दुधात खलून घ्या.
आता साखरेच्या पाकात काजूची पावडर घाला, गैसवर ठेवून हे मिश्रण एकजीव झालं की गैस बंद करा, यामध्ये दूधमिश्रित केशर घाला, या मिश्रणाच्या गुठळ्या होउ देऊ नका, हे मिश्रण पुन्हा गैसवर ठेवून यामध्ये तूप आणि वेलचीपूड घाला यातील तूप वितळलं की गैस बंद करा, हे मिश्रण थंड होउ द्या आता हाताला तूप लावून घ्या मिश्रणाचे एकसमान भाग करा आणि त्यांना लाडवाचा आकार द्या हे लाडू किसलेल्या चॅाकलेट मध्ये घोळवा, वरुन पिस्त्याचे काप लावून सुशोभित करा. झटपट होणारे लाडू लहान मुलांच्या वाढदिवसाला सोयिस्कर आणि मुलांना आवडतील असे असतात.
प्रतिक्रिया
20 Jul 2016 - 11:36 am | तुषार काळभोर
फाऊल!!!
20 Jul 2016 - 11:40 am | मदनबाण
इ का ? फोटो किधर कु है ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hello (Adele) - Indian Classical Version
20 Jul 2016 - 11:44 am | अत्रुप्त आत्मा
फोटूऊऊऊऊऊऊऊऊऊ!
21 Jul 2016 - 6:47 am | Bhagyashri sati...
फोटो टाकायला शिल्लक नाही राहिले लाडू!
22 Jul 2016 - 1:30 am | विद्यार्थी
अहो लाडूच तर आहेत ते, अजून थोडे करा. पाककृतीचा फोटो असल्याशिवाय मजा नाही बघा :-)
22 Jul 2016 - 11:16 am | संजय पाटिल
बरोबर! आता परत लाडू करा, फोटो काढा आणि इथे प्रतिक्रीया मधे टाका..
22 Jul 2016 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा
@फोटो टाकायला शिल्लक नाही राहिले लाडू! ››› पुन्यांदा य़ेक डाव करा. आनी टाका हितं फोटू!
22 Jul 2016 - 3:31 pm | सत्याचे प्रयोग
फोटू शिवाय पाकृला मजा नाय . फोटू पायजेत फोटू .
22 Jul 2016 - 4:04 pm | पक्षी
फटू पायजे म्हणजे पायजे....
22 Jul 2016 - 6:38 pm | अभ्या..
आमची आज्जी असती तर म्हणली असती "एवढं सगळं घालून कशाला वाईट लागणारे. भारीच होणार की"
;)
23 Jul 2016 - 6:23 pm | Bhagyashri sati...
थोडे अवांतर मी सतिश तुकाराम वासने मी मिसळपावाचा २०१० पासुन वाचक आहे.पण माझी मुलगी सदस्य झाली.त्यामुळे मी देखील प्रतिक्रिया देऊ शकतो.इथे आपल्या माहितीत भरच पडते.सर्व मिपाकरांचे मनापासुन धन्यवाद
23 Jul 2016 - 6:32 pm | अभ्या..
सतीशराव तुम्ही पण व्हा सदस्य स्वतंत्र नावाने. १२ वीतली मुलगी लिहितेय म्हणून आधी एका कथेबद्दल सांगितले गेले. ती लिहित असेल अन आवड असेल तर आता तिला हे अकाउंट वापरु द्या. तुम्ही पण लिखाणाचे वाचनाचे चाहते असाल तर सेपरेट अकाउंट तयार करुन या. स्वागत करु तुमचे पण.
24 Jul 2016 - 8:32 pm | Bhagyashri sati...
सर्व मिपाकर कसे दिसत असतील बघण्याची खुप ईच्छा आहे
24 Jul 2016 - 9:23 pm | माम्लेदारचा पन्खा
त्यांच्या काय डोक्यावर शिंगं असतात का मागे शेपट्या ?
माणसासारखी माणसं ती...दिसतील तुम्हाला... जरा धीर धरा...!
1 Aug 2016 - 6:19 pm | सूड
काही मिपाकर अवसेच्या रात्री हरणटोळ, मांजर, ड्रॅक्युला असे कायापालट करतात. त्यामुळे जरा सावध!!
25 Jul 2016 - 12:09 am | Bhagyashri sati...
तसं नाहीं हो, मागे कधीतरी काही मिपाकरांचे फोटो पाहिले होते
1 Aug 2016 - 5:43 pm | कुणाल धस
फोटो टाका madam.
बाकी पाककृती छान लिहिली आहे. करून बघावे लागेल.